Blue Origin NS -26 मोहिमेतील अंतराळ पर्यटक -फोटो -Blue Origin
Blue Origin -30 ऑगस्ट
Blue origin च्या NS-26 मोहिमेतील सहा अंतराळप्रवासी 29 ऑगस्टला अंतराळ पर्यटन करून परतले ह्या मोहिमेत Nicolina Elrick,Rob Ferl,Eugene Grin,Dr.Eiman
Jahangir,Karsen kitchen आणी Ephraim Robin हे सहा नागरिक सहभागी झाले होते Karsen सगळ्यात लहान आहे त्या मुळे आता कमी वयात अंतराळ पर्यटन करणारी तरुणी म्हणून तिची विक्रमी नोंद झाली आहे
हे सहाही अंतराळ प्रवासी 29 ऑगस्टला सकाळी 8.07 मिनिटाला Blue Origin च्या New Shepard अंतराळ यानातुन अंतराळ पर्यटनासाठी निघाले आणी 8.19 मिनिटात अंतराळ पर्यटनाचा अनुभव घेऊन पृथ्वीवर परतले New Texas येथील Blue Origin च्या उड्डाण स्थळावरून ह्या सहा अंतराळ प्रवाशांसह New Shepard अंतराळयान रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात जाण्यासाठी आकाशात झेपावले आणी अत्यंत वेगाने काही वेळातच अंतराळातील 62 मैल (100k.m.) अंतरावरील पृथ्वी आणी अंतराळ ह्या मधील सिमारेषे जवळ (कर्मन )पोहोचले आणि अंतराळ यान काही सेकंदात कर्मन रेषा पार करून अंतराळात प्रवेशले
ह्या सहाही प्रवाशांनी अंतराळ पर्यटनातील ह्या अंतराळ प्रवासाचा आनंद लुटला त्यांनी New Shepard अंतराळ यानाच्या खिडकीतून खाली पृथ्वीवर पहाण्याचा आनंद घेतला आणी यान अंतराळात प्रवेशताच यानातील मोकळ्या जागेत वजन रहित अवस्थेत तरंगण्याचा आनंद लुटला
Blue Origin च्या अंतराळ पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेला NS-26 Patch - फोटो -Blue Origin
संशोधक Rob ferl ह्यांना नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून Arabidopsis Thaliana ह्या झाडाचे रोप संशोधनासाठी देण्यात आले होते हे रोप Ferl ह्यांनी KFT Fixation tube मध्ये ठेऊन सोबत नेले आणी प्रवासा दरम्यान ह्या रोपाच्या जिन्समधील बदलांचे निरीक्षण नोंदवले त्याच वेळी पृथ्वीवर नासा संस्थेतील शास्त्रज्ञ Anna Lisa ह्या देखील ह्या संशोधनात सहभागी झाल्या आणि त्यांनी अंतराळ प्रवासा दरम्यान Ferl ह्यांच्या Activities वर आणी KFT वर नियंत्रण ठेऊन चार वेळा रोपाला सक्रीय केले Ferl ह्यांनी ह्या आठ ट्यूब्स त्यांच्या कमरेवरील पट्ट्याला बांधल्या होत्या पृथ्वीवरून अंतराळातील ऊड्डाणापासुन अंतराळ प्रवासातील चार टप्प्यात ह्या रोपामध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण त्यांनी नोंदवले ह्या रोपांमधील जीन्सवर अंतराळातील वातावरणात काय बदल होतो झीरो ग्रव्हिटिला रोप कसे प्रतिसाद देते ह्यावर ते संशोधन करत आहेत परतल्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा ,"हा प्रवास माझ्यासाठी आनंददायी होता अंतराळप्रवासा दरम्यान संशोधन करण्याची अशी संधी मला ह्या आधी मिळाली नव्हती हा अनुभव माझ्यासाठी अमूल्य होता मी कित्येक तास,आठवडे महिने सतत ह्या साठी व्यतीत केले होते अखेर माझ्या अपेक्षे प्रमाणे त्यात यश मिळाले ह्या पेक्षा सुंदर अनुभव दुसरा कुठला असु शकतो!" आता नासाचे शास्त्रज्ञ ह्या बदलांचे निरीक्षण नोंदवुन त्यावर सखोल संशोधन करतील
हे सर्व पर्यटक अंतराळ प्रवास करून New Shepard अंतराळयानातून West Texas येथील वाळवंटात पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले तेव्हा त्यांचे नातेवाईक मित्र त्यांना भेटण्यासाठी तेथे हजर होते सारेच जण अंतराळ प्रवासा नतंर आनंदित झाले होते Nicolina सर्वात आधी अंतराळयाना बाहेर आल्या आणि त्यांनी मी अंतराळात जाऊन आले असे म्हणत आनंदाने हात उंचावला त्या नंतर एकामागून एक अंतराळ पर्यटक बाहेर आले आणि साऱ्यांनीच आम्ही अंतराळात खरेच जाऊन आलो आमचा प्रवास आनंददायी आणि अविस्मरणीय होता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली karsen हिला भेटायला आलेल्या तिच्या वडिलांनी मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय अंतराळ प्रवास करण्याचे तीचे स्वप्न पुर्ण झाले अशी प्रतिक्रया व्यक्त केली
त्या नंतर ह्या सर्व अंतराळ पर्यटकांना त्यांच्या साठी खास तयार करण्यात आलेला NS -26 Patch देण्यात आला आणि ते आता अंतराळवीर पर्यटक झाल्याचे जाहीर करण्यात आले
New Shepherd अंतराळयानाने आजवर सातवेळा सामान्य नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले असुन आता आठव्यांदा ह्या सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले आहे आजवर 43 नागरिकांनी Blue Origin च्या New Shepard अंतराळयानातून अंतराळ प्रवासाचा आणि अंतराळ पर्यटनाचा आनंद घेतला आहे New Shepard अंतराळ यानाची हि 26 वी यशस्वी अंतराळ मोहीम आहे
No comments:
Post a Comment