Monday, 2 December 2024

अंतराळवीरांनी स्थानकातून दिल्या पृथ्वीवासीयांना Thanksgiving Day च्या शुभेच्छा

 NASA astronauts (clockwise from bottom left) Nick Hague, Suni Williams, Butch Wilmore, and Don Pettit wish a Happy Thanksgiving in this video from the International Space Station. Credit: NASA/YouTube

नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान स्थानकातून पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा देताना अंतराळवीर Nick Hague ,Don Pettite ,Sunita Williams आणि Butch Wilmore -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 28 नोव्हेंबर 

अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील चवथ्या गुरुवारी Thanks giving Day उत्साहात साजरा केल्या जातो अमेरिकन नागरिक त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक आणि मित्रांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या खास पदार्थांचा समावेश असलेल्या मेजवानीचा आस्वाद घेतात पृथ्वीपासून दूर अंतराळ स्थानकात तरंगत्या अवस्थेत राहणाऱ्या अंतराळवीरांना मात्र कुटुंबियांसोबत हा डे साजरा करता येत नाही पण अंतराळ स्थानकातील अंतराळवीर  सहकारी अंतराळवीर मित्रांसोबत स्थानकात हा दिवस साजरा करतात पार्टी करून पृथ्वीवरून त्यांच्यासाठी आलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधून पृथ्वीवरील कुटुंबियांशी संवाद साधतात आणि Thanks giving Day च्या शुभेच्छा देतात 

ह्या वर्षी 28नोव्हेंबरला सर्वत्र Thanks giving day साजरा झाला सध्या स्थानकात वास्तव्यास असलेल्या Sunita Williams ,Nick Hague ,Butch Wilmore आणि Don Pettite ह्या अंतराळवीरांनी देखील स्थानकात हा दिवस साजरा केला त्या आधी त्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधत संस्था,त्यांचे कुटुंबीयआणि पृथ्वीवासीयांना Thanks giving day निमित्त शुभेच्छा दिल्या आणि Thanks giving day बद्दल त्यांच्या भावना व्यक्त करीत त्यांच्या Thanks giving feast मध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असणार हेही सांगितले 

Sunita -"आम्ही सारे अंतराळवीर आमचे नातेवाईक,मित्र आणि पृथ्वीवरील आम्हाला सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी इथे जमलो आहोत "Happy Thanks giving day"!

Don Pettite - Thanks giving स्पेशली फॅमिली आणि मित्रांसोबत एकत्रित येऊन साजरा केला जातो पण आताच्या जगात सर्वजण आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे सर्वांनाच एकत्र येणे जमत नाही म्हणून Thanks giving day च्या सुट्टीत सर्वजण एकत्र जमून आपल्या फॅमिलीसोबत मेजवानीचा आस्वाद घेतात 

Nick Hague -"मेजवानीत खास पदार्थांचा समावेश असतो आम्ही आता पृथ्वीपासून दूर अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत वास्तव्य करीत आहोत त्या मुळे आम्ही आमच्या फॅमिली,फ्रेंड सोबत पृथ्वीवर हा डे साजरा करू शकत नाही पण आम्ही स्थानकात उद्या हा दिवस साजरा करणार आहोत आमचे इथले जेवण वेगळे असले तरीही आमच्या feast मधेही Thanks giving सारख्याच खास पदार्थांचा समावेश असणार आहे आमच्या साठी पृथ्वीवरून Brussels Sprouts,Sardines,Butternut Squash,Apple Spice आणि Smoked Turkey ह्यांची पाकिटे आली आहेत असे म्हणत त्यांनी पाकिटे दाखविली ह्या सर्वासाठी नासा संस्था आणि सर्वांचे आभार !"

Butch Wilmore -"जेव्हा आपण आपल्या कामात व्यस्त असतो तेव्हा एकत्र येण जमत नाही आम्ही आता स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत हा दिवस साजरा करणार आहोत इथे राहण्याचा अनुभव मजेशीर आहे आमचे कुटुंबीय मित्र आणि नासा संस्थेच्या सपोर्ट मुळे हा अद्भुत अनुभव आम्ही घेऊ शकलो त्या साठी सर्वांचे आभार आमचे कुटुंबीय Thanks giving च्या दिवशी जिथे असतील तिथून आमच्या सुरक्षिततेसाठी देवाजवळ प्रार्थना करत असतील मला आमच्या देशाचेही आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मुळेच आम्ही हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ज्यांनी आम्हाला संधी दिली प्रेरित केल त्या सर्वांचे आभार !" Happy Thanks giving Day!

Thanks Giving Day साजरा करण्यासाठी ह्या अंतराळवीरांनी बुधवारीच आठवड्यातील त्यांची कामे आटोपली आणि गुरुवारच्या सुट्टीचा दिवस मोकळा ठेवला त्या दिवशी Celebration feast मधील पदार्थांचा आस्वाद आणि कुटुंबियांसोबत संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि पृथ्वीवासीयांना Thanks giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment