Friday 2 August 2024

Blue Origin NS-26 मोहिमे अंतर्गत सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार

 

 Blue Origin च्या NS- 26 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवासी -फोटो -Blue Origin 

Blue Origin- 2 ऑगस्ट

अमेरिकेने अंतराळ विश्वात खाजगी कंपन्यांंना अंतराळ पर्यटनाची परवानगी दिल्यानंतर Blue Originने New Shepherd अंतराळयानातुन सामान्य नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले आहे आता NS-26 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत सहा नागरिक अंतराळ पर्यटनास जाणार असुन त्यांची नावे Blue Origin कंपनीने मागच्या आठवड्यात जाहीर केली आहेत 

ह्या मोहिमेत Nicolina Elrick,Rob Ferl,Eugene Grin,Dr.Eiman Jahangir,Karsen kitchen आणी Ephraim Robin हे सहा नागरिक सहभागी होणार आहेत Karsen सगळ्यात लहान असुन ह्या मोहिमे नंतर ती अंतराळ पर्यटन करणारी सगळ्यात कमी वयाची तरुणी ठरेल

Rob Ferl हे Research scientist आहेत आणी ते नासा संस्थेतर्फे कमर्शियल अंतराळवीर म्हणून ह्या म़ोहिमेत सहभागी होणार आहेत ह्या अंतराळ प्रवासा दरम्यान ते सायंटिफिक प्रयोग करणार आहेत मायक्रो ग्रव्हिटित झाडाच्या रोपावर काय परिणाम होतो ते ह्या परिस्थितीला कसे सामोरे जातात विषेशतः त्यांच्या जिन्समध्ये काय बदल होतात ह्याचे निरीक्षण ते नोंदवणार आहेत 

नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून त्यांना Arabidopsis Thaliana ह्या झाडाचे रोप देण्यात येणार असून हे रोप Ferl  KFT Fixation tube मध्ये ठेऊन सोबत नेणार आहेत आणी प्रवासा दरम्यान ह्या रोपाच्या जिन्समधील बदलांचे निरीक्षण नोंदवणार आहेत त्याचवेळी पृथ्वीवर नासा संस्थेतील शास्त्रज्ञ Anna Lisa ह्या देखील ह्या संशोधनात सहभागी होणार आहेत त्या अंतराळ प्रवासा दरम्यान Ferl ह्यांच्या Activities वर नजर ठेवतील आणी KFT वर नियंत्रण ठेऊन चार वेळा रोपाला सक्रीय करतील आणी पृथ्वीवरील वातावरणात व अंतराळातील मायक्रो ग्रॅव्हीटीत  ह्या रोपातील होणारे बदल टिपतील पृथ्वीवर परतल्यानंतर नासाचे शास्त्रज्ञ ह्या बदलांचे निरीक्षण नोंदवुन त्यावर सखोल संशोधन करतील

New Shepherd अंतराळयानाने आजवर सातवेळा सामान्य नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले असुन आता आठव्यांदा ह्या सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार आहे हे सर्व अंतराळ प्रवासी पृथ्वीच्या वर 62 मैल  अंतरावरील  पृथ्वी आणि अंतराळातील karman रेषा पार करून अंतराळातील मायक्रो ग्रॅव्हीटीत प्रवेश करतील आणि वजनरहित अवस्थेचा आनंद घेतील त्या नंतर काही मिनिटातच हे अंतराळ प्रवासी पृथ्वीवर परततील 

आजवर 37 नागरिकांनी Blue Origin च्या New Shepard अंतराळयानातून अंतराळ प्रवासाचा आणि अंतराळ  पर्यटनाचा आनंद घेतला आहे New Shepard अंतराळ यानाची हि 26 वी अंतराळ मोहीम आहे ह्या नागरिकांच्या अंतराळ ऊड्डाणाची निश्चित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment