Saturday, 14 December 2024

परग्रहावरील आकाशात 72 यशस्वी ऊड्डाणाची विक्रमी नोंद करणाऱ्या पहिल्या Ingenuity Mars Helicopter च्या Accident चे कारण शास्त्रज्ञांनी शोधले

 NASA’s Ingenuity Mars Helicopter

नासाचे Ingenuity Mars helicopter मंगळावरील आकाशातील 72व्या उड्डाणानंतर खाली उतरताना दुर्घटनाग्रस्थ झाले तो वालुकामय भाग -फोटो -नासा संस्था (JPL)

 नासा संस्था-JPL-11 डिसेंबर

परग्रहावरील आकाशात 72 यशस्वी ऊड्डाणाची विक्रमी नोंद करणाऱ्या पहिल्या Ingenuity Mars Helicopter च्या Accident चे कारण शास्त्रज्ञांनी शोधले आहे नासाच्या मंगळ मोहिमेतील Perseverance मंगळ यानासोबत Ingenuity Mars helicopter मंगळावर पोहोचले होते पण 18 जानेवारी 2024 ला  72 व्या उड्डाणानंतर ते दुर्घटनाग्रस्त झाले होते मंगळावरील आकाशातील उड्डाणानंतर खाली भूमीवर उतरताना Ingenuity helicopter चे Roter Blade खराब झाल्याने ते उड्डाणास असमर्थ झाले 

नासाच्या Southern California -( JPL) संस्थेतील इंजिनीअर्स आणि शास्त्रज्ञांनी Ingenuity helicopter चे डिझाईन करताना मंगळावरील आकाशात महिनाभरात पाच उड्डानांची अपेक्षा केली होती पण शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कित्येक पट जास्त 72 वेळा यशस्वी उड्डाणे करून आणि ह्या प्रत्येक उड्डाणा दरम्यात मंगळ भूमीवरील वेगवेगळ्या भागातील महत्वपूर्ण संशोधित माहिती,फोटो आणि व्हडिओ नासा संस्थेला पाठवून Ingenuity ने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत केले होते 

Ingenuity helicopter 72 व्या उड्डाण्णा दरम्यान मंगळावरील आकाशात 40 फूट उंचीवर पोहोचले आणि 19 सेकंदात helicopter मधील कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेथील फोटो देखील घेतले आणि 32 सेकंदात ते पुन्हा खाली उतरले पण मंगळ भूमीवर खाली उतरताना तेथील जमिनीचा अंदाज न आल्याने ते क्षतिग्रस्थ झाले आणि त्याचा नासा संस्थेशी संपर्क तुटला सहा दिवसांनी नासा संस्थेचा Ingenuity शी संपर्क झाला तेव्हा Ingenuity helicopterचे Roter Blade तुटल्याचे उपलब्ध फोटोवरून शास्त्रज्ञांच्या लक्षात आले होते 

Ingenuity helicopter चे पहिले पायलट Havard Grip(JPL) म्हणतात ,"Ingenuity helicopter मध्ये Black Box नव्हता आणि परग्रहावर असल्याने कोणी प्रत्यक्षदर्शी तेथे नव्हता त्या मुळे 100 मैल दूर अंतरावरून ह्या दुर्घटनेची माहिती मिळवताना अडचण आली उपलब्ध फोटो व व्हिडीओ वरून माहिती काढावी लागली Ingenuity helicopter च्या खालच्या भागातील कॅमेरे मंगळावरील खडकाळ पण सपाट भागातील फोटो काढण्यासाठी बसविले होते मात्र Ingenuity helicopter जेथे खाली उतरले तो भाग वालुकामय होता तेथे वाळूच्या लहरी होत्या तो भाग सपाट नव्हता त्या मुळे खाली वेगात येणाऱ्या Ingenuity helicopter ला खाली उतरताना जमिनीचा अंदाज न आल्याने ते दुर्घटनाग्रस्थ झाले ह्या भागात Ingenuity ला उतारण्यायोग्य जागा कॅमेरे शोधू शकले नाहीत त्या मुळे वाळूच्या निसरड्या भागात उतरल्यावर ते फरफटत गेले त्याच्या Roter Blade वर जास्तीचा भार आल्याने Roter System क्षतिग्रस्थ झाली त्यांचा संपर्क तुटला आणि helicopter ला आवश्यक तेव्हढी ऊर्जा न मिळाल्याने उरलेल्या Blade चा भागही तुटला आणि संपर्क यंत्रणा बंद पडली !" Ingenuity च्या मंगळावरील आकाशातील यशस्वी 72 उड्डाणामुळे आणि त्याने गोळा केलेल्या संशोधित माहिती मुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आणि मंगळ मोहिमेतील वाहन बनविताना ते खूप मोठे आणि जड असायला हवे असे नाही तर छोट्या आकाराचे वजनांनी हलके पण अत्याधुनिक यंत्रणेने युक्त असायला हवे हे Ingenuityमुळे सिद्ध झाले असे Ingenuity चे प्रोजेक्ट मॅनेजर Teddy Tzanetos म्हणतात

Ingenuity 72 व्या उड्डाणा दरम्यान दुर्घटनाग्रस्थ झाले आणि ते मंगळावरील आकाशात उड्डाण करण्यास असमर्थ झाले असले तरीही त्यातील अत्याधुनिक यंत्रणा सुरु आहे Ingenuity तेथील वातावरणातील आणि इतर संशोधित माहिती गोळा करून Perseverance यानाला आठवड्यातून एकदा पाठवतो JPLमधील शास्त्रज्ञांनी हि माहिती संशोधित केली असून लवकरच ती सर्वत्र प्रसारित केल्या जाईल शास्त्रज्ञांनी Ingenuity helicopter च्या दुर्घटनेचे नेमके कारण शोधल्यामुळे आता हि माहिती भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील मंगळावरील आकाशात उड्डाण करणाऱ्या विमान किंवा इतर वाहन बनविताना उपयुक्त ठरेल

No comments:

Post a Comment