Saturday 27 July 2024

नासाच्या Space X Crew-9 मोहिमेतील चार अंतराळवीर ऑगस्टमध्ये स्थानकात जाणार

   https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/07/crew-9-5657c1.jpg

 नासाच्या Space X Crew -9 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर Zena Cardman ,Nick Hague ,Stephanie Wilson आणि रशियन अंतराळवीर  Alexsander Gorbunov - फोटो -नासा संस्था

 नासा संस्था- 20 जुलै 

नासाच्या Space X Crew-9 अंतराळ मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत नासाचे अंतराळवीर Zena Cardman ,Nick Hague,Stephanie Wilson आणी रशियन अंतराळवीर Alexsander Gorbunov ऑगस्टमध्ये स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत अंतराळवीर Zena Cardman  ह्या मोहिमेतील कमांडर पद सांभाळणार असुन अंतराळवीर Nick Hague पायलटपद सांभाळणार आहेत अंतराळवीर Stephanie Wilson आणी अंतराळवीर Alexander Gorbunov हे दोघे मिशन स्पेशालिस्टपद सांभाळणार आहेत

हे चारही अंतराळवीर नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मधील 39 A ह्या ऊड्डाण स्थळावरुन  Space X Crew Dragon मधून Falcon-9 रॉकेटच्या सहाय्याने  स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावतील

अंतराळवीर  Zena Cardman आणी  Alexander Gorbunov हे पहिल्यांदाच अंतराळस्थानकात रहायला जाणार आहेत  अंतराळवीर Nick Hague दुसऱ्यांंदा स्थानकात रहायला जाणार आहेत तर अंतराळवीर Stephanie Wilson ह्यांची हि चवथी अंतराळवारी आहे त्यांनी STS-120,STS-121,STS-131 ह्या मोहिमे अंतर्गत स्थानकात वास्तव्य केले आहे त्यांच्या तीन वेळच्या अंतराळ कारकीर्दित त्यांनी स्थानकात 42 दिवस वास्तव्य केले आहे 

ह्या अंतराळविरांच्या ऊड्डाणाची निश्चित तारीख ठरली नसली तरीही हे अंतराळवीर ऑगस्टच्या मध्यंतरात स्थानकात जाणार आहेत


No comments:

Post a Comment