Saturday 20 July 2024

नासा संस्था Apollo-11 मोहिमेचा 55वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाचे आयोजनाने साजरा करणार

 https://www.nasa.gov/wp-content/uploads/2023/05/as11-40-5875large.jpg

अंतराळवीर Buzz Aldrin 20 जुलै1969 ला चंद्रभुमीवर अमेरिकेचा झेंडा रोवल्यानंतर मागे अंतराळवीरांच्या पावलांचे ठसे -फोटो-नासा संस्था.

नासा संस्था-20 जुलै

20 जुलै 1969 ला नासाच्या अपोलो -11 चांद्र मोहिमेतील अंतराळवीर Neil Armstrong, Michael Collinsआणी Buzz Aldrin ह्यांनी पहिल्यांदा चंद्रभुमीवर पाऊल ठेवले होते त्या ऐतिहासिक घटनेचा आज पंचावन्नवा वर्धापन दिवस आहे अमेरिकेत पंधरा जुलै पासून पंचवीस जुलै पर्यंत हा वर्धापन दिन वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे  ह्या अपोलो 11मोहिमेतील सहभागी मान्यवरांच्या ऊपस्थितीत हा वर्धापन दिन साजरा होत असुन त्यात विविध कार्यक्रमाचा समावेश आहे
19 जुलैला अपोलो 11 मोहिमेतील सहभागी महिला आणि Human Computer म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  Dorothy Vaughan ह्यांच्या अपोलो मोहिमेतील उत्कृष्ठ कार्याचे स्मरण करण्यात आले आणि  त्यांच्या सन्मानार्थ नासाच्या Huston येथील Johnson Space Center मधील 12न. च्या बिल्डिंगला त्यांचे नाव देण्यात आले त्याच्या  Ribbon cuttingचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला 


https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/07/dorothy-vaughan.jpg
 
नासाच्या अपोलो 11 मोहिमेतील सहभागी महिला Human Computer Dorothy vaughan-फोटो-नासा संस्था 
16 जुलै 1969 ला हे तीन अंतराळवीर अपोलो यानामधून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 20 जुलैला चंद्रावर पोहोचले तेथे पोहोचल्यावर अंतराळवीर Neil Armstrong आणी Buzz Aldrin ह्यांनी अपोलो यानाच्या Eagle moon मोड्युल मधून ऊतरून चंद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवले आणी काही अंतर चालत गेले चंद्रभुमीवर त्यांनी 21तास 38मिनिटे व्यतीत केले त्या वेळात त्यांनी प्रथम तेथील भुमीत अमेरिकेचा झेंडा रोवला ह्या दोन्ही Moon Walker नी तेथे Launch pad वर लागलेल्या आगीत शहिद झालेल्या अपोलो मोहिमेतील अंतराळविरांचे नाव असलेले शौर्यपदक ठेवले आणी विश्वशांतीसाठीची काही स्मृतीचिन्हेही ठेवली
ह्या दोन्ही अंतराळविरांनी ह्या अपोलो मोहिमेचा चंद्रावर जाऊन पाऊलखुणा ठेऊन सुखरू पृथ्वीवर परतण्याचा मुळ ऊद्देश साध्य केलाच शिवाय तेथे काही अंतर चालत जाऊन तेथील भुमीचा मागोवा घेतला  तेथील भुमीवरील खडक आणी मातीचे नमुने गोळा केले या शिवाय त्यांनी चंद्रावरून पृथ्वीवर Signals येण्यासाठी TV Camera Deploy केला आणी पृथ्वीवासीयांसाठी ऊपयुक्त कामे केली पृथ्वीवरील 650 मिलीयन लोक हा ऐतिहासिक क्षण टि.व्हि.वरून पहात होते
अमेरिकेच्या अंतराळविश्वातील ह्या ऐतिहासिक यशाची  माहिती नवीन पिढीला व्हावी त्या निमित्ताने ह्या मोहिमेतील अंतराळवीरांची आणी ईतर सहभागी शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणी टिममधील सर्वांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात1960 चे शतक आव्हानात्मक होते पण 1969 साली अपोलो 11मोहिमेतील अंतराळवीरांनी  अनेक अडचणीवर मात करत हि मोहीम यशस्वी केली आणी चंद्रावर पहिल्या मानवी पाऊलखुणा ठेवल्या ती छोटिशी ऐतिहासिक घटना भविष्यकालीन चंद्रमोहिमेसाठी यशस्वी पाऊलवाट ठरली आता पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत जेव्हा अपोलो 11मोहिमेतील अंतराळवीर Eagle मोड्युल मधून चंद्रावर ऊतरले तेव्हा साऱ्या जगाच लक्ष तेथे होते साऱ्या जगाच्या शांतीसाठीव एकीसाठी आपण पुन्हा प्रार्थना करु या !त्यांच स्मरण करु या!

No comments:

Post a Comment