
अंतराळवीर Sunita Wlliams आणि Butch Wilmore नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान पृथ्वीवासीयांना शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -24 डिसेंबर
25 डिसेंबरला जगभरात सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जातो सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत,मित्रांसोबत एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करतात पृथ्वीपासून दूर अंतराळातील फिरत्या अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर मात्र आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करू शकत नाहीत पण स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत हे अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीरांसोबत एकत्र येऊन हा सण साजरा करतात अंतराळ स्थानकातील मोकळ्या जागेत तिथे ऊपलब्ध असलेल्या साधनांनी सजावट करतात ख्रिसमस साठी खास वेषभूषा करतात आणी पृथ्वीवरुन ख्रिसमस निमित्य आलेल्या पदार्थांचा एकत्रित आस्वाद घेऊन आनंदाने हा सण साजरा करतात
ह्या वर्षी देखील अंतराळस्थानकात वास्तव्यास असलेले नासाचे अंतराळवीर Sunita Williams ,Nick Hague,Butch Wilmore,आणी अंतराळवीर Don Pettit ह्यांनी ख्रिसमस सण साजरा केला त्यांनी त्यांची ह्या आठवड्यातील कामे लवकर आटोपून ख्रिसमस साठी वेळ काढला स्थानकातील मोकळ्या जागेत सजावट करून ख्रिसमस निमित्त खास वेषभूषा करून हा सण आनंदाने साजरा केला आणी नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादा दरम्यान त्यांचे कुटुंबीय, मित्र आणी पृथ्वीवासियांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा दिल्या
Sunita- अंतराळस्थानकात तुम्हा सर्वांचे स्वागत आम्ही ईथे अंतराळस्थानकातील सात अंतराळवीर मिळुन ख्रिसमस साजरा करणार आहोत आपण पृथ्वीवर आपल्या कुटुंबीयांसोबत एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतो तसेच ईथे आम्ही स्थानकातील Space Family सोबत हा सण साजरा करतोय मला ख्रिसमस साजरा करायला आवडतो त्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र जमतात, सणासाठी तयार होतात घराची सजावट करतात वेगवेगळे पदार्थ करतात आम्ही पण थोडी फार सजावट करून तयारी केलीय
Nick- ख्रिसमसचा काळ सुट्टीचा असतो त्यावेळी दरवर्षी ख्रिसमसला मी माझ्या कुटुंबियासोबत,मित्रांसोबत ह्या सुट्टीचा आनंद घेतो एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतो पण ह्या वर्षी मी त्यांच्या पासून दुर ईथे अंतराळातील फिरत्या स्थानकातील घरात वास्तव्य करतोय म्हणून ईथुन तुम्हा सर्वांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा देतोय हि सुट्टी तुम्हाला आनंदात जावो ! मला हेही सांगायचे आहे की,आम्ही एकटेच कुटुंबियांपासुन दुर रहाणारे नाही तर नासा संस्थेतील आमच्या टिममधील सर्व जगभरातील आम्हाला रोज मार्गदर्शन करणारे लोक आहेत जे सणाच्या वेळी पण कुटुंबाबियांपासून दुर राहून हि मोहीम यशस्वी करण्यासाठी सतत कार्यरत राहतात त्या सर्वांचे आभार नासा संस्थेतील टिममधील सर्वांना Merry Christmas !
Don- आणी ख्रिसमस म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी पण !आमच्या साठी पण पृथ्वीवरुन वेगवेगळ्या पदार्थांचे पॅकेटस आले आहेत आणी आम्ही आता त्याचा आस्वाद घेणार आहोत Merry Christmas !
Butch- ख्रिसमस म्हणजे प्रभु येशुचा जन्मोत्सव ! तुम्हा सर्वांना Merry Christmas !
No comments:
Post a Comment