नासाचे अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin आणि Ivan Vagner स्थानकात पोहोचल्यानंतर एकत्रित Welcome Ceremony दरम्यान लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -12 सप्टेंबर
नासाचे अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin आणी Ivan Vagner बुधवारी स्थानकात पोहोचले हे तिनही अंतराळवीर सहा महिने स्थानकात वास्तव्य करणार आहेत
बुधवारी 11 तारखेला सोयुझ MS-26 अंतराळयान ह्या तिनही अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले निघण्या आधी ह्या तिन्ही अंतराळविरांचे ऊड्डाणपुर्व अंतिम चेकअप करण्यात आले त्यांचे हेल्थ चेकअप,स्पेससुट फिटिंग आणी ईतर आवश्यक चेकअप करण्यात आले हे अंतराळवीर स्थानकात जायला निघाले तेव्हा ऊड्डाणस्थळी त्यांना निरोप द्यायला त्यांचे कुटुंबीय,मित्र आणि संस्थेतील प्रमुख हजर होते
सोयुझ अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनुर येथील ऊड्डाण स्थळावरुन 12.23 p.m(EDT) वाजता स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 3.32p.m.वाजता स्थानका जवळ पोहोचले त्यानंतर सोयुझ अंतराळयानाने स्थानकाभोवती दोन फेऱ्या मारल्या
सोयुझ अंतराळयान स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Rassvet Module जवळ पोहोचल्यावर स्वयंचलित यंत्रणेने सोयुझ यान आणी स्थानक ह्यांच्यातील Hatching, Docking प्रक्रिया पार पडली आणी 5.50p.m.ला स्थानकाचे दार ऊघडताच तिनही अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सद्या रहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले
त्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला तेव्हा स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्र जमले होते रशियातील Mascow M.C.C येथील प्रमुखांनी आणि नासाच्या Huston तेथील संस्था प्रमुखांनी त्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला ,"Space Flight Control Team च्या वतीने देखील तुम्ही स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन! आता स्थानकात अंतराळवीरांची संख्या खूप झाली आहे आणि तुम्हाला एकत्रित वास्तव्य करून संशोधन करावयाचे आहे काही दिवसात Space X Crew Dragon मोहिमेतील आणखी अंतराळवीर स्थानकात पोहोचतील ह्या साठी धैर्याची गरज आहे आम्हाला आशा आहे कि,तुम्ही हे कार्य यशस्वी करून सहा महिन्यांनी सुरक्षित पुन्हा पृथ्वीवर परत याल तुम्हाला स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा !" त्या वेळी अंतराळवीर Don आणि Ovchinin ह्यांना तुम्ही इथे पोहोचल्यावर तुमच्या भावना काय आहेत असे विचारले तेव्हा त्यांनी आभार मानत आम्ही पुन्हा आमच्या ह्या दुसऱ्या घरी राहायला आलो आहोत आणि आम्हाला इथे राहायला आवडत हे घर सुंदर आहे!अद्भुत आहे! आणि आमची खूप दिवसांची इच्छा होती कि इथे खूप अंतराळवीरांसोबत वास्तव्य कराव आता आमची ती इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून आम्ही आनंदित आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली
आता स्थानकातील अंतराळवीरांची संख्या बारा झाली असुन हे अंतराळवीर नासाच्या मोहीम 71/72 मध्ये सहभागी होऊन तेथे सुरू असलेल्या संशोधनात सहभागी होतील आणी सहा महिन्याच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परततील
अंतराळवीर Don Pettit आणी अंतराळवीर Alexey Ovchinin हे चवथ्यांंदा स्थानकात रहायला गेले असुन त्यांंची हि चवथी अंतराळवारी आहे आणी अंतराळवीर Ivan Vagner दुसऱ्यांंदा स्थानकात रहायला गेले असुन त्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे
No comments:
Post a Comment