नासाच्या Deep Space Food Challenge स्पर्धेतील विजेत्या Interstellar टीममधील France,Texax आणी Florida येथील सहभागी सदस्य -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -20 ऑगस्ट
भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर आणि अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पौष्टिक,सकस आणि चविष्ट अन्न निर्मिती करता यावी ह्या साठी आणी पृथ्वीवरील धान्य ऊत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नासा संस्था आणी कॅनडीयन स्पेस एजन्सी (C.SA) ह्यांनी Deep Space Food Challenge स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत धान्य निर्मितीची नाविन्यपूर्ण पध्दत विकसित करण्याची संधी देण्यात आली होती
ह्या स्पर्धेत अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना जीवनसत्त्वयुक्त सकस आणी पौष्टिक अन्न ऊत्पादन संशोधनाची संधी जाहीर करण्यात आली होती हे अन्न ऊत्पादन कमी साहित्य,कमी पाणी वापरून,कमी जागेत करता येणे आवश्यक होते स्थानकातील झीरो ग्रव्हिटित सगळ्या वस्तू तरंगत असल्याने आणी तीथे पाणी नसल्याने पाणी कमी प्रमाणात वापरणे आवश्यक असते तेथे पाणी देखील थेंबाच्या स्वरूपात तरंगते त्यामुळे तेथे पदार्थ बनवणे अशक्यच ह्या बाबी लक्षात घेऊन ह्या समस्यावर मात करून धान्य ऊत्पादन निर्मितीची नवीन विकसीत पध्दत सादर करणे आवश्यक होते हे संशोधित नवीन धान्य उत्पादनाचे तंत्रज्ञान भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरणार आहे
हि स्पर्धा 2021 मध्ये जाहीर करण्यात आली होती ह्या स्पर्धेला जगभरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 32 देशातील 300 स्पर्धकांनी ह्यात भाग घेतला आणि त्यांनी नाविन्यपूर्ण अन्न उत्पादन प्रणाली सादर केल्या त्यातुन ह्या Deep Space Food Challenge साठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता करणाऱ्या स्पर्धकांची तीन टप्प्यात निवड करण्यात आली ह्या स्पर्धकांचे विकसित अन्न तत्रंज्ञानाचे निरीक्षण नोंदवून अंतिम टप्प्यात चार विजेत्या अमेरिकन टीमची नावे घोषित करण्यात आली
2023 मध्ये ह्या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली Methuselah Foundation आणि Ohio State University ह्यांच्या सहकार्याने दोन महिने ह्या निवड झालेल्या विकसित अन्न प्रणालीची चाचणी Ohio University च्या कॅम्पस मधील विद्यार्थ्यांच्या निरीक्षणात करण्यात आली ह्या विद्यार्थ्यांनी ह्या दोन महिन्यांच्या कालावधीत निवड झालेल्या ह्या नाविन्यपूर्ण अन्न तंत्रज्ञानाची संशोधित माहिती गोळा केली ह्या दरम्यान त्यांनी ह्या अन्न प्रणालीची नियमित उत्पादन क्षमता,उत्पादनाचा कालावधी पोषकता आणि टिकाऊपणा ह्याचे निरीक्षण नोंदवले ह्या प्रणालीद्वारे पिकवलेले अन्न व भाजीपाल्याची सकसता,जीवनसत्वयुक्तता,सुरक्षितता आणि स्पर्धेतील इतर बाबींची पुर्तता तपासली त्या नंतर त्यांनी ह्या उत्पादित अन्नाची चव चाखून रुचकरता जाणून घेतली आणि सखोल निरीक्षणाअंती हि संशोधित माहिती जजेसच्या टिमकडे अंतिम निवडीसाठी पाठविली ह्या संशोधनासाठी Ohio Universityला नासा संस्थेतर्फे अर्थसहाय्य देण्यात आले
शेवटचा तिसरा टप्पा पंधरा आणि सोळा ऑगस्टला Ohio University Form Bureau मधील 4-H center ground मध्ये झालेल्या दोन दिवसीय Networking & Learning Summit कार्यक्रमात पार पडला ह्या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांचे संशोधीत अन्न तंत्रज्ञान आणी ऊत्पादित अन्नाचे प्रदर्शन भरवण्यात आले त्यासाठी ह्या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले तसेच नासा संस्थेतील मान्यवर,ऊद्योजक,अन्नप्रक्रिया ऊद्योगातील मान्यवर व सेलीब्रिटी शेफ देखील ह्या कार्यक्रमा साठी आमंत्रित होते ह्या सर्वांनी ह्या विजेत्या स्पर्धकांशी संवाद साधुन त्यांच्या ऊत्पादित पदार्थांची चव चाखली आणी सुरक्षिततेची पहाणी केली आणी त्या विषयीची माहिती जाणून घेतली कार्यक्रमात सेलीब्रिटी शेफ आणी Cookbookचे लेखक Tyler Florence देखील ऊपस्थित होते त्यांनी ह्या अंतीम निवड झालेल्या स्पर्धकांशी संवाद साधला त्यांच्या ऊत्पादित अन्नपदार्थाची माहिती घेऊन चव चाखली त्या नंतर जजेसच्या टिमने अंतीम विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित केली आणी कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना बक्षीसाची रक्कम देण्यात आली
ह्या स्पर्धेत पहिले बक्षीस अमेरिकेतील Merritt Island Florida मधील Interstellar Lab च्या प्रमुख Barbara Belvisi ह्यांंना मिळाले त्या लघु ऊद्योजक आहेत त्यांच्या अनेक पर्यावरण पुरक ग्रीन हाऊसच्या शाखा आहेत त्यात त्या आरोग्यदायी पर्यावरण पुरक फळभाज्या व पोषक अन्न निर्मिती करतात त्यांच्या संशोधीत विकसित अन्न तत्रंज्ञान प्रणाली मध्ये सुक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेल्या ताज्या हिरव्या भाज्या,मायक्रो ग्रीन,मायक्रो न्युट्रिअंट रोपवाढीसाठीच्या खत निर्मितीसाठी आवश्यक किटक निर्मितीच्या अन्न ऊत्पादन यंत्रणेचा समावेश आहे त्यांना नासा संस्थेतर्फे 750,000 $ चे बक्षीस देण्यात आले
Nolux of Riverside आणी SATED ह्या दोन ऊपविजेत्यांना 250,000 $चे बक्षीस देण्यात आले Nolux टिमने Robert Jinkerson च्या नेतृत्वात कृत्रीम Photosynthesis System तयार केली ह्या कृत्रिम प्रकाश सिस्टीम यंत्रणेद्वारे वनस्पती विपरीत परिस्थितीत सुर्यप्रकाशाच्या अभावात आवश्यक अन्न निर्मिती करू शकतात
SATED संस्था Jim Sears ह्यांची स्वतःची आहे त्यांनी सुरक्षित,जिवनसत्वयुक्त पोषक अन्न तयार केले आहे त्यांनी अनेक प्रकारचे Customizable अन्नपदार्थ निर्मित केले आहेत त्यात Peach Cobbler,Pizza चा समावेश आहे त्यांनी तयार केलेले अन्नपदार्थ अग्नीरोधक आणी दिर्घकाळ टिकणारे आहेत ह्या संस्थेला Cookbook चे लेखक Tyler Florence ह्यांनी वैयक्तिक बक्षीस दिले
याशिवाय नासा संस्थेने सौर ऊर्जेवर तयार केलेल्या अन्नपदार्थ बनवणाऱ्या International टिमला बक्षीस दिले आहे Finland मधील Lappaeenranta ह्या संस्थेतील टिमने Gas Fermentation System वापरून Single Cell Protein निर्मिती केली आहे
ह्या सर्व विजेत्याचे नासा संस्थेतील मान्यवरांनी अभिनंदन केले ह्या Deep Space Food स्पर्धेच्या आयोजक आणि नासाच्या Marshall Space Flight Center च्या मॅनेजर Angela Herbelt म्हणतात,नासाने कॅनडीयन स्पेस एजन्सी सोबत प्रथमच अशी स्पर्धा आयोजित केली त्यामुळे जगभरातील सर्जक वृत्तीचे नागरिक एकत्र आले त्यांना कल्पकतेने नाविन्यपूर्ण विकसित अन्न तत्रंज्ञान सादर करण्याची प्रेरणा मिळाली ह्याचा ऊपयोग भविष्यकालीन अंतराळवीरांना त्यांच्या परग्रहावरील वास्तव्यात होईल तसेच जगभरातील दुर्गम भागात जिथे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुरेसे जिवनसत्वयुक्त अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांना रोगाशी सामना करावा लागतो अशा लोकांना देखील होईल हे स्पर्धेक आमच्या मोहिमेत सहभागी होऊन आम्हाला अंतराळविश्वातील संशोधनास मदत करत आहेत त्यामुळे आम्ही देखील प्रेरित झालो आहोत
No comments:
Post a Comment