Tuesday, 22 September 2026

युरोप मध्ये अंतराळस्थानकातील Zero g इंडिकेटर Pikachu वर आधारित जागतिक अंतराळ सप्ताहाचे आयोजन

Pikachu in the Cupola

 अंतराळ स्थानकातील Cupola मधील पोकेमन कंपनीचा पिकाचू झिरो g इंडिकेटर -फोटो -इसा संस्था 

ESA -19 सप्टेंबर 

युरोप मध्ये दरवर्षी आक्टोबर मध्ये जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केल्या जातो ह्या वर्षी इसा आणि पोकेमन कंपनीच्या सहकार्याने ऑक्टोबरमध्ये अंतराळस्थानकातील Zero g इंडिकेटर पिकाचू वर आधारित अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे अंतराळवीरांसाठी उपयुक्त यंत्रणायुक्त पिकाचू पोकेमन कंपनीच्या खेळातील पिवळ्या उंदराच्या स्वरूपात बनविण्यात आला असून हा इंडिकेटर अंतराळयान आणि अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणीय वातावरणातून अंतराळातील झिरो ग्रॅविटीत पोहोचल्याचे संकेत देतो त्यामुळे अंतराळवीर स्वत:चे आणि अंतराळयानाचे संरक्षण करू शकतात कारण गुरुत्वाकर्षणीय वातावरणातून झिरो ग्रॅविटीत प्रवेश करताना वजनरहित अवस्था प्राप्त होत असल्याने अंतराळवीर त्यांच्या सीटवरून बाहेर खेचल्या जाऊन कुठेही धडकण्याची आणि इजा होण्याची शक्यता असते पण इंडिकेटरमुळे अंतराळवीर सतर्क होऊन काळजी घेतात आणि अंतराळयानाच्या वेगावर नियंत्रण ठेवतात अंतराळस्थानकात वर लटकवलेला हा इंडिकेटर अंतराळवीरांना योग्य दिशा दाखवतो आणि अंतराळातील हानिकारक गोष्टीपासून सतर्क राहण्यासाठीचे संकेत देतो  

 Sophie Adenot with Astronaut Pikachu plush at the European Astronaut Centre

अंतराळवीर सोफी अडेनॉट पिकाचू सोबत European Astronaut Center मध्ये -फोटो इसा संस्था 

अंतराळवीर सोफी सोबत अंतराळस्थानकात पोहोचलेल्या पिकाचूने 11 एप्रिल ते 17 जून पर्यंत 67 दिवस स्थानकात वास्तव्य केले आणि त्या दरम्यान पृथ्वीभोवती 1040 फेऱ्या मारल्या हा पिकाचू स्थानकातील Cupola मध्ये वरच्या बाजूला लटकलेला आहे अंतराळस्थानक पृथ्वीच्यावर 400 की.मी.उंचीवरून पृथ्वीभोवती 90 मिनिटाला एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्या मुळे अंतराळवीरांना दररोज सोळा वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळतो अंतराळवीरांचे Cupola हे आवडीचे ठिकाण आहे त्यांच्या संशोधनातून मिळालेल्या रिकाम्या वेळात तिथून ते पृथ्वीवरील जगभरातील नैसर्गिक सौन्दर्य,नैसर्गिक आपत्ती आणि इतर घडामोडीचे व्हिडीओ व फोटो घेतात आणि संशोधित माहिती नासा संस्थेला देतात 

"इसा आणि पोकेमन कंपनीने मिळून युरोप मध्ये 4 ते10 ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह 2026 साजरा करण्याचे ठरविले आहे त्या निमित्य सोफी सोबत स्थानकात पोहोचलेल्या पिकाचू वर आधारित पोकेमन गो इव्हेंट ह्या दृकश्राव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे 

युरोप मधील प्रेक्षणीय स्थळे आणि प्रमुख संग्रहालया मध्ये अंतराळ आणि पोकेमन मधील प्रमुख पात्रांच्या द्वारे युरोपियन नागरिकांना पारंपारिक चौकटीबाहेरच्या जगात नेऊन अंतराळ विश्व,अंतराळ मोहिमे सोबतच अंतराळातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्टींच्या संशोधना बद्दलची माहिती ह्या प्रदर्शनात देण्यात येणार आहे हि माहिती युरोप मधील भावी तरुणांना आणि सर्व वयोगटातील नागरिकांना इसा संस्थेशी आणि अंतराळविश्वाशी जोडले जाण्यास मदत करेल शिवाय भविष्यकालीन संशोधकांना त्यांचे द्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करेल संशोधक कल्पनाशक्तीच्या माध्यमातून जिज्ञासू वृत्तीने शोध लावतात त्यांचे ह्या अथांग ब्रह्मांडातील अज्ञात गोष्टीबद्दलचे औसुक्य त्यांच्यातील Curiosity,spark आणि अंतराळविश्वाबद्दलचे आकर्षण जागृत करणे हे आमचे प्रमुख उद्धिष्ठ आहे !"असे ESA Director General -Josef Aschbacher म्हणतात 

  Pokémon x ESA collaboration key art

 पोकेमन कंपनीचे सिनिअर डायरेक्टर Mathieu Galante म्हणतात," पोकेमनच्या प्रवासाची सुरवात मानवाला अज्ञात असलेल्या अंतराळ विश्वातील गोष्टीबद्दल जाणून घेण्याच्या कुतुहलाने होते अंतराळभेटी पासून ब्रह्मांडातील दूरवरच्या अज्ञात गोष्ठीच्या शोधाची हि भावना नेहमीच पोकेमन ट्रेनर असण्याचा एक भाग बनली आहे इसाच्या सहकार्याने चाहत्यांसाठी नवीन दालन उघडेल आणि युरोपमध्ये विविध ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोकेमनचे जग आणि अंतराळविश्वातील आश्चर्यकारक वैज्ञानिक माहिती काल्पनिक कथानकाच्या दृश्य स्वरूपात नागरिकांना दिसेल पोकेमन मधील पात्र अंतराळवीश्व,अंतराळ मोहीम या सोबतच आपल्या सौरमाले बाहेरील अथांग ब्रम्हांडातील माहिती खेळकर आणि आकर्षक स्वरूपात नागरिकांना देतील 

ह्या प्रदर्शनात पोकेमन कंपनीचे कपडे ,अक्सेसरीज आणि संग्राह्य वस्तूंची श्रेणी सादर केल्या जाईल 

Sunday, 13 September 2026

अंतराळस्थानकातील अंतराळविरांनाही कामगार दिनानिमित्त सुट्टी

  Expedition 74 Flight Engineers (from left) Sophie Adenot of ESA (European Space Agency) and Jessica Meir of NASA take a portrait together before beginning their exercise sessions. Afterward, Adenot worked out on the Advanced Resistive Exercise Device (ARED), which mimics free weights on Earth, while Meir jogged on the COLBERT treadmill. Both exercise devices are located inside the Tranquility module.

युरोपियन अंतराळवीर सोफी अडेनॉट आणि जेसिका मीर ह्यांचा अंतराळस्थानकातील कामातून मिळालेल्या मोकळ्या क्षणी काढलेला व्यायामा आधीचा फोटो -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था/Space News -13 सप्टेंबर 

अमेरिकत सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारी सात सप्टेंबरला कामगार दिन साजरा होतो त्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम,परेडचे आयोजन केले जाते नागरिकांना कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी दिली जाते अमेरिकन नागरिक ह्या सुट्टीचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेतात काही जण आपल्या कुटुंबियांसोबत पिकनिकला जातात तर काही जण आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आस्वाद घेतात त्या मध्ये वेगवेगळ्या पारंपारीक पदार्थांचा आणी Barbecues चा समावेश असतो 

पृथ्वीपासुन दुर अंतराळस्थानकात वास्तव्यास असलेले अंतराळवीर सतत स्थानकातील संशोधन व ईतर कामात व्यस्त असतात पण ह्या वेळी नासा संस्थेने त्यांना त्यांच्या कामातून सुट्टी दिली अमेरिकन अंतराळवीर जेसिका मीर,Jack Hathaway आणी अनिल मेनन ह्यांना सात तारखेला त्यांच्या कामातून सुट्टी मिळाली युरोपियन अंतराळवीर सोफीलाही हि सुट्टी मिळाली ह्या आठवड्यात ह्या अंतराळविरांनी तिन स्पेसवॉक केले त्यामुळे त्यांचा वेळ धावपळीत गेला होता

रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov, Anna kikina ,Andrey Fedyaev हे तिघे मात्र कामात बिझी राहिले स्थानकात आलेले Progress 94 Spacecraft स्थानकातील नको असलेले आणी ईतर साहित्य घेऊन पृथ्वीवर परतणार असल्याने स्थानकाच्या Poisk Module वरून त्याच्या सुरक्षित  परतण्याची तयारी हे अंतराळवीर करत होते  शिवाय त्या नंतर बैकोनुर येथून  Progress 96 Spacecraft स्थानकात येणार असल्याने त्याच्या तयारीत हे तिघेही व्यस्त होते 

Wednesday, 9 September 2026

अंतराळस्थानकाच्या नूतनीकरणासाठी नासाच्या अंतराळवीर जेसिका आणि युरोपियन अंतराळवीर सोफी ह्यांचा स्पेसवॉक पूर्ण

NASA astronaut Jessica Meir prepares to enter the Quest airlock to complete a spacewalk outside the International Space Station.

नासाच्या अंतराळवीर जेसिका मीर अंतराळस्थानका बाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था/ ESA संस्था  - 8 सप्टेंबर 

नासाच्या अंतराळवीर जेसिका मीर आणी युरोपियन अंतराळवीर सोफी अडेनॉट ह्यांनी एक सप्टेंबरला स्थानकाच्या बाहेरील भागातील नूतनीकरणाच्या कामासाठी स्पेसवॉक पूर्ण केला स्थानकाच्या बाहेरील भागातील दिशादर्शक High definition कॅमेरा बदलण्यासाठी आणि पुढील स्पेसवॉकची पूर्वतयारी करण्यासाठी हा स्पेसवॉक करण्यात आला स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी केलेला ह्या महिन्यातील हा तिसरा स्पेसवॉक होता

ह्या  दोन्ही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉकची तयारी आधीच करून ठेवली त्यांनी त्यांचे स्पेससूट चार्ज करून लिकेज चेक केले रोबोटिक आर्म आणि कॅमेरा चेक केला आणि स्पेसवॉकसाठी लागणारे सामान तयार ठेवले 

एक सप्टेंबरला सकाळी 8.40 मिनिटाला स्थानकाच्या Quest Airlock ह्या भागातून स्पेसवॉकसाठी ह्या दोघी बाहेर पडल्या आणि दुपारी 3.29 मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतल्या अंतराळवीर सोफी ह्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा होत्या तर अंतराळवीर जेसिका ह्यांनी रेषाविरहित स्पेससूट परिधान केला होता 

 EVA-99: Sophie Adenot working in the vacuum of space

अंतराळस्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करताना  युरोपियन अंतराळवीर सोफी फोटो - ESA संस्था 

सहा तास एकोणपन्नास मिनिटाच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघींनी स्थानकाच्या Harmony Module आणी Truss ह्या भागातील काम पुर्ण केले त्यांनी Harmony Module च्या समोरील भागात स्थानकात येणाऱ्या अंतराळयानाच्या डॉकिंग प्रक्रियेच्या दिशादर्शनासाठी आवश्यक असलेले जुने retroflector बदलुन नवीन बसविले आणी स्थानकाच्या Truss ह्या भागातील जुना नादुरुस्त Camera बदलून नवा High definition Camera बसविण्याचे काम पुर्ण केले त्या नंतर ह्या दोघीनी अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागातील मायक्रोऑरगॅनिझमच्या संशोधन प्रयोगाचे निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती व नमुना घेतला 

Back to the airlock during the EVA to fetch the MicroOrganisms sample collection kit.

युरोपियन अंतराळवीर सोफी अंतराळस्थानकाबाहेरील भागातील मायक्रो ऑरगॅनिझमचे सॅम्पल्स घेताना -फोटो -ESA संस्था 

त्यानंतर त्यांनी पुढील स्पेसवॉकच्या कामासाठीची पुर्व तयारी करून ठेवली त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक सिस्टीम साठी  लागणाऱ्या जंपर केबल वायर जोडणीचे काम पूर्ण केले पुढील स्पेसवॉक मध्ये Alpha Magnetic Spectrometer चा Heat rejecting Radiator बदलण्यात येणार आहे 

स्पेसवॉक दरम्यान Sophie ह्यांना डाव्या हाताने हालचाल करताना त्रास होत होता तेव्हा जेसिका त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या जवळ गेल्या तेव्हा सोफी ह्यांच्या स्पेससुट मध्ये प्रॉब्लेम झाल्याने हा त्रास होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तो प्राब्लेम लगेच दुर केला 

स्थानकाच्या कामासाठी केलेला हा 99 वा स्पेसवॉक होता अंतराळवीर सोफी ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता आणि जेसिका ह्यांचा हा सातवा स्पेसवॉक होता अंतराळवीर सोफी ह्यांनी ह्या आधीच पहिली फ्रेंच महिला स्पेसवॉकर अंतराळवीर म्हणून विक्रम प्रस्थापित केला होता आता जेसिका ह्यांनी महिला स्पेसवॉकर मध्ये तिसरे स्थान प्राप्त केले आहे पहिल्या क्रमांकावर अंतराळवीर Peggy Whitson आहेत त्यांनी आजवर त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत10 वेळा स्पेसवॉक केला आणि भारतीय वंशाच्या  Sunita Williams ह्यांनी 9 वेळा स्पेसवॉक केल्याने त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 284 व स्पेसवॉक होता

Saturday, 29 August 2026

अंतराळस्थानकाच्या उर्वरित कामासाठी अंतराळवीर सोफी आणि अनिल मेनन ह्यांचा स्पेसवॉक पूर्ण

NASA astronaut Anil Menon is attached to the Canadarm2 robotic arm as it guides him toward the worksite where he and ESA astronaut Sophie Adenot (out of frame) installed a space-to-ground antenna. 

नासाचे अंतराळवीर अनिल मेनन स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक दरम्यान -फोटो- नासा संस्था 

नासा संस्था /ESA संस्था - 26 ऑगस्ट 

नासाचे अंतराळवीर सोफी ऑडेनॉट आणि अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी 25 ऑगस्टला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अपूर्ण राहिलेला उर्वरित स्पेसवॉक पूर्ण केला हे दोन्ही अंतराळवीर सकाळी 8 वाजून 27 मिनिटाला स्पेसवॉकसाठी स्थानकाच्या Quest Airlock ह्या भागातून स्थानकाबाहेर पडले आणि दुपारी 2वाजून 57 मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले 

स्थानकाच्या बाहेरील भागातील Space To Ground Antenna नादुरुस्त झाल्यामुळे तो काढून त्या जागी नवीन अँटेना बसविण्यासाठी ह्या आधी अठरा तारखेला स्पेसवॉक करण्यात आला पण त्या वेळी वेळ कमी पडल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते नासाच्या पृथ्वीवरील जगभरातील संस्था आणि अंतराळस्थानक ह्यांच्यातील संपर्क यंत्रणा ,Data Transmission आणि सॅटेलाईट ट्रॅकिंगसाठी Space to Ground अँटेनांद्वारे काम केल्या जाते   

साडेसहा तासांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये सुरवातीला अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी Foot Restraint ( पायाला बांधण्याचे साधन )आणले आणी Canadarm2 वर Install केले त्यांना ह्या कामासाठी स्थानकातून अंतराळवीर Jack Hathaway ह्यांनी मदत केली त्यानंतर ते स्थानकाबाहेरील Platform 3 पर्यंत पोहोचले आणि 2009 मध्ये तेथे बांधून ठेवलेला जास्तीचा नवीन अँटेना काढला अंतराळवीर सोफी ह्यांनी त्यांना ह्या कामात मदत केली ह्या दोघांनी मिळून अँटेनांचे बोल्ट काढले आणि सुरक्षितपणे अँटेना Z1Trussह्या भागात नेला अंतराळवीर सोफी ह्यांनी हा अँटेना तेथे इन्स्टॉल करण्याआधी त्या ठिकाणी Lubricant लावले 

  Sophie Adenot working on securing the spare antenna on the boom

युरोपियन अंतराळवीर सोफी स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक दरम्यान स्पेअर अँटेना सुरक्षितपणे काढण्यासाठी मदत करताना  -फोटो-ESA संस्था 

ह्या दोघांनी सुरक्षितपणे हा अँटेना आणल्यावर त्याला इलेक्ट्रिकल केबल जोडण्यासाठी  गिम्बल लॉक्स काढले आणि हीट शिल्डवर फिक्स करताना फिरू नये म्हणून काळजी घेतली त्या नंतर ह्या आधीच्या स्पेसवॉक मध्ये नादुरुस्त अँटेना स्थानकाबाहेरील Truss ह्या भागात बांधून ठेवला होता तो तिथून काढला आणि Canadarm 2 ह्या भागात आणला ह्या भागात स्थानकातील जास्तीच्या सामानाची साठवणूक केली जाते तिथे हा अँटेना सुरक्षितपणे बांधून ठेवला स्पेसवॉक पूर्ण झाल्यावर अंतराळवीर सोफी ह्यांनी अंतराळवीर अनिल मेनन ह्यांना पोर्टेबल Foot Restraint काढण्यासाठी मदत केली त्या नंतर हे दोन्ही अंतराळवीर स्थानकात परतले  

नासाच्या Huston येथील Flight Control Center मध्ये ह्या अँटेनाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात आली अंतराळवीर अनिल मेनन ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता आणि अंतराळवीर सोफी ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता ह्या दोन स्पेसवॉक दरम्यान त्यांनी अंतराळात 12 तास 53 मिनिटे व्यतीत केले अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 283 वा स्पेसवॉक होता US चा 98 वा आणि युरोपियन अंतराळवीरांनी केलेला हा 32 वा  स्पेसवॉक होता 

 

Tuesday, 25 August 2026

अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीर अनिल मेनन आणी Sophie Adenot ह्यांचा Space walk पुर्ण

 Astronauts Anil Menon of NASA (top) and Sophie Adenot of ESA (European Space Agency) work on a space-to-ground antenna outside the International Space Station.

 नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आणि सोफी आडोनेट  स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक दरम्यान -फोटो-नासा संस्था 

नासा संस्था / ESA संस्था - 18 ऑगस्ट 

नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आणी युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot ह्यांनी बुधवारी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला अंतराळवीर सोफी ह्यांचा हा पहिला स्पेसवॉक होता त्यांनी पहिली महिला फ्रेंच अंतराळवीर स्पेसवॉकर म्हणून विक्रम नोंदविला अंतराळवीर अनिल मेनन ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता 

ह्या दोघांनी आदल्या दिवशीच स्पेसवॉकची तयारी केली होती त्यांनी त्यांचे स्पेससुट चार्ज करून लिकेज चेक केले कॅमेरे रोबोटिक आर्म आणी ईतर वस्तू चेक केल्या मेनन ह्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या स्पेससुट वर लाल रंगाच्या रेशा होत्या तर सोफी ह्यांनी रेशा विरहित स्पेससुट परीधान केला होता हे दोघे सकाळी 8.29 मिनिटानी स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडले आणि 2.52 मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले 

 Astronauts Anil Menon of NASA and Sophie Adenot of ESA are pictured training for a spacewalk at the Johnson Space Center’s Neutral Buoyancy Laboratory in Houston, Texas.

 अंतराळवीर अनिल मेनन आणि Sophie Adenot स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडण्याआधी -फोटो -नासा संस्था 

सहा तासाच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळविरांनी स्थानकाबाहेरील भागातील नादुरुस्त झालेला  Space to ground Antenna काढला आणी स्थानकाच्या Truss ह्या भागात बांधून ठेवला त्या जागी नवीन अँटेना बसविण्यात येणार होता पण अँटेनाचे बोल्ट ढिले करण्यासाठी आणी ईलेक्ट्रिकल केबल डिसकनेक्ट करण्यात ह्या अंतराळवीरांचा खूप वेळ गेला त्या मुळे नवीन अँटेना पुढच्या स्पेसवॉक मध्ये बसविण्याचे ठरले 

ह्या अँटेना द्वारे पृथ्वीवरील नासा संस्था आणी स्पेसस्टेशन ह्याच्यामधील Data Tracking आणी Relay Satellite संपर्क यंत्रणा शिवाय नासाच्या Huston येथील संस्था आणी जगभरातील नियंत्रण केंद्राशी ह्या अँटेनाद्वारे संपर्क साधला जातो 2025 च्या नोव्हेंबरमध्ये हा अँटेना नादुरुस्त झाला होता

अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी Foot Restraint ( पायाला बांधण्याचे साधन )आणले आणी Canadarm2 वर Install केले त्यांना ह्या कामासाठी स्थानकातून अंतराळविर Jack Hathaway ह्यांनी मदत केली ह्या दोन्ही अंतराळविरांनी अँटेना काढताना तो स्थिर रहाण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले आणी केबल डिसकनेक्ट केले अँटेनाचे बोल्ट काढले खराब झालेल्या अँटेनाचे अनेक बोल्ट व कनेक्टर काढण्यात त्यांचा बराच वेळ गेला त्या मुळे नवीन अँटेनाचे काम लांबले 

स्थानकात परतण्याआधी ह्या अंतराळविरांनी त्या भागातील सिस्टीम यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहेत का हे चेक केले आणी तेथील जागा स्वच्छ केली स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला US चा हा 97 वा स्पेसवॉक होता आणि स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 282वा स्पेसवॉक होता 

Tuesday, 18 August 2026

सूर्याच्या प्रखर तेजोमय चकाकत्या करोनाच्या अलौकिक सुंदर दृष्याने नागरिक भारावले

    a thin white line of wispy light on a black background

Space News चे Sky Watching Editor- Daisy Dobrijevic ह्यांनी Greenland येथील Spitsbergen  येथून टिपलेले खग्रास सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृष्य -फोटो -Space News 

Space News- 13 ऑगस्ट 

माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीय "मी आत्ताच खग्रास सुर्यग्रहणाच्या वेळचे सुर्याचे अलौकिक सौंदर्य पाहिले ह्या वर माझा विश्वास बसत नाही आजवर मी हजारो फोटो पाहिलेत पण ह्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही प्रत्यक्षात सुर्यग्रहण घडताना सुर्याचे हे बदलते स्वरूप अनुभवतानाची भावना शब्दातीत आहे क्षणभराचे हे दृश्य, क्षणभंगुर अनुभव !" भारावलेल्या अवस्थेततील Space newsचे आकाश निरीक्षक संपादक Daisy Dobrijevic ह्यांनी  Greenland मधील Spitsbergen  येथून सुर्यग्रहण पाहिल्यानंतर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली  सुर्यग्रहणाच्या वेळी सुर्याभोवती नाजूक वलय पसरत होते सोबतीला आकाशात गुरु,बुध आणी शुक्र ग्रहही होते सुर्याभोवती सोनेरी मुलामा दिल्याचा आभास होत होता अंतराळातील हे दृश्य अत्यंत विलोभनिय होते माझ्या आजवरच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर अविस्मरणीय क्षण आहे हा !" 

कारण चंद्र सुर्याची हि दशा काही क्षणापुरतीच टिकते खग्रास सुर्य ग्रहण घडताना घडल्यानंतर हळूहळू अंधार पसरतो तापमान कमी होते प्रकाश मंदावत जातो सुर्याची प्रखरता कमी होते आणी ह्या संधी प्रकाशात पक्षांची किलबिल,प्राण्यांचे आवाज वातावरणात घुमु लागतात त्यांना रात्रीचा आभास होतो हे दृश्य अद्वितीय असते 

खग्रास सूर्यग्रहण पहाण्याचा आनंद Greenland,Island आणी स्पेनमधील लाखो लोकांनी घेतला हा ग्रहणकाळ एक मिनिटे सदतीस सेकंद इतका होता 

सूर्याभोवतीच्या तेजोमय करोनाचे विलोभनीय दृश्य पाहून युरोपीय प्रभावित

 12 August total eclipse imaged by Miguel Claro

 

ESA-13ऑगस्ट 

ह्या वर्षी 12 ऑगस्टला खग्रास सुर्यग्रहण झाले पण ते भारतात दिसले नाही युरोप खंडातील काही देशात पुर्ण स्वरूपात तर काही ठिकाणी खंडग्रास स्वरूपात दिसले युरोपात विस वर्षानंतर खग्रास सुर्यग्रहण दिसणार असल्याने शास्त्रज्ञ आणी हौशी नागरिकांमध्ये हे ग्रहण पाहण्याची ऊत्सुकता होती 

युरोपियन अंतराळ (ESA) संस्थेतर्फे ह्या सुर्यग्रहणाचे लाईव्ह Broadcasting करण्यात आले होते त्यामुळे जे नागरिक ग्रहण पाहण्यासाठी ग्रहणस्थळी येऊ शकत नव्हते आणी जिथून ग्रहण दिसणार नव्हते त्यांनाही ग्रहण पाहता आले आदल्या दिवशीच ग्रहण पाहु ईच्छीणाऱ्या नागरिकांना ग्रहण कसे पहायचे ह्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यासाठी खास तयार करण्यात आलेले चष्मे देण्यात आले आणी  चष्मा न घालता ग्रहण डायरेक्ट न पहाण्याची सुचना देण्यात आली होती

बारा ऑगस्टला अंतराळातील भ्रमणादरम्यान चंद्र प्रुथ्वी आणी सुर्य ह्याच्यमध्ये आला आणी सुर्याची ग्रहणदशा सुरू झाली जसजसे चंद्र भ्रमण सुरू झाले तसतशी सुर्याभोवती सावली पडु लागली आणी सुर्य झाकल्या जाऊ लागला सुर्यप्रकाश मंद होत गेला आणी पृथ्वीवर अंधार पडण्यास सुरुवात झाली सुर्याच्या ऊष्णतेची प्रखरता कमी झाली झाडांची सळसळ पक्षांचा किलबिलाट वातावरणात घुमु लागला सुर्य पुर्ण पणे झाकल्या जाण्याआधी सुर्याला चंद्र कोरीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आणी चंद्र पूर्णपणे सुर्यासमोर येताच सुर्यावर चंद्राची पुर्ण सावली पडली आणि खग्रास स्थिती प्राप्त होताच सुर्य काळवंडला त्याच्या भोवतीचे तळपते प्रखर तेजोमय प्रकाशकिरण दिसू लागले ह्या क्षणी सुर्याला डायमंड रिंगचे सौंदर्य प्राप्त झाले 

   96248.jpg

सुर्यापेक्षा चंद्राचा आकार लहान असल्याने सुर्य पुर्ण पणे झाकल्या जात नाही त्यामुळे खग्रास सुर्यग्रहणा दरम्यान मानवाला सुर्याभोवतीच्या प्रखर ऊष्णतेने तळपणाऱ्या अग्नीज्वालाचे प्रकाशमान तेजोवलय पहायला मिळते अंतराळातील निसर्गाच्या ह्या अदभूत घडामोडी मुळे सुर्याला प्राप्त झालेले अलौकिक सौंदर्य पाहुन नागरिक रोमांचित झाले शहराबाहेरील मोकळ्या मैदानात,नदीकिनारी हे ग्रहण पहाण्यासाठी शास्त्रज्ञ आणी नागरिकांनची गर्दी जमली होती त्यांनी सुर्याचे ग्रहण सुरू झाल्यापासून संपेपर्यंतच्या ग्रहणदशेचा आनंद अनुभवला 

स्पेनमधील मधील  Observatorio Astrofisico de Javalambre येथून ESA च्या लाईव्ह प्रसारणाद्वारे खग्रास सुर्यग्रहण पाहिल्यानंतर ESA च्या Director of Science Professor- Carole Mundell म्हणाल्या," सुर्याचे खग्रास ग्रहण पहातानाचा अनुभव अत्यंत सुंदर होता दिवसा रात्रीचा आभास,सुर्याभोवतीचा करोना त्यातील प्रखर तेजस्वी किरणांचे  प्रकाशवलय आणी सुर्याच हे सुंदर रूप सारच आश्चर्यकारक, अविश्वसनीय होत "!

Saturday, 15 August 2026

रशियन अंतराळवीर Anna, Dubrove आणि Andrey ह्यांनी स्थानकातून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या

  India's Independence Day wishes from space! Russian cosmonauts Pyotr Dubrov,  Anna Kikina and Andrey Fedyaev sent warm greetings to India from orbit,  praising the country's journey of self-reliance and prosperity while  celebrating

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे रशियन अंतराळवीर Anna Kikina ,Pyotr Dubrov आणि Andrey Fedyaev स्थानकातून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना -फोटो - Roscosmos संस्था 

नासा संस्था - ( Roscosmos)-15 ऑगस्ट 

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov,Anna kikina आणि Andrey Fedyaev ह्यांनी स्थानकातून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या ह्या वेळी त्यांच्या हातात भारतीय ध्वज होता त्यांनी भारतीयांना भरभराट आणी शांती लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली 

ह्या अंतराळवीरांनी त्याच्या व्यस्त दिनचर्येतुन वेळ काढून भारतियांना 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या भारत आणी रशिया ह्यांच्या अंतराळविश्वातील संबध व ऐतिहासिक मैत्रीचा ऊल्लेख त्यांनी ह्या वेळी केला  अंतराळातून लाईव्ह संवादाद्वारे त्यांनी पृथ्वीवासीयांशी साधलेला हा संवाद

Pyotr Dubrov म्हणाले " ऐशी वर्षांपुर्वी भारतीय स्वातंत्र्य विरांनी परकीयांशी झालेल्या युध्दात बलीदान देऊन अनेक संकटावर मात करत स्वातंत्र्य मिळवले त्या नंतर भारत औद्योगिक आणी अंतराळविश्वात प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे भारतीयांना ऐशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ह्या वर्षी मानवाच्या अंतराळविश्वातिल अंतराळ ऊड्डाणाला आणी अंतराळ प्रवेशाला 65 वर्षे पुर्ण होत आहेत सोव्हिएत युनियन आणी भारताच्या ऐतिहासिक मैत्रीच्या शुभारंभाला देखील अंतराळवीर युरी गँगरीन ह्यांनी 1961 मध्ये भारताला भेट दिली होती !"

Anna Kinkina  म्हणाल्या," त्या वेळी ते म्हणाले अंतराळातून भारत सुंदर दिसतो पण प्रत्यक्षात भारत जास्त सुंदर आणी खास आहे कारण ईथे आमच्या खऱ्या मित्राच घर आहे भारता सोबतच्या रशियाच्या अंतराळविश्वातिल मैत्रीला ऐतिहासिक संदर्भ आहे 1975 साली रशियाच्या सहकार्याने भारताचा पहिला ऊपग्रह आर्यभट्ट अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला आणी 1984 साली अंतराळवीर राकेश शर्मा ह्यांनी सोयुझ T-11अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळ ऊड्डाण केले होते हे भारताचे पहिले ऐतिहासिक मानवी अंतराळ ऊड्डाण होते आता भारत स्वयंपूर्ण बनला आहे भारतीय अंतराळसंस्था ईसरोने गगनयान ह्या अंतराळयानाची निर्मिती केली आहे त्या साठीही रशियाने सहकार्य केले आता भारतीय अंतराळवीर रशियाच्या Yuri Gagarin Cosmonauts Training Center मध्ये ऊड्डाण पुर्व प्रशिक्षण घेतात 

अंतराळवीर Andrey म्हणाले आता रशिया आणी भारत देशाची  अंतराळविश्वातिल हि ऐतिहासिक भागीदारी विकासाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण करत आहे नुकतीच ईसरो आणी रशियन अंतराळसंस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची निवड घोषित करण्यात आली आहेत

         "भारतीय नागरिकांना ऐशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !"

Saturday, 8 August 2026

नासाच्या Innovative Technology Concepts स्पर्धेतील विजेत्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची संशोधनासाठी निवड

 

नासाच्या Innovative Technology Concepts स्पर्धेतील 2026 च्या विजेत्यांच्या संकल्पित तंत्रज्ञानाचे चित्रकारांनी साकारलेले कोलाज -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -8 ऑगस्ट 

नासा संस्थेद्वारे भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या परग्रहावरील सुरक्षीत वास्तव्यासाठी आणि नवीन विकसित तंत्रज्ञान संशोधित करण्यासाठी दर वर्षी अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते त्या स्पर्धेत शास्त्रज्ञ आणी सर्जनशील नागरिकांना सहभागी होण्याची संधी दिली जाते ह्या वर्षी NIAC द्वारा जाहीर झालेल्या अभिनव स्पर्धेला अमेरिकेतील सर्व राज्यातील संस्था आणी कंपनीतील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला ह्या सहभागी स्पर्धेकामधील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या पहिल्या गटातील 18 विजेत्या स्पर्धेकांची अंतिम निवड करण्यात आली आहे  

ह्या वर्षीच्या विजेत्या स्पर्धकांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना ऊल्लेखनियआहेत एका विजेत्या स्पर्धेकाने चंद्र मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील अंधारात देखील कार्यक्षम राहण्यासाठी आणि सुरक्षित संशोधनासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे भविष्यकालीन चंद्र मोहिमेदरम्यान तेथील भूगर्भातील Lava Tubeच्या अस्तित्वाचा भाग शोधून तेथील संशोधित माहिती आणि नकाशा मिळवण्यासाठी हवेत तरंगणाऱ्या छोट्या रोबोटची निर्मिती त्यांना आधार देणारी तंत्रज्ञान प्रणाली आणि तापमान नियंत्रक विकसित केले आहेत शिवाय चंद्रावर दोन आठवड्यांची प्रदीर्घ रात्र असल्यामुळे तेथे अंधार असतो अशावेळी भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांच्या तेथील वास्तव्यादरम्यान संशोधित माहिती मिळविताना कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता भासेल त्यासाठी ह्या सर्जनशील संशोधकाने अंतराळवीरांच्या स्पेससूट मध्ये रेडिओयसोटॉपिक उष्णता निर्मिती प्रणाली विकसित केली आहे 

दुसऱ्या विजेत्या सर्जनशील संशोधकाने सौरमालेतील शुक्र ग्रहाच्या उष्ण वातावरणात देखील सुरक्षित राहून कार्यरत राहणाऱ्या अंतराळयानाची आणि अत्याधुनिक उपकरणाची निर्मिती संकल्पना विकसित केली आहे तिसऱ्या विजेत्या संशोधकाने शनी ग्रहाभोवतीच्या कड्याची संशोधित माहिती मिळवण्यासाठी दहा हजार लघु उपग्रहांच्या वापराची संकल्पना मांडली आहे शिवाय शनी,युरेनस नेपच्युन या सारख्या ग्रहाभोवती फिरणाऱ्या कड्यामधून संशोधित नमुने गोळा करणारी प्रणाली संकल्पित केली आहे 

काही कल्पक संशोधकांनी सौरमालेबाहेरील मानवाला अज्ञात असलेल्या ग्रहांचा शोध घेऊन त्यांची सखोल भौगोलिक माहिती नकाशे आणि फोटो ह्यांची निरक्षित संशोधित माहिती मिळविण्यासाठीची संकल्पना मांडली आहे शिवाय काही स्पर्धकांनी  आकाशगंगा निर्मिती संशोधन,कृष्णविवर निर्मिती रहस्य आणि त्यातील गुरुत्वाकर्षणीय लहरींचा शोध घेणारी संकल्पना विकसित केली असून काहींनी पृथ्वीवरील सूर्याच्या हानिकारक सूर्यकिरणांचा उत्सर्ग कमी करण्यासाठी आणि अंतराळातील धूलिकणांचा संभाव्य वापर ह्या सारख्या अभिनव संकल्पना सादर केल्या आहेत  

"नासा संस्थेच्या NIAC (NASA Innovative Advance Concept) ह्या मोहिमे अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो नासा संस्था भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी,अंतराळविश्वातील व्यावसायिक वाढीसाठीआणि एरोस्पेस मोहीम सक्षम करण्यासाठी अशा अवकाश तंत्रज्ञानांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देते आणि त्या प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करते नासा संस्थेने ह्या स्पर्धेतील अठरा जणांच्या ह्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांची निवड घोषित केली असून त्या नासा संस्थेशी संबंधित नाहीत परंतु भविष्यकालीन अंतराळविश्वातील संशोधनासाठी त्या उपयुक्त ठरतील म्हणून नासा संस्थेने त्यांच्या संकल्पित तंत्रज्ञान निर्मितीसाठी त्यांना 3.2 million डॉलर इतका निधी मंजूर केला असून ह्या अठरा पैकी प्रत्येकांना 175,000 डॉलर्स इतका निधी देण्यात येणार आहे मात्र नऊ महिन्यात त्यांना त्यांची तंत्रज्ञान निर्मिती पूर्ण करावी लागेल असे नासाचे वॉशिंग्टन येथील Mission Directorate Greg Stover म्हणतात !" 

 

Wednesday, 29 July 2026

नासाचे अंतराळवीर Chris Williams सहकारी रशियन अंतराळवीरांसह पृथ्वीवर पोहोचले

 Change of command: Complete. @Astro_Jessica is now commander of the  International @Space_Station as former station commander Sergey Kud- Sverchkov handed over the role this morning ahead of the Soyuz MS-28 crew's  departure. Next

नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey आणि Sergei पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकातील Change The Command आणि Farewell Ceremony दरम्यान नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -26 जुलै 

नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Kud Sverchkov आणि Sergei Mikaev अंतराळस्थानकातील त्यांचे 241 दिवसांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले आहेत हे तीनही अंतराळवीर Soyuz MS- 28 ह्या अंतराळयानातून दुपारी 2.03 मिनिटाला पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि संध्याकाळी 5.27 वाजता पृथ्वीवर पोहोचले 

  Cosmonaut Sergey Kud-Sverchkov outside of the Soyuz MS-17 spacecraft - NASA

रशियन अंतराळवीर Sergey Kud Sverchkov कझाकस्थानातील Dehezkazgan येथे सुरक्षित पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था 

पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकात ह्या आंतराळवीरांचा Change The Command आणि Farewell Ceremony पार पडला स्थानकाचे सध्याचे कमांडर Sergey Kud Svarchkov ह्यांनी अंतराळ मोहीम 75च्या कमांडर पदाची सूत्रे अंतराळवीर Jessica ह्यांच्या हाती सोपविली त्या वेळी ह्या अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले 

Sergey Kud Sverchkov -"स्थानकातील आठ महिन्यांचे वास्तव्य आनंदात गेले पण हे सोपे नव्हते आणि अवघडही मी आधी इथे वास्तव्य केल होत त्या मुळे अनुभवी होतो इथल्या वास्तव्यादरम्यान स्थानकात पृथ्वीवरून अनेक Cargo Vehicles इथे आले Payload ,Sign,Eva ह्यातला सहभाग महत्वपूर्ण आहे हा नवा अनुभव गाठीशी घेऊन हे सार मागे सोडून जात आहोत हा अनुभव देखील पुढे उपयुक्त ठरेल मी नासा संस्थेतील पार्टनर देश युरोप,जपान ,USA आणि रशियाचे आभार मानतो त्यांच्या एकत्रित सहकार्याने हि मोहीम यशस्वी झाली माझ्या स्थानकातील सहकारी अंतराळवीर मित्रांची साथ देखील महत्वाची आहे त्यांची बुद्धिमत्ता,समर्पण आणि कार्यक्षमता कौतुकास्पद  आहे आम्ही सारे इथे कुटुंबियांसारखे एकत्र राहिलो त्यांच्या सोबतच मी नासा संस्थेतील टीममधील सर्वांचे आभार मानतो आणि स्थानकाची सूत्रे आता अंतराळवीर Jessica कडे सोपवतो !"  

Jessica - "Thank You Sergey तुमच्या कुशल नेतृत्वाबद्दल तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन सर्व समस्यांवर मात करीत स्थानकाची धुरा सांभाळली आणि हि मोहीम यशस्वी केली तुमच्या सारख्या कर्तृत्वान कमांडरकडून स्थानकाची जबाबदारी स्वीकारताना मला सन्मानित वाटतय तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाल आपण इथून खाली जेव्हा पृथ्वीकडे पाहतो तेव्हा आपल्याला आपल सुरक्षित घर दिसत पण इथे दररोज  अंतराळात फिरताना आपल्याला स्थानकातील आपल घर दिसत आपल काम दिसत इथे आपण  प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी  सुरक्षित असतो कारण जगभरातील नासा संस्थेतील हजारो कर्मचारी टीम प्रमुख सतत रात्रंदिवस आपल्या सुरक्षिततेसाठी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जागरूकतेने मार्गदर्शन करतात ह्याची जाणीव होते हि मोहीम जशी आपली आहे तशी त्यांची सुद्धा आहे माझ्यासाठी हे कमांडरपद म्हणजे अंतराळ स्थानक आणि अंतराळवीरांची जबाबदारीने काळजी घेण इथले सर्व अंतराळवीर कर्तृत्वान आहेत मेहनती आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण आणि कठीण समयी साथ देण महत्वाच आहे ह्या मोहिमेच्या यशासाठी आपल संशोधनच ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित काम करण आवश्यक आहे आपल्या कर्तृत्वाची छाप सोडून मित्रत्वाचे नाते जोडून आपण इथून पृथ्वीवरील ग्रॅव्हीटीत सुरक्षित पोहोचू तेव्हा आपली हि मोहीम पूर्ण होईल Sergey,Sergei आणि Chris ह्यांच्या परतण्याची तयारी पाहताना आनंद झाला हे तिघेही सुरक्षित पृथ्वीवर पोहोचो अशी शुभेच्छा त्यांच्या कठोर परिश्रम,समर्पण,सौहाद्रता आणि प्रेरणादायी मित्रत्वाची आठवण येईल Sergey नि बनविलेल्या Space Cakeची आठवण आहेच माझ्या मोहीम 75 मधील अंतराळवीरांनो सतत हसत रहा आणि संशोधनात सहभागी व्हा धन्यवाद!" त्या नंतर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेत एकत्रित फोटो घेतला आणि हे तिन्ही अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी निघाले  

  NASA astronaut Chris Williams grins at the camera while holding a walkie-talkie up to his ear. He's wearing a blue and white spacesuit that has various patches on the chest and left arm. His helmet is open. Someone in a blue jumpsuit stands behind him, and there are more people standing behind a red and white tape barrier.

 नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियातील कझाकस्थानात सुरक्षित पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था 

तीन तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर सोयूझ अंतराळयान पृथ्वीवर पोहोचले पृथ्वीच्या कक्षेत शिरताच हे तिन्ही अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने कझाकस्थानातील Dehezkazgan येथे खाली उतरले तेव्हा नासा आणि  Roscosmos संस्थेतील रिकव्हरी टीम तेथे पोहोचली त्यांनी ह्या तीनही अंतराळवीरांना अंतराळयानातून बाहेर काढले आणि चेअरवर बसविले पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर त्यांना कसे आहात ? त्याचा अंतराळप्रवास कसा झाला? असे विचारले असता अंतराळप्रवास स्मूथ आणि छान झाला आम्ही आनंदी आहोत तुम्हा सर्वांच्या स्वागताने आणि अभिनंदनाने आणखी छान वाटल असे त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या प्रमुखांना सांगितले 

 

रशियन अंतराळवीर Sergei Mikaev ह्यांना सोयूझ अंतराळयानातून उचलून आणताना रशियाच्या रिकव्हरी टीममधील कर्मचारी -फोटो -नासा संस्था 

तेथे त्यांचे प्राथमिक चेकअप झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने कझाकस्थानातील Karaganda येथील रिकव्हरी कॅम्प येथे नेण्यात आले तेथे पुढील चेकअप झाल्यानंतर अंतराळवीर Chris ह्यांना नासाच्या विमानाने Johnson Space Center Huston येथे पोहोचविण्यात आले अंतराळवीर  Sergey आणि Sergei ह्यांना रशियातील Star City Training Base येथे पोहोचविण्यात आले 

Sunday, 26 July 2026

नासाच्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळभूमीत एक वर्षाच्या वास्तव्यासाठी धाडसी नागरिकांना संधी

 

नासाच्या  ह्या अभिनव उपक्रमातील सहभागी उमेदवार Augmented reality goggles घालून  शास्त्रज्ञ निर्मित परग्रहीय वातावरणात अंतराळवीरांसारखे कार्य करताना -फोटो -नासा संस्था 

 

 नासा संस्था - 26 जुलै 

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळसृष्टी निर्माण केली आहे नासाच्या भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळसृष्टीत राहिल्यावर मानवी शरीरावर व आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी CHAPEA हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे 

ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ सृष्टीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ भविष्य कालीन अंतराळवीरांचे प्रातिनिधित्व करणाऱ्या धाडसी ऊमेदवारांचा समावेश असलेले तीन गृप तयार करण्यात आले होते त्यातील पहिल्या गृप मधील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांनी ह्या सृष्टीत वर्षभर वास्तव्य करून उपयुक्त संशोधित माहिती गोळा केली असून दुसऱ्या गृप मधील चार प्रतिनिधी देखील ऑक्टोबर मध्ये नासा संस्थेतील कृत्रिम मंगळ भूमीतील एक वर्षांचे वास्तव्य संपवून परतणार आहेत 

आता पुन्हा नासा संस्थेतर्फे भविष्यकालीन मंगळ आणि चंद्र मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ह्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीतील परग्रहीय वातावरणात एक वर्षाच्या वास्तव्यासाठी संधी उपलब्ध केली आहे ह्या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छित उमेदवारांना नासा संस्थेच्या निर्धारित बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे त्या मध्ये उमेदवाराचे मानसिक आरोग्य,शैक्षणिक पात्रता,सुदृढ शारीरयष्टी ह्या बाबींचा समावेश आहे शिवाय ह्या उमेदवारांना नासा संस्थेच्या अनेक चाचण्या आणि दीर्घकालीन निवड प्रक्रिया पार पाडाव्या लागतील त्या साठी उमेदवारांमध्ये सयंम आणि चिकाटीची आवश्यकता असावी लागेल ह्या उमेदवारांना पृथ्वीवरील ह्या शास्त्रज्ञ निर्मित परग्रहीय वातावरणात वास्तव्य करून संशोधन करावे लागणार असल्याने ह्या बंदिस्स्त वातावरणात राहण्याची इच्छा आणि अभ्यासू वृत्ती असणे देखील आवश्यक आहे 

नासाच्या आतापर्यंतच्या HERA मोहिमे अंतर्गत संशोधन आणि CHAPEA मोहिमे अंतर्गत दीर्घकाळ परग्रहीय वातावरणात राहिल्यावर मानवाच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर काय परिणाम होतात ह्या विषयी संशोधित माहिती गोळा केल्या गेली आता ह्या दोन्ही मोहिमांचा एकत्रित विकसित परिणाम संशोधित करण्यात येणार आहे नासाच्या नव्या अभियानात HERA मोहिमेचा अंतराळयान आणि CHAPEA मोहिमेचा परग्रहावरील वास्तव्यासाठी वातावरणीय संशोधित माहिती गोळा करण्यासाठी उपयोग केल्या जाईल त्या साठी ह्या उमेदवारांना पृथ्वीवरील नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित परग्रहीय वातावरणात वास्तव्य करताना पृथ्वीपासून दूर आणि बंदिस्त परीस्थितीत राहावे लागणार असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क आणि  संवाद साधता येणार नाही फक्त नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील टीम प्रमुख त्यांच्याशी संपर्क साधतील त्यांना मर्यादित जागेत आणि मर्यादित साहित्यात तेथे राहावे लागेल

भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील भूमीवर वास्तव्य करताना शारीरिक व इतर अडचणींवर मात करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या उमेदवारांना अंतराळवीरांसारखेच ट्रेनींग दिले जाईल त्या मध्ये कृत्रिम मंगळभूमीत संशोधना सोबतच Simulated Mars Walk,रोबोटिक ऑपरेशन्स,मंगळ आणि भविष्यकालीन अंतराळमोहिमेसाठी डिझाईन केलेल्या तंत्रज्ञानाच्या संशोधनात्मक चाचणी,रोव्हरच्या साहाय्याने ह्या मंगळभूमीत दूरवर प्रवास करुन संशोधित माहिती गोळा करणे ह्याचा समावेश आहे सोबतच ह्या निवडक उमेदवारांना ह्या आधीच्या परग्रहावरील अनेक उड्डाणाचा आणि कार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी सुधारून नवीन विकसित संशोधित तंत्रज्ञान व माहिती गोळा करावी लागेल  

 भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि परग्रहावरील विपरीत वातावरणात अंतराळवीरांच्या शारीरिक दुष्परिणामावर मात करण्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी आणि नवीन विकसित अत्याधुनिक हार्डवेअर आणि  यंत्रणेच्या कार्यक्षमतेसाठी हा उपक्रम नासा संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे   

Saturday, 18 July 2026

अंतराळवीर अनिल मेनन सहकारी रशियन अंतराळवीरांसह स्थानकात पोहोचले

  An adult and two children watch a rocket launch. The adult woman carries one child on her shoulder and holds hands with the other child. Their backs are to the camera, so we can see the text on the back of their t-shirts, which reads "Team Menon" in white and yellow writing.

रशियातील कझाकस्थान येथील बैकोनुर ऊड्डाणस्थळावरुन  अंतराळवीर अनिल मेनन ह्यांच्या पत्नी Anna मुलांसोबत सोयूझ यानाचे  ऊड्डाण पहाताना - फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -17 जुलै 

नासाच्या अंतराळ मोहीम 74/75 अंतर्गत अंतराळवीर अनिल मेनन रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov आणि Anna kikina हे तिघे 14 जुलैला आठ महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले आहेत ह्या तिन्ही अंतराळवीरांसह सोयुझ MS-29 अंतराळयान रशियातील कझाकस्थान येथील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून सकाळी 10.47 मिनिटांनी स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले 

 

अंतराळवीर अनिल मेनन ,Pyotr Dubrov आणि Anna Kikina -फोटो- नासा संस्था

हे अंतराळवीर दोन महिने रशियातील Cosmonaut training Center मधील Cosmonaut Hotel Crew Quarter मध्ये रहात होते उड्डाणाआधी संस्थेच्या बस मधून ते उड्डाणस्थळी निघाले तेव्हा त्यांच्या अंतराळवीर मित्रांनी  Farewell song वाजवून त्यांना निरोप दिला आणि सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या 

उड्डाणाआधी ह्या अंतराळवीरांचे उड्डाणपूर्व मेडिकल,स्पेससूट फिटिंग लिकेज व इतर आवश्यक गोष्टीचे चेकअप झाले त्या नंतर ह्या अंतराळवीरांशी नासा संस्थेचे Administrator Jared Isaacman,Deputy Administrator Matt Anderson आणि Roscosmos संस्थेतील प्रमुखांनी संवाद साधला Jared ह्यांनी मेनन ह्यांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले "तुम्ही भाग्यवान आहात खूप कमी जणांना अंतराळस्थानकात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते तुम्ही त्यासाठी खूप मेहनत घेतलीत तुम्ही कर्तृत्ववान आहात तुमच्याकडून आम्हाला अमेरिकेला खूप अपेक्षा आहेत त्या साठी आमचा  पाठिंबा आणि अमेरिकन जनतेच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही रशिया आणि अमेरिका ह्या दोन देशाचे नाव यशस्वी कराल अशी खात्री आहे !"

त्या नंतर ह्या अंतराळवीरांना पोहोचवायला आलेल्या त्यांच्या कुटुंबयांशी,मित्र आणि नासा संस्थेतील मान्यवर अंतराळवीरांशी ह्या तिघांनी संवाद साधला मेनन ह्यांच्या पत्नी Anna ह्या त्यांना निरोप द्यायला आल्या होत्या त्या नंतर दोन्ही संस्थेतील प्रमुखांनी त्यांना उड्डाणस्थळी नेले आणि सोयूझ अंतराळ याना पर्यंत पोहोचवले निर्धारित वेळी यानाचे रॉकेट प्रज्वलित झाले आणि यान अंतराळात झेपावले 

सोयुझ यान अंतराळात पोहोचताच स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होऊन अंतराळयान रॉकेटपासून वेगळे झाले आणि स्थानकाच्या दिशेने अंतराळप्रवासास लागले तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर दुपारी 1.52 मिनिटाला स्थानकाच्या Prichal Module जवळ पोहोचले  सोयूझ यानाने अंतराळात दोन फेऱ्या मारल्या नंतर स्थानक आणि सोयूझ यान ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली दुपारी 4.30 वाजता स्थानकाचे दार उघडल्यानंतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला  

सध्या स्थानकात वास्तव्यास असलेल्या कमांडर Sergey Sverchkov ह्यांच्या मार्गदर्शनात अंतराळ मोहीम 74 चे अंतराळवीर Jessica Mier,Jack,Chris, Sophie, अंतराळवीर Sergey Mikoev आणि Adrey Fedyaev ह्यांनी ह्या तिन्ही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले त्यानंतर काही वेळातच नासा आणि Roscosmos संस्थेतील प्रमुखांच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांचा स्थानकातील Welcome Ceremony पार पडला 

 In the front row from left, are new Expedition 75 crew members Anil Menon of NASA and Roscosmos cosmonauts Pyotr Dubrov and Anna Kikina. In the second row, are Roscosmos cosmonauts Andrey Fedyaev, Sergei Mikaev, and Sergey Kud-Sverchkov. In the back, are Sophie Adenot of ESA and NASA astronauts Jack Hathaway, Chris Williams, and Jessica Meir.

अंतराळवीर मेनन Anna आणि Dubrov स्थानकात पोहोचल्या नंतर Welcome Ceremony दरम्यान संस्थेतील मान्यवरांशी संवाद साधताना सर्व अंतराळवीर एकत्रित -फोटो -नासा संस्था 

Mitri Kalashnikov  -Good Evening ! तुम्ही सर्वजण स्थानकात सुखरूप पोहोचला आहात आनंदी दिसत आहात हे पाहून आम्हा सर्वांना आनंद झाला Anna ,Pyotr आणि अनिल तुमचे अभिनंदन! 

Huston -आम्ही सुद्धा हेच म्हणू तुमच Launching ,Docking आणि अंतराळ प्रवास ग्रेट होता Anna ,Pyotr तुम्ही स्थानकात सुखरूप पोहोचला आहात आणि अनिल तुम्ही पहिल्यांदाच स्थानकात प्रवेश केलाय आता तुमच स्थानकातील संशोधन पण असच ग्रेट असेल अशी आशा आहे आमच्या रशियन मित्रांचे आभारी आहोत त्यांनी हि मोहीम यशस्वी केली 

Alona Sakchinka -Welcome ! तुम्ही सुखरूप पोहोचला आहात आनंदी आहात आणि आमच्याशी संवाद साधत आहात हे पाहून आनंद झाला अभिनंदन  स्थानकातील वास्तव्यासाठी संशोधनासाठी शुभेच्छा! तुम्ही सगळे कसे आहात मेनन तुम्ही प्रथमच अंतराळ प्रवास केला स्थानकातील प्रवेशानंतरची भावना कशी आहे ? Anna Pyotr तुम्ही पुन्हा स्थानकात प्रवेश केलाय कस वाटतय ? 

मेनन -आम्ही आनंदी आहोत खूप लवकर तीन तासात इथे पोहोचलो हे सार आश्चर्यकारक आहे कुठल्याही पहिल्या गोष्टीच अप्रूप वाटत आणि हा तर अंतराळ प्रवास आणि अंतराळातील स्थानकातला प्रवेश खूप Excellent ! आणि निघण्याआधी मला निरोप द्यायला Jared Isaacman आले त्यांनी माझ्याशी संवाद साधत प्रोत्साहन दिले माझ्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे मी निश्चितच नवीन संशोधित माहिती मिळवेन  

Pyotr -आणि आम्हाला अस वाटतय कि पृथ्वीवर खूप दिवसांची मोठी सुट्टी व्यतीत करून पुन्हा इथे पोहोचलो आहोत अशा ठिकाणी जिथे मी खूप दिवस राहिलोय इथल्या सहकारी अंतराळवीर मित्रांसोबत संशोधन केलय मोकळा वेळ व्यतीत केलाय मला अस वाटतय हि बिझिनेस ट्रीप आहे पुन्हा पृथ्वीवर आणि इथे माझ्या घरातला प्रवास स्थानकात पोहोचल्यावरआधी तर ह्या अंतराळवीरांनी केलेल प्रेमळ स्वागत Welcome Ceremony! ची परंपरा सगळे अंतराळवीर आनंदाने हसतमुखाने स्वागत करतात भेटतात आम्ही सर्वजण पृथ्वीवर ट्रेनिंगमध्ये एकत्र राहिलोय  ट्रेनिंग घेतलय आता इथे एकत्र आलोय त्यांच्या हार्दिक स्वागताने भारावलोय !  

अंतराळवीरांच्या नातेवाईकांनी ह्या अंतराळवीरासोबत संवाद साधून त्यांच्या भावना व्यक्त केल्या 

"तुम्ही सर्वजण सुखरूप पोहोचला आहात हे पाहून आनंद होतोय हा भावनिक क्षण आहे तुमचे अभिनंदन आणि वास्तव्यासाठी शुभेच्छा तुम्ही लांब आहात आता नवीन संशोधन करणार आहात आताचा हा वंडरफूल क्षण enjoy करतोय launching च्या वेळी भावनात्मक आणि रोमांचक अनुभव पहायला मिळाला आम्ही प्रेरित झालो तुम्हाला संशोधनासाठी सुरक्षित वास्तव्यासाठी शुभेच्छा !"

आता हे तिनही अंतराळवीर स्थानकातील अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील  अंतराळवीर मेनन पहिल्यांदाच स्थानकात वास्तव्यास गेले असून Dubrov आणि Anna दुसऱ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत Dubrov ह्यांनी स्थानकात 355 दिवस आणि Anna ह्यांनी 157 दिवस  वास्तव्य करून संशोधन केले आहे मेनन झिरो ग्रॅव्हीटीत मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामावर उपयुक्त संशोधन विशेषतः रक्ताभिसरण,ब्लड सेल Bone loss , Heart attack वर ऊपयुक्त संशोधन स्टेमसेल आणी झिरो ग्रव्हिटित मायक्रोआँरगँनिझम, बँक्टेरीया ह्यांच्यवर होणाऱ्या परिणामाची माहिती संशोधीत करणार आहेत 

Wednesday, 15 July 2026

स्थानकातील अंतराळवीरांनी साजरा केला Sophie Adenot चा 44 वाढदिवस

true 

नासाचे अंतराळवीर स्थानकात अंतराळवीर Sophie Adenot चा  Birthday Celebrate करताना  -फोटो ESA संस्था 

ESA संस्था - सध्या स्थानकात वास्तव्यास असलेल्या नासाच्या अंतराळवीरांनी युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot ह्यांचा 44वा वाढदिवस नुकताच साजरा केला अंतराळवीर Sophie ह्यांनी सोशल मीडियावरून त्यांचे आभार मानले 

Sophie - "Oh !My God ! I am surprised! Thank you ! मला स्थानकात दोन Astro Pie सोबत मेणबत्त्या सापडल्या आणि त्यावर Happy Birthday Sophie अस लिहलय! Thank You Team ! you are Awesome ! Amazing ! तुम्ही माझ्यासाठी हे सरप्राईझ तयार केलत आणि मेणबत्ती पेटविण्याची ऑर्डर दिलीत!" 

अंतराळवीर - Happy Birthday Sophie !" असे म्हणत Sophie ला शुभेच्छा दिल्या 

Sophie -मला माझ्या कुटुंबियांकडून मित्र परिवाराकडून आणि माझ्या सहकारी अंतराळवीरांकडून सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या त्या बद्दल सर्वांचे आभार !  

हे माझे रशियन अंतराळवीर मित्र मास्टर बेकर्स आहेत त्यांनी माझ्यासाठी मल्टीलेयर केक तयार केलाय त्यांनी हनी ब्रेडवर योगर्ट,Sweetened Milk ,rehydrated Berriesचे लेयर्स बनवून त्यावर Pine nut घातले खूप सुंदर डेलिशस चव होती पृथ्वीप्रमाणे इथे मेणबत्ती पेटविता येत नाही म्हणून त्यांनी ट्रिक केली त्यांनी टॉर्च लॅम्पला रंगीत टेप चिटकऊन डेकोरेट केले आणि जेव्हा मी त्या पेटविल्या तेव्हा ज्योत तयार झाली

घरापासून दूर अंतराळातील ह्या फिरत्या घरात पृथ्वी सूर्याभोवती आणि आम्ही पृथ्वीभोवती फिरत असताना स्थानकाच्या  वास्तव्यातील हा वाढदिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे ह्या अंतराळवीर मित्रांनी साजरा केलेला हा 44 वा वाढदिवस माझ्यासाठी किती स्पेशल आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही Thanks पुन्हा एकदा 

Thank You Team पृथ्वीवरील Music Team ,ESA संस्था ज्यांनी माझ्या साठी हा मेसेज रेकॉर्डिंग करून पाठविला आणि आणि नासा संस्थेतील सर्वांचे आभार !"

 

नासा संस्थेतर्फे चंद्रभूमीवर उतरण्यासाठी तीन कंपन्यांनी बनविलेल्या Moon Lander ची निवड जाहीर

नासा संस्थेने निवड केलेले Astrobotic ,Intuitive Machines Firefly Aerospace कंपीनीनी निर्मित केलेले Moon Lander 

नासा संस्था -15 जुलै 

नासा संस्थेने आर्टेमिस चंद्रमोहीम आणि भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रभूमीवर उतरण्यासाठी आणि पृथ्वीवरून सायंटिफिक व इतर सामान नेण्यासाठी Moon Lander बनविण्याची संधी जाहीर केली होती अनेक कंपन्यांनी त्यात सहभाग नोंदविला होता आता नासा संस्थेने त्यातून तीन कंपन्यांनी बनविलेल्या Moon Lander ची निवड जाहीर केली आहे Astrobotic ,Firefly Aerospace आणि Intuitive Machines ह्या तीन कंपन्यांनी तयार केलेल्या Moon Lander चा त्यात समावेश आहे हि निवड 2028 पर्यंतच्या नव्या चंद्रमोहिमेसाठी आहे 

"ह्या कंपन्यांना Moon Lander निर्मितीसाठी 600 मिलियन डॉलरचा निधी देण्यात येणार असून त्या साठी नासा संस्थेच्या नियम व अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे चंद्रमोहिमे अंतर्गत चंद्रभूमीवर अत्याधुनिक यंत्र सामुग्रीची नेआण करण्यासाठी आणि भविष्यकालीन मोहिमेतील चंद्रावरच्या दिर्घकालीन मानवी वास्तव्यासाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीची हि पूर्वतयारी आहे असे नासाच्या Washington येथील Associate Administrator Lory Glaze म्हणतात"! भविष्यकालीन चंद्र मोहिमेतील अंतराळवीर चंद्रभूमीवर उतरतील तेव्हा संशोधनादरम्यान तिथे फिरण्यासाठी आणि सामान  नेआण करण्यासाठीही ह्या Moon Lander ची आवश्यकता आहे 

Astrobotic कंपनीला कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिसेसच्या दोन डिलिव्हरी साठी 297 मिलियन डॉलर आणि Firefly Aerospace कंपनीला 144.2 मिलियन डॉलरदेण्यात येणार असून Intuitive Machines ला एका डिलिव्हरीसाठी 148.3 मिलियन डॉलरचा निधी मंजूर करण्यात आला आहे 

"नासाची आर्टेमिस मोहीम आणखी जलद आणि यशस्वी होण्यासाठी ह्या कंपन्यांनी ह्या आधी चंद्रावर उड्डाण केलेल्या Lander च्या डिझाईनचा वापर करून त्यातील त्रुटी दूर करून नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे भविष्य कालीन मोहिमेत चंद्रावर तळ ठोकण्यासाठी आम्ही हि पूर्व तयारी करीत आहोत असे नासाचे Moon Base Acting Director of Cargo Lander- Ryan Stephan म्हणतात  ह्या नवीन निर्मिती ऑर्डर मुळे आम्हाला भविष्यकालीन मोहिमेत सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळेल आणि वेळही वाचेल !'

चंद्रभूमीवरील भविष्यकालीन 17 मोहिमा पार पाडण्याचा नासा संस्थेचा विचार आहे त्या साठी अमेरिकन उद्योजकांना संधी देण्यात येणार आहे PROMISE Technology अंतर्गत Perseverance आणि Curiosity  ह्या दोन्ही मंगळयानासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून नाविन्यपूर्ण अद्ययावत यंत्रणा विकसित करून भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी Lander बनविण्याची संधी सर्जनशील इंजिनीअर्सना देण्यात येणार आहे 

शिवाय नासा संस्थेतर्फे चंद्रमोहिमेसाठी चंद्रावर उतरण्यासाठी अंतराळयान बनविण्याची संधीही देण्यात येणार  असून ऊर्जा, Avionics तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक,चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सायंटिफिक माहिती आणि Optical Imager ह्या अद्ययावत यंत्रणेने युक्त अशा अंतराळयानाच्या निर्मितीसाठी अमेरिकन कंपन्यांकडून लवकरच प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत शिवाय चंद्र आणि पृथ्वी मधील संदेश यंत्रणा,संपर्क यंत्रणा आणि दिशादर्शका द्वारे तेथील संशोधित माहिती मिळवण्यात येईल 

आता निवड झालेल्या Moon Lander मध्ये चंद्रभूमीवर अंतराळयान उतरल्यानंतर तेथे उडणाऱ्या इंजिनच्या धुराच्या लोटाचे चंद्रावरील धुळीवर होणारे परिणाम फोटोबद्ध करणारे 3D स्टिरिओ कॅमेरे,अंतराळयान चंद्राच्या कक्षेत भ्रमण करताना किंवा चंद्रभूमीवर उतरताना योग्य मार्गदर्शन करणारे Laser Retroreflector Array आणि भविष्यकालीन अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी तेथील दीर्घकालीन संशोधनासाठीच्या नियोजनासाठी,चंद्रावरील वातावरणातील अपायकारक किरणोत्सर्गाची संशोधित माहिती आणि मोजमाप करण्यासाठी Linear Energy Transfer Spectrometer ह्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणे आवश्यक आहे 

ह्या वेगवेगळ्या Moon Lander द्वारे चंद्र भूमीवर सायंटिफिक उपकरणे पाठवून आम्ही चंद्रभूमीवरील वातावरणाचा तेथे उतरण्यायोग्य जागेचा शोध घेणार आहोत भविष्यकालीन अंतराळ मोहिमेच्या यशासाठी,अंतराळयान आणि अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी हि माहिती उपयुक्त ठरणार आहे  

 

Saturday, 4 July 2026

नासाच्या अंतराळवीरांनी स्थानकातून दिल्या अमेरिकेच्या 250 स्वतंत्रदिनानिमित्य शुभेच्छा !

true

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे अंतराळवीर Jessica Meir ,Jack Hathaway आणि Chris Williams स्थानकातून पृथ्वीवासीयांना अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र दिनानिमित्त शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था 


नासा संस्था - 4 जुलै 

अमेरिकेचा 4 जुलैला 250वा स्वातंत्र दिन आहे सध्या अमेरिकन नागरिकात तो साजरा करण्यासाठी उत्साहाचे वातावरण आहे पृथ्वीपासून दूर अंतराळस्थानकात वास्तव्य करीत असलेल्या अंतराळवीरांना तो पृथ्वीवर साजरा करता येत नाही पण अंतराळस्थानकातील अंतराळवीर एकत्र येऊन तो दिवस अंतराळात उत्साहाने साजरा करतात अंतराळमोहीम 74 चे अंतराळवीर Jack Hathaway,Chris Williams आणि Jessica Meir सध्या स्थानकात वास्तव्य करीत आहेत त्यांनी स्थानकातून नासाच्या लाईव्ह संपर्कात संवाद साधून पृथ्वीवासीयांना अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्या वेळी त्यांनी साधलेला हा संवाद 

अंतराळवीर Jack Hathaway -"आता ह्या क्षणी आम्ही पृथ्वीपासून दूर अंतराळातून 250 मैल अंतरावरून तुमच्याशी संवाद साधत आहोत आम्हाला  स्थानकात अमेरिकेचा हा 250 वा स्वातंत्र दिन साजरा करायला मिळतोय हा आमचा बहुमान आहे अंतराळातील अंतराळस्थानकात विविध देशातील अंतराळवीर एकत्र येतात वास्तव्य करतात आणि इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत ह्या फिरत्या लॅब मध्ये मानवाच्या,पृथ्वीच्या विकासासाठी संशोधन करतात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावतात इथे केलेले हे संशोधन भविष्यकालीन चंद्र आणि मंगळमोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणि तेथील त्यांच्या वास्तव्यासाठीची पूर्व तयारी आहे !"

अंतराळवीर Chris Williams - "अंतराळविश्वातील ह्या संशोधन आणि अंतराळमोहिमांमुळे जगातील अनेक देशातील अंतराळवीर आणि मानव एकत्र येतात आणि अंतराळवीर होण्याचे  स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना अशक्य ते शक्य करण्यासाठी प्रेरित करतात अंतराळविश्वातील आधीची Mercury ,Gemini आणि Apollo अंतराळ मोहीम त्यानंतरच Space Shuttle आणि आताची आमची हि अंतराळ मोहीम आम्ही सध्या स्थानकात वास्तव्य करत आहोत ह्या प्रत्येक अंतराळ मोहिमेमागे आधी इथे येऊन गेलेल्या अंतराळवीरांचं ध्येय साध्य करण्यासाठीच कर्तृत्व आहे आमच्या साठी ती अंतराळातील पाऊलवाट आहे !"

अंतराळवीर Jessica Meir - "आणि आता नासाने अंतराळविश्वातील आर्टेमिस चंद्रमोहीमेद्वारे अंतराळात यशस्वी पाऊल टाकले आहे आणि सर्व मानवाच्या कल्याणासाठी नासाने अंतराळ विश्वात टाकलेल्या ह्या यशस्वी  पाऊलवाटेवरून ह्या मोहिमेद्वारे पुढे वाटचाल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत 

             आम्हा सर्वांतर्फे अंतराळस्थानकातून तुम्हा सर्व पृथ्वीवासीयांना 

                                                        Happy 250 America ! 

 

 

Friday, 3 July 2026

अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी नासाच्या अंतराळवीरांच्या स्पेसवॉक संपन्न

  NASA astronaut Chris Williams works outside the International Space Station to swap out a malfunctioning wrist joint on the Canadarm2 robotic arm.

नासाचे अंतराळवीर Chris Williams स्थानका बाहेरील भागात Space Walk करताना -फोटो- नासा संस्था 

नासा संस्था -2 जुलै 

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे अंतराळवीर Chris Williams आणि Jessica Meir ह्यांनी स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी 30 तारखेला स्पेसवॉक केला हे दोन्ही अंतराळवीर मंगळवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणी सात तासांंनी स्पेसवाँक संपवुन स्थानकात परतले

ह्या दोनही अंतराळविरांनी आदल्या दिवशीच ह्या स्पेसवाँकची तयारी करून ठेवली होती त्यांनी स्पेससुट लीकेज चेकअप केले आणी स्पेसवॉकसाठी लागणारे साहित्य,कँमेरे,बँटरी चार्ज करून व्यवस्थित आहेत की नाही हेही चेक केले

ह्या स्पेसवाँकसाठी अंतराळवीर Williams ह्यांनी लाल रंगाच्या रेशा असलेल्या स्पेससुट परीधान केला होता तर अंतराळवीर Jessica ह्यांनी परीधान केलेला स्पेससुट रेशाविरहित होता

NASA astronauts Chris Williams and Jessica Meir are pictured training for a spacewalk in their spacesuits at NASA's Neutral Buoyancy Laboratory in Houston, Texas.

 

सात तास वीस मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या अंतराळ वीरांनी स्थानकाबाहेरील भागातील रोबोटिक आर्मच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले त्यांनी Canadarm 2 रोबोटिक आर्मच्या मनगटाचा जुना सांधा काढून नवीन सांधा बसविला  27 मेला ह्या रोबोटिक आर्म मध्ये बिघाड झाला होता ह्या आर्ममधे अतिरिक्त वीजप्रवाह प्रवाहित होऊन करंट येत येत होता आणी त्यामुळे रोबोटिक आर्म कार्यरत होत नव्हता 

त्या नंतर नासा आणि CSA मधील तज्ञ शास्त्रज्ञांनी हा सांधा बदलण्याचा निर्णय घेतला अंतराळवीरांनी स्पेसवाँकमध्ये ह्या  रोबोटिक आर्मचा सांधा बदलल्या वर नासाच्या Huston  येथील संस्थेतील टीमने ह्या रोबोटिक आर्मची दुरुस्ती व्यवस्थित झाली कि नाही हे पाहण्यासाठी ह्या आर्मचा विद्युत प्रवाह सुरु केला आणि डेटा कनेक्टिव्हीटी आणि कार्यप्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी घेतली 

ह्या अंतराळवीरांना स्पेसवाँकसाठी स्थानकातून Flight Engineer Jack Hathaway आणि युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot ह्यांनी मार्गदर्शन केले

नासाच्या शास्त्रज्ञांनी हा रोबोटिक आर्म आणि स्थानकातील अद्ययावत यंत्रणा पंचवीस वर्षे कार्यक्षम राहील आणि त्याचे पार्ट बिघडले तर बदलता येतील अशी तयार केली असल्यामुळे रोबोटिक आर्म दुरुस्ती करताना समस्या आली नाही 

अंतराळवीर Williams ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता आणि अंतराळवीर Jessica Meir ह्यांचा हा पाचवा स्पेसवॉक होता आणि स्थानकाच्या कामासाठी केलेला हा 280वा स्पेसवॉक होता  

Monday, 29 June 2026

नासाच्या TESS टेलीस्कोपने सौरमाले बाहेरील तेजस्वी ताऱ्याभोवती भ्रमण करणारे फुगीर कापसासारखे दोन ग्रह शोधले

 

TESS टेलिस्कोपने शोधलेले अंतराळातील सूर्यासारख्या तेजस्वी TOI -791 ह्या ताऱ्याच्या कक्षेत परिभ्रमण करणारे TOI-791b आणि TOI -791c हे कापसासारखे हलके लघु ग्रह -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था -29 जून 

नासाच्या अंतराळमोहिमे अंतर्गत 2018 साली अंतराळात प्रक्षेपित केलेल्या TESS मोहिमे अंतर्गत आजवर अंतराळातील मानवाला अज्ञात असलेल्या आपल्या सौरमाले बाहेरील अनेक ताऱ्यांचा वेध घेतला आहे आणी संशोधीत माहिती गोळा केली आहे शास्त्रज्ञांच्या मते ह्या अथांग ब्रम्हांडात आपल्या सौरमालेबाहेर अनेक सुर्य, ग्रह आणी असंख्य तारे आहेत ह्याचाच शोध घेण्यासाठी हि मोहीम सुरू करण्यात आली अत्याधुनिक चार High resolution कॅमेरे आणी शक्तिशाली दुर्बीण युक्त TESS टेलीस्कोपच्या सहाय्याने अत्यंत दुरवरचे तारे शोधून त्यांचे फोटो आणी सखोल संशोधीत माहिती गोळा केल्या जाते 

TESS मुळे अंतराळातील TOI-791ह्या सुर्यासारख्या तेजस्वी ताऱ्याचा शोध लागला गेल्या सात वर्षांपासून TESS ने  त्या ताऱ्याचे सखोल निरीक्षण नोंदवले आणि सखोल संशोधित माहिती गोळा केली तेव्हा हा तारा सुर्यासारखा तेजस्वी आहे तो प्रकाशमान होतो आणि त्याचा प्रकाश मंदावतो देखील अशी निरीक्षीत माहिती प्राप्त झाली हा तारा पृथ्वीपासुन 1,113 प्रकाशवर्ष दुरवर आहे  TESS ला त्या भोवती दोन कापसासारख्या हलक्या वजनाचे फुगीर लघु ग्रह परीभ्रमण करताना आधळले आहेत हे दोन्ही लघु ग्रह गुरु ग्रहाच्या आकाराचे आहेत पण वजनाने कॉटन कॅण्डी सारखे हलके आहेत आजवर सापडलेल्या अंतराळातील सर्व ग्रहांपेक्षा ते फुगीर आहेत शास्त्रज्ञांनी त्यांना TOI -791bआणि TOI-791c अशी नावे दिली असून हे दोन्ही लघु ग्रह TOI-791 ह्या स्वयंप्रकाशित सूर्यासारख्या ताऱ्याभोवती परीभ्रमण करीत आहेत

 We see a comparison of the two super-puff planets compared to five planets of our own solar system. The Earth appears as a small dot, next to Neptune and Uranus that appear similarly sized, then Saturn which is much larger, and Jupiter as the largest of them all. The super-puff planets are shown in comparison, with the TOI-791 b planet appearing in light blue and slightly smaller than Jupiter and the TOI-791 c planet appearing in darker blue and slightly larger than Jupiter. 

"हे दोन्ही लघु ग्रह गुरूसारखे दिसत असले तरीही त्यांची घनता गुरु ग्रहाच्या तुलनेत कमी आहे TOI -791b ची घनता 3.0% आणि  TOI-791cची घनता 5.9% इतकी आहे आम्हाला हे लघु ग्रह आपण पाहू शकू अशी अजिबात शक्यता वाटली नव्हती त्या मुळे आता ह्या कापसासारख्या हलक्या ग्रहांविषयी सखोल माहिती जाणून घेण्याची आमची उत्सुकता वाढली आहे!" असे नासाच्या कॅलिफोर्निया येथील Ames Research Center मधील Science Processing Operations Centerचे प्रमुख शास्त्रज्ञ Jon Jenkins म्हणतात ब्रह्मांडातील अस्तित्वात असलेल्या आणि मानवाला अज्ञात असलेल्या जड आणि हलक्या वजनाच्या ग्रहांच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्यास हि संशोधित माहिती उपयुक्त ठरेल 

ह्या दोन्ही लघु हलक्या ग्रहांच्या परीभ्रमण कक्षेचा आकार लांब आणि वेगळा आहे TOI-791b ला TOI -791 ह्या मुख्य ताऱ्याभोवती परिक्रमा करण्यासाठी 139 दिवस तर TOI-791cला 232 दिवस लागतात हे दोन्ही ग्रह एकमेकांशी एका विशिष्ठ गुरुत्वाकर्षणाने बांधलेले आहेत ते आळीपाळीने कक्षेत ओढल्या जात असल्यामुळे त्यांच्या परिक्रमेच्या वेळेत बदल होतो 

नासा संस्थेतील शास्त्रज्ञ म्हणतात सध्या आपल्याला अशा प्रकारचे मोजकेच फुगिर ग्रह अस्तित्वात असल्याचे  माहिती आहेत आणि एकाच सूर्यमालेत दोन ग्रह सापडणे दुर्मिळ आहे त्या मुळे ह्या दोन हलक्या वजनाच्या लघुग्रह आणि स्वयंप्रकाशित ताऱ्याच्या शोधामुळे आम्ही उत्साहित झालो आहोत हि संशोधित माहिती आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे विश्व निर्मितीच्या वेळेस अशा ग्रहांची निर्मिती प्रक्रिया आणि उत्क्रांती कशी झाली ह्या विषयी जाणून घेण्यासाठी सखोल संशोधित माहिती गोळा केली जात आहे आता ह्या दोन्ही ग्रहावरील वातावरण वायूंचे अस्तित्व आणि त्यांच्या परिक्रमेचा तेथील वातावरणावर होणारा परिणाम ह्या विषीयी निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती गोळा केल्यानंतर विश्वातील जड मोठ्या आणि हलक्या कमी वजनाच्या ग्रहनिर्मितीचा उलगडा होईल 

Friday, 26 June 2026

नासाचे अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी पत्रकारांशी साधला उड्डाणपूर्व लाईव्ह संवाद


 

 नासा संस्था - 26 जुन 

नासाच्या अंतराळ मोहीम 74/75 अंतर्गत अंतराळवीर अनिल मेनन रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov आणि Anna kikina हे तिघे 14 जुलैला अंतराळ स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत हे तीनही अंतराळवीर रशियातील Baikonur Cosmodrom Kazakhstan येथून Soyuz -MS-29 अंतराळ यानातून स्थानकात जाणार असून स्थानकात आठ महिने वास्तव्य करणार आहेत  

अनिल मेनन Air Force emergency medicine physician ,लष्करी अधिकारी आणि नासाचे अंतराळवीर आहेत त्यांनी मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनीअरची पदवी घेतलीय ते नासा आणि Space X संस्थेत flight surgeon पदी कार्यरत होते  

स्थानकात जाण्याआधी भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी त्यांच्या ह्या मोहिमेविषयी त्यांच्या विषयी पत्रकारांशी संवाद साधला सध्या हे अंतराळवीर रशियातील Gagarin Cosmonaut Training Center Star City येथे उड्डाणपूर्व ट्रेनिंग घेत आहेत तेथूनच त्यांनी नासाच्या लाईव्ह संपर्कात निवडक दैनिकांतील पत्रकारांशी संवाद साधला

-तुम्ही आठ महिने अंतराळस्थानकात वास्तव्यासाठी जाणार आहात त्याची तयारी कशी सुरु आहे विशेषतः मनाची तयारी त्या साठी ध्यान वै करीत आहात का ?

"आम्ही बऱ्याच दिवसांपासून ह्या मोहिमेसाठी ट्रेनिंग घेत आहोत स्थानकातील दैनंदिन प्रक्रिया Spacewalk या सारख्या आवश्यक गोष्टी प्रमाणेच मनाच्या एकाग्रतेचाही त्या मध्ये समावेश आहे मी स्वत: डॉक्टर असल्याने माझ्या मेडिकल करिअरचा आणि नासा संस्थेतील अंतराळवीरांना ट्रेनिंग देताना त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव मला कामी येतोय मी ह्या मोहिमेतील येणाऱ्या संभाव्य समस्यांचा अंतराळवीरांना आलेल्या अनुभवांचा सखोल अभ्यास करत आहे आणि जास्तीतजास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करताना त्यांना पाहून प्रेरित होतोय नासा संस्थेच्या ट्रेनिंग सोबतच हि माहिती आम्हाला मोहिमेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास त्यातून मार्गक्रमण करताना उपयोगी पडेल आणि माझी टीम माझ्यासोबत आहे मी आनंदित आहे उत्सुकतेने जाण्याची वाट पहातोय !"

-टीम वरून आठवल तुमची पत्नी पण अंतराळवीर आहे तुम्हाला तिच्याकडून कसा सपोर्ट मिळतोय तुम्ही आठ महिन्यांच्या करारावर सही केली तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी होती? ती मार्गदर्शन करते का ?

"अर्थातच तिलाही आनंदच झाला त्या बाबतीत आम्ही दोघेही लकी आहोत जेव्हा ती स्थानकात गेली होती तेव्हा मी इथे पृथ्वीवर मुलांना सांभाळत होतो आणि तेव्हाच पुरुषांना घर आणि मुल सांभाळण किती कठीण असत ह्याचा अनुभव आला आता तिला हे समजेल आणि तिथे अंतराळ स्थानकात काय स्थिती असते ते मला कळेल अर्थातच मला त्यांची आठवण येईल पण आता अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असल्याने आम्ही नासाच्या लाईव्ह संपर्कात एकमेकांना पाहू शकतो बोलू शकतो त्या मुळे जास्त काळजी नाही तिचा सपोर्ट आहेच ती जास्तीतजास्त मित्रांच्या सहवासात राहिली तर मलाही आनंद होईल आणि फक्त मोहिमेपुरतेच नाही तर नेहमीच ती मला सल्ला देत असते तिच्या अंतराळस्थानकातील कमी दिवसांच्या वास्तव्यात तिने वेळेचा कसा सदुपयोग केला,कसे पृथ्वीदर्शन केले,फोटो घेतले आणि झिरो ग्रॅव्हीटीत वावरताना कशी काळजी घ्यायची हेही तिने सांगितल्यामुळे माझ्या दीर्घकालीन वास्तव्यात मला त्याचा उपयोग होईल !" 

 - तुम्ही Star City चे रहिवासी होतात प्रथमच तिथून अंतराळ स्थानकात जाताना काय फीलिंग आहेत ?

"मी डॉक्टर असल्याने 2013 मध्ये तिथे कार्यरत होतो मी तिथल्या अंतराळवीरांसोबत त्याच्या निरोगी आरोग्यासाठी काम केलय सोबतच त्यांच ट्रेनिंगही पहात होतो तिथले लोक,बिल्डींग्स,कार्यक्रम Star City ला ऐतिहासिक महत्व आहे मला हे सार पाहायला मिळाल ह्याचा अभिमान वाटतो आणि घर सोडून दूर जाताना जस वाईट वाटत तसच मलाही फील होतय ह्या क्षणी हे सर्व सोडून जाताना संमिश्र भावना आहेत एकीकडे मला वाईट वाटतय मी पुन्हा इथे येऊ शकेन कि नाही ह्याच कारण माझी मोहीम संपली कि मी पुन्हा नासाच्या विमानाने नासा संस्थेत जाईन तिथल्या संशोधनात व्यस्त होईन पण माझं जीवनभराच स्वप्न सत्यात उतरणार आणि मी स्थानकात वास्तव्य करणार आणि तिथल्या झिरो ग्रॅव्हीटीतला तरंगण्याचा मजेशीर रोमांचक अनुभव घ्यायला मिळणार ह्या कल्पनेने आनंदित झालोय!"

-आता आठ महिने तुम्ही तेथे तरंगत्या अवस्थेत वास्तव्य करणार आहात त्या साठी काही विशेष तयारी करीत आहात का? त्या साठी मिलिटरी ट्रेनिंगचा उपयोग झाला का ?

"हो ! गेल्या सात वर्षातला अंतराळविश्वातल्या अंतराळवीरांसोबतचा नासा संस्थेतील अनुभव अथक परिश्रम,कठोर ट्रेनिंग व्यायाम हे सार मला उपयुक्त ठरेल आणि माझ्या मते तिथे तुमच्या शरीराबरोबरच मनाची तयारी आवश्यक आहे मनोनिग्रह Iron Man सारखा आणि  प्रत्यक्षात तिथे गेल्यावर झिरो ग्रॅव्हीटीत येणारी समस्या,अनुभव ह्या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मला निश्चितच त्याचा फायदा होईल मला आत्मविश्वास वाटतो कि मी करू शकेन ह्या आधी Space X मध्ये कार्यरत असताना आम्हाला दार आठवड्याला समस्या सोडवण अशक्य वाटायच पण आम्ही त्यावर अथक प्रयत्नाने मात करायचो आणि अशाच कठीण प्रसंगी आपल कसब पणाला लागत आणि आपल्या हातून वैशिष्ठपूर्ण कार्य घडत आणि आता तर नासाचे Administrator Isaacman ह्यांच जे असाध्य ते साध्य करण्याच ध्येय आहे नासा संस्थेतील अशा प्रेरणादायी व्यक्ती आपल्यालाही प्रेरित करतात !"

N.D.T.V -Emergency Medicine Physician ,Mechanical Engineer,Space Force आणि  Flight Surgeon पदी कार्यरत असतानाचा अनुभव कसा होता आणि तुमचे पालक युक्रेन आणि भारतीय वंशाचे आहेत,तुम्ही पोलिओ निर्मूलन साठी लसीचा प्रसार करण्यासाठी भारतात आला होतात तो अनुभव कसा होता भारताबद्दल काय सांगाल ?

-"मी भारतात आलो होतो तुम्हा भारतीयांबरोबर कामही केलय खूप छान अनुभव होता मी दिल्लीला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक वर्ष होतो आणि NDTV च ऑफिस ग्रेटर कैलास रोडला मी तिथे बाजूलाच राहात होतो मी रोटरी क्लबसोबत पोलिओ निर्मूलनासाठी पोलिओ लसीच्या प्रसाराचे काम केल त्या साठी खेडोपाडीही गेलो आणि वेगवेगळ्या  भागातील व्यवसायातील लोकांच्या भेटी घेतल्या भारतातही खूप संधी आहेत,अंतराळसंस्था आहे भारतीय अंतराळवीर देखील स्थानकात गॆले होते मी त्यांना भेटलोय अनेक युवा कर्तबगार तरुणांनाही स्थानकात जायचे आहे भविष्यात त्यांचंही स्वप्न पूर्ण होईल ते नासा संस्थेत जातील त्यांना मी निश्चितच मदत करेन मी भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे अंतराळात जाऊन मलाही पृथ्वीकडे पहायचय आणि आपल्या पृथ्वीवरील मानव सृष्टीबद्दल विचार करायचाय भारत वैभवशाली देश आहे इथे काहीच अशक्य नाही हे मी तिथे शिकलोय !"

-अमेरिकेने झिरो ग्रॅव्हीटीत लिहता येईल अशी पेन तयार केलीय आणि रशियाने पेन्सिल दोघांच्या तुलनेत कोण जास्त पुढे आहे ?

"दोघेही प्रगत अद्ययावत संशोधन मानवी विकासासाठी करीत आहेत आणि हे जास्त महत्वाचे आहे आज पृथ्वीवरील कॅन्सर,हार्टअटॅक या सारख्या अनेक रोगांवर अजूनही पूर्णपणे प्रभावी औषधे नाहीत त्या मुळे अशा रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे संशोधन इथे करता येत नाही ते स्थानकात केल्या जात आहे स्थानकात आता मानवी आरोग्यावर सखोल संशोधन केल्या जात आहे 3D टेक्नॉलॉजी मुळे झिरो ग्रॅव्हीटीत सेल्युलर टिश्यूचे प्रिंटआऊट काढल्या जात आहेत कारण तिथे तरंगत्या अवस्थेत सर्व बाजूने शरीरातील सर्व अवयव पाहता येतात अंतराळातील विपरीत वातावरणात सतत तरंगत्या अवस्थेत राहिल्याने अनेक समस्या ऊद्भवतात हाडे ठिसूळ होणे वजन कमी होणे क्रुत्रीम प्रकाशामुळे आणी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यावर परिणाम होतो पण आता हे दुष्परिणाम टाळण्यासाठी ऊपाय केले जात आहेत व्यायामाने त्यावर मात करण्यात यश मिळत आहे !"

मानवी आरोग्य निरोगी रहाण्यासाठी तिथे गेल्यावर मी  मानवी आरोग्य रक्ताभिसरण संस्था ह्या विषयी संशोधन करणार आहे शिवाय अंतराळातील बॅक्टेरीया मायक्रो ऑरगॅनिझम जर अंतराळात जिवंत राहिले असतील तर स्पेसवॉक दरम्यान त्यांना शोधून तेथील थंड वातावरणात त्यांच्या वर काय परिणाम होतो हे देखील शोधणार आहे ह्या संशोधनाचा ऊपयोग भविष्य कालीन मंगळ व चंद्र मोहिमेतील अंतराळविरांना होणार आहे!" हि पत्रकार परिषद बराच वेळ सुरू होती 

 

Friday, 12 June 2026

नासाच्या Artemis III अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांची निवड जाहीर

 The Artemis III crew poses for an official portrait (from left: Andre Douglas, Luca Parmitano, Randy Bresnik, Frank Rubio).

नासाच्या आर्टेमिस III अंतराळ मोहिमेतील सहभागी अंतराळवीर Andre Douglas  इसाचे अंतराळवीर Luca Parmintano नासाचे अंतराळवीर Randy Bresnik आणि अंतराळवीर Frank Rubio- फोटो -नासा संस्था  

नासा संस्था -12 जुन 

नासाची आर्टेमिस II मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता नासा संस्थेने आर्टेमिस III मोहिमेची तयारी सुरु केली आहे नासा संस्थेने बुधवारी ह्या मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड केली असून वेळेवर काही समस्या उद्भवल्यास किंवा एखादा अंतराळवीर मोहिमेत सहभागी होऊ न शकल्यास राखीव अंतराळवीराची निवड जाहीर केली आहे 

ह्या मोहिमेसाठी नासाचे अंतराळवीर Andre Douglas,Randy Bresnik,Frank Rubio आणि इसाचे अंतराळवीर Luca Parmintano ह्यांच्या नावाची घोषणा झाली आहे आणि Bob Hines ह्यांची राखीव अंतराळवीर म्हणून निवड झाली आहे ह्या मोहमेतील कमांडरपद अंतराळवीर Randy Bresnik आणि पायलट पद अंतराळवीर Luca Permintano सांभाळतील अंतराळवीर Andre Douglas आणि अंतराळवीर Frank Rubio हे दोघे मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून काम करतील 

अंतराळवीर Bresnik ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे ह्या आधी STS-129 मोहिमे अंतर्गत 2009 मध्ये त्या नंतर अंतराळ मोहीम 52- 53 अंतर्गत ते अंतराळ स्थानकात वास्तव्यास गेले होते 

अंतराळवीर Parmintano ह्यांची देखील हि तिसरी अंतराळवारी आहे ह्या आधी 2013 मध्ये आणि 2019 मध्ये Soyuz MS-13अंतराळमोहीम 61अंतर्गत ते स्थानकात वास्तव्यास गेले होते 

अंतराळवीर Rubio ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे ह्या आधी 2022 मध्ये Soyuz MS-22अंतराळमोहीमे अंतर्गत ते स्थानकात वास्तव्यास गेले होते त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 371 दिवस वास्तव्य करून स्थानकात जास्त दिवस राहणारा अमेरिकन अंतराळवीर असा विक्रम प्रस्थापित केला होता 

अंतराळवीर Douglas ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळयात्रा आहे ह्या आधी त्यांची आर्टेमिस II मोहिमेत राखीव अंतराळवीर म्हणून निवड झाली होती 

हे अंतराळवीर 2027 मध्ये चंद्रावर जातील आणि आर्टेमिस IV मोहिमेसाठी आवश्यक सायंटिफिक प्रयोग व संशोधित माहिती मिळवतील ह्या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर 2028 मध्ये आर्टेमिस IV मोहिमेतील अंतराळवीर चंद्राच्या दक्षिणेकडील भागात जातील नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून S.LS रॉकेटच्या साहाय्याने Orion चंद्रयान ह्या अंतराळवीरांसह अंतराळात झेपावेल आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (Low Earth Orbit ) प्रवेश करेल त्या नंतर हे चारही अंतराळवीर Orion चंद्रयानातील सर्व अत्याधुनिक सिस्टिम्स चेक करतील ह्या सिस्टिम्सची कार्यक्षमता,सुरक्षितता,हार्डवेअर,सॉफ्टवेअर,संपर्क यंत्रणा आणि इतर आवश्यक बाबीचा त्यात  समावेश आहे 

ह्या मोहिमेदरम्यान हे अंतराळवीर पृथ्वीवरून अंतराळात येणाऱ्या Blue Origin आणि Space X ह्यांनी निर्मित केलेल्या Moon Lander ची देखील चाचणी घेतील  भविष्यकालीन चंद्रमोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त संशोधित माहिती मिळविण्यासाठी आणि चंद्रभूमीवर फिरण्यासाठी Blue Origin आणि Space X ह्यांनी अत्याधुनिक अद्ययावत यंत्रणायुक्त Moon Lander ची निर्मिती केली आहे  हे अंतराळवीर चंद्र मोहिमेत जाण्याआधीच Blue Origin कंपनीचे Moon Lander अंतराळात Launch होईल त्या नंतर अंतराळवीर तेथे पोहोचतील आणि Lander ची Hatching ,Docking प्रक्रिया पार पडेल अंतराळवीर Lander मध्ये प्रवेश करतील आणि Lander मधील सर्व सिस्टिम्सची,सुरक्षितता,कार्यक्षमता संपर्क यंत्रणा चेक करतील दोन दिवस हे अंतराळवीर त्या मध्ये वास्तव्य करतील आणि त्या नंतर Orion चंद्र यान Lander पासून वेगळे होईल 

Blue Origin Lander ची चाचणी पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवरून Space X ने तयार केलेल्या Moon Lander चे Launching अंतराळात होईल त्यानंतर पुन्हा ह्या Lander ची Hatching Docking प्रक्रिया पार पडेल एक दिवस अंतराळवीर त्यात वास्तव्य करून त्यातील सर्व यंत्रणेची सुरक्षितता,कार्यक्षमता आणि संपर्क यंत्रणा चेक करतील ह्या प्रक्रिया पार पडल्यावर Orion चंद्रयान Lander पासून वेगळे होईल साधारण दोन आठवड्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परततील अंतिम कालावधी ह्या अंतराळवीरांच्या मोहिमेनंतर ठरेल 

ह्या अंतराळवीरांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नासाचे Administrator Jared Isaacman म्हणाले" आर्टेमिस II च्या यशस्वीतेमुळे आणि त्यातील सहभागी अंतराळवीरांच्या वैशिष्ठपूर्ण कर्तृत्वामुळे नासा ह्या मोहिमेतील पुढचे  धाडसी पाऊल टाकत आहे आर्टेमिस II मोहिमेत उड्डाणाआधी आलेल्या समस्यांना न घाबरता ह्या अंतराळवीरांनी धैर्याने आणि संयमाने हि अवघड मोहीम यशस्वी केली त्यांनी अत्यंत उपयुक्त आणि मौल्यवान संशोधित माहिती देखील गोळा केली त्या मुळे जगभरातील नासा संस्थेतील शास्त्रज्ञ प्रेरित झाले आहेत "!


Tuesday, 9 June 2026

नासाच्या मावेन मंगळयानातील यंत्रणा बंद पडल्याने मोहीम थांबविण्याचा निर्णय

  

  2014 मध्ये मंगळावर पोहोचलेले नासाचे मावेन मंगळयान कक्षेतिळ भ्रमणादरम्यान -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था- 3 जुन 

2013 साली  मंगळावरील पुरातन सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे आणी सजीव सृष्टीसाठी आवश्यक पोषक वातावरणाचा शोध घेण्यासाठी मंगळावर गेलेल्या नासाच्या मावेन मंगळयानाचे कार्य आता थांबले आहे 

मंगळावरील अकरा वर्षांच्या यशस्वी कार्यकीर्दिनंतर सहा डिसेंबरला ह्या यानाचा पृथ्वीवरील नासा संस्थेशी असलेला संपर्क अचानक तुटला होता त्या नंतर ह्या मोहिमेतील नासाच्या शास्त्रज्ञांनी त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही त्या मुळे त्यांचे प्रयत्न असफल ठरले फेब्रुवारी मध्ये शास्त्रज्ञांनी पुन्हा मावेन मंगळ यानाच्या सध्य स्थितीची आढावा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मावेन मंगळ यानातील यंत्रणा बंद पडल्याने यान कार्यरत होत नसल्याचे आढळले त्या मुळे मावेन मंगळयान ह्या पुढे संशोधीत माहिती मिळवण्यासाठी कार्यक्षम नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला 

डिसेंबरमध्ये मंगळाच्या कक्षेत भ्रमणादरम्यान मावेन मंगळाचा मागच्या बाजूस जाण्याआधी यानातील सर्व यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत होत्या आणी यान नियमितपणे भ्रमण करत होते पण मंगळाच्या मागच्या बाजुस गेल्यावर मात्र नासाच्या डिप स्पेस नेटवर्क टिममधील शास्त्रज्ञांना कोणताही सिग्नल मिळाला नाही तेव्हा त्यांनी ओपन लूप रिसिव्हर द्वारे रेकॉर्ड केलेल्या रेडिओ सिग्नलसच्या माहिती नुसार मंगळामागे गेल्यावरही यान सुरक्षित मोडमध्ये होते पण अचानक यानाचा वेग प्रचंड वाढला त्यामुळे त्याचे वेगावरचे नियंत्रण गेले आणी यान अनियंत्रित झाले

ह्या अवस्थेत यान भरकटले आणी अत्यंत वेगाने असामान्यपणे भ्रमण करायला लागले शास्त्रज्ञांच्या मते भ्रमणादरम्यान यानाच्या मार्गक्रमणात समस्या ऊद्भवली त्यामुळे व्यत्यय आला अत्यंत वेगवान आणी सततच्या अनियंत्रित भ्रमणामुळे बॅटरी निकामी झाली त्याचा परिणाम यानातील यंत्रणेवर होऊन यंत्रणा बंद पडल्या आणी त्यामुळे यान दुरुस्त होण्यातही अडथळा आला

ह्या मिळालेल्या माहितीवर नासाचे शास्त्रज्ञ आणखी सखोल संशोधन करीत आहेत आणि मावेनचा पृथ्वीशी संपर्क तुटण्याचे नेमके कारण शोधत आहेत ह्या वर्षाच्या अखेरीस आणखी संशोधित माहिती मिळेल पण तो पर्यंत नासा संस्थेतील शास्त्रज्ञांच्या टीमने हि मोहीम थाबविणार असल्याचे जाहीर केले आहे 

2013 नोव्हेंबरमध्ये मंगळग्रहावरील आणि वातावरणातील संशोधित माहिती मिळविण्यासाठी मावेन मंगळयान मंगळावर गेले होते आणि ह्या दहाबारा वर्षात मावेन मंगळयानाने अत्यंत उपयुक्त संशोधित माहिती गोळा केली आहे ह्या माहितीचा उपयोग भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील हानिकारक सौर किरणांपासून संरक्षण करण्यासाठी होईल आणि अनेक दशके हि माहिती उपयुक्त ठरेल असे नासाच्या वॉशिग्टन येथील Planetary Science Division मधील Director Louise Prockter म्हणतात 

मावेन मंगळयानाने शास्त्रज्ञांच्या मंगळावर पूर्वी सजीवांना पोषक वातावरण व पाण्याचे अस्तित्व होते तेथे सजीवांचे अस्तित्व असण्याच्या शक्यतेला दुजोरा देणारे पुरावे व संशोधित माहिती मिळविली पूर्वी पोषक असलेले वातावरण कसे नष्ट झाले ते शुष्क आणि थंड कसे झाले तेथील भूमीवर आणि वातावरणात सूर्याचा कसा प्रभाव पडला ह्याची माहितीही मावेन मंगळयानाने मिळविली आहे 

2018 साली झालेल्या सौर वादळ,धुलीवादळा दरम्यान ह्या यानाने अत्यंत महत्वपूर्ण माहिती संशोधित केली सौर वादळाच्या वेळी तेथे अत्यंत उष्ण विद्युतभारित किरणोत्सर्ग अविरतपणे होतो त्यामुळे उष्ण वारे वाहतात धुळीचे प्रचंड मोठे ढग तयार होतात आणि ते अत्यंत वेगाने आकाशात उंचावर जातात आणि आकाश वेढून टाकतात त्या वेळेस ह्या वावटळीत प्रचंड प्रमाणात माती व धूळ देखील उंच उडते त्यामुळे जमिनीची झीज होते आणि ह्या वावटळीत पाण्याचे कण देखील ओढले जाऊन उंच आकाशात पोहोचतात त्या मुळे पाणी देखील नष्ट होते कदाचित पुरातनकाळी असलेल्या पाण्याचे अस्तित्व असेच नष्ठ झाले असावे शिवाय ह्या सौरवादळा मुळे तेथे होणाऱ्या हानिकारक प्रकाश झोतामुळे तेथील वातावरणातील सजीवांसाठी पोषक असलेल्या वायूवरही प्रभाव पडला असेल अशी संशोधित माहिती मावेन मंगळयानाने गोळा केली आहे मावेन अंतराळयानातील अद्ययावत यंत्रणेने ह्या सौरवादळ,धुलीवादळाच्या वेळेस सूर्यकिरणांची तीव्रता आणि त्याचा भूमीवर,वातावरणावर होणारा प्रभाव ह्याची निरीक्षीत संशोधीत माहितीच्या मोजमापाची नोंद देखील केली आहे आजवर कुठल्याही यानाने अशी माहिती मिळविली नव्हती 

ह्या उत्सर्जित अपायकारक विद्युतभारित सौर किरणांच्या उत्सर्जनामुळे तेथील वातावरणातील वायूवर प्रभाव पडून तेथे तयार होणारा आकर्षक रंगीत झगमगत्या अवोऱाचे फोटो आणि त्यातील चार्जित कणांचे देखील निरीक्षण नोंदवून त्याची संशोधित माहिती मावेन मंगळयानाने पृथ्वीवर पाठविली आहे पण आता मात्र मावेनचे काम थांबले आहे त्या मुळे तेथील कक्षेत भ्रमणा दरम्यान किंवा मंगळाच्या कक्षेतुन ओढल्या जाऊन ते मंगळ ग्रहावर आढळून नष्ठ होईल


Thursday, 28 May 2026

रशियन अंतराळवीरांचा स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक संपन्न

 Roscosmos cosmonaut Sergey Ku-Sverchkov installs a solar radiation experiment during a spacewalk on the outside of the International Space Station.

अंतराळवीर Sergey Kud -Sverchkov आणि अंतराळवीर Mikaev अंतराळस्थानका बाहेरील भागात Solar Radiation Device Install करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -27 मे 

नासाच्या अंतराळ मोहीम 74चे कमांडर Sergey Kud -Sverchkov आणि फ्लाईट इंजिनीअर Sergei Mikaev ह्यांनी बुधवारी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला हे दोनही अंतराळवीर सकाळी 10 वाजून18 मिनिटांनी स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणि सहा तासांनी 4 वाजून 23 मिनिटाला स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले 

सहा तासांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या बाहेरील भागातील Zvezda service Module  आणि रशियन सेगमेंट मधील Poisk आणि Nauka module मधील तांत्रिक कामे पूर्ण केली त्यांनी Zvezda Module बाहेरील भागात Solar Radiation आणि Solar Flares ह्यांची तीव्रता मोजण्यासाठी अत्याधुनिक उपकरण फिक्स केले सध्या सूर्याच्या अंतर्गत भागातून आगीचे लोट आणि आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर अंतराळात बाहेर फेकल्या जात आहेत त्यामुळे हानिकारक विद्युत भारित सूर्य किरणे देखील बाहेर फेकल्या जातात त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील विद्युत उपकरणे आणि इतर यंत्रणेवर होतो तसेच अंतराळातील स्थानकाबाहेरील सोलर पॅनल आणि इतर यंत्रणेवर देखील होतो अशा वेळेस अंतराळस्थानकाला आणि अंतराळवीरांना देखील हानी पोहोचू शकते म्हणून अंतराळवीर आणि अंतराळ स्थानक ह्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानका बाहेरील भागात ह्या अग्निज्वाळा आणि  हानिकारक सौर किरणांची तीव्रता मोजमाप करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे त्या मुळे अंतराळवीर अशा वेळेस सावधगिरी बाळगून स्वत:चा बचाव करू शकतील व स्थानक देखील सुरक्षित राहू शकेल 

ह्या शिवाय ह्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Poisk Module आणि Nauka Module बाहेरील भागात देखील काम केले त्यांनी त्या भागातील पूर्ण झालेले दोन सायंटिफिक प्रयोगाचे उपकरण काढून टाकले  त्यांनी अंतराळातील मायक्रो ग्रॅव्हीटीत मायक्रो Organism वर काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती गोळा करण्यासाठी बसविण्यात आलेले अत्याधुनिक उपकरण व इतर साहित्य काढून ठेवले 

हि कामे पूर्ण झाल्यानंतर  उरलेल्या वेळात ह्या अंतराळवीरांनी स्थानकात आलेल्या Progress 94 ह्या कार्गोशिप वरील अँटेनाचे फोटो काढले हे कार्गोशिप स्थानकात पोहोचले तेव्हा त्यावरील अँटेना उघडण्याचा प्रयत्न असफल झाला होता 

अंतराळवीर Sergey  Kud -Sverchkov ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी लाल रंगाच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता अंतराळवीर Mikaev ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉकसाठी परिधान केलेल्या स्पेससूटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या अंतराळ स्थानकाच्या नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी केलेला हा 279 वा स्पेसवॉक होता  

Wednesday, 20 May 2026

नासाच्या Space X Crew-13 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळविरांची निवड जाहीर

 

नासाच्या Space X Crew -13  चे अंतराळवीर Jessica Watkins,Luke Delaney  कॅनडाचे अंतराळवीर Joshua Kutryk आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Teteryatnikov- फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - 20 मे  

नासाच्या Space X Crew-13 अंतराळ मोहिमे अंतर्गत अंतराळ स्थानकात वास्तव्यासाठी जाण्यासाठी चार अंतराळविरांची निवड जाहीर झाली आहे नासाचे अंतराळवीर Jessica Watkins, Luke Delaney कॅनडाचे अंतराळवीर Joshua Kutryk आणी रशियन अंतराळवीर Sergey Teteryatnikov ह्यांचा समावेश आहे 

ह्या अंतराळ मोहिमेचे कमांडरपद अंतराळवीर Jessica आणी पायलटपद अंतराळवीर Luke सांभाळणार असुन अंतराळवीर Joshua आणी अंतराळवीर Sergey हे दोघे मिशन स्पेशालिस्टपद सांभाळतील  

अंतराळवीर Jessica Watkins Colorado मधील Lafayette येथील रहिवासी आहेत 2017 मध्ये नासा संस्थेत त्यांची अंतराळवीर पदासाठी निवड झाली Stanford University मधून Geological आणी Environmental Scienceपदवी प्राप्त Jessica ह्यांनी California University मधून Doctorate केले त्यांनी  मंगळभुमी विषयी संशोधनात्मक अभ्यास केला असून त्या नासाच्या California येथील J.P.L Lab मधील Curiosity Mars Rover Science टिमच्या सदस्य आहेत त्या दुसऱ्यांंदा स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत ह्या आधी 2022 मध्ये Space X Crew 4 अंतराळ मोहीम अंतर्गत त्या स्थानकात गेल्या होत्या त्यांनी मोहीम 67/68 मध्ये सहभाग नोंदवला त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 170 दिवस वास्तव्य केले आणी सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला होता Space X Crew मोहीमे अंतर्गत स्थानकात दोनवेळा अंतराळप्रवास करणाऱ्या त्या पहिल्या नासाच्या अंतराळवीर आहेत 

 Florida येथील रहिवासी असलेले अंतराळवीर Luke Delaney हे मेकॅनिकल ईंजीनियर आणी एरोस्पेस ईंजीनियरमध्ये पदव्युत्तर आणि प्रावीण्य प्राप्त नौदल वैमानिक आहेत Luke ह्यांनी Test Pilot पदी कार्यरत असताना Operation Enduring Freedom मोहिमेच्या समर्थनार्थ संपूर्ण Pacific region मधून प्रवास केला नासाच्या Virginia येथील Langley Research Center Hampton येथे Test Pilot Instructor आणी Research Pilot पदी ते कार्यरत होते 2021 मध्ये त्यांची अंतराळवीर पदासाठी निवड झाली ते प्रथमच अंतराळस्थानकात वास्तव्यास जाणार आहेत 

 Fort Saskatchewan येथील रहिवासी अंतराळवीर Kutryk हे देखील पहिल्यांदाच अंतराळस्थानकात वास्तव्यास जाणार आहेत 2017 मध्ये त्यांची नासात निवड झाली त्यांनी कॅनडाच्या NATO UN आणी North American Aerospace Defense Command च्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन CF-18 Fighter Pilot पदी काम केले Cold Lake येथील Aerospace Engineering Test Establishment मध्ये Experimental आणी Operational Test Pilot पदावरही ते कार्यरत होते त्यांनी कॅनडातील Royal Military College मधून BE Mechanical ची पदवी घेतली त्या नंतर त्यांनी ME Space Studies,Flight Test Engineering Defense Studies विषयात प्राविण्य प्राप्त केले 

रशियन अंतराळवीर Sergey Teteryatnikov ह्यांनी रशियातील सेंट पिटर्सबर्ग नौदल अकादमी मधून BE केले त्यांची Test Cosmonaut पदासाठी निवड होण्याआधी त्यांनी नौदल इंजिनीयर पदी अनेक ठिकाणी कामे केली विशेषतः पाणबुड्या आणि विशेष इंजिन रुम संचलन ह्या सह विविध नौदल अभियांत्रिकी विभागात त्यांनी काम केले 2021 मध्ये त्यांची Gagarin Research & Test Cosmonaut Training Center Cosmonaut Crops मध्ये निवड झाली 2023 पर्यंत ते तिथे कार्यरत होते अंतराळवीर Sergey देखील पहिल्यांदाच अंतराळस्थानकात वास्तव्यास जाणार आहेत

हे चारही अंतराळवीर सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान  सहा महिन्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात जातील आणी अंतराळ मोहीम 75 मध्ये सहभागी होऊन तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील 

Tuesday, 12 May 2026

आर्टेमिस मोहिमेतील अंतराळविरांतर्फे छोट्या अंतराळप्रेमी जॅकला Orion Flight Space suit गिफ्ट

CBS news आयोजित Artemis II Astronauts The Real Hero ह्या कार्यक्रमात अंतराळ प्रेमी छोट्या जॅकला Space suit दाखवताना अंतराळवीर Christina Koch -फोटो -CBS news 

नासा संस्था- (CBS news)  -12 में 

नासा संस्था वेगवेगळे वेगवेगळ्या ऊपक्रमाद्वारे नागरिकांना अंतराळमोहिमेत सहभागी होण्याची संधी देते अमेरीकेच्या पन्नास वर्षानी सुरू झालेल्या आर्टिमस मोहिमेत देखील सहभागी होण्याची संधी नासाने ऊपलब्ध केली होती आर्टेमिस ll मोहिमेतील ऊड्डाणस्थळी ऊपस्थित रहाण्याची आर्टेमिस II मोहिमेतील अंतराळवीरांचे अंतराळ ऊड्डाण प्रत्यक्ष वा आभासी पध्दतीने सोशल मिडीया द्वारे सहभागी होऊन पाहण्याची संधी नासाने जाहीर केली होती त्याला  नागरिकांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्यात लहान मुलांचाही सहभाग होता

आर्टेमिस ll मोहिमेत सहभागी होऊन ह्या अंतराळविरांना पहाण्यासाठी उड्डाणस्थळी इतर लहान मुलांप्रमाणेच पाच वर्षाचा जॅक देखील आला होता तोही अंतराळविरांसारखा पांढऱ्या रंगाचा स्पेससुट घालून त्यावर कमांडर असे लिहले होते आर्टेमिस II  मोहिमेच्या अंतराळ उड्डाणाच्या लाईव्ह प्रसारणाच्या वेळी वार्तांकन करणाऱ्या  CBS news च्या पत्रकारांचे लक्ष त्याच्याकडे गेले त्यांनी Jack सोबत संवाद साधला तेव्हा त्याने मला देखील अंतराळवीर व्हायचे आहे असे सांगितले होते त्या वेळी त्याने ऊपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते त्या नंतर सोशल मीडियावर तो व्हायरल झाला होता 


आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांनी गिफ्ट दिलेल्या Orion Flight Space Suit सोबत अंतराळप्रेमी जॅक -फोटो -CBS News

आता अंतराळवीर चंद्र मोहीम यशस्वी करुन पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या ह्या मोहिमेबाबत जाणुन घेण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केल्या जात आहेत हे अंतराळवीर देखील ऊत्साहाने त्यात सहभागी होत आहेत 

ह्या अंतराळवीरांच्या आर्टेमिस मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि ह्या मोहिमेबद्दल जाणून घेण्यासाठी 1 मेला CBS Morning Town hall मध्ये Gayle King आणि Tony Dokoupil ह्यांनी Artemis II Astronauts the Real Hero ह्या सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते ह्या कार्यक्रमात अंतराळवीर  Reid Wiseman,Victor Glover,Christina Koch आणि Jeremy Hansen ह्यांना आमंत्रित केले होते ह्या कार्यक्रमात त्यांनी ह्या छोट्या अंतराळप्रेमी जॅकला देखील आमंत्रित केले होते अंतराळवीर आर्टेमिस मोहिमेतून परतल्यानंतरही त्याच्याशी संवाद साधला होता 

ह्या कार्यक्रमात त्याची खास दखल घेऊन आधी त्याचे सर्वांनी कौतुक केले आणि अंतराळवीरांना त्याच्या अंतराळप्रेमा विषयी सांगितले अंतराळवीर Christina ह्यांनी त्याला जवळ बोलावले आणि त्याच्याशी संवाद साधत सांगितले की,आम्ही तुझ्या बद्दल असे ऐकले आहे की.तु अंतराळ वीरांसारखा पांढरा फ्लाईट स्पेससूट घालून  launching पासुन landing पर्यंत ह्या मोहिमेत सहभागी झालास आणी मोहिमेची माहिती घेतलीस पण तुझ्या आईकडून आम्हाला कळाले की,तुझा पांढरा स्पेससुट थोडा मळला होता आम्ही तुला आता आमच्या सारखा केशरी रंगाचा Orion फ्लाईट स्पेससुट गिफ्ट देणार आहोत त्यावर आमच्या सह्या आहेत शीवाय आम्ही तुला आमच्या टिममध्ये सहभागी करून घेत आहोत आणी तुला कंमाडरपद पण देत आहोत तुला चालेल ना? हे ऐकून छोटा Jack आश्चर्यचकित झाला आनंदाने ऊडी मारून त्याच्या आईकडे गेला आणी तिला बिलगुन हे सांगितल आणी पुन्हा पळत येत Christina ला बिलगुन आनंदाने हो म्हणाला तेव्हा Christina ने त्याला स्पेससुट दिला आणी तु आम्हाला खूप आवडलास असे सांगितले !"

त्या नंतर Jack च्या आईवडिलांनी अंतराळविरांचे आभार मानले आणी Jack ला अंतराळविश्वाची किती आवड आहे ते सांगितले अंतराळविरांनी त्याचे कौतुक केले त्याला प्रोत्साहन दिले त्यांच मोठेपण लहानाप्रती प्रेम फक्त आमच्या साठीच नाही सर्व मानवतेसाठी प्रशंसनीय आहे त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत धैर्याने आर्टिमस मोहिम यशस्वी केलीय हे काम अतुलनीय आहे असे त्या म्हणाल्या

Friday, 8 May 2026

White house मध्ये आयोजित स्वागत समारंभात Donald Trump तर्फे आर्टेमिस मोहिमेतील अंतराळविरांचे अभिनंदन

four people in blue flight jackets stand behind an old man at a desk in a grotesquely decorated office

White house मध्ये आयोजित स्वागत समारंभात नासाचे Administrator Jared Isaacman आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीर Victor Glover,Christina koch, Reid Wiseman,Jeremy Hansen ह्यांचे अभिनंदन करताना  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump 

नासा संस्था-( Space news ) - 8 मे

नासाच्या आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर Reid Wiseman,Victor Glover,Christina Koch आणी Jeremy Hansen ह्यांनी चंद्राच्या कक्षेत शिरुन हि मोहीम यशस्वी केल्यानंतर जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांनी देखील त्यांच्यासाठी 29 एप्रिलला White House मध्ये खास स्वागत समारंभाचे आयोजन करून त्यांचे अभिनंदन केले ह्या कार्यक्रमात नासाचे Administrator Jared Isaacman हे देखील आमंत्रित होते 

Oval Office मध्ये आयोजित ह्या स्वागत समारंभात Donald Trump ह्यांनी अंतराळवीरांचे कौतुक केले," ते म्हणाले ह्या चार अंतराळविरांनी हि मोहिम यशस्वी केल्याने अमेरीकेची मान अभिमानाने ऊंचावली आहे ह्या अंतराळविरांनी जीवाची पर्वा न करता मोहिमेदरम्यान आलेल्या समस्येवर मात करीत अत्यंत धैर्याने हि अवघड मोहीम यशस्वी केली ह्या अंतराळविरांचे काम निश्चितच गौरवास्पद आहे अशा कर्तबगार नागरिकांच्या असाधारण कर्तृत्वामुळे देश महान बनतो ह्या अंतराळविरांचे धैर्य अविश्वसनिय आहे आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो

अंतराळात जाण्यासाठी असाधारण धैर्य,निरोगी आरोग्य सुदृढ शरीर आणी अंतराळ प्रवासादरम्यान येणाऱ्या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असावी लागते ह्या अंतराळविरांनी अमेरिकेचे पन्नास वर्षांनंतरचे चंद्र मोहिमेचे ऊद्दिष्ठ साध्य केले त्यांच्या ह्या ऐतिहासिक मोहिमेच्या यशाबद्दल अभिनंदन आणी त्यांना ह्या कठीण परिस्थितीत साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचे देखील अभिनंदन नासा संस्थेने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हि मोहीम यशस्वी केली आहे त्यांचे कार्य  देखील अभिनंदनीय आहे

ह्या अंतराळविरांना अंतराळात गेलेले पाहून मला देखील आता अंतराळात जाण्याची ईच्छा होत आहे मी देखील फिजिकली फिट आहे स्मार्ट आहे पण एक समस्या आहे असे म्हणत त्यांनी नासाचे Administrator Jared ह्यांना आपल्या देशात राष्टाध्यक्ष अंतराळ प्रवास करु शकतात का? त्यांना तशी परवानगी आहे का?असे गमतीत विचारले तेव्हा Jared म्हणाले आम्ही निश्चितच ह्या बाबतीत विचार करु !"

ह्या कार्यक्रमात अमेरिकेतील नामवंत पत्रकार देखील ऊपस्थित होते त्यांनी Donald Trump ह्यांना काही प्रश्न विचारले Trump ह्यांनी त्यातील काही प्रश्नांची ऊत्तरे दिली विशेष म्हणजे Donald Trump ह्यांनी ह्या अंतराळवीरांना ह्या मोहिमेविषयी कुठलेही प्रश्न विचारले नाहीत त्यांनी पायलट विषयी गौरवोउद्गार काढले पायलट सॉलिड असतात आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या त्यांना दिसतात असे ते म्हणाले 2028 पर्यंत आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांचे पाऊल चंद्रभूमीवर पडेल त्या साठी नासा संस्था प्रयत्न करेल आणि त्यांना लागेल ती मदत आम्ही करू असेही त्यांनी सांगितले 

Thursday, 30 April 2026

ESAच्या SOLIS 100 अभियाना अंतर्गत संशोधनासाठी सहा प्रतिनिधींचा पृथ्वीवरील कृत्रिम झिरो ग्रॅविटीत प्रवेश

 SOLIS100 isolation study crew

 ESA च्या SOLIS 100 अभियानातील भविष्य कालीन अंतराळवीरांचे सहभागी प्रतिनिधी -फोटो -ESA

 ESA संस्था -23 एप्रिल 

युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मन एरोस्पेस सेंटर ह्यांच्या तर्फे SOLIS 100 ह्या नाविन्यपूर्ण अभियानाचा शुभारंभ झाला ह्या अभियाना अंतर्गत भविष्यकालीन मंगळ व दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहा तरुणांनी जर्मनीतील Cologne येथील शास्त्रज्ञ निर्मित अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी सारख्या कृत्रिम वातावरणात प्रवेश केला आता शंभर दिवस हे तरुण तेथे बंदिस्त असतील त्यांना बाहेरच्या जगाशी आणि  त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येणार नाही फक्त संस्थेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात असतील  

अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर जेव्हा अंतराळ प्रवास करतात किंवा अंतराळ स्थानकात राहतात तेव्हा ते पृथ्वीपासून त्यांच्या कुटुंबियांपासून जसे दूर असतात तसेच ह्या भावी अंतराळवीरांच्या प्रतिनिधींना ठेवण्यात येईल त्यांच्या ह्या शंभर दिवसांच्या वास्तव्यात हे प्रतिनिधी मानवी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठीच्या संशोधनात सहभागी होतील 

 हे सहा प्रतिनिधी जर्मनीतील Cologne येथे DLR Envihab Research Facility द्वारे निर्मित अंतराळस्थानकासारख्या वातावरणात आणि अंतराळवीरांसारख्या परिस्थितीत राहतील त्यांची दिनचर्या  देखील अंतराळवीरांसारखी असेल अंतराळवीरांसारखेच सायंटिफिक प्रयोग,संशोधन Technology Demonstration आणि इतर कामांचा त्यात समावेश आहे ह्या बंदिस्त झिरो ग्रॅविटीत राहताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत होणारे बदल ह्याचे निरीक्षण नोंदवून त्याची संशोधित माहिती गोळा केल्या जाईल ह्या दरम्यान त्यांना येणाऱ्या समस्या आणि इतर आव्हानांना ते कसे सामोरे जातात ह्याचीहि नोंद करण्यात येईल 

  SOLIS100 sleeping pods

      ESA च्या SOLIS 100 अभियानातील प्रतिनिधींचा Sleeping pod -फोटो -E.SA संस्था 

भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित अंतराळ प्रवास आणि निरोगी आरोग्यासाठी हि संशोधित माहिती गोळा करण्यात येत आहे हे अंतराळवीर पृथ्वीपासून दूर असल्यामुळे त्यांच्या अंतराळ प्रवासादरम्यान अचानक काही समस्या उद्भवल्यास आणि त्यांचा पृथ्वीशी संपर्क तुटल्यास त्या समस्येवर मात करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल 

झिरो ग्रॅविटीत दीर्घकाळ वास्तव्यादरम्यान अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर परिणाम होतो मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो मसल्स आणि हाडांची झीज होणे,रक्तप्रवाहाची दिशा बदलणे,हार्ट प्रॉब्लेम,थ्रम्बोसिस,वजन कमी होणे या सारख्या समस्या जाणवतात अशा विपरीत वातावरणात ह्या समस्या का निर्माण होतात शरीर ह्या परिस्थितीवर कशी मात करते त्यांच्या मानसिक अवस्थेत काय बदल जाणवतात ह्या विषयी संशोधन करण्यात येत आहे  

 ह्या अभियानातील भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांचे हे सहा प्रतिनिधी 26 ते 32 वयोगटातील असून युरोपातील वेगवेगळ्या भागातील आहेत त्यांची निवड युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मन एरोस्पेस सेंटर तर्फे केल्या गेली असून त्यांची मानसिक,शारीरिक क्षमता आणि इतर आवश्यक बाबीची पूर्तता करून अंतिम निवड करण्यात आली 

Saturday, 25 April 2026

स्थानकातील शनिवारच्या डिनर पार्टीत अंतराळवीरांनी घेतला सोफीच्या फ्रेंच पदार्थाचा आस्वाद

अंतराळ स्थानकातील शनिवारच्या डिनर पार्टीत स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्रित अंतराळवीर सोफीच्या फ्रेंच पदार्थाचा आस्वाद घेताना -फोटो -E.SA संस्था 

 

E.SA संस्था - 23एप्रिल

अंतराळस्थानकातील अंतराळवीर पृथ्वीपासून दूर त्यांच्या कुटुंबियांपासून दूर अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत वास्तव्य करतात तेव्हा त्यांना पृथ्वीसारखे ताजे अन्न पदार्थ खायला मिळत नाही त्यांना पृथ्वीवरून आलेले प्रिझर्व अन्न पदार्थ खावे लागतात अंतराळ स्थानकातील वास्तव्यादरम्यान अनेक सण येतात अशा वेळी त्यांना ह्या खास प्रसंगी खाण्यासाठी काही विषेश पदार्थ दिले जातात तर कधी स्थानकात येणाऱ्या कार्गोशिप किंवा अंतराळ स्थानकात   वास्तव्यास येणाऱ्या अंतराळविरांसोबत त्यांच्या साठी अन्न पदार्थ पाठविले जातात 

अंतराळवीर स्थानकातील वास्तव्यादरम्यान संशोधन व इतर कामात व्यस्त असतात अंतराळस्थानकात येणाऱ्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत त्यांच्या पृथ्वीवर जाण्यासाठीची तयारी पृथ्वीवरून स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या कार्गोशिपसाठी Hatching Docking ची तयारी करणे शिवाय संशोधित प्रयोगाचे नमुने गोळा करणे ह्या व्यतिरिक्त अनेक कामे ते करतात मागच्या महिन्यात अंतराळवीरांनी अंतराळस्थानकाच्या नूतनीकरणासाठी आणि तांत्रिक कामासाठी स्पेसवॉकही केला ह्या आठवड्यात अंतराळवीरांनी आर्टिमस II मोहिमेतील अंतराळवीरांशी चंद्रप्रवासा दरम्यान अंतराळातून लाईव्ह संवादही साधला त्या मुळे ह्या अंतरावीरांचा हा आठवडा अत्यंत धावपळीचा गेला 

ह्या अंतराळवीरांनी म्हणूनच ह्या शनिवारी रात्री एकत्र डिनर पार्टीचे आयोजन केले युरोपियन अंतराळवीर सोफी अडोनेट हिने हि कल्पना सुचविली सोफीने त्या साठी स्थानकातील सामानातून खास टेबल तयार केला आणि त्यावर सारे पदार्थ मांडून टेबल सजविला ह्या पार्टीचे वैशिष्ठ होते सोफीच्या बोनस फूडचा त्यातला समावेश युरोपियन सांस्कृतिक परंपरेनुसार अंतराळवीर जेव्हा स्थानकात वास्तव्यास जातात तेव्हा त्यांच्यासाठी हे बोनस फूड दिले जाते अंतराळवीरांच्या वास्तव्यादरम्यान स्थानकात येणाऱ्या सण किंवा खास प्रसंगाच्या वेळी खाण्यासाठी अंतराळवीरांना काही जास्तीचे पारंपारिक पदार्थ दिले जातात अंतराळवीर त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून जेव्हा एकत्र पार्टी करतात तेव्हा ह्या खास पदार्थांचा आस्वाद घेतात अंतराळवीरांसाठी युरोपातील खास Chef हे पदार्थ बनवतात सोफीसाठी हे स्पेशल पदार्थ Multi Michelin Starred Chef -Anne -Sophie Pic ह्यांनी तयार केले होते अंतराळवीरांनी शनिवारच्या डिनर मध्ये ह्या फ्रेंच बोनस फूड पदार्थांचा आस्वाद घेत पार्टी एन्जॉय केली  

अंतराळवीरांना सोबत दिल्या जाणाऱ्या  पदार्थांच्या सोबत दिलेले हे खास अन्न पदार्थ अत्यल्प असतात त्यांच्या मेनूच्या एक दशांश पट इतकेच पण अंतराळवीर म्हणतात हे अन्न पदार्थ अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील वास्तव्यात शरीरासाठी आणि मनासाठी आरोग्यदायी ठरतात त्या मुळे अंतराळवीरांची मैत्री दृढ होण्यास मदत होते आणि विशेष म्हणजे त्यांना वेगवेगळ्या देशातील पदार्थंची चव चाखायला मिळते