नासा संस्थेने निवड केलेले Astrobotic ,Intuitive Machines Firefly Aerospace कंपीनीनी निर्मित केलेले Moon Lander
नासा संस्था -15 जुलै
नासा संस्थेने आर्टेमिस चंद्रमोहीम आणि भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रभूमीवर उतरण्यासाठी आणि पृथ्वीवरून सायंटिफिक व इतर सामान नेण्यासाठी Moon Lander बनविण्याची संधी जाहीर केली होती अनेक कंपन्यांनी त्यात सहभाग नोंदविला होता आता नासा संस्थेने त्यातून तीन कंपन्यांनी बनविलेल्या Moon Lander ची निवड जाहीर केली आहे Astrobotic ,Firefly Aerospace आणि Intuitive Machines ह्या तीन कंपन्यांनी तयार केलेल्या Moon Lander चा त्यात समावेश आहे हि निवड 2028 पर्यंतच्या नव्या चंद्रमोहिमेसाठी आहे
"ह्या कंपन्यांना Moon Lander निर्मितीसाठी 600 मिलियन डॉलरचा निधी देण्यात येणार असून त्या साठी नासा संस्थेच्या नियम व अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे चंद्रमोहिमे अंतर्गत चंद्रभूमीवर अत्याधुनिक यंत्र सामुग्रीची नेआण करण्यासाठी आणि भविष्यकालीन मोहिमेतील चंद्रावरच्या दिर्घकालीन मानवी वास्तव्यासाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीची हि पूर्वतयारी आहे असे नासाच्या Washington येथील Associate Administrator Lory Glaze म्हणतात"! भविष्यकालीन चंद्र मोहिमेतील अंतराळवीर चंद्रभूमीवर उतरतील तेव्हा संशोधनादरम्यान तिथे फिरण्यासाठी आणि सामान नेआण करण्यासाठीही ह्या Moon Lander ची आवश्यकता आहे
Astrobotic कंपनीला कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिसेसच्या दोन डिलिव्हरी साठी 297 मिलियन डॉलर आणि Firefly Aerospace कंपनीला 144.2 मिलियन डॉलरदेण्यात येणार असून Intuitive Machines ला एका डिलिव्हरीसाठी 148.3 मिलियन डॉलरचा निधी मंजूर करण्यात आला आहे
"नासाची आर्टेमिस मोहीम आणखी जलद आणि यशस्वी होण्यासाठी ह्या कंपन्यांनी ह्या आधी चंद्रावर उड्डाण केलेल्या Lander च्या डिझाईनचा वापर करून त्यातील त्रुटी दूर करून नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे भविष्य कालीन मोहिमेत चंद्रावर तळ ठोकण्यासाठी आम्ही हि पूर्व तयारी करीत आहोत असे नासाचे Moon Base Acting Director of Cargo Lander- Ryan Stephan म्हणतात ह्या नवीन निर्मिती ऑर्डर मुळे आम्हाला भविष्यकालीन मोहिमेत सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळेल आणि वेळही वाचेल !'
चंद्रभूमीवरील भविष्यकालीन 17 मोहिमा पार पाडण्याचा नासा संस्थेचा विचार आहे त्या साठी अमेरिकन उद्योजकांना संधी देण्यात येणार आहे PROMISE Technology अंतर्गत Perseverance आणि Curiosity ह्या दोन्ही मंगळयानासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून नाविन्यपूर्ण अद्ययावत यंत्रणा विकसित करून भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी Lander बनविण्याची संधी सर्जनशील इंजिनीअर्सना देण्यात येणार आहे
शिवाय नासा संस्थेतर्फे चंद्रमोहिमेसाठी चंद्रावर उतरण्यासाठी अंतराळयान बनविण्याची संधीही देण्यात येणार असून ऊर्जा, Avionics तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक,चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सायंटिफिक माहिती आणि Optical Imager ह्या अद्ययावत यंत्रणेने युक्त अशा अंतराळयानाच्या निर्मितीसाठी अमेरिकन कंपन्यांकडून लवकरच प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत शिवाय चंद्र आणि पृथ्वी मधील संदेश यंत्रणा,संपर्क यंत्रणा आणि दिशादर्शका द्वारे तेथील संशोधित माहिती मिळवण्यात येईल
आता निवड झालेल्या Moon Lander मध्ये चंद्रभूमीवर अंतराळयान उतरल्यानंतर तेथे उडणाऱ्या इंजिनच्या धुराच्या लोटाचे चंद्रावरील धुळीवर होणारे परिणाम फोटोबद्ध करणारे 3D स्टिरिओ कॅमेरे,अंतराळयान चंद्राच्या कक्षेत भ्रमण करताना किंवा चंद्रभूमीवर उतरताना योग्य मार्गदर्शन करणारे Laser Retroreflector Array आणि भविष्यकालीन अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी तेथील दीर्घकालीन संशोधनासाठीच्या नियोजनासाठी,चंद्रावरील वातावरणातील अपायकारक किरणोत्सर्गाची संशोधित माहिती आणि मोजमाप करण्यासाठी Linear Energy Transfer Spectrometer ह्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणे आवश्यक आहे
ह्या वेगवेगळ्या Moon Lander द्वारे चंद्र भूमीवर सायंटिफिक उपकरणे पाठवून आम्ही चंद्रभूमीवरील वातावरणाचा तेथे उतरण्यायोग्य जागेचा शोध घेणार आहोत भविष्यकालीन अंतराळ मोहिमेच्या यशासाठी,अंतराळयान आणि अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी हि माहिती उपयुक्त ठरणार आहे
No comments:
Post a Comment