
रशियन अंतराळवीर Alexey Ovichinin आणि अंतराळवीर Ivan Vagner स्थानकाच्या Poisk Module मधील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -19 डिसेंबर
रशियन अंतराळवीर Alexey Ovichinin आणी अंतराळवीर Ivan Vagner ह्यांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील तांत्रिक कामासाठी Space Walk केला 19 डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता हा स्पेसवॉक सुरु झाला आणि सात तास सातरा मिनिटांनी संध्याकाळी साडे पाच वाजता संपला
ह्या दोन्हीही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक साठीची तयारी आधीच करून ठेवली होती त्यांनी Space Walk साठी लागणाऱ्या स्पेससुटचे लिकेज चेक करून तो चार्ज करून ठेवला व्हिडीओ कॅमेरे चेक केले आणी ईतर आवश्यक टेकनिकल सामान देखील चेक केले आणि ते स्पेससुट मध्ये भरून स्पेससूट तयार ठेवला 19 डिसेंबर ला सकाळी साडेदहा वाजता हे दोन्ही अंतराळवीर स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणि संध्याकाळी साडेपाच वाजता स्पेसवॉक संपवून स्थानकात परतले
स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Poisk Module मधील तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी हा स्पेसवॉक केला ह्या सात तास सतरा मिनिटांच्या स्पेसवॉक दरम्यान ह्या अंतराळवीरांनी ह्या भागातील Celestial X -ray source आणि Electrial Connector patch panels वर देखरेख करण्यासाठी डिझाईन केलेले नवीन Experiment पॅकेज Install केले आणि ह्या भागातील काम झालेल्या प्रयोगाचे अनेक निरुपयोगी साहित्य काढून टाकले ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या अंतराळवीरांना स्थानकाच्या Nouka Multipurpose Lab Module मध्ये बसविण्यात आलेला Robotic Arm काढून युरोपियन सेगमेंट मधील Control panel वर फिक्स करावयाचा होता पण वेळेअभावी ते काम अपूर्ण राहिले ह्या अंतराळवीरांना ह्या स्पेसवॉक साठी अंतराळवीर Alexsander Gorbunov ह्यांनी स्थानकातून मदत केली
ह्या स्पेसवॉक साठी अंतराळवीर Ovichinin ह्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला Orlan स्पेससूट परिधान केला होता त्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता अंतराळवीर Vagner ह्यांचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी निळ्या रंगांच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता
स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 63 वा स्पेसवॉक होता आणि स्थानकाच्या कामासाठी अंतराळवीरांनी केलेला आजवरचा हा 272 वा स्पेसवॉक होता
No comments:
Post a Comment