
मंगळावरील आकाशात 30 सप्टेंबरला झालेल्या सुर्ग्रहणाच्या वेळी Perseverance यानाने कॅमेराबद्ध केलेले निसर्गाने साकारलेल्या मानवी डोळ्याचे विलोभनीय दृश्य - फोटो नासा संस्था
नासा संस्था-JPL- 8 नोव्हेंबर
नासाचे Perseverance मंगळयान 2021च्या फेब्रुवारी मध्ये मंगळावर पोहोचले तेव्हापासून मंगलभुमीवरील व भुगर्भातील पुरातन सजीव सृष्ठिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे,पाण्याचे अस्तित्व आणी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील मानवी निवासासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा शोध घेत आहे Perseverance मंगळयानाने आजवर अत्यंत महत्त्वपुर्ण संशोधीत माहिती आणी तेथील भूगर्भातील खडकांचे नमुने गोळा करून त्याचे फोटो व व्हिडिओ पृथ्वीवर पाठविले आहेत ह्याच मोहिमे अंतर्गत Perseverance यानाने मागच्या महिन्यात झालेल्या मंगळावरील सुर्यग्रहणाच्या वेळचे फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत
मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत Phobos आणी Deimos हे दोन्हीही चंद्र आकाराने लहान आहेत Phobos हा बटाट्याच्या आकाराचा आहे 30 सप्टेंबरला मंगळावरील 1,283 व्या दिवशी मंगळावरील आकाशात सुर्यग्रहण झाले तेव्हाचे फोटो Perseverance ने यानातील अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने कॅमेराबद्ध केले असुन पृथ्वीवर पाठवले आहेत
Perseverance यानाने घेतलेल्या ह्या फोटोत निसर्गाने रेखाटलेल्या मानवी डोळ्याचे विलोभनीय दृश्य दिसत आहे सुर्यग्रहणाच्या वेळी निसर्गाने साकारलेल्या ह्या फोटोत सुर्याचा पृष्ठभाग मानवी डोळ्यातील पांढऱ्या (Iris) भागासारखा भासत आहे आणी काळवंडलेला Phobos चंद्र मधल्या बुबुळा सारखा ( pupil) भासत आहे त्या मूळे शास्त्रज्ञानी ह्या फोटोला Googly Eye असे नाव दिले आहे बटाट्याच्या आकाराचा Phobos चंद्र सुर्य आणी मंगळाच्या मधून भ्रमण करत असताना ग्रहणकाळात त्याने सुर्याचा मोठा पृष्ठभाग व्यापला आहे त्यामुळे सुर्याची प्रकाशकिरणे रोखली गेल्याने सावली पडली आणी चंद्र काळवंडला ह्या वेळी Phobos अत्यंत वेगाने भ्रमण करीत असल्यामुळे त्याला मानवी डोळ्यातील फिरणाऱ्या बुबुळाचा आकार प्राप्त झाला आहे
मंगळाच्या ह्या दोन चंद्रांची नावे ग्रीक खगोल शास्त्रज्ञांने ग्रीक पुराण कथेतील भीतीदायक देवता आणी त्याचा जुळा भाऊ ह्यांच्या नावावरुन ठेवली आहेत (फोबिया म्हणजे भिती) Phobos हा पृथ्वीच्या चंद्रापेक्षा 157 पटिने लहान असून त्याची रूंदी जेमतेम 17 मैल ईतकी आहे आणी Deimos त्याहीपेक्षा लहान आकाराचा आहे हा चंद्र मंगळाच्या जवळ असुन मंगळावरील विषुववृत्ताशी समांतर आहे ह्या चंद्राला मंगळाभोवती परिक्रमा करण्यासाठी फक्त साडेसात तास लागतात
Perseverance मंगळयानाने ह्या आधी अनेकवेळा मंगळावरील सुर्य ग्रहण पाहिले आहे आणी त्या आधी नासाच्या मंगळ मोहिमेतील Quriosity मंगळयानाने 2019 मध्ये आणी Opportunity यानाने 2004 मध्ये मंगळावरील आकाशात झालेल्या सुर्यग्रहणाच्या वेळचे फोटो कॅमेराबध्द करून पृथ्वीवर पाठवले होते
No comments:
Post a Comment