Tuesday, 19 November 2024

Blue Origin सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार

 Headshots of the six NS-28 astronauts

 Blue Origin च्या NS -28 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवासी  -फोटो -Blue Origin

Blue Origin -18 नोव्हेंबर

Blue Origin NS-28 मोहिमे अंतर्गत सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार आहे 22 नोव्हेंबरला Blue Origin च्या West Texax येथील उड्डाण स्थळावरून साडे नऊ वाजता New Shepard अंतराळ यानातून Emily Calandrelli ,Sharon Hagle,Mark Hagle,Austin Litteral,James(JD) Russell,Henry Wolford हे सहा नागरिक अंतराळ पर्यटनास जाणार आहेत 

Emily -MIT इंजिनीअर, नामांकित पहिल्या अमेरिकन महिला TV Host आणि #1NY Times Best Selling लेखिका आहेत त्यांचे 3 मिलियन फॉलोअर्स आहेत Emily यु ट्यूब वर सक्रिय आहेत यु ट्यूब वर त्यांच्या सायन्स सिरीज Wonder Lab Emily,s Science Lab प्रसारित होतात त्या नऊ पुस्तकांची लेखिका आहेत 

Sharon Hagle - Space Kid Global च्या संस्थापक आहेत मुलींना मुलांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व करण्यासाठी सामान हक्क मिळावा ह्या साठी त्यांनी संघर्ष केला आहे Sharonचे पती Mark Tricor International चे अध्यक्ष आणि CEO आहेत ह्या दोघांनी ह्या आधी 31 मार्च 2022 मध्ये Blue Origin च्या NS -20 मोहिमे अंतर्गत अंतराळ पर्यटन केले आहे आता ते दुसऱ्यांदा अंतराळ पर्यटनास जाणार आहेत सर्वात आधी अंतराळ पर्यटन करणारी जोडी म्हणून त्यांची नोंद झाली आहे

Austin Litteral - वित्तीय आणि सेवा उद्योगा मध्ये कार्यरत आहेत त्यांना लहानपणापासूनच अंतराळ प्रवास  करण्याची इच्छा होती आता त्यांचे स्वप्न साकारणार आहे त्यांचे तिकीट Whatnot co.ने स्पॉन्सर केले आहे 

James  सिरीयल उद्योजक आणि Info HDA चे संस्थापक आहेत ते सैनिकी परिवारातील आहेत त्यांनी त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ Victoria Russell Fondation ची स्थापना केली ह्या संस्थेद्वारे मुलांना शिक्षण आणि संगोपनासाठी आर्थिक व शैक्षणिक मदत केली जाते 

Henry -Canada येथील Bayshore Capital Torontoचे अध्यक्ष आणि CEO आहेत Aviator आणि Pilot आहेत Charter,Medevac आणि Organ retrieval Flight मध्ये कार्यरत आहेत 

Blue Origin चे New Shepard अंतराळयान नव्यांदा सामान्य नागरिकांना अंतराळ पर्यटनास घेऊन जाणार आहे हे सहाही जण अंतराळ यानातून पृथ्वीवरून उड्डाण करून काही मिनिटात पृथ्वी आणि अंतराळ ह्यांची सीमा भेदणाऱ्या करमन रेषेपर्यंत पोहोचतील काही मिनिटे अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीचा अद्भुत आनंद अनुभवतील आणि पृथ्वीवर परततील 

 The mission patch for NS-28.

Blue Origin च्या NS -28 मोहिमेतील अंतराळ पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेला Embedded Patch -फोटो -Blue Origin

पृथ्वीवर परतल्यावर त्यांना Blue Origin ने त्यांच्यासाठी तयार केलेला त्यांची वैशिष्ठे कोरलेला  Embedded Patch देऊन त्यांना अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देण्यात येईल Blue Origin ची हि अठ्ठाविसावी अंतराळ मोहीम आहे आजवर Blue Origin ने 43 नागरिकांना करमन रेषे पर्यंत अंतराळ पर्यटन घडवले आहे

No comments:

Post a Comment