
Space X Crew -8 चे रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin,नासाचे अंतराळवीर Michael Barratt,Matthew Dominickआणि Jeanette Epps पृथ्वीवर परतल्यानंतर -फोटो नासा संस्था
नासा संस्था -25 ऑक्टोबर
नासाच्या Space X Crew 8 मोहिमेतील अंतराळवीरMathew Dominick ,Michael Baratt Jeanette Epps आणि रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin त्यांचे स्थानकातील वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले आहेत हे चारही अंतराळवीर बुधवारी 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजता स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 34 तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर 25 तारखेला शुक्रवारी दुपारी 3.29 मिनिटाला पृथ्वीवर पोहोचले
Space X Crew Dragon Endeovour ह्या अंतराळवीरांसह Florida येथील Pensacola येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले हे अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचताच नासाची रिकव्हरी टीम तेथे पोहोचली त्यांनी अंतराळवीरांना Dragon मधून बाहेर काढले त्या नंतर टीम मधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केले ह्या अंतराळवीरांना त्या नंतर नासाच्या विमानाने Houston येथील Johnson Space Center मध्ये पोहोचविण्यात आले
हे अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी 3 मार्चला स्थानकात गेले होते पण Star Liner अंतराळयानाच्या समस्येमुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबल्यामुळे स्थानकातील 232 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते आता पृथ्वीवर परतले आहेत त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांनी तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदविला विशेषतः मानवी आरोग्यासाठी उपयुक्त Stem Cell Research ,Fuel Temperature affects Material आणि स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील वास्तव्यात मानवी शरीरावर होणारे विपरीत परिणाम ह्या विषयी त्यांनी संशोधन केले
पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकात नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांचा Farewell ceremony पार पडला तेव्हा ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या भावना व्यक्त करीत नासा संस्थेचे आभार मानले अंतराळ मोहीम 71-72 च्या वतीने अंतराळवीर सुनीता विल्यम्स ह्यांनी ह्या चारही अंतराळवीरांना पृथ्वीवर परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या म्हणाल्या ,"ह्या चारही अंतराळवीरांचे कर्तृत्व असामान्य आहे त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होऊन महत्वपूर्ण संशोधन केले आहे त्या अंतराळवीरांचे Hard work आणि यशस्वी योगदाना बद्दल त्यांचे आभार ! त्यांच्या सहवासातील काळ मजेत गेला आम्ही त्यांना मिस करू !" त्या नंतर ह्या चारही अंतराळवीरांनी देखील सहकारी अंतराळवीर आणि नासा संस्थेतील सर्वांचे आभार मानले
Mathew Dominick -,"ह्या मोहिमेतील सर्वच अंतराळवीरांसोबतचा स्थानकातील वास्तव्याचा काळ मजेत गेला आम्हाला इथे वास्तव्याची,संशोधनाची संधी दिल्याबद्दल जगभरातील नासा संस्थेतील सर्वांचे आभार त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहकार्यामुळे आम्ही इथे राहू शकलो संशोधन करू शकलो आणि विशेष म्हणजे रात्री निश्चिन्त झोपू शकलो कारण आम्हाला माहीत होते कि ते रात्रदिवस आमच्या संपर्कात आहेत त्यांची आमच्यावर नजर आहे त्या साठी स्पेशल आभार विशेष म्हणजे स्थानकातून आम्ही पृथ्वीवरचे Huricane Milton वादळ पाहू शकलो त्या काळात माझ्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी आम्हाला सपोर्ट केल त्या साठी त्यांचेही आभार !"
Michael Baratt -," Crew -8 मोहिमेतील Matt,Jenette आणि Sasha ह्यांच्या सोबत इथे येतानाचा अंतराळ प्रवास मजेशीर होता छान होता इथल्या वास्तव्यातील सहकारी अंतराळवीरां सोबतचे काही प्रसंग तर खूप वंडरफूल होते त्या साठी त्यांचे आभार आणि संस्थेतील सर्वांचे त्यांनी आम्हाला स्थानकात वास्तव्याची संधी दिल्याबद्दल आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शासाठी आभार !'
Jenette -"मला सुद्धा संस्थेतील सर्वांचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथे संशोधन करू शकलो आणि माझ्या कुटुंबियांचे माझ्या जुळ्या बहिणी Jenet आणि Brain ह्यांचे विशेष आभार मी इथे आठ महिने दूर असूनही त्यांनी adjust केल माझे स्थानकातील सहकारी मित्र खूप छान होते मी देखील त्यांना मिस करेन !" अंतराळवीर Alexandar ह्यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या पृथ्वीवरील वादळा मुळे हवामान खराब असल्याने ह्या अंतराळवीरांची परत येण्याची तारीख लांबली पण अखेर हे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित पोहोचले
No comments:
Post a Comment