
नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी आर्टेमिस III मोहिमेतील अंतराळवीरांना उतरण्यासाठी शोधलेल्या चंद्राच्या दक्षिण भागातील नऊ जागा -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -28 ऑक्टोबर
अमेरिकेच्या आर्टेमिस III मोहिमेतील चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथील संशोधित माहिती गोळा करणार आहेत तेथील भूमीवर उतरून भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या निवासासाठी आणि चंद्रावरील भविष्यकालीन मानवी निवासासाठी पृथ्वीसारखे पोषक वातावरण असलेली जागा शोधणार आहेत पण त्या आधी ह्या चार अंतराळवीरांना चंद्रावर उतरण्यासाठी योग्य भूमीचा शोध नासा संस्थेतील शास्त्रज्ञ घेत आहेत शास्त्रज्ञांना त्यात यश आले असून Artemis III मोहिमेतील अंतराळवीरांना उतरण्यासाठी चांद्रभूमीवरील नऊ जागा त्यांना आढळल्या आहेत
शास्त्रज्ञांना चंद्राच्या दक्षिण भागात ह्या जागा आढळल्या असून हा भाग अपोलो मोहिमेतील अंतराळवीर ज्या भागात उतरले होते त्या भागापेक्षा वेगळा आहे तेथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती देखील वेगळे आहे ह्या भाग थंड आहे तिथे सूर्याचा पुरेसा प्रकाश आणि सावली पडते आणि शास्त्रज्ञांच्या मते तेथे मानवासाठी पोषक वातावरण असू शकते कारण त्या भागात पाणी आणि इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत चांद्रभूमीवरील हा भूभाग पुरातन असल्यामुळे इथे Geological संशोधनास वाव आहे चंद्रावरील पुरातन काळच्या सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्यासाठी संशोधनायोग्य आहे
नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter आणि Vast body Lunar Science reserch टीमने गोळा केलेल्या Data च्या साहाय्याने शास्त्रज्ञानी हि माहिती मिळवली आहे नासा संस्थेतील आर्टेमिस मोहिमेतील शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सनी ह्या भागाची निवड करताना चांद्रभूमीवरील ह्या भागात अंतराळवीरांना उतरण्यायोग्य जमीन तेथील मानवाला आवश्यक असलेल्या पृथ्वीसारखे पोषक वातावरणाची शक्यता सूर्यप्रकाश व सावलीची उपलब्धता शिवाय भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क यंत्रणेसाठी आवश्यक वातावरण ह्या गोष्ठीना प्राधान्य दिले भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील Orion अंतराळयान नासाची Space Launch System , Rocket,Human Landing System ह्या साठी योग्य आहे का? ह्याचीही पाहणी करण्यात आली
नासा संस्थेतील Chief Exploration Scientist -Jocob Bleacher म्हणतात," पन्नास वर्षांनी अमेरिकेने पुन्हा चांद्रमोहीम सुरु केली आहे आर्टेमिस III मोहिमेतील अंतराळवीर पहिल्यांदाच नव्या अंतराळ यानातून चंद्रावरील दक्षिण भागात जाणार आहेत हा भाग अपोलो मोहिमेतील अंतराळवीर उतरले होते त्या भूमीपेक्षा वेगळा आहे आजवर त्या भागात कोणीही गेले नाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी चांद्रभूमीवर उतरण्यायोग्य जागा निवडणे आवश्यक आहे ह्या अंतराळवीरांच्या चंद्रावरील दक्षिण भागातील भूमीवर उतरण्याची हि पहिली ऐतिहासिक घटना आहे हे अंतराळवीर तेथे जातील चंद्राविषयी संशोधित माहिती मिळवतील भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यायोग्य जागा शोधतील शिवाय तेथे राहून चंद्रावरील इतर भागाचाही शोध घेतील "
सध्या चांद्रभूमीवरील ह्या नऊ भागाची प्राथमिक निवड नासा संस्थेने केली आहे नासा संस्थेतील शास्त्रज्ञ ,इंजिनीअर्स नासाचे औद्योगिक पार्टनर ह्या भागांचे सखोल संशोधित निरीक्षण नोंदवतील त्या नंतर अंतिम जागेची निवड निश्चित होईल
No comments:
Post a Comment