नासाचे पार्कर सोलर प्रोब सौर यान सूर्याच्या कक्षेत शिरताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -27 डिसेंबर
आकाशातील तळपत्या तेजोमय सुर्याच्या ऊगवण्याने सृष्टीतील चराचरातील चेतना
जागृत होते सर्वत्र प्रकाश पसरतो पण सूर्याच्या प्रखर उष्णतेने सृष्ठी
होरपळते प्रखर उष्णतेच्या तेजाने तळपणाऱ्या सूर्याकडे आपण उघड्या डोळ्याने
पाहू शकत नाही आपले डोळे दिपतात आपली पृथ्वी सूर्यापासून करोडो मैल दूर
असून आपली हि अवस्था होते मग सूर्याच्या जवळ किती तीव्र उष्णता असेल ह्याची
कल्पना आपण करू शकतो अशा वेळेस एखादे अंतराळयान सूर्याच्या जवळच नाही तर
त्याच्या तळपत्या तेजोवलयात शिरून प्रत्यक्ष सूर्याला स्पर्शून आल ह्या वर
सहजासहजी विश्वास बसणार नाही पण आजच्या बुद्धिमान शास्त्रज्ञाच्या प्रगत
यांत्रिक युगात हे शक्य झालय नासाच्या पार्कर सोलर प्रोबने हे काम केलय
पार्कर सौर यानाने सूर्याच्या करोना ह्या भागात म्हणजेच तेजोवलयात प्रवेश
केला आणि तोही एकदाच नाही तर तीनदा आणि तेथील विध्युत भारित कणांचे
सॅम्पल्स देखील गोळा केले आहेत पार्कर सौरयान मिशनचे शास्त्रज्ञ,टीममधील
इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञ ह्यांच्यामुळे हे ऐतिहासिक यश प्राप्त झाले
आता 24 डिसेंबरला पुन्हा Parker Solar probeने सूर्याच्या कक्षेत अत्यंत जवळ पोहोचून वेगाने फेरी मारण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आणि पार्कर सोलर प्रोबने त्याचा सूर्याच्या कक्षेत अत्यंत वेगाने फेरी मारण्याचा जुना विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे 24 डिसेंबरला पार्कर प्रोबने सूर्याच्या कक्षेत अत्यंत जवळून ताशी 430,000 मैल वेगाने फेरी मारत ऐतिहासिक नोंद केली आजवरच्या ईतिहासात पहिल्यांंदाच अशी घटना घडली आहे आजवर एकही सौरयान सुर्याच्या ईतक्या जवळ गेले नव्हते 26 डिसेंबरला नासा संस्थेला मिळालेल्या Beacon toneच्या संदेशानुसार पार्कर सोलर प्रोबने सुरक्षितपणे सूर्याभोवती अत्यंत वेगाने फेरी मारली आणि अजूनही सूर्याभोवती फेरी मारत आहे इतक्या उष्ण तापमानात जवळून फेरी मारल्यानंतरही हे सौर यान हि मोहीम यशस्वी करत सुरक्षित राहिल्याने शास्त्रज्ञांचे मत बदलण्यास मदत मिळाली आहे शास्त्रज्ञ 1958 सालापासून सूर्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आता इतक्या वर्षांनी हा ऐतिहासिक क्षण आला आहे असे पार्कर सौर यान मोहिमेतील सिस्टिम इंजिनीअर म्हणतात
नासा संस्थेतील Associate Administrator -(Science Mission Directorate) Nicky FOX म्हणतात ," पार्कर सौर यानाची सूर्याच्या कक्षेत शिरून इतक्या जवळून फेरी मारण्याची हि पहिलीच ऐतिहासिक घटना आहे त्या मुळे आता शास्त्रज्ञांना सोलर सिस्टिमचा सखोल अभ्यास करता येईल सूर्याचा सौरमंडळ आणि अंतराळावर पडणारा प्रभाव शिवाय सूर्याकडून सजीव सृष्टीला दररोज मिळणारी ऊर्जा ह्या बाबतीत संशोधन करता येईल आपल्या सौरमाले बाहेर आपल्या पृथ्वीसारखे सजीव सृष्टीचे अस्तित्व आहे का? हेही शोधता येईल पार्कर सौर यान 2018 मध्ये सुर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले तेव्हा पासून शात्रज्ञ गेली सात वर्षे
ह्या क्षणाची वाट पाहात होते !"
2018 साली पार्कर सोलर सौर यान सूर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते सूर्याच्या कक्षेत शिरण्याआधी पार्कर सौरयानाने शुक्राभोवती सात फेऱ्या मारल्या होत्या आणि सातव्या फेरीत शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करीत सूर्याचा कक्षेत प्रवेश केला होता सूर्याभोवतीची कक्षा अंडाकृती आकाराची असल्यामुळे पार्कर सौर यान यानातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेने दर तीन महिन्यांनी सुरक्षित अंतर ठेवून भ्रमण दिशा बदलत सूर्याच्या उष्णतेपासून यान सुरक्षित ठेवतो तेथील प्रचंड ऊष्णतेमुळे आणि रेडिएशन मुळे सर्व क्षणात जळून खाक होईल पण पार्कर यानाची निर्मिती करताना त्यात थर्मल प्रोटेक्शन सिस्टिम बसविण्यात आल्यामुळे यान सूर्याच्या कक्षेत आतपर्यंत पोहोचले आणि सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी ठरले
पार्कर सौर यानाचे प्रोजेक्ट सायंटिस्ट Nour Rawafi म्हणतात ,"पार्कर सौर यानाने सूर्याच्या अंतर्गत भागात पोहोचून अत्यंत उष्ण भागात भ्रमण करीत यान सुरक्षित ठेऊन हि मोहिम शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त यशस्वी केली आहे सूर्याच्या करोना भागात 1 मिलियन डिग्री फॅरनहिट इतकी उष्णता असते अशा वातावरणात यानाला इजा पोहोचु नये म्हणून यानाच्या वरच्या भागात कार्बन फोमची शिल्ड बसविण्यात आली आहे त्या मुळे यान सूर्याची 2,600 डिग्री फॅरनहिट उष्णता सहन करू शकेल अशा वातावरणात स्टील देखील वितळेल पण हि शिल्ड आगीपासून यानाचे संरक्षण करेल !"
ह्या आधी पार्कर यानाने सुर्याभोवतीचे वातावरण व सौरवादळ ह्या मधील सिमारेषा भेदत सूर्याच्या कक्षेत प्रवेश केला त्यावेळी यान सुर्याच्या मध्यापासून 3.83 मिलीयन मैल अंतरावर पोहचले होते चार पाच तासाच्या काळात यानाने तिनदा करोना कक्षेत प्रवेश केला आणी यानात बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने तेथील विध्युत भारीत पार्टिकलस पण गोळा केले होते
पार्कर
यानाने 2019 मध्ये पाठविलेल्या माहितीमुळे सुर्याभोवतीचे तेजोवलय अशाच
सौरवादळामुळे तयार होते आणी त्याचा आकार Zig -Zag आहे हे कळाले त्याला
Switchbacks म्हणतात आणी हा भाग सुर्याच्या अत्यंत जवळ आहे पण हे कोठे आणी
कसे तयार होतात ह्या बाबतीत डिटेल माहिती मिळाली नव्हती पण पार्कर यान
करोना भागात शिरल्याने आणि त्याने सॅम्पल्स आणि फोटो घेतल्यामुळे सखोल
संशोधनानंतर ह्या संबंधित माहिती प्राप्त झाली होती
सुर्य पृथ्वीसारखा Solid नाही तेथे जमीन नाही तो प्रचंड धगधगता आगीचा गोळा आहे तेथे प्रचंड ऊष्णतेमुळे सतत आगीच्या धगधगत्या ज्वाळा बाहेर पडतात आणी त्यातून प्रचंड वेगाने बाहेर पडणारे वायू,धुळ,विद्युतभारीत कण ह्यामुळे तेथे सतत सौरवादळ होते आणी तेथे असलेल्या मॅग्नेटिक फिल्ड आणी ग्रॅव्हिटीमुळे हा आगीचा डोंब गोळ्याच्या कींवा बॉलच्या आकारात बांधला जातो ह्या विद्युतभारीत कणांनी सुर्याच्या आतील भागातील Plasma तयार होतो तेथील मँग्नेटिक फिल्ड मुळे तो तेथेच फिरत रहातो पण जेव्हा आगीचा प्रचंड दाब येतो तेव्हा हे पार्टिकल अत्यंत वेगाने बाहेर फेकले जातात आणि तेथे फिरत राहतात अशी संशोधित माहिती व फोटो पार्कर सौर यानाने आतापर्यंत गोळा केली होती आता सूर्याच्या अत्यंत उष्ण अंतर्गत भागातील यशस्वी फेरीमुळे शास्त्रज्ञांना आता करोना भागातील अंतर्गत उष्णतेचे मोजमाप तिथून उत्सर्जित होणारी किरणे आगीच्या ज्वाळा आणि इलेक्ट्रिकल ,मॅग्नेटिक भारित सौरकण ,सौरवादळाची संशोधित सखोल माहिती मिळेल
























2 CHAPEA-1 मोहिमेतील पहिल्या गृप मधील कमांडर Kelly Haston, Ross Brockwell ,Nathan Jones आणी Anca Selariu -फोटो -नासा संस्था 