नासाच्या Space X Crew -9 मोहिमेतील अंतराळवीर Nick Hague आणि Aleksandr Gorbunov स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 2 ऑक्टोबर
नासाच्या Space X Crew -9 मोहिमेचे अंतराळवीर Nick Hagueआणि रशियन अंतराळवीर Aleksandr Gorbunov रविवारी स्थानकात सुखरूप पोहोचले हे दोन्ही अंतराळवीर शनिवारी 28 सप्टेंबरला दुपारी 1.17 वाजता(EDT) Space X Crew Dragon मधून स्थानकात जाण्यासाठी अंतराळ प्रवासास निघाले आणि रविवारी संध्याकाळी 5.30वाजता स्थानकात पोहोचले पहिल्यांदाच Cape Canaveral Florida येथील Space Launch Complex -40 ह्या उड्डाण स्थळावरून अंतराळवीरांसह Space X Crew Dragon चे उड्डाण करण्यात आले
Star Liner यानातील बिघाडामुळे अंतराळयान स्थानकात अडकल्यामुळे ह्या अंतराळवीरांचे स्थानकात जाणे लांबले होते शिवाय Star Liner मधील अंतराळवीर येताना Space X Crew Dragon मधून पृथ्वीवर परतणार असल्यामुळे ह्या मोहिमेतील इतर दोन अंतराळवीरांचे स्थानकातील जाणे देखील रद्द करण्यात आले
उड्डाणाआधी ह्या अंतराळवीरांचे उड्डाणपूर्व चेकअप करण्यात आले ह्या मोहिमेतील कमांडरपद अंतराळवीर Nick Hague ह्यांनी आणि Flight Engineer पद अंतराळवीर Aleksandr ह्यांनी सांभाळले हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ प्रवासादरम्यान नासा संस्थेच्या संपर्कात होते रविवारी संध्याकाळी 5.30.वाजता Space X Crew Dragon स्थानकाच्या समोरील भागातील Harmony Module जवळ पोहोचले आणि संध्याकाळी 7.04.वाजता स्थानक आणि Dragon ह्यांच्यातील Hatching ,Docking प्रक्रिया पार पडली त्या आधी ह्या अंतराळवीरांनी Dragon मधील लिकेज आणि pressurization सिस्टिम चेक केली त्या नंतर ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या वास्तव्य करत असलेल्या अंतराळवीरांनी ह्या दोघांचे स्थानकात स्वागत केले काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला
Space X Crew -9 चे अंतराळवीर Nick Hague आणि Aleksandr Gorbunov स्थानकातील सर्व अंतराळवीरांसोबत Welcome Ceremony दरम्यान -फोटो -नासा संस्था
ह्या वेळी झालेल्या लाईव्ह संवादादरम्यान नासा आणि रशियन स्पेस संस्थेतर्फे ह्या अंतराळवीरांचे सुरक्षित अंतराळ प्रवास केल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले आणि अंतराळस्थानकात यशस्वी प्रवेश केल्या बद्दल स्वागत करण्यात आले त्या वेळी नासा संस्थेतील मान्यवरांनी अंतराळवीर Nick ह्यांना ,"तुमच्या अंतराळातील ह्या दुसऱ्या घरी दुसऱ्यांदा स्वागत असे म्हणत तुमचा अंतराळ प्रवास कसा झाला हे विचारले तेव्हा अंतराळवीर Nick म्हणाले ,"आमचा Freedom Space Dragon मधील प्रवास छान झाला अंतराळातील आमच्या ह्या दुसऱ्या घरी पुन्हा प्रवेश केल्यानंतर स्थानकातील अंतराळवीरांनी आनंदाने हसतमुखाने आमचे स्वागत केले ते पाहून माझा आनंद द्विगुणित झाला प्रवेशा नंतरच्या ह्या दहा मिनिटात मी खूप हसलो आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू देखील आले ह्या मोहीम 72 मधील अंतराळवीर खूप छान आहेत आता त्यांच्या सोबतचा वास्तव्याचा आणि संशोधनाचा काळ मजेत जाईल मला इथे पुन्हा येण्याची संधी दिल्याबद्दल आभार !"
Aleksandr म्हणाले ,"मी पहिल्यांदाच स्थानकात आलो आमचा अंतराळ प्रवास थरारक होता हे अंतराळातील फिरते स्थानक त्यातील हि मोठी Lab पाहून मी आश्चर्य चकित झालो ,अमेझिंग आहे सार ! इथे पोहोचल्याचा आनंद होतोय आता इथे वास्तव्य करणार आहे संशोधनात सहभागी होणार आहे मला हि संधी दिल्याबद्दल दोन्ही संस्थेचे आभार! त्या नंतर त्यांनी रशियन भाषेतूनही संवाद साधून संस्थेचे आभार मानले !
त्या नंतर संस्थेतील मान्यवरांनी दोघांना स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या नासा संस्थेचे Administrator Bill Nelson ह्यांनी देखील ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील यशस्वी प्रवेशा बद्दल अभिनंदन केले आणि स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी उड्डाण स्थळावरून पहिल्या मानवासहित यशस्वी उड्डाण केल्याबद्दल टीमचेही अभिनंदन केले आहे
हे दोन्ही अंतराळवीर आता पाच महिने स्थानकात वास्तव्य करतील आणि स्थानकातील अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील फेब्रुवारीत Star liner मोहिमेतील अंतराळवीरांसोबत हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील ऑक्टोबर मध्ये Space X Crew -8 मोहिमेतील चार अंतराळवीर पृथ्वीवर परततील तोवर अकरा अंतराळवीर एकत्रित स्थानकात वास्तव्य करून संशोधनात सहभागी होतील
अंतराळवीर Nick Hague हे दुसऱ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत तर अंतराळवीर Aleksandr मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले आहेत
No comments:
Post a Comment