नासाचे युरोपा क्लीपर अंतराळयान Kennedy Space Center मधील उड्डाणस्थळावरून गुरु ग्रहावर जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -15ऑक्टोबर
नासाचे युरोपा क्लीपर अंतराळयान 14 ऑक्टोबरला दुपारी 12वाजुन 4 मिनिटाला नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center मधील 39A ह्या उड्डाण स्थळावरून Space X Falcon -9 रॉकेटच्या साहाय्याने गुरु ग्रहावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले गुरु ग्रहाच्या Europa ह्या चंद्रावर शास्त्रज्ञांना बर्फाचा सागर आढळला तेव्हा पासुनच शास्त्रज्ञांना तेथे सजीवांचे अस्तित्व आहे का? किंवा पुरातन काळी होते का? हे जाणून घेण्याची ऊत्सुकता होती आता त्या बाबतीत अधिक संशोधन करण्यासाठी Europa Clipper अंतराळयान गुरु ग्रहाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे
गुरु ग्रहांच्या चंद्रावरील समुद्राच्या पाण्याच्या संशोधनासाठी नासाने राबवलेली हि पहिलीच अंतराळ मोहीम आहे हे अंतराळयान प्रदीर्घ कालावधीचा अंतराळ प्रवास करणार असून सहा वर्षांनी 2030 मध्ये गुरु ग्रहावर पोहोचेल त्या साठी युरोपा क्लीपर अंतराळयान 1.8 बिलियन मैलाचा (2.9 बिलियन k.m.)अंतराळ प्रवास करेल 2031मध्ये यान कार्यरत होईल आणि संशोधनाला सुरवात करेल युरोपा क्लीपर अंतराळयान गुरु ग्रहाभोवती अत्यंत जवळून म्हणजे 16 मैल अंतरावरून (25k.m.) 49 वेळा भ्रमण करेल आणी ह्या भ्रमणादरम्यान तेथील वातावरण आणि पाण्याच्या सागराची संशोधनात्मक माहिती गोळा करेल
नासाने परग्रहावरील संशोधनासाठी तयार केलेले युरोपा क्लीपर हे अंतराळयान
आजवरच्या अंतराळयानापेक्षा आकाराने मोठे अद्ययावत यंत्रणेने उपयुक्त आणि स्वयंचलित आहे ह्या अंतराळ यानात नऊ अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणे फिक्स केली आहेत त्या मध्ये गुरूच्या युरोपा चंद्रावरील सागरावर जमलेल्या बर्फाचा थर भेदण्यासाठी ice penetrating radar यंत्रणा व अत्याधुनिक कॅमेरे ह्यांचा समावेश आहे युरोपा क्लीपर यानातील Thermal उपकरणाद्वारे समुद्रावर जमलेल्या बर्फीय भागाच्या तापमानाची नोंद करेल आणि उष्णतेमुळे वितळलेल्या बर्फ़ाचे पाणी होऊन प्रवाहित झालेला भाग शोधेल गुरु ग्रहावरील वातावरण अत्यंत विरळ आहे तेथे अत्यंत कमी प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो यानाला सौरप्रणाली बसविण्यात आली असून अंतराळयानासाठी आवश्यक सौरऊर्जा निर्मिती आणि सौरऊर्जेचा पुुरेेसा साठा यानात केलेला आहे त्या मुळे आवश्यकतेनुसार अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने सौरऊर्जेचा वापर करेल
युरोपा क्लीपर अंतराळयान 49 वेळा गुरु ग्रहाभोवती परिक्रमा करेल आणि त्या दरम्यान तेथील 8000,000k.m. अंतर पार करेल ह्या यानातील अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणाच्या साहाय्याने गुरु ग्रहाचा पृष्ठभाग आणि वातावरणाची माहिती गोळा केली जाईल तसेच Europa वरील गोठलेला सागर,बर्फाची खोली आणि सागराच्या तळाच्या खोलवरच्या पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाचा शोध घेईल Europa Clipper अंतराळ यान भविष्यकालीन मानवी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी गुरु ग्रहावरील पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा देखील शोध घेईल आणि गोळा केलेली संशोधित माहिती पृथ्वीवर पाठवेल यानातील सायंटिफिक उपकरणाद्वारे समुद्राच्या पाण्यातील घटक द्रव्ये,खारेपणा,मिठाचे प्रमाण आणि त्यातील इतर खनिज द्रव्याच्या अस्तित्वाचा शोध घेईल तेथील भूभाग आणि इतर आवश्यक geological माहिती देखील गोळा करेल
नासा संस्थेने ह्या मोहिमेत नागरिकांसाठी त्यांची नावे युरोपा क्लीपर सोबत पाठविण्यासाठी "Message in Bottle"अभियान जाहीर केले होते त्याला हौशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता ह्या
यानासोबत U.S.मधील पुरस्कार प्राप्त नामांकित कवियत्री Laureate Ada
Limons ह्यांची कविताही पाठवण्यात आली आहे Europa Clipper Mission वर
त्यांनी हि कविता लिहिली आहे ह्या कविते सोबतच सहभागी नागरीकांची नावे देखील
गुरु ग्रहावर पाठविण्यात आली आहेत एका मायक्रो चीपवर स्टेन्सीलच्या
स्वरूपात अभियानातील सहभागी नागरिकांची कोरलेली नावे आणि युरोपावरील कविता यानाला जोडण्यात आली आणी यानासोबत गुरू
ग्रहाच्या दिशेने मार्गस्थ झाली ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आधी
Laureate Ada Limion ह्या कवियित्रीची In Praise Of Mystery-A Poem for
Europa हि कविता ऐकावी किंवा वाचावी लागली कवियत्री Laureate ह्यांनी
जानेवारीत नासाच्या J PL Lab ला भेट दिली होती तेव्हा Europa Clipper पाहून
त्या प्रेरित झाल्या तेव्हाच त्यांना हि कविता सुचली होती
युरोपा क्लीपरच्या यशस्वी उड्डाणानंतर नासाचे Administrator- Bill Nelson ह्यांनी युरोपा क्लीपर टीम मधील सर्वांचे अभिनंदन केले ,"पृथ्वी बाहेरील ग्रहावरील गुरूच्या चंद्रावरील पाण्याच्या संशोधनासाठी निघालेल्या युरोपा क्लीपरच्या अंतराळ प्रवासाच्या शुभारंभासाठी शुभेच्छा ! नासा संस्था नेहमीच ब्रम्हांडातील अज्ञात गोष्टीच्या शोधासाठी पुढाकार घेते आणि संशोधनाला प्राधान्य देते युरोपा वरील समुद्रातील पाणी मानवासाठी पिण्यायोग्य आहे का ह्याचा शोध युरोपा क्लीपर घेईलच पण ह्या मोहिमेमुळे भविष्यात आपल्या सौरमालेतील आणि सौरमाले बाहेरील ग्रहांच्या चंद्रावरील पिण्यायोग्य पाण्याच्या अस्तित्वाचा शोधही घेता येईल !"
ह्या मोहिमेच्या यशानंतर नासाच्या Washington येथील नासा संस्थेतील Mission Directorate Nicky Fox ह्यांनी देखील प्रतिक्रया व्यक्त केली," आम्ही ह्या मोहिमेच्या यशाने आनंदित झालो आहोत आणि भविष्यकालीन संशोधित माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहोत ह्या आधी गुरु ग्रहावर गेलेल्या Juno ,Galileo आणि Voyager अंतराळ यानाद्वारे गुरु ग्रहावरील पुरातन कालीन सजीवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यात आला होता 1990 मध्ये Galileo मोहिमेत तेथील युरोपा चंद्रावर गोठलेल्या बर्फाखालील भागात महासागर असून त्यात मुबलक प्रमाणात खारे पाणी आहे आणि ते पाणी पृथ्वीवरील सर्व सागरातील पाण्याच्या प्रमाणापेक्षाही जास्त आहे अशी माहिती मिळाली होती आणि सागराच्या तळातील भागात काही Organic Compounds आणि पुरातन सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे घटक देखील आढळले आहेत त्या मुळे प्रेरित होऊन नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी हि मोहीम राबविली आहे आणि त्याचा यशस्वी शुभारंभ झाला आहे !'
No comments:
Post a Comment