Friday 12 July 2024

Andre Douglas ह्यांची Artemis-ll मोहिमेतील Backup crew साठी निवड

 https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/07/andre-douglas.jpg

आर्टिमस मोहिमेतील Backup Crew Andre Douglas- फोटो- नासा संस्था

नासा संस्था- 3 जुलै 

नासाच्या आर्टिमस मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथील भुमीवर पाऊल ठेऊन तेथील संशोधीत माहिती गोळा करणार आहेत सध्या त्यांची अंतिम तयारी सुरु आहे 2024 मध्ये हे अंतराळवीर चंद्रावर जाणार होते पण काही कारणास्तव त्यांचे जाणे लांबले असले तरीही ह्या मोहिमेची  जोरदार तयारी सुरू आहे

आर्टिमस -ll मोहिमेतील अंतराळवीर Ried Wiseman, Victor Glover,Christina Koch आणी Canada चे अंतराळ वीर Jeremy Hansen ह्यांची निवड आधीच निश्चित झाली होती  ह्या चौघांचे ट्रेनिंग देखील पुर्ण होत आले असुन आता ऊड्डाणपुर्व अंतीम ट्रेनिंग सुरू आहे आता ह्या चार अंतराळविरांसोबत जास्तीच्या पाचव्या अंतराळवीराची निवड नासा संस्थेने केली आहे अंतराळवीर Andre Douglas ह्यांची आर्टिमस मोहिमेतील Backup Crew म्हणून निवड झाली आहे

ऐनवेळी काही समस्या ऊद्भवल्यास ऊड्डाणाच्या वेळी काही अडचण आली किंवा एखादा अंतराळवीर जाण्यास असमर्थ असल्यास त्यांच्या ऐवजी Andre Douglas चंद्रावर जाण्यासाठी आर्टिमस मोहिमेत सहभागी होतील त्यासाठी त्यांना देखील ह्या चार अंतराळवीरांसोबत ट्रेनिंग देण्यात आले होते 

 Andre Douglas ह्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ,त्यांचा Extensive Operational experience आणी नासा संस्थेतील ह्या कामातील कुशलता पाहून त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या अंतराळवीर पदाच्या ट्रेनिंग मधला आणी नासा संस्थेतील वेगवेगळ्या विभागातील कामाचा उत्कृष्ट सहभाग पाहून आम्ही त्यांची निवड निश्चित केली असे नासाच्या Huston येथील Johnson Space Center मधील  Chief Astronaut Joe Acaba म्हणतात

Andre Virginia चे रहिवासी आहेत यांनी Coast Guard Academy London येथून  ME Mechanical केल त्या नंतर त्यांनी चार विषयात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतुन PHD केले त्यांनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतुन Systems Engineering मध्ये PHD केले शिवाय त्यांनी US Coast Gard Naval Architect,Salvage Engineer,Damage Control Assistant Officer Of the Deck म्हणून काम केलय John Hopkin University मध्ये त्यांनी नासा संस्थेतर्फे Maritime robotics,Planetary Defence and Space Exploration Missions मध्ये ते सहभाग नोंदवला होतापण

आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीरांसोबत पृथ्वीवरील कृत्रिम चंद्रासारख्या भूमीवर पार पडलेल्या Moonwalk Spacewalk ,Space Suit टेस्ट, Lunar Terrian Vehical आणि Rover Test मध्ये ते सहभागी झाले होते

ह्या आधी Canada च्या CSA (कॅनडीयन स्पेस एजन्सी) नेही अंतराळवीर Jenni Wibbons ह्यांची Backup Crew म्हणून 2023 च्या नोव्हेंबरमध्ये निवड केली आहे

No comments:

Post a Comment