नासा संस्था - 26 जुन
नासाच्या अंतराळ मोहीम 74/75 अंतर्गत अंतराळवीर अनिल मेनन रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov आणि Anna kikina हे तिघे 14 जुलैला अंतराळ स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत हे तीनही अंतराळवीर रशियातील Baikonur Cosmodrom Kazakhstan येथून Soyuz -MS-29 अंतराळ यानातून स्थानकात जाणार असून स्थानकात आठ महिने वास्तव्य करणार आहेत
अनिल मेनन Air Force emergency medicine physician ,लष्करी अधिकारी आणि नासाचे अंतराळवीर आहेत त्यांनी मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनीअरची पदवी घेतलीय ते नासा आणि Space X संस्थेत flight surgeon पदी कार्यरत होते
स्थानकात जाण्याआधी भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी त्यांच्या ह्या मोहिमेविषयी त्यांच्या विषयी पत्रकारांशी संवाद साधला सध्या हे अंतराळवीर रशियातील Gagarin Cosmonaut Training Center Star City येथे उड्डाणपूर्व ट्रेनिंग घेत आहेत तेथूनच त्यांनी नासाच्या लाईव्ह संपर्कात निवडक दैनिकांतील पत्रकारांशी संवाद साधला
-तुम्ही आठ महिने अंतराळस्थानकात वास्तव्यासाठी जाणार आहात त्याची तयारी कशी सुरु आहे विशेषतः मनाची तयारी त्या साठी ध्यान वै करीत आहात का ?
"आम्ही बऱ्याच दिवसांपासून ह्या मोहिमेसाठी ट्रेनिंग घेत आहोत स्थानकातील दैनंदिन प्रक्रिया Spacewalk या सारख्या आवश्यक गोष्टी प्रमाणेच मनाच्या एकाग्रतेचाही त्या मध्ये समावेश आहे मी स्वत: डॉक्टर असल्याने माझ्या मेडिकल करिअरचा आणि नासा संस्थेतील अंतराळवीरांना ट्रेनिंग देताना त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव मला कामी येतोय मी ह्या मोहिमेतील येणाऱ्या संभाव्य समस्यांचा अंतराळवीरांना आलेल्या अनुभवांचा सखोल अभ्यास करत आहे आणि जास्तीतजास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करताना त्यांना पाहून प्रेरित होतोय नासा संस्थेच्या ट्रेनिंग सोबतच हि माहिती आम्हाला मोहिमेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास त्यातून मार्गक्रमण करताना उपयोगी पडेल आणि माझी टीम माझ्यासोबत आहे मी आनंदित आहे उत्सुकतेने जाण्याची वाट पहातोय !"
-टीम वरून आठवल तुमची पत्नी पण अंतराळवीर आहे तुम्हाला तिच्याकडून कसा सपोर्ट मिळतोय तुम्ही आठ महिन्यांच्या करारावर सही केली तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी होती? ती मार्गदर्शन करते का ?
"अर्थातच तिलाही आनंदच झाला त्या बाबतीत आम्ही दोघेही लकी आहोत जेव्हा ती स्थानकात गेली होती तेव्हा मी इथे पृथ्वीवर मुलांना सांभाळत होतो आणि तेव्हाच पुरुषांना घर आणि मुल सांभाळण किती कठीण असत ह्याचा अनुभव आला आता तिला हे समजेल आणि तिथे अंतराळ स्थानकात काय स्थिती असते ते मला कळेल अर्थातच मला त्यांची आठवण येईल पण आता अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असल्याने आम्ही नासाच्या लाईव्ह संपर्कात एकमेकांना पाहू शकतो बोलू शकतो त्या मुळे जास्त काळजी नाही तिचा सपोर्ट आहेच ती जास्तीतजास्त मित्रांच्या सहवासात राहिली तर मलाही आनंद होईल आणि फक्त मोहिमेपुरतेच नाही तर नेहमीच ती मला सल्ला देत असते तिच्या अंतराळस्थानकातील कमी दिवसांच्या वास्तव्यात तिने वेळेचा कसा सदुपयोग केला,कसे पृथ्वीदर्शन केले,फोटो घेतले आणि झिरो ग्रॅव्हीटीत वावरताना कशी काळजी घ्यायची हेही तिने सांगितल्यामुळे माझ्या दीर्घकालीन वास्तव्यात मला त्याचा उपयोग होईल !"
- तुम्ही Star City चे रहिवासी होतात प्रथमच तिथून अंतराळ स्थानकात जाताना काय फीलिंग आहेत ?
"मी डॉक्टर असल्याने 2013 मध्ये तिथे कार्यरत होतो मी तिथल्या अंतराळवीरांसोबत त्याच्या निरोगी आरोग्यासाठी काम केलय सोबतच त्यांच ट्रेनिंगही पहात होतो तिथले लोक,बिल्डींग्स,कार्यक्रम Star City ला ऐतिहासिक महत्व आहे मला हे सार पाहायला मिळाल ह्याचा अभिमान वाटतो आणि घर सोडून दूर जाताना जस वाईट वाटत तसच मलाही फील होतय ह्या क्षणी हे सर्व सोडून जाताना संमिश्र भावना आहेत एकीकडे मला वाईट वाटतय मी पुन्हा इथे येऊ शकेन कि नाही ह्याच कारण माझी मोहीम संपली कि मी पुन्हा नासाच्या विमानाने नासा संस्थेत जाईन तिथल्या संशोधनात व्यस्त होईन पण माझं जीवनभराच स्वप्न सत्यात उतरणार आणि मी स्थानकात वास्तव्य करणार आणि तिथल्या झिरो ग्रॅव्हीटीतला तरंगण्याचा मजेशीर रोमांचक अनुभव घ्यायला मिळणार ह्या कल्पनेने आनंदित झालोय!"
-आता आठ महिने तुम्ही तेथे तरंगत्या अवस्थेत वास्तव्य करणार आहात त्या साठी काही विशेष तयारी करीत आहात का? त्या साठी मिलिटरी ट्रेनिंगचा उपयोग झाला का ?
"हो ! गेल्या सात वर्षातला अंतराळविश्वातल्या अंतराळवीरांसोबतचा नासा संस्थेतील अनुभव अथक परिश्रम,कठोर ट्रेनिंग व्यायाम हे सार मला उपयुक्त ठरेल आणि माझ्या मते तिथे तुमच्या शरीराबरोबरच मनाची तयारी आवश्यक आहे मनोनिग्रह Iron Man सारखा आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यावर झिरो ग्रॅव्हीटीत येणारी समस्या,अनुभव ह्या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मला निश्चितच त्याचा फायदा होईल मला आत्मविश्वास वाटतो कि मी करू शकेन ह्या आधी Space X मध्ये कार्यरत असताना आम्हाला दार आठवड्याला समस्या सोडवण अशक्य वाटायच पण आम्ही त्यावर अथक प्रयत्नाने मात करायचो आणि अशाच कठीण प्रसंगी आपल कसब पणाला लागत आणि आपल्या हातून वैशिष्ठपूर्ण कार्य घडत आणि आता तर नासाचे Administrator Isaacman ह्यांच जे असाध्य ते साध्य करण्याच ध्येय आहे नासा संस्थेतील अशा प्रेरणादायी व्यक्ती आपल्यालाही प्रेरित करतात !"
N.D.T.V -Emergency Medicine Physician ,Mechanical Engineer,Space Force आणि Flight Surgeon पदी कार्यरत असतानाचा अनुभव कसा होता आणि तुमचे पालक युक्रेन आणि भारतीय वंशाचे आहेत,तुम्ही पोलिओ निर्मूलन साठी लसीचा प्रसार करण्यासाठी भारतात आला होतात तो अनुभव कसा होता भारताबद्दल काय सांगाल ?
-"मी भारतात आलो होतो तुम्हा भारतीयांबरोबर कामही केलय खूप छान अनुभव होता मी दिल्लीला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक वर्ष होतो आणि NDTV च ऑफिस ग्रेटर कैलास रोडला मी तिथे बाजूलाच राहात होतो मी रोटरी क्लबसोबत पोलिओ निर्मूलनासाठी पोलिओ लसीच्या प्रसाराचे काम केल त्या साठी खेडोपाडीही गेलो आणि वेगवेगळ्या भागातील व्यवसायातील लोकांच्या भेटी घेतल्या भारतातही खूप संधी आहेत,अंतराळसंस्था आहे भारतीय अंतराळवीर देखील स्थानकात गॆले होते मी त्यांना भेटलोय अनेक युवा कर्तबगार तरुणांनाही स्थानकात जायचे आहे भविष्यात त्यांचंही स्वप्न पूर्ण होईल ते नासा संस्थेत जातील त्यांना मी निश्चितच मदत करेन मी भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे अंतराळात जाऊन मलाही पृथ्वीकडे पहायचय आणि आपल्या पृथ्वीवरील मानव सृष्टीबद्दल विचार करायचाय भारत वैभवशाली देश आहे इथे काहीच अशक्य नाही हे मी तिथे शिकलोय !"
-अमेरिकेने झिरो ग्रॅव्हीटीत लिहता येईल अशी पेन तयार केलीय आणि रशियाने पेन्सिल दोघांच्या तुलनेत कोण जास्त पुढे आहे ?
"दोघेही प्रगत अद्ययावत संशोधन मानवी विकासासाठी करीत आहेत आणि हे जास्त महत्वाचे आहे आज पृथ्वीवरील कॅन्सर,हार्टअटॅक या सारख्या अनेक रोगांवर अजूनही पूर्णपणे प्रभावी औषधे नाहीत त्या मुळे अशा रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे संशोधन इथे करता येत नाही ते स्थानकात केल्या जात आहे स्थानकात आता मानवी आरोग्यावर सखोल संशोधन केल्या जात आहे 3D टेक्नॉलॉजी मुळे झिरो ग्रॅव्हीटीत सेल्युलर टिश्यूचे प्रिंटआऊट काढल्या जात आहेत कारण तिथे तरंगत्या अवस्थेत सर्व बाजूने शरीरातील सर्व अवयव पाहता येतात अंतराळातील विपरीत वातावरणात सतत तरंगत्या अवस्थेत राहिल्याने अनेक समस्या ऊद्भवतात हाडे ठिसूळ होणे वजन कमी होणे क्रुत्रीम प्रकाशामुळे आणी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यावर परिणाम होतो पण आता हे दुष्परिणाम टाळण्यासाठी ऊपाय केले जात आहेत व्यायामाने त्यावर मात करण्यात यश मिळत आहे !"
मानवी आरोग्य निरोगी रहाण्यासाठी तिथे गेल्यावर मी मानवी आरोग्य रक्ताभिसरण संस्था ह्या विषयी संशोधन करणार आहे शिवाय अंतराळातील बॅक्टेरीया मायक्रो ऑरगॅनिझम जर अंतराळात जिवंत राहिले असतील तर स्पेसवॉक दरम्यान त्यांना शोधून तेथील थंड वातावरणात त्यांच्या वर काय परिणाम होतो हे देखील शोधणार आहे ह्या संशोधनाचा ऊपयोग भविष्य कालीन मंगळ व चंद्र मोहिमेतील अंतराळविरांना होणार आहे!" हि पत्रकार परिषद बराच वेळ सुरू होती
No comments:
Post a Comment