Wednesday 31 July 2024

नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore स्थानकातून लवकरच परतण्याची शक्यता

  Image shows Boeing's Starliner crew capsule docked to the Harmony module's forward port at the International Space Station

 अंतराळ स्थानकाच्या Harmony Module च्या समोरील भागात उभे असलेले Boeing Star Liner अंतराळयान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 जुलै 

नासाचे अंतरवीर Sunita Williams आणि Butch Wilmore जून महिन्यात Boeing Star liner अंतराळयानाच्या Flight Test साठी स्थानकात गेले होते पण स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांच्या Star liner अंतराळयानातील Thrusters मधून हेलियम लिकेज होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले अशा कंडिशनमध्ये स्थानकातून पृथ्वीवर परतणे अंतराळवीरांच्या सुरक्षिततेच्या दृष्ठीने धोकादायक असल्याने त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले होते पण आता नासा आणि बोईंग टीममधील इंजिनीअर्सनी मिळून ह्या समस्येवर उपाय शोधला आहे 

New Mexico येथील White Sand Test Facility मध्ये नासा आणी बोईंग टीममधल्या इंजिनीअर्सनी Boeing Star liner अंतराळयानातील थ्रस्टर्स मधील  Reaction control System (RCS) ची Hot Fire Test पूर्ण केली ह्या टेस्टच्या वेळी पृथ्वीवर Boeing Star liner अंतराळयान स्थानकात पोहोचत असतानाची स्थिती निर्माण करण्यात आली शिवाय ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याआधी अंतराळयानाच्या स्थानकाबाहेर पडतानाची स्थिती त्या वेळेसचे De orbit burn आणि पृथ्वीवर पोहोचल्यानंतर Landing च्या स्थितीचा विचार करण्यात आला आणि हि टेस्ट करून अंतराळयानाची कार्यक्षमता तपासण्यात आली त्या नंतर यानातील RCSचे पुन्हा निरीक्षण करून त्यातील त्रुटीवर उपाय शोधण्यात आले 

27 जुलैला ह्या टीममधील इंजिनीअर्सनी पृथ्वीवर दुसरी टेस्ट पूर्ण केली त्या वेळी Boeing Star liner अंतराळयानातील Propulsion System चे चेकिंग त्यांनी केले ह्या पृथ्वीवरील टेस्टच्या वेळी अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore ह्यांनी स्थानकात उभ्या असलेल्या Boeing Star liner अंतराळयानात बसून ह्या टेस्ट मध्ये सहभाग नोंदवला ह्या टेस्ट दरम्यान टीम मधील इंजिनीअर्सनी अंतराळयानातील  28 पैकी 27  थ्रस्टर्स चे Firing करून त्यांची कार्यक्षमता तपासली शिवाय हेलियम लिकेजचे प्रमाण नोंदवण्यात आले तेव्हा प्राथमिक टेस्ट नंतर सर्व थ्रस्टर्स पुन्हा Preflight स्थितीत आल्याचे आणि पृथ्वीवर परतण्यासाठी आवश्यक एव्हढे हेलियम त्यात शिल्लक असल्याचे निरीक्षणास आले आता थ्रस्टर्स मधील हेलियम लिकेज होत असलेला भाग पुन्हा बंद करण्यात आला आहे टेस्ट साठी  सिस्टीमचा भाग काही काळ उघडण्यात आला होता अंतराळयान जेव्हा स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्थानकातून बाहेर पडेल तेव्हा निघण्याआधी हे दोन्ही अंतराळवीर तो भाग उघडून त्यातून लिकेज होत नाही ना ह्याची खात्री करतील 

त्या मुळे आता ह्या दोन अंतराळवीरांच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते लवकरच पृथ्वीवर परततील असे Boeing चे Vice President आणि Program Manager , Mark Nappi  ह्या टेस्टच्या यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले ,"आता मी निश्चिन्त झालो आहे ! Boeing Star liner अंतराळयान आता ह्या दोन अंतराळवीरांना सुरक्षितपणे स्थानकातून पृथ्वीवर पोहोचवेल ते जसे गेले तसेच पृथ्वीवर सुरक्षितपणे पोहोचावेत हीच आमची इच्छा आहे Star Liner अंतराळयान स्थानकात पोहोचल्यानंतर पुन्हा त्यातून हेलियम लिकेज झाले नाही त्याची माहितीही आम्ही गोळा केली आम्ही ह्या दोन्ही अंतराळवीरांच्या सुरक्षिततेवर भर देत आहोत त्या साठी आम्ही सतत ह्या दोन्ही अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून आवश्यक सूचना देत आहोत आणि यानाच्या देखभालीवर दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करीत आहोत त्यातील यंत्रणा अद्ययावत सॉफ्टवेअर बसवून, सिस्टिम चेक करीत आहोत सध्या ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याची तारीख निश्चित ठरली नसली तरी ते लवकरच परतावेत ह्या साठी आमची टीम प्रयत्न करीत आहे !"

सध्या हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ मोहीम 70-71च्या अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी झाले आहेत ह्या अंतराळवीरांनी पृथ्वीवर पॅरिस मध्ये सुरु असलेल्या ऑलिंपिक खेळाडूंना स्थानकात खेळ खेळून प्रोत्साहन दिले सुरवातीला अंतराळवीर Sunita Williams ह्यांनी इलेक्ट्रिक मशाल पेटवून शुभारंभ केला त्या नंतर इतर अंतराळवीरांनी वेट लिफ्टिंग,रेसिंग,डिस्टन्स थ्रो, शॉट पुट,वेगवेगळ्या कसरतीचे प्रयोग केले पृथ्वीवर ऑलिम्पिक मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना खूप मेहनत करावी लागते पण इथे झिरो ग्रॅव्हीटीत वजनरहित अवस्थेत खेळताना आम्हाला सोपे जाते असे म्हणत त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ! आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

No comments:

Post a Comment