Monday 9 September 2024

Boeing Star Liner अंतराळयान अंतराळवीरांविना स्वयंचलित यंत्रणेने स्थानकातून पृथ्वीवर सुरक्षित परतले

 

 Night vision view of Boeing's Starliner and its parachutes descending to New Mexico.

Boeing Star Liner अंतराळयान White Sand Space Harbor-New Mexico येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था -7 सप्टेंबर 

नासा आणि बोईंग कंपनीच्या Boeing Star Liner अंतराळयानाच्या Flight Test साठी नासाचे अंतराळवीर Sunita  Williams आणि Butch Wilmore जून मध्ये अंतराळस्थानकात राहायला गेले होते पण स्थानकात पोहोचल्यानंतर Star Liner अंतराळयानातील थ्रस्टर्समधून हेलियम वायू लीक होत असल्याने त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले होते 

अखेर Boeing Star Liner अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने सहा सप्टेंबरला पृथ्वीवर परतले New Mexico येथील White Sand Space Harbor येथे रात्री 10 वाजता (स्थानिक वेळ ) Star Liner अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे खाली उतरले गेल्या तीन महिन्यांपासून हे अंतराळयान स्थानकात अडकले होते दोनवेळा Star Liner मानव विरहित स्थानकात पोहोचले होते त्या नंतर 5 जूनला तिसऱ्या Flight Test अंतर्गत Star Liner अंतराळवीरांना घेऊन स्थानकात पोहोचले होते

जून मध्ये जेव्हा Star Liner अंतराळयान स्थानकात पोहोचले तेव्हा Boeing आणि नासा संस्थेतील टीम प्रमुखांना यानातील थ्रस्टर्स मधून लिकेज होत असल्याचे लक्षात आले होते तेव्हा पासूनच टीम मधील इंजिनीअर्स थ्रस्टर्स दुरुस्तीसाठी सतत प्रयत्न करत होते आणि अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्यासाठी आणि यानाच्या दुरुस्तीसाठी वेगवेगळे उपाय शोधत होते अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore देखील संस्थेतील टीमच्या नियमित मार्गदर्शनात स्थानकातुन थ्रस्टर्स दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले पण ह्या दोन्ही अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी Star Liner अंतराळयान ह्या दोधांशिवाय रिकामेच पृथ्वीवर परतले आहे

Star Liner अंतराळयान पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर नासा आणि Boeing co. मधील ह्या मोहिमेतील प्रमुखांना आनंद झाला  नासाच्या वॉशिंग्टन येथील  Associate Administrator (Space Operation mission) Ken Bowersox म्हणतात ,"आमच्या टीममधील सर्वांचा मला अभिमान वाटतो त्यांनी संपूर्ण Flight Test दरम्यान आणि आता अत्यंत कठीण परिस्थितीत अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची मोलाची कामगिरी यशस्वी केली आहे हे त्यांचे असामान्य कर्तृत्व कौतुकास्पद आहे जरी हे अंतराळयान अंतराळवीरांसह न येता रिकामेच परतले असले तरीही त्यांनी हि धोकादायक जबाबदारी कुशलतेने पार पाडली आहे अखेर अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर आणण्यात ते यशस्वी ठरले त्या मुळे भविष्यकालीन व्यावसायिक अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या नियमित  प्रवासासाठी ह्या यानाला अंतिम मान्यता देण्यासाठी नासा संस्था प्रयत्न करेल!" 

अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर परतल्यावर नासाचे मॅनेजर Steve Stich -(Commercial Crew Program) ह्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले," नासाच्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळविरांना स्थानकात नेण्या आणण्यासाठी अंतराळयानाच्या Flight Test ची गरज असते त्या नंतरच अंतराळयानाच्या नियमित वापराला अंतिम परवानगी दिली जाते आता Star Liner स्थानकातून स्वयंचलित यंत्रणेने सुरक्षित अंतराळ प्रवास करून  पृथ्वीवर परतले आहे त्यामुळे आम्ही आनंदित झालो आहोत !'

आता नासा संस्थेतील तज्ञ ह्या अंतराळ यानाच्या Launching पासून परत पृथ्वीवरच्या Landing पर्यंतच्या अंतराळ प्रवासाच्या Dataचे निरीक्षण करतील आणी ह्या यानाची कार्यक्षमता चेक करतील त्या नंतर नासा संस्था Boeing Star Liner च्या अंतराळवीरांसह नियमित अंतराळ प्रवासाला अंतिम मान्यता देईल !" तोवर नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मध्ये Boeing Star Linerतज्ज्ञांच्या देखरेखीत ठेवण्यात येईल 

अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore अंतराळ मोहीम 71-72च्या अंतराळवीरांसोबत फेब्रुवारी 2025 पर्यंत स्थानकात वास्तव्य करतील आणि स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील आणि Space X Crew -9 मोहिमेतील Crew Dragon मधून पृथ्वीवर परततील

No comments:

Post a Comment