Thursday, 15 October 2026

ESA तर्फे Bepicolombo अंतराळयानाच्या बुध ग्रहावरील प्रवेश अभियानात सहभागी होण्याची संधी

  BepiColombo

 ESA आणि  JAXA चे बेपिकोलंबो अंतराळयान बुध ग्रहाभोवती फेऱ्या मारताना फोटो -ESA- संस्था 

ESA संस्था - 15 ऑक्टोबर 

ESA आणि JAXA संस्थेचे बेपिकोलंबो अंतराळयान आठ वर्षांच्या अंतराळ प्रवासानंतर आता बुध  ग्रहाच्या कक्षेत शिरण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे युरोपियन स्पेस एजेंसी चे Mercury Planetary Orbiter ( MPO किंवा कार्टून कॅरेक्टर बेपी) जपानचे Mercury Magnetospheric Orbiter (MIO) आणि त्यांचा रोबोट मित्र Mercury Transfer Module(MTM) या तीन अंतराळयानांनी आतापर्यतचा हा कठीण अंतराळप्रवास एकत्रित केला आहे 

ह्या दीर्घ कालावधीच्या अंतराळ प्रवासादरम्यान त्यांनी सौरमालेतील ग्रहांजवळून नऊ फेऱ्या मारल्या त्या पैकी एक पृथ्वीजवळून दोन शुक्र ग्रहांजवळून आणि सहा वेळा बुध ग्रहांजवळून फेऱ्या मारल्या आता ते बुध ग्रहावर कार्यरत होण्यासाठी पोहोचण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत  

Welcome BepiColombo to Mercury!

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला ह्या मोहिमेतील अनेक महत्वपूर्ण टप्पे पार पडण्यास सुरवात झाली होती त्या मुळे येत्या काही महिन्यात MPO आणि MIO हि दोन्ही अंतराळयाने बुध ग्रहाच्या वैज्ञानिक कक्षेत प्रवेश करतील तीन  सप्टेंबरला बेपीकोलंबो अंतराळयानाला ऊर्जा देणाऱ्या आणि दिशादर्शक असलेले दोन्ही ऑर्बिटर MTM पासून  वेगळे झाले 

एकवीस नोव्हेंबरला MPO आणि MIO एकत्रितपणे बुध ग्रहाच्या कक्षेत खेचले जातील नऊ आणि दहा डिसेंबरला MPO आणि MIO वेगळे होतील आणि MIO स्वतंत्रपणे  वैज्ञानिक कक्षेत कार्यरत होईल एकोणीस मार्च 2027 मध्ये MPO देखील त्याच्या अंतिम वैज्ञानिक कक्षेत प्रवेश करेल आणि दहा डिसेंबरला ह्या अंतराळयानाचे विलगीकरण आणि बेपिकोलंबोच्या बुध ग्रहावरील प्रवेशाची अधिकृतपणे नोंद होईल 

हा प्रवास अत्यंत कठीण आणि साहसी होता आणि आमच्यासाठी अविश्वसनीय यशाचा होता हा क्षण आमच्यासाठी जितका उत्साहवर्धक आहे तितकाच रोमांचक आहे असे ह्या टीममधील शास्त्रज्ञ म्हणतात त्या मूळे ESA ने ह्या यशात सामान्य नागरिकांना देखील सहभागी होण्याची संधी जाहीर केली आहे जर्मनी मधील ESA च्या Space Corporation Center मध्ये 9 डिसेंबरला साजरा होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विजेत्या नागरिकांना बेपिकोलंबो टीमच्या सदस्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे आणि अंतराळयानाच्या विलगीकरणाचा थरारक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देखील मिळणार आहे 

हि स्पर्धा फक्त ESA सदस्य आणि सहयोगी राज्यातील नागरिकांसाठी खुली असून ह्या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना  चित्र,गाणे,कविता,फोटो किंवा व्हिडीओच्या स्वरूपात स्वागत संदेश तयार करण्याची संधी मिळणार आहे शिवाय ह्या मोहिमेबद्दल स्पर्धकाच मत आणि मोहिमेतील त्यांच्या आवडत्या गोष्ठीच महत्व सांगणे आवश्यक आहे स्पर्धकांनी केलेली त्यांची निर्मिती सोशल मीडियावरून शेअर करावी लागेल आणि त्याची सार्वजनिक माहिती संस्थेला द्यावी लागेल 

 

Wednesday, 14 October 2026

मंगळावर तीस सप्टेंबरला नवीन वर्षाचा आरंभ

 Mars Express images combined to produce global Mars in colour

 फोटो -ESA -संस्था  

 ESA संस्था - 14 ऑक्टोबर 

आपल्या पृथ्वीवरील जगभरातील बहुतांश देशात एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरवात होते पण मंगळावर मात्र  नवीन वर्षाची सुरवात 30 सप्टेंबरला होते ह्या वर्षी तीस सप्टेंबरला पृथ्वीवरील वेळेनुसार आठ वाजून सोळा मिनिटांनी मंगळवार नवीन वर्षाचा आरंभ झाला मंगळावर आता 39 वे वर्ष सुरु झाले आहे मंगळावरील वर्ष गणना 1955 पासून शास्त्रज्ञांनी सुरू केली आणि पहिल्या वर्षी 1956 रोजी मंगळावर मोठे धुळी वादळ झाले त्या मुळे पहिल्या वर्षाची नोंद धुळीचे वर्ष असे झाले

पृथ्वीवरील दिन गणना आणि मंगळावरील दिन गणना ह्यात फरक आहे पृथ्वीला सूर्याभोवती परिक्रमा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात म्हणजेच एक वर्ष पण मंगळाला सुर्याभोवती परीक्रमा करण्यासाठी 687 किंवा 668 दिवस लागतात म्हणजे पृथ्वीच्या दुप्पट मंगळावरील दिवसाला सोल म्हणतात आणि तो 24 तास 39 मिनिटांचा असतो आणि वर्षाचा कालावधी पृथ्वीच्या दुप्पट वर्ष 

मंगळावरील नववर्षाची सुरवात उत्तर विषुवदिनी होते मंगळावरील उत्तर गोलार्धात वसंतऋतू आणि दक्षिण गोलार्धात शरद ऋतूचे आगमन झालेले असते आपल्या पृथ्वीप्रमाणे मंगळवार देखील हिवाळा,वसंत,उन्हाळा , आणि शरद असे चार ऋतू असतात पण मंगळ ग्रह लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने महिन्यांचा कालावधी अनियमित असतो त्या मुळे मंगळावरील उत्तरेकडील भागात उन्हाळ्यात जास्त ऊन पडते तर दक्षिणेकडील भागात हिवाळ्यात जास्त ऊन पडते 

मंगळावर दर सहा महिन्यांनी तीव्र धुळीचे वादळ होते आणि ते प्रचंड मोठे आणी वेगवान असते अनेकदा त्यामुळे वातावरणात उंचावर उडालेली उष्ण कणांची धूळ सर्व मंगळग्रह व्यापून टाकते तेथे उष्णता देखील कमीजास्त प्रमाणात असते दिवसा तापमान अत्युच्च प्रमाणात वाढते तर रात्री थंडी उणे अंश सेल्सिअस पर्यंत पडते 

Saturday, 10 October 2026

स्थानकातील आठ महिन्याचे वास्तव्य संपवून नासाच्या Space X Crew 12 चे अंतराळवीर पृथ्वीवर परतले

   NASA’s SpaceX Crew-12 splashes down off the coast of Los Angeles, California on Thursday, Oct. 8, 2026.

 Space X Crew  Dragon अंतराळवीरांसह  California -Los Angeles येथील समुद्राच्या खाडीत पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था /ESA - 10 ऑक्टोबर 

 नासाच्या Space X Crew -12 चे अंतराळवीर Jessica Meir ,Jack Hathaway,युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot आणि रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev हे  स्थानकातील 237 दिवसांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत हे चारही अंतराळवीर ऑक्टोबरला सकाळी12.05मिनीटांनी (स्थानिक वेळ) Space X Crew Dragon मधून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले आणि 27.तास 29 मिनिटांच्या अंतराळ प्रवासा नंतर 8 ऑक्टोबरला सकाळी 11.34  मिनिटांनी(8.34 स्थानिक वेळ) पृथ्वीवर परतले  

निघण्याआधी नासाच्या लाईव्ह संपर्कात स्थानकात ह्या अंतराळवीरांच्या Farewell Ceremony आणि Change The Command Ceremony पार पडला त्या वेळी स्थानकाच्या सध्याच्या कमांडर Jessica ह्यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले 

 Space X Crew-12 अंतराळवीर Farewell ceremony आणि Change the Command ceremony दरम्यान स्थाकातील सर्व अंतराळवीरांचा निरोप घेताना Jessica Meir सोबत -फोटो -नासा संस्था 

पृथ्वीवर परतण्याआधीचा हा निरोपाचा क्षण सुखदु:खाचा आहे आठ महिन्यांचे इथले वास्तव्य संपवून आता पृथ्वीवर परतण्याचा आमच्या कुटुंबियांना भेटण्याचा हा आनंदी क्षण पण स्थानक इथले सहकारी अंतराळवीर मित्र ह्यांना सोडून जाण्याचे दु:ख आमच जाण थोडस लांबल त्या मुळे आम्हाला Space X Crew -13 मोहिमेतील अंतराळवीरांसोबत राहता आल अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील ह्या फिरत्या घरात वास्तव्य करताना सायंटिफिक संशोधन करताना Space Walk आणि स्थानकाची इतर तांत्रिक कामे करताना आमचा वेळ व्यस्ततेत गेला पण रिकामा वेळ ह्या सहकारी अंतराळवीरांसोबत मजेत गेला आम्ही खूप enjoy केल खूप हास्यविनोद केले त्यांच्या आठवणी कायम सोबत राहतील इथे वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या अंतराळयानातून अंतराळवीर वास्तव्यासाठी येतात एकत्र संशोधन करतात तेव्हा त्यांची ओळख जागतिक अंतराळवीर अशी होते ते कुठल्या देशातून आले हि ओळख गौण ठरते इथे ते एकरूप होतात आणि विविधतेतून एकता हिच स्थानकातील वास्तव्याची खरी ओळख आहे मी इथे दुसऱ्यांदा आले तेव्हाच ठरवल होत कि खूप मित्र जोडायचे खूप अनुभव गोळा करायचा नव्या अंतराळवीरांना मदत करायची माझा तो उद्देश साध्य झाला हे सारेच अंतराळवीर खूप छान आहेत इथे येण्याआधी अंतराळवीरांनी कितीही ट्रेनिंग घेतलेले असले तरी झिरो ग्रॅव्हीटीतल्या प्रथम प्रवेशाच्या वेळी आपली अवस्था लहान बाळासारखी होते पाणी पिण,खाण,झोप आणि इतर गोष्टी करताना फजिती होते तेव्हा आम्ही आमचा अनुभव आठवतो त्या गोष्टींची मजा लुटतो कारण हे खरच खूपच कठीण असत गुरुत्वाकर्षण नसल्याने तरंगत्या अवस्थेत राहण तेव्हा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो हे सार शिकवतो तेव्हा मानसिक आनंद मिळतो समाधान मिळत आता पुन्हा इथे येता येईल कि नाही सांगता येत नाही त्या मुळे हे स्थानक सोडून जाताना वाईट वाटत कारण पृथ्वीवर अंतराळातील हे आश्चर्यकारक फिरत स्थानक रिप्लेस होऊ शकत नाही ते युनिक आहे इथल्या लॅब मध्ये संशोधन करताना अंतराळातून पृथ्वीदर्शन करताना अंतराळातील तारे न्याहाळतानाचा आनंद अमूल्य आहे त्या साठी जगभरातील नासा आणि सहभागी संस्थेतील मान्यवरांचे आभार त्यांच्यामुळेच आम्ही इथे स्थानकात सुरक्षित राहू शकतो आता ह्या स्थानकाच्या कमांडरपदाची सूत्रे मी अंतराळवीर Pyotr ह्यांच्या हाती सोपवत आहे ते अनुभवी आहेत स्थानकाची जबाबदारी ते व्यवस्थित सांभाळतील आम्ही देखील अनेकदा समस्या उद्भवल्यावर त्यांचा सल्ला घेतलाय!"

Pyotr -"Thank You Jessica! तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून हि जबाबदारी सोपवल्याबद्दल अंतराळातील ह्या फिरत्या स्थानकातील हा सन्मान माझ्यासाठी गौरवास्पद आहे कारण 69 वर्षांपूर्वी ह्याच दिवशी रशियाच Sputnik अंतराळयान लाँच झाल होत आणि आता हे स्थानकातील मानवी वास्तव्य एकता आणि अंतराळवीरांतील मानवतेचे प्रतीक आहे आपण एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही हे सिद्ध करणार हे युग आहे हे अंतराळवीर कर्तृत्ववान आहेत तुमच्या सोबतच काळ मजेत गेला खूप शिकायला मिळाल ह्या साऱ्यांचा कमांडर होताना गौरवास्पद वाटतय!"त्या नंतर सर्वांनी एकत्र येत शेवटचा निरोप घेतला आणि अंतराळवीर परतीच्या तयारीला लागले

  Space X Crew 12चे अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचल्यानंतर Sophie Adenot आनंदाने अभिवादन करताना - फोटो ESA संस्था 

अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरताच चारही अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने कॅलिफोर्निया येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले तेव्हा नासा /इसा /Space X आणि Roscosmos संस्थेच्या Recovery बोटी त्वरित तेथे पोहोचल्या त्यात दोन Fast recovery बोटी आणि  recovery teams ह्यांचा समावेश होता त्यांनी Dragon ला ओढत Space X च्या जहाजापर्यंत आणले तेथे hatching Docking प्रक्रिया पार पडली 

 

 Docking नंतर Deck वर Recovery टीममधील सदस्य अंतराळवीरांना Dragon मधून बाहेर काढताना -फोटो -नासा संस्था 

त्या नंतर Recovery टीममधील डॉक्टरांनी ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केल्यानंतर त्यांना एकामागून एक बाहेर काढले पृथ्वीवर परतल्यावर सर्व अंतराळवीर आनंदित झाले होते ह्या अंतराळवीरांना आधी हेलिकॉप्टरने Recovery Camp मध्ये पुढील चेकअप साठी नेण्यात आले त्या नंतर नासाच्या विमानाने त्यांना नासाच्या Johnson Space Center  Huston येथे पाठवण्यात आले आवश्यक प्रक्रिया पार पडल्यावर हे अंतराळवीर त्यांच्या देशात परततील 

Saturday, 3 October 2026

नासाच्या Crew 13 चे चार अंतराळवीर स्थानकात सुखरूप पोहोचले

  Four astronauts in a spacecraft.

 Space X Crew 13 चे अंतराळवीर Jessica Watkins,Luke Delaney, कॅनडाचे अंतराळवीर Joshua Kutryk आणि रशियन अंतराळवीर Sergey Teteryatnikov -अंतराळस्थानकात जाण्यासाठी उड्डाणा आधी -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - 3 ऑक्टोबर 

नासाच्या Crew 13 चे चार अंतराळवीर Jessica Watkins, Luke Delaney कॅनडाचे अंतराळवीर Joshua Kutryk आणि रशियन अंतराळवीर Sergey Teteryatnikov सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले आहेत 

एक तारखेला नासाच्या Cape Canaveral Space Force Station Florida येथील Space Launch Complex 40 ह्या उड्डाणस्थळावरून Space X Crew Dragon सकाळी अकरा वाजता ह्या चारही अंतराळवीरांसह Falcon 9 राँकेटच्या सहाय्याने अंतराळात झेपावले 

हे सर्व अंतराळवीर उड्डाणाआधी दोन आठवडे नासाच्या Johnson Space Center Huston येथे Quarantine मध्ये होते उड्डाणा आधी त्यांचे उड्डाणपूर्व चेकअप आणि इतर आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतर हे अंतराळवीर उड्डाणस्थळी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप द्यायला त्यांचे कुटुंबीय मित्र आणि नासा संस्थेतील मान्यवर हजर होते काही क्षण त्यांच्याशी संवाद साधून चारही अंतराळवीर नासाच्या गाडीतून ऊड्डाणस्थळी पोहोचले

ह्या मोहिमेत अंतराळवीर Jessica ह्यांनी कमांडर पद अंतराळवीर Luke ह्यांनी पायलटपद सांभाळले अंतराळवीर Joshua आणि अंतराळवीर Sergey ह्या दोघांनी मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळले

Space X Crew Dragon अंतराळात पोहोचताच पूर्व निर्धारित प्रक्रिया पार पडल्या Dragon रॉकेट पासून वेगळे झाले आणि स्वयंचलित यंत्रणेने Dragon वेगाने अंतराळ प्रवासास लागले हे अंतराळवीर अंतराळ प्रवासादरम्यान नासा आणि Space X संस्थेच्या संपर्कात होते नासाच्या California आणि Huston येथील टीम प्रमुखांची Dragon मधील स्वयंचलित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर नजर होती

साडेसात तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर संध्याकाळी सात वाजता Space X Crew Dragon स्थानकाच्या  समोरील भागातील Harmony Module जवळ पोहोचले त्यानंतर अंतराळवीरांनी Space X Dragon मधील Leak Check Pressurization सिस्टिम व इतर आवश्यक बाबी चेक केल्यानंतर Dragon आणि स्थानक ह्यांच्यातील Hatching- Docking प्रक्रिया पार पडली सर्व काही व्यवस्थित आहे ह्याची खात्री झाल्यावर रात्री 9.19 वाजता अंतराळवीरांनी एकामागून एक स्थानकात प्रवेश केला तेव्हा सध्या स्थानकात रहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले काही वेळातच नासाच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला तेव्हा स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्र जमले होते 


नासाच्या Space X Crew 13 चे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर Welcome Ceremony दरम्यान सर्व अंतराळवीर एकत्रित -फोटो -नासा संस्था 

 Huston Space center  -"तुम्ही स्थानकात सुखरूप पोहोचलेले पाहून आम्ही आनंदित झालो आहोत तुमचे अभिनंदन ! तुमचा अंतराळ प्रवास कसा झाला खूप लवकर पोहोचला आहात !

Jessica -" हो! आम्ही देखील आनंदित झालो आहोत आमचा अंतराळ प्रवास सुपर क्विक होता खूप सुरक्षित आणि छान झाला आम्ही इतक्या लवकर इथे पोहोचलो ह्यावर विश्वास बसत नाहीय ह्या मोहीम 75चे आम्ही आभारी आहोत त्यांनी आमचे खूप छान स्वागत केले इथेपर्यंत पोहोचण्याचा काळ खूप मोठा होता आणि प्रवास छोटा खरंच अमेझिंग आहे सार! त्या साठी जगभरातील नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील सर्वांचे आभार त्यांच्या मुळेच आम्ही इथे सुरक्षित पोहोचलो आहोत माझ्यासाठी हि जागा खूप स्पेशल आहे मी इथे दुसऱ्यांदा प्रवेश केलाय माझ्या सहकारी आणि नव्या अंतराळवीर मित्रांसोबत इथे वास्तव्य करणार आहे आणि त्यांच्या सोबत संशोधनात सहभागी होऊन काम करण्यास मी उत्सुक आहे !

Joshua -"मी माझ्या कॅनडातील मित्रांना,नागरिकांना Hi करू इच्छितो! मी इथे त्यांचे प्रातिनिधीत्व करायला पोहोचलोय हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे एका कॅनडियन अंतराळवीराने पुन्हा स्थानकात कॅनडाचा झेंडा फडकावलाय हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे आजचा हा दिवस खूप क्रेझी होता खूप मोठा होता मी विश्वास ठेऊ शकत नव्हतो पण खरंच खूप आनंदी होतो आता हे मिशन यशस्वी करायचे आहे अर्थात थोडी झोप आवश्यक आहे मला हि संधी दिल्याबद्दल नासा आणि CSA चे आभार !

Sergey -"Thank You Roscosmos आणि Nasa! मला इथे यायची संधी दिल्याबद्दल  मी आनंदित झालो आहे आता  लवकरच संशोधन करण्यासाठी उत्सुक आहे !

Huston -"Thank You ! तुम्हा सर्वांना आता खरोखरच आरामाची गरज आहे स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा !" 

 आता हे अंतराळवीर स्थानकातील अंतराळ मोहीम 75 च्या अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील शिवाय हे अंतराळवीर स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत मानवी मानवी Stem cell ,Tissu ची निर्मिती करतील ह्या संशोधनाचा उपयोग हार्ट अटॅक,पॅरालिसिस सारख्या मानवी आजारावरील अत्याधुनिक उपचार व औषधे निर्मिती साठी होईल शिवाय स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील रोप लागवड व वाढीवर संशोधित माहिती गोळा करतील 

 ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील प्रवेशा नंतर नासा आणि Space X संस्थेतील ह्या टीममधील प्रमुख आनंदी झाले कारण ह्या अंतराळवीरांचे स्थानकात जाणे Dragon मधील तांत्रिक बिघाडामुळे लांबले होते पण हि मोहीम यशस्वी तर झालीच शिवाय ह्या अंतराळवीरांचा अंतराळप्रवास देखील जलद आणि सुरक्षितपणे झाला नासाचे Administrator Jared Isaacman म्हणतात ,"Space X सोबतच्या अंतराळ उड्डाणातील आमच्या व्यावसायिक भागीदारीमुळे नेहमीप्रमाणेच Crew 13हि अंतराळ मोहीम देखील यशस्वी झाली हे यश आमच्या सामर्थ्याचे आणि अतुलनीय क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे आता हे चारही अंतराळवीर स्थानकातील संशोधनात सहभागी होऊन भविष्य कालीन मंगळ आणि चंद्र मोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त माहिती मिळवतील आजवरच्या अंतराळ  मोहिमेतील उड्डाणाच्या इतिहासात प्रथमच उड्डाणप्रक्रिया अंतराळप्रवास जलद आणि सुलभतेने झाला त्या साठी Space X टीमचे अभिनंदन "!

नासाच्या  Associate Administrator- Lori Glaze," म्हणतात ह्या व्यावसायिक मानवी अंतराळ मोहिमांच्या आणि संशोधित सातत्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत स्थानकाचे अस्तित्व टिकून आहे त्यातील सायंटिफिक संशोधन प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे   

Wednesday, 30 September 2026

नासाच्या Deep Space food challenge सपर्धेतील विजेत्यांची घोषणा

Deep Space Food Challenge Mars to Table

 

नासा संस्था - 30 सप्टेंबर  

नासा आणि कॅनडियन स्पेस एजन्सी तर्फे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी Deep space food challenge Mars to table -2026 हि स्पर्धा जाहीर करण्यात आली होती ह्या मध्ये अंतराळवीरांसाठी विकसित जीवनसत्त्वयुक्त उत्पादित अन्नप्रणालीचा वापर करून अंतराळातील जेवणातील नाविन्यपूर्ण अन्नपदार्थ कमी वेळेत,कमी श्रमात निर्धारित परिस्थितीत आणि साहित्यात तयार करून त्यांचा आराखडा सादर करण्याची संधी देण्यात आली होती नासा आणि CSAच्या नियमानुसार निकषांची पूर्ती करणाऱ्या अंतिम विजेत्या स्पर्धकाची नावे गुरुवारी घोषित करण्यात आली  

ह्या स्पर्धेत जगभरातील 33 देशातील आणी अमेरिकेतिल 28 राज्यातील नागरीक सहभागी झाले होते त्यातील निवडक 113 स्पर्धकांमधुन पाच जणांची अंतिम निवड करण्यात आली त्यांना 650,000 डॉलर ची बक्षिसे देण्यात आली 300000 डॉलरचे पहिले बक्षीस Philadelphia येथील Chinyere Ukeje ह्यांना मिळाले असून त्यांनी Adaptive Nourishment Infrastructure (ANI) अन्न तंत्रज्ञान प्रणाली सादर केली दुसरे 200,000 डॉलरचे बक्षीस Rosemead येथील Cislune  ह्यांना मिळाले असून त्यांनी Fresh Ferment Reserve Food Infrastructure चा वापर करून विकसित अन्न तंत्रज्ञान प्रणाली सादर केली 

भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर आणि अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पौष्टिक,सकस आणि चविष्ट अन्न निर्मिती करता यावी ह्या साठी आणी पृथ्वीवरील धान्य ऊत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नासा संस्था आणी कॅनडीयन स्पेस एजन्सी (CSA) ह्यांनी Deep Space Food Challenge स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना जीवनसत्त्वयुक्त पौष्टिक आणी सुरक्षित अन्न ऊत्पादन प्रणाली संशोधीत करण्याची संधी देण्यात आली होती हे अन्न ऊत्पादन कमी साहित्य,कमी पाणी वापरून,कमी जागेत करता येणे आवश्यक होते 

अंतराळविरांना अंतराळातील झीरो ग्रव्हिटितील तरंगत्या वातावरणात पाण्याच्या कमतरतेत पदार्थ बनवणे अशक्य असते त्या मुळे सध्या स्थानकात वास्तव्य करणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरील नासा संस्थेत तयार केलेले डिहायड्रेटेड प्रिझर्व केलेले अन्न पाठविले जाते पण भविष्यकालीन मंगळमोहिमेतील अंतराळविरांना मंगळावर  पोहोचण्यासाठी नऊ महिने लागतील आणी ईतके दिवस हे प्रिझर्व अन्न पुरणार नाही स्थानकातील अंतराळविरांना वेळोवेळी स्थानकात जाणाऱ्या कार्गो शिप मधून अंतराळमोहिमेतील अंतराळविरांसोबत अन्न फळे व इतर सामान पाठविण्यात येतात पण मंगळमोहिमेतील अंतराळविरांना असे अन्नपदार्थ व सामान पाठवता येणार नाही नासा आणी कॅनडियन स्पेस संस्थेने जाहीर केलेल्या ह्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना ह्या समस्या विचारात घेऊन धान्य ऊत्पादन आणी अन्नपदार्थ निर्मितीचे एकत्रित नवीन विकसीत तंत्रज्ञान सादर करणे आवश्यक होते  

ह्या वर्षी ह्या स्पर्धेचे नियम आव्हानात्मक होते भविष्यकालीन अंतराळवीरांच्या नऊ महिन्यांच्या अंतराळ प्रवासा दरम्यान 15 अंतराळवीरांच्या एका टीमला 500 मंगळ दिवसांच्या (पृथ्वीवरील 513 दिवस) अपेक्षित कलावधीमध्ये पुरेल इतके आणि अंतराळातील विपरीत वातावरणात खराब न होता सुरक्षितपणे टिकू शकतील अशा विकसित वैविध्यपूर्ण सकस अन्नपदार्थांच्या कार्यप्रणालीचा आणि अंतराळातील भोजनाचा एकत्रित संकल्पित आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले आणि त्याचा व्हिडीओ पाठविण्यास सांगण्यात आले होते 

प्रथम क्रमांक प्राप्त Chinyere Ukeje ह्यांनी ANI संकल्पना विकसित केली त्यांनी नियंत्रित जागेत व वातावरणात अन्न आंबवण व बुरशीची लागवड करून जैविक चक्राद्वारे पोषकतत्वयुक्त अन्न निर्मिती तंत्रज्ञान विकसित केले असे अन्न सुरक्षित सकस आणि टिकाऊ असते शिवाय अंतराळवीरांना हे अन्न पदार्थ अंतराळात तयार करता येऊ शकतात हे अन्न पदार्थ चविष्ठ असल्याने त्यांना नेहमीचे बेचव अन्न पदार्थ खावे लागणार नाही आणि हे वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ आधी पृथ्वीवरील मर्यादित अन्नाचा वापर करून अंतराळात अर्ध्या प्रमाणात तयार करता येत असल्याने त्यांना ते ताजे खाल्ल्याचा आनंद मिळेल ANI हे नायजेरियातील कृषी क्षेत्रातील कापणी आणि सुपीकतेची देवी पृथ्वीच्या नावावरून ठेवण्यात आले ह्या विकसित अन्न तंत्रज्ञान प्रणालीमध्ये कमी वेळ,श्रम,कर्मचारी,उपकरणे पाणी आणि वीज पुरवठ्यात दररोज ताजे अन्नपदार्थ पुरवते 

अंतराळविरांना अंतराळस्थानकातील वास्तव्या दरम्यान सकस जीनवसत्वयुक्त ताजे अन्न मिळत नाही त्यामुळे अंतराळातील झीरो ग्रव्हिटित त्यांना अनेक शारीरिक समस्या ऊद्भवतात त्यांना ताजे सकस पौष्टीक अन्न मिळावे ह्यासाठी 2021-2024 दरम्यान ह्या स्पर्धेची प्रथम सुरवात झाली ह्या स्पर्धेला जगभरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यांनी नाविन्यपूर्ण अन्न उत्पादन प्रणाली सादर केल्या त्यातुन ह्या Deep Space Food Challenge साठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता करणाऱ्या स्पर्धकांची तीन टप्प्यात निवड करण्यात आली ह्या स्पर्धकांचे विकसित उत्पादित अन्न त्याची मर्यादित जागेतील उत्पादन क्षमता,सुरक्षितता,सकसता व टिकाऊपणा ह्यांचे संशोधित निरीक्षण नोंदवण्यात आले त्यातील निवडक अंतिम स्पर्धकांचे अन्नपदार्थ बनवून अमेरिकेत जगभरातील मान्यवर उद्योजक,सेफ आणि नासा संस्थेतील तज्ज्ञांच्या उपस्थितीत दोन दिवसाच्या समिट मध्ये पदार्थांची चव चाखुन त्यांची पोषकता आकर्षकता चेक करून अंतिम निवड करण्यात आली    

ह्या मोहिमेचे नासाच्या अलाबामा मार्शल स्पेस सेन्टरचे प्रोग्राम मॅनेजर Jennifer Edmunson म्हणतात,"भविष्यकालीन मंगळ मोहिमेत आम्ही असे नाविन्यपूर्ण विकसित अन्नपदार्थ बनविण्यासाठी उत्सुक आहोत ह्या मोहिमेतील अंतराळवीरांना ह्या पौष्टीक अन्न तंत्रज्ञानाचा वापर करता येईल नासाने कॅनडीयन स्पेस एजन्सी सोबत आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेमुळे जगभरातील सर्जक वृत्तीचे नागरिक एकत्र आले त्यांना नाविन्यपूर्ण विकसित अन्न प्रणाली तत्रंज्ञान सादर करण्याची प्रेरणा मिळाली ह्याचा ऊपयोग भविष्यकालीन अंतराळवीरांना त्यांच्या परग्रहावरील वास्तव्यात होईल तसेच जगभरातील दुर्गम भागात जिथे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुरेसे जिवनसत्वयुक्त अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांना रोगाशी सामना करावा लागतो अशा लोकांना देखील होईल हे स्पर्धेक आमच्या मोहिमेत सहभागी होऊन आम्हाला अंतराळविश्वातील संशोधनास मदत करत आहेत त्यामुळे आम्ही देखील प्रेरित झालो आहोत!"


Tuesday, 22 September 2026

युरोप मध्ये अंतराळस्थानकातील Zero g इंडिकेटर Pikachu वर आधारित जागतिक अंतराळ सप्ताहाचे आयोजन

Pikachu in the Cupola

 अंतराळ स्थानकातील Cupola मधील पोकेमन कंपनीचा पिकाचू झिरो g इंडिकेटर -फोटो -इसा संस्था 

ESA -19 सप्टेंबर 

युरोप मध्ये दरवर्षी आक्टोबर मध्ये जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केल्या जातो ह्या वर्षी इसा आणि पोकेमन कंपनीच्या सहकार्याने ऑक्टोबरमध्ये अंतराळस्थानकातील Zero g इंडिकेटर पिकाचू वर आधारित अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे अंतराळवीरांसाठी उपयुक्त यंत्रणायुक्त पिकाचू पोकेमन कंपनीच्या खेळातील पिवळ्या उंदराच्या स्वरूपात बनविण्यात आला असून हा इंडिकेटर अंतराळयान आणि अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणीय वातावरणातून अंतराळातील झिरो ग्रॅविटीत पोहोचल्याचे संकेत देतो त्यामुळे अंतराळवीर स्वत:चे आणि अंतराळयानाचे संरक्षण करू शकतात कारण गुरुत्वाकर्षणीय वातावरणातून झिरो ग्रॅविटीत प्रवेश करताना वजनरहित अवस्था प्राप्त होत असल्याने अंतराळवीर त्यांच्या सीटवरून बाहेर खेचल्या जाऊन कुठेही धडकण्याची आणि इजा होण्याची शक्यता असते पण इंडिकेटरमुळे अंतराळवीर सतर्क होऊन काळजी घेतात आणि अंतराळयानाच्या वेगावर नियंत्रण ठेवतात अंतराळस्थानकात वर लटकवलेला हा इंडिकेटर अंतराळवीरांना योग्य दिशा दाखवतो आणि अंतराळातील हानिकारक गोष्टीपासून सतर्क राहण्यासाठीचे संकेत देतो  

 Sophie Adenot with Astronaut Pikachu plush at the European Astronaut Centre

अंतराळवीर सोफी अडेनॉट पिकाचू सोबत European Astronaut Center मध्ये -फोटो इसा संस्था 

अंतराळवीर सोफी सोबत अंतराळस्थानकात पोहोचलेल्या पिकाचूने 11 एप्रिल ते 17 जून पर्यंत 67 दिवस स्थानकात वास्तव्य केले आणि त्या दरम्यान पृथ्वीभोवती 1040 फेऱ्या मारल्या हा पिकाचू स्थानकातील Cupola मध्ये वरच्या बाजूला लटकलेला आहे अंतराळस्थानक पृथ्वीच्यावर 400 की.मी.उंचीवरून पृथ्वीभोवती 90 मिनिटाला एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्या मुळे अंतराळवीरांना दररोज सोळा वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळतो अंतराळवीरांचे Cupola हे आवडीचे ठिकाण आहे त्यांच्या संशोधनातून मिळालेल्या रिकाम्या वेळात तिथून ते पृथ्वीवरील जगभरातील नैसर्गिक सौन्दर्य,नैसर्गिक आपत्ती आणि इतर घडामोडीचे व्हिडीओ व फोटो घेतात आणि संशोधित माहिती नासा संस्थेला देतात 

"इसा आणि पोकेमन कंपनीने मिळून युरोप मध्ये 4 ते10 ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह 2026 साजरा करण्याचे ठरविले आहे त्या निमित्य सोफी सोबत स्थानकात पोहोचलेल्या पिकाचू वर आधारित पोकेमन गो इव्हेंट ह्या दृकश्राव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे 

युरोप मधील प्रेक्षणीय स्थळे आणि प्रमुख संग्रहालया मध्ये अंतराळ आणि पोकेमन मधील प्रमुख पात्रांच्या द्वारे युरोपियन नागरिकांना पारंपारिक चौकटीबाहेरच्या जगात नेऊन अंतराळ विश्व,अंतराळ मोहिमे सोबतच अंतराळातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्टींच्या संशोधना बद्दलची माहिती ह्या प्रदर्शनात देण्यात येणार आहे हि माहिती युरोप मधील भावी तरुणांना आणि सर्व वयोगटातील नागरिकांना इसा संस्थेशी आणि अंतराळविश्वाशी जोडले जाण्यास मदत करेल शिवाय भविष्यकालीन संशोधकांना त्यांचे द्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करेल संशोधक कल्पनाशक्तीच्या माध्यमातून जिज्ञासू वृत्तीने शोध लावतात त्यांचे ह्या अथांग ब्रह्मांडातील अज्ञात गोष्टीबद्दलचे औसुक्य त्यांच्यातील Curiosity,spark आणि अंतराळविश्वाबद्दलचे आकर्षण जागृत करणे हे आमचे प्रमुख उद्धिष्ठ आहे !"असे ESA Director General -Josef Aschbacher म्हणतात 

  Pokémon x ESA collaboration key art

 पोकेमन कंपनीचे सिनिअर डायरेक्टर Mathieu Galante म्हणतात," पोकेमनच्या प्रवासाची सुरवात मानवाला अज्ञात असलेल्या अंतराळ विश्वातील गोष्टीबद्दल जाणून घेण्याच्या कुतुहलाने होते अंतराळभेटी पासून ब्रह्मांडातील दूरवरच्या अज्ञात गोष्ठीच्या शोधाची हि भावना नेहमीच पोकेमन ट्रेनर असण्याचा एक भाग बनली आहे इसाच्या सहकार्याने चाहत्यांसाठी नवीन दालन उघडेल आणि युरोपमध्ये विविध ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोकेमनचे जग आणि अंतराळविश्वातील आश्चर्यकारक वैज्ञानिक माहिती काल्पनिक कथानकाच्या दृश्य स्वरूपात नागरिकांना दिसेल पोकेमन मधील पात्र अंतराळवीश्व,अंतराळ मोहीम या सोबतच आपल्या सौरमाले बाहेरील अथांग ब्रम्हांडातील माहिती खेळकर आणि आकर्षक स्वरूपात नागरिकांना देतील 

ह्या प्रदर्शनात पोकेमन कंपनीचे कपडे ,अक्सेसरीज आणि संग्राह्य वस्तूंची श्रेणी सादर केल्या जाईल 

Sunday, 13 September 2026

अंतराळस्थानकातील अंतराळविरांनाही कामगार दिनानिमित्त सुट्टी

  Expedition 74 Flight Engineers (from left) Sophie Adenot of ESA (European Space Agency) and Jessica Meir of NASA take a portrait together before beginning their exercise sessions. Afterward, Adenot worked out on the Advanced Resistive Exercise Device (ARED), which mimics free weights on Earth, while Meir jogged on the COLBERT treadmill. Both exercise devices are located inside the Tranquility module.

युरोपियन अंतराळवीर सोफी अडेनॉट आणि जेसिका मीर ह्यांचा अंतराळस्थानकातील कामातून मिळालेल्या मोकळ्या क्षणी काढलेला व्यायामा आधीचा फोटो -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था/Space News -13 सप्टेंबर 

अमेरिकत सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारी सात सप्टेंबरला कामगार दिन साजरा होतो त्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम,परेडचे आयोजन केले जाते नागरिकांना कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी दिली जाते अमेरिकन नागरिक ह्या सुट्टीचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेतात काही जण आपल्या कुटुंबियांसोबत पिकनिकला जातात तर काही जण आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आस्वाद घेतात त्या मध्ये वेगवेगळ्या पारंपारीक पदार्थांचा आणी Barbecues चा समावेश असतो 

पृथ्वीपासुन दुर अंतराळस्थानकात वास्तव्यास असलेले अंतराळवीर सतत स्थानकातील संशोधन व ईतर कामात व्यस्त असतात पण ह्या वेळी नासा संस्थेने त्यांना त्यांच्या कामातून सुट्टी दिली अमेरिकन अंतराळवीर जेसिका मीर,Jack Hathaway आणी अनिल मेनन ह्यांना सात तारखेला त्यांच्या कामातून सुट्टी मिळाली युरोपियन अंतराळवीर सोफीलाही हि सुट्टी मिळाली ह्या आठवड्यात ह्या अंतराळविरांनी तिन स्पेसवॉक केले त्यामुळे त्यांचा वेळ धावपळीत गेला होता

रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov, Anna kikina ,Andrey Fedyaev हे तिघे मात्र कामात बिझी राहिले स्थानकात आलेले Progress 94 Spacecraft स्थानकातील नको असलेले आणी ईतर साहित्य घेऊन पृथ्वीवर परतणार असल्याने स्थानकाच्या Poisk Module वरून त्याच्या सुरक्षित  परतण्याची तयारी हे अंतराळवीर करत होते  शिवाय त्या नंतर बैकोनुर येथून  Progress 96 Spacecraft स्थानकात येणार असल्याने त्याच्या तयारीत हे तिघेही व्यस्त होते