2 CHAPEA-1 मोहिमेतील पहिल्या गृप मधील कमांडर Kelly Haston, Ross Brockwell ,Nathan Jones आणी Anca Selariu -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 7 जुलै
नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA)
मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळसृष्टी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर
जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे
वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळसृष्टीत राहिल्यावर
मानवी शरीरावर व आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव
उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या
कृत्रिम मंगळ सृष्टीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने
संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार
शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन गृप तयार करण्यात आले होते
25 जूनला CHAPEA-1 मोहिमेतील पहिल्या गृप मधील कमांडर Kelly Haston, Ross Brockwell ,Nathan Jones आणी Anca Selariu हे चार धाडसी प्रतिनिधी एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळसृष्टीत राहायला गेले होते आता 378 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते पृथ्वीवरील भूमीत परतले आहेत
Mars Dune Alpha ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीतील 3D Printed Habitat असलेल्या जागेत ह्या अंतराळवीरांच्या प्रतिनिधींनी एक वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले आणि ह्या मानवी संशोधनात्मक अभियाना अंतर्गत मंगळ मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवला मंगळ मोहिमेसाठी आवश्यक असलेले Mars Space Walk ह्या कृत्रिम मंगळासारख्या वातावरणात आणि लाल मातीत भाजीपाल्याची यशस्वी लागवड केली शिवाय अंतराळयानाची देखभाल व दुरुस्ती अचानक समस्या उद्भवल्यास,आपद्कालीन परिस्थीतीत नासा संस्थेशी संपर्क साधण्यास वेळ झाल्यास समस्येवर मात करून पुढे मार्गक्रमण करण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्व्याची गोष्ठ म्हणजे ह्या भूमीत त्यांच्या कुटुंबीयांपासून पृथ्वीवासीयांपासून दुर बंदिस्त अवस्थेत राहण हे सार ह्या प्रतिनिधींनी यशस्वीपणे पार पाडल ह्या एक वर्षांहून जास्त काळात त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संपर्क नव्हता फक्त नासा संसंस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात होते ह्या काळात त्यांनी अत्यंत मोलाची संशोधित माहिती गोळा केली आहे
सहा जुलैला नासाच्या Huston येथील Johnson Space Center मध्ये ह्या प्रतिनीधीच्या मंगळभूमीतून पृथ्वीवरील प्रवेशाच्या वेळी त्यांच्या स्वागताला नासाचे Deputy Director-Steve Koerner ,अंतराळवीर Kjell Lindgren -Deputy Director व Flight Oprations ,Principal Investigater- CHAPEA Grace Douglas ,Judy Hayesआणि Julie Kramer हजर होते
ह्या स्वागत समारंभाच्या वेळी Steve Koerner म्हणाले," ह्या चार धाडसी प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी मी आतुर झालो आहे त्यांनी ह्या Mars Dune Alpha मधील 1700 sq ft जागेत बंदीस्त अवस्थेत वास्तव्य केलय CHAPEA अभियान भविष्य कालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षितते साठी आणी ह्या मंगळ.ग्रहासारख्या वातावरणात राहिल्यावर मानवी आरोग्यावर शारीरिक आणी मानसिक दृष्टया काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी आहे विशेषत: त्यांच्या आरोग्यदायी पोषणासाठी आवश्यक आहे ह्या धाडसी प्रतिनिधींनी ह्या भूमीतील बंदिस्त वातावरणात त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर राहून हि अत्यंत कठीण मोहीम यशस्वी केली आहे त्यांना मर्यादित प्रमाणात अन्न देण्यात आले होते आणि नासा संस्थेच्या कडक निर्बंधात ठेवण्यात आले होते पण त्यांनी हसतमुखाने हि मोहीम यशस्वी केली त्यांना लागणाऱ्या भाजीपाल्याची यशस्वी लागवड केली ह्या मोहिमेतील आवश्यक बाबीची पूर्तता करून सायंटिफिक प्रयोग केले आणि संशोधित माहिती गोळा केली आहे त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबियासारखेच आम्ही देखील उत्सुक आहोत त्यांचे त्यांनी केलेल्या ह्या कार्याबद्दल आभार ! ही अवघड मोहीम यशस्वी केल्याबद्दल ह्या चौघांचे अभिनंदन ! आता ते बाहेर येतील पण ते वर्षभर ह्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांना काही दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली राहावे लागेल त्यांच्या तब्येतीसाठी हे आवश्यक आहे त्या नंतर अंतराळवीर Kjell Lindgren ह्यांनी नासा संस्थेतील Mars Dune Alpha चा बंद दरवाजा उघडला आणि चारही प्रतिनिधी Mars Dune Alpha मधून बाहेर आले
CHAPEA -1मधील भावी अंतराळवीरांच्या प्रतिनिधींनी Mars Dune Alpha मध्ये लावलेल्या रोपांना आलेले टोमॅटो
अंतराळवीर Kjell Lindgren ह्यांनी त्यांचे स्वागत केले ,"तुम्हा सर्वांचे ह्या भूमीत स्वागत ! तुम्ही अद्भुत आहात ! साहसी आहात ! ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन ! इथे वास्तव्य करणे सोपे नव्हते आजचा दिवस असाधारण आहे तुम्हा सर्वांचे घरी परतण्यासाठी स्वागत! हि नासा संस्थेतील कृत्रिम मंगळसृष्टी तयार करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ,इंजिनिर्स,अभियंते,तंत्रज्ञ ह्या मोहिमेतील टीम प्रमुख आणी कर्मचारी ह्या साऱयांनीच अथक परिश्रम केले आहेत त्या सर्वांचे आभार भविष्य कालीन मंगळ मोहिमेसाठी ह्या चौघांनी अत्यंत कठीण परिस्थितीत केलेल हे संशोधन अंतराळवीरांच्या मंगळ मोहिमेसाठी पथदर्शक ठरेल ह्या संशोधनावर उमटलेले तुमच्या हाताचे ठसे भविष्य काळात मंगळावर पोहोचतील तुम्ही एक वर्षासाठी तुमचे करिअर बाजूला ठेवून ह्या मोहिमेत सहभागी झालात तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल,संशोधनाबद्दल आभार ! "
त्या नंतर इतर मान्यवरांनी देखील ह्या चौघांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या ह्या एक वर्षाच्या कृत्रिम मंगळसृष्टीतील वास्तव्याबद्दलचे अनुभव शेअर करण्यास सांगितले
कमांडर Kelly Hatson - हा क्षण अत्यंत आश्चर्यचकित करणारा आहे ! इथे मी तुम्हा सर्वाना Hello करू शकत आहे! माझा विश्वास बसत नाही तुम्ही सर्वांनी आमचे छान स्वागत केलय त्या बद्दल तुम्हा सर्वांचे आभार! इथे राहण आव्हानात्मक होत सुख दुःखाचे क्षण होते खूप हार्डवर्क होत थोडीफार मजा पण आली हा युनिक अनुभव दुर्मिळ होता इथे राहण्याची संशोधन करण्याची संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे आभार माझे कुटुंबीय, माझे मित्र आणि इथले सहकारी ज्यांनी आम्हाला प्रेरित केल त्या सर्वांचे आभार! टीममधील सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल आमची काळजी घेतली त्या बद्दल आभार!"
Ross Brockwell -" CHAPEA टीममधील सर्वांचे आभार! माझ्या कुटुंबीयांमुळे आणि माझ्या सहकारी मित्रांमूळे मला इथे राहून संशोधन करण शक्य झाल ह्या एक वर्षात त्यांची उणीव जाणवली मी त्यांच्या जवळ नव्हतो त्यांनी मला सतत प्रेरणा दिली हे संशोधन महत्वाचे होते त्याचा उपयोग भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी होणार आहे आणि आम्ही त्यात सहभागी झालो माझ्यासाठी हि अमूल्य संधी होती त्या साठी नासा संस्थेचे आभार इथे राहण कठीण होत पण आव्हानात्मक होत मी ईथे हेअर सायन्सवर पण प्रयोग केले आणी माझ्या मित्रांनी त्याला साथ दिली अस ते गमतीने म्हणाले!'
Nathan Joens- मी खूप Exited आहे ! माझ्या डोक्यात असंख्य विचार येत आहेत माझ्या भावना संमीश्र आहेत माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील अशी भीती वाटतेय पण मी माझ्या भावनांवर ताबा ठेवलाय आम्ही इथे एक वर्षांहून जास्त दिवस वास्तव्य केल सुरवातीला पहिल्या काही दिवसात मला खूप कठीण गेल पण नंतर ह्या सहकारी मित्रांच्या सहकार्यामुळे सार सुरळीत झाल इथे राहण सोप नव्हत रोजच नवीन आव्हानाला सामोरे जाव लागल पण त्यामुळेच नव अनुभव आला शिकायला मिळाल नासा संस्थेमुळे हे शक्य झाल माझ्या कुटुंबियांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नव्हत मी फिजिशियन आहे ते काम सोडून मी इथे आलो नासा संस्थेने आम्हाला ह्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी दिली त्या मुळे आम्ही मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी संशोधन करू शकलो आता वाटतय किती भर्रकन हे वर्ष संपल नासा संस्थेतील ह्या टीम मधील सर्वांचे आभार !"
Anca Selariu -माझ्या भावना देखील अशाच आहेत ! मी युनीव्हर्सीटीत शिकत असताना आम्ही अंतराळवीराचे भाषण ऐकले तेव्हाचे शब्द माझ्या अजूनही लक्षात आहेत एखाध ध्येय गाठण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक परीश्रम करण्याची तयारी हवी आपण काय साध्य केलय हे पाहाण आवश्यक आहे असं ते म्हणाले होते मला ह्या अभिनव उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली ह्या मंगळ भूमीत राहायला मिळाल हे साहसी काम करायला मिळाल त्या बद्दल नासा संस्थेचे आभार मला नेहेमी विचारल जात की मंगळ मोहीमच का राबविल्या जाते मंगळाचीच निवड का केली जाते ? कारण मंगळ ग्रहावर संशोधनास वाव आहे तिथे जाण सोप नसल तरी शक्य आहे आता अनेक देशांचे अंतराळयान तेथे पोहोचले आहेत आणि संशोधित माहिती गोळा करत आहेत त्या मुळे तेथे अंतराळविश्वातील एकी पाहायला मिळतेय आणि मी ह्या मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षे साठीच्या संशोधनात्मक अभियानात सहभागी झाले हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे माझ्या कुटुंबीयामुळे आणि नासा संस्थेमुळे हे शक्य झाले !
No comments:
Post a Comment