Saturday, 29 August 2026

अंतराळस्थानकाच्या उर्वरित कामासाठी अंतराळवीर सोफी आणि अनिल मेनन ह्यांचा स्पेसवॉक पूर्ण

NASA astronaut Anil Menon is attached to the Canadarm2 robotic arm as it guides him toward the worksite where he and ESA astronaut Sophie Adenot (out of frame) installed a space-to-ground antenna. 

नासाचे अंतराळवीर अनिल मेनन स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक दरम्यान -फोटो- नासा संस्था 

नासा संस्था /ESA संस्था - 26 ऑगस्ट 

नासाचे अंतराळवीर सोफी ऑडेनॉट आणि अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी 25 ऑगस्टला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अपूर्ण राहिलेला उर्वरित स्पेसवॉक पूर्ण केला हे दोन्ही अंतराळवीर सकाळी 8 वाजून 27 मिनिटाला स्पेसवॉकसाठी स्थानकाच्या Quest Airlock ह्या भागातून स्थानकाबाहेर पडले आणि दुपारी 2वाजून 57 मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले 

स्थानकाच्या बाहेरील भागातील Space To Ground Antenna नादुरुस्त झाल्यामुळे तो काढून त्या जागी नवीन अँटेना बसविण्यासाठी ह्या आधी अठरा तारखेला स्पेसवॉक करण्यात आला पण त्या वेळी वेळ कमी पडल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते नासाच्या पृथ्वीवरील जगभरातील संस्था आणि अंतराळस्थानक ह्यांच्यातील संपर्क यंत्रणा ,Data Transmission आणि सॅटेलाईट ट्रॅकिंगसाठी Space to Ground अँटेनांद्वारे काम केल्या जाते   

साडेसहा तासांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये सुरवातीला अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी Foot Restraint ( पायाला बांधण्याचे साधन )आणले आणी Canadarm2 वर Install केले त्यांना ह्या कामासाठी स्थानकातून अंतराळवीर Jack Hathaway ह्यांनी मदत केली त्यानंतर ते स्थानकाबाहेरील Platform 3 पर्यंत पोहोचले आणि 2009 मध्ये तेथे बांधून ठेवलेला जास्तीचा नवीन अँटेना काढला अंतराळवीर सोफी ह्यांनी त्यांना ह्या कामात मदत केली ह्या दोघांनी मिळून अँटेनांचे बोल्ट काढले आणि सुरक्षितपणे अँटेना Z1Trussह्या भागात नेला अंतराळवीर सोफी ह्यांनी हा अँटेना तेथे इन्स्टॉल करण्याआधी त्या ठिकाणी Lubricant लावले 

  Sophie Adenot working on securing the spare antenna on the boom

युरोपियन अंतराळवीर सोफी स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक दरम्यान स्पेअर अँटेना सुरक्षितपणे काढण्यासाठी मदत करताना  -फोटो-ESA संस्था 

ह्या दोघांनी सुरक्षितपणे हा अँटेना आणल्यावर त्याला इलेक्ट्रिकल केबल जोडण्यासाठी  गिम्बल लॉक्स काढले आणि हीट शिल्डवर फिक्स करताना फिरू नये म्हणून काळजी घेतली त्या नंतर ह्या आधीच्या स्पेसवॉक मध्ये नादुरुस्त अँटेना स्थानकाबाहेरील Truss ह्या भागात बांधून ठेवला होता तो तिथून काढला आणि Canadarm 2 ह्या भागात आणला ह्या भागात स्थानकातील जास्तीच्या सामानाची साठवणूक केली जाते तिथे हा अँटेना सुरक्षितपणे बांधून ठेवला स्पेसवॉक पूर्ण झाल्यावर अंतराळवीर सोफी ह्यांनी अंतराळवीर अनिल मेनन ह्यांना पोर्टेबल Foot Restraint काढण्यासाठी मदत केली त्या नंतर हे दोन्ही अंतराळवीर स्थानकात परतले  

नासाच्या Huston येथील Flight Control Center मध्ये ह्या अँटेनाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात आली अंतराळवीर अनिल मेनन ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता आणि अंतराळवीर सोफी ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता ह्या दोन स्पेसवॉक दरम्यान त्यांनी अंतराळात 12 तास 53 मिनिटे व्यतीत केले अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 283 वा स्पेसवॉक होता US चा 98 वा आणि युरोपियन अंतराळवीरांनी केलेला हा 32 वा  स्पेसवॉक होता 

 

Tuesday, 25 August 2026

अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीर अनिल मेनन आणी Sophie Adenot ह्यांचा Space walk पुर्ण

 Astronauts Anil Menon of NASA (top) and Sophie Adenot of ESA (European Space Agency) work on a space-to-ground antenna outside the International Space Station.

 नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आणि सोफी आडोनेट  स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक दरम्यान -फोटो-नासा संस्था 

नासा संस्था / ESA संस्था - 18 ऑगस्ट 

नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आणी युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot ह्यांनी बुधवारी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला अंतराळवीर सोफी ह्यांचा हा पहिला स्पेसवॉक होता त्यांनी पहिली महिला फ्रेंच अंतराळवीर स्पेसवॉकर म्हणून विक्रम नोंदविला अंतराळवीर अनिल मेनन ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता 

ह्या दोघांनी आदल्या दिवशीच स्पेसवॉकची तयारी केली होती त्यांनी त्यांचे स्पेससुट चार्ज करून लिकेज चेक केले कॅमेरे रोबोटिक आर्म आणी ईतर वस्तू चेक केल्या मेनन ह्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या स्पेससुट वर लाल रंगाच्या रेशा होत्या तर सोफी ह्यांनी रेशा विरहित स्पेससुट परीधान केला होता हे दोघे सकाळी 8.29 मिनिटानी स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडले आणि 2.52 मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले 

 Astronauts Anil Menon of NASA and Sophie Adenot of ESA are pictured training for a spacewalk at the Johnson Space Center’s Neutral Buoyancy Laboratory in Houston, Texas.

 अंतराळवीर अनिल मेनन आणि Sophie Adenot स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडण्याआधी -फोटो -नासा संस्था 

सहा तासाच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळविरांनी स्थानकाबाहेरील भागातील नादुरुस्त झालेला  Space to ground Antenna काढला आणी स्थानकाच्या Truss ह्या भागात बांधून ठेवला त्या जागी नवीन अँटेना बसविण्यात येणार होता पण अँटेनाचे बोल्ट ढिले करण्यासाठी आणी ईलेक्ट्रिकल केबल डिसकनेक्ट करण्यात ह्या अंतराळवीरांचा खूप वेळ गेला त्या मुळे नवीन अँटेना पुढच्या स्पेसवॉक मध्ये बसविण्याचे ठरले 

ह्या अँटेना द्वारे पृथ्वीवरील नासा संस्था आणी स्पेसस्टेशन ह्याच्यामधील Data Tracking आणी Relay Satellite संपर्क यंत्रणा शिवाय नासाच्या Huston येथील संस्था आणी जगभरातील नियंत्रण केंद्राशी ह्या अँटेनाद्वारे संपर्क साधला जातो 2025 च्या नोव्हेंबरमध्ये हा अँटेना नादुरुस्त झाला होता

अंतराळवीर अनिल मेनन ह्यांनी Foot Restraint ( पायाला बांधण्याचे साधन )आणले आणी Canadarm2 वर Install केले त्यांना ह्या कामासाठी स्थानकातून अंतराळविर Jack Hathaway ह्यांनी मदत केली ह्या दोन्ही अंतराळविरांनी अँटेना काढताना तो स्थिर रहाण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले आणी केबल डिसकनेक्ट केले अँटेनाचे बोल्ट काढले खराब झालेल्या अँटेनाचे अनेक बोल्ट व कनेक्टर काढण्यात त्यांचा बराच वेळ गेला त्या मुळे नवीन अँटेनाचे काम लांबले 

स्थानकात परतण्याआधी ह्या अंतराळविरांनी त्या भागातील सिस्टीम यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहेत का हे चेक केले आणी तेथील जागा स्वच्छ केली स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला US चा हा 97 वा स्पेसवॉक होता आणि स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 282वा स्पेसवॉक होता 

Tuesday, 18 August 2026

सूर्याच्या प्रखर तेजोमय चकाकत्या करोनाच्या अलौकिक सुंदर दृष्याने नागरिक भारावले

    a thin white line of wispy light on a black background

Space News चे Sky Watching Editor- Daisy Dobrijevic ह्यांनी Greenland येथील Spitsbergen  येथून टिपलेले खग्रास सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृष्य -फोटो -Space News 

Space News- 13 ऑगस्ट 

माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीय "मी आत्ताच खग्रास सुर्यग्रहणाच्या वेळचे सुर्याचे अलौकिक सौंदर्य पाहिले ह्या वर माझा विश्वास बसत नाही आजवर मी हजारो फोटो पाहिलेत पण ह्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही प्रत्यक्षात सुर्यग्रहण घडताना सुर्याचे हे बदलते स्वरूप अनुभवतानाची भावना शब्दातीत आहे क्षणभराचे हे दृश्य, क्षणभंगुर अनुभव !" भारावलेल्या अवस्थेततील Space newsचे आकाश निरीक्षक संपादक Daisy Dobrijevic ह्यांनी  Greenland मधील Spitsbergen  येथून सुर्यग्रहण पाहिल्यानंतर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली  सुर्यग्रहणाच्या वेळी सुर्याभोवती नाजूक वलय पसरत होते सोबतीला आकाशात गुरु,बुध आणी शुक्र ग्रहही होते सुर्याभोवती सोनेरी मुलामा दिल्याचा आभास होत होता अंतराळातील हे दृश्य अत्यंत विलोभनिय होते माझ्या आजवरच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर अविस्मरणीय क्षण आहे हा !" 

कारण चंद्र सुर्याची हि दशा काही क्षणापुरतीच टिकते खग्रास सुर्य ग्रहण घडताना घडल्यानंतर हळूहळू अंधार पसरतो तापमान कमी होते प्रकाश मंदावत जातो सुर्याची प्रखरता कमी होते आणी ह्या संधी प्रकाशात पक्षांची किलबिल,प्राण्यांचे आवाज वातावरणात घुमु लागतात त्यांना रात्रीचा आभास होतो हे दृश्य अद्वितीय असते 

खग्रास सूर्यग्रहण पहाण्याचा आनंद Greenland,Island आणी स्पेनमधील लाखो लोकांनी घेतला हा ग्रहणकाळ एक मिनिटे सदतीस सेकंद इतका होता 

सूर्याभोवतीच्या तेजोमय करोनाचे विलोभनीय दृश्य पाहून युरोपीय प्रभावित

 12 August total eclipse imaged by Miguel Claro

 

ESA-13ऑगस्ट 

ह्या वर्षी 12 ऑगस्टला खग्रास सुर्यग्रहण झाले पण ते भारतात दिसले नाही युरोप खंडातील काही देशात पुर्ण स्वरूपात तर काही ठिकाणी खंडग्रास स्वरूपात दिसले युरोपात विस वर्षानंतर खग्रास सुर्यग्रहण दिसणार असल्याने शास्त्रज्ञ आणी हौशी नागरिकांमध्ये हे ग्रहण पाहण्याची ऊत्सुकता होती 

युरोपियन अंतराळ (ESA) संस्थेतर्फे ह्या सुर्यग्रहणाचे लाईव्ह Broadcasting करण्यात आले होते त्यामुळे जे नागरिक ग्रहण पाहण्यासाठी ग्रहणस्थळी येऊ शकत नव्हते आणी जिथून ग्रहण दिसणार नव्हते त्यांनाही ग्रहण पाहता आले आदल्या दिवशीच ग्रहण पाहु ईच्छीणाऱ्या नागरिकांना ग्रहण कसे पहायचे ह्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यासाठी खास तयार करण्यात आलेले चष्मे देण्यात आले आणी  चष्मा न घालता ग्रहण डायरेक्ट न पहाण्याची सुचना देण्यात आली होती

बारा ऑगस्टला अंतराळातील भ्रमणादरम्यान चंद्र प्रुथ्वी आणी सुर्य ह्याच्यमध्ये आला आणी सुर्याची ग्रहणदशा सुरू झाली जसजसे चंद्र भ्रमण सुरू झाले तसतशी सुर्याभोवती सावली पडु लागली आणी सुर्य झाकल्या जाऊ लागला सुर्यप्रकाश मंद होत गेला आणी पृथ्वीवर अंधार पडण्यास सुरुवात झाली सुर्याच्या ऊष्णतेची प्रखरता कमी झाली झाडांची सळसळ पक्षांचा किलबिलाट वातावरणात घुमु लागला सुर्य पुर्ण पणे झाकल्या जाण्याआधी सुर्याला चंद्र कोरीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आणी चंद्र पूर्णपणे सुर्यासमोर येताच सुर्यावर चंद्राची पुर्ण सावली पडली आणि खग्रास स्थिती प्राप्त होताच सुर्य काळवंडला त्याच्या भोवतीचे तळपते प्रखर तेजोमय प्रकाशकिरण दिसू लागले ह्या क्षणी सुर्याला डायमंड रिंगचे सौंदर्य प्राप्त झाले 

   96248.jpg

सुर्यापेक्षा चंद्राचा आकार लहान असल्याने सुर्य पुर्ण पणे झाकल्या जात नाही त्यामुळे खग्रास सुर्यग्रहणा दरम्यान मानवाला सुर्याभोवतीच्या प्रखर ऊष्णतेने तळपणाऱ्या अग्नीज्वालाचे प्रकाशमान तेजोवलय पहायला मिळते अंतराळातील निसर्गाच्या ह्या अदभूत घडामोडी मुळे सुर्याला प्राप्त झालेले अलौकिक सौंदर्य पाहुन नागरिक रोमांचित झाले शहराबाहेरील मोकळ्या मैदानात,नदीकिनारी हे ग्रहण पहाण्यासाठी शास्त्रज्ञ आणी नागरिकांनची गर्दी जमली होती त्यांनी सुर्याचे ग्रहण सुरू झाल्यापासून संपेपर्यंतच्या ग्रहणदशेचा आनंद अनुभवला 

स्पेनमधील मधील  Observatorio Astrofisico de Javalambre येथून ESA च्या लाईव्ह प्रसारणाद्वारे खग्रास सुर्यग्रहण पाहिल्यानंतर ESA च्या Director of Science Professor- Carole Mundell म्हणाल्या," सुर्याचे खग्रास ग्रहण पहातानाचा अनुभव अत्यंत सुंदर होता दिवसा रात्रीचा आभास,सुर्याभोवतीचा करोना त्यातील प्रखर तेजस्वी किरणांचे  प्रकाशवलय आणी सुर्याच हे सुंदर रूप सारच आश्चर्यकारक, अविश्वसनीय होत "!

Saturday, 15 August 2026

रशियन अंतराळवीर Anna, Dubrove आणि Andrey ह्यांनी स्थानकातून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या

  India's Independence Day wishes from space! Russian cosmonauts Pyotr Dubrov,  Anna Kikina and Andrey Fedyaev sent warm greetings to India from orbit,  praising the country's journey of self-reliance and prosperity while  celebrating

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे रशियन अंतराळवीर Anna Kikina ,Pyotr Dubrov आणि Andrey Fedyaev स्थानकातून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना -फोटो - Roscosmos संस्था 

नासा संस्था - ( Roscosmos)-15 ऑगस्ट 

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov,Anna kikina आणि Andrey Fedyaev ह्यांनी स्थानकातून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या ह्या वेळी त्यांच्या हातात भारतीय ध्वज होता त्यांनी भारतीयांना भरभराट आणी शांती लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली 

ह्या अंतराळवीरांनी त्याच्या व्यस्त दिनचर्येतुन वेळ काढून भारतियांना 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या भारत आणी रशिया ह्यांच्या अंतराळविश्वातील संबध व ऐतिहासिक मैत्रीचा ऊल्लेख त्यांनी ह्या वेळी केला  अंतराळातून लाईव्ह संवादाद्वारे त्यांनी पृथ्वीवासीयांशी साधलेला हा संवाद

Pyotr Dubrov म्हणाले " ऐशी वर्षांपुर्वी भारतीय स्वातंत्र्य विरांनी परकीयांशी झालेल्या युध्दात बलीदान देऊन अनेक संकटावर मात करत स्वातंत्र्य मिळवले त्या नंतर भारत औद्योगिक आणी अंतराळविश्वात प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे भारतीयांना ऐशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ह्या वर्षी मानवाच्या अंतराळविश्वातिल अंतराळ ऊड्डाणाला आणी अंतराळ प्रवेशाला 65 वर्षे पुर्ण होत आहेत सोव्हिएत युनियन आणी भारताच्या ऐतिहासिक मैत्रीच्या शुभारंभाला देखील अंतराळवीर युरी गँगरीन ह्यांनी 1961 मध्ये भारताला भेट दिली होती !"

Anna Kinkina  म्हणाल्या," त्या वेळी ते म्हणाले अंतराळातून भारत सुंदर दिसतो पण प्रत्यक्षात भारत जास्त सुंदर आणी खास आहे कारण ईथे आमच्या खऱ्या मित्राच घर आहे भारता सोबतच्या रशियाच्या अंतराळविश्वातिल मैत्रीला ऐतिहासिक संदर्भ आहे 1975 साली रशियाच्या सहकार्याने भारताचा पहिला ऊपग्रह आर्यभट्ट अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला आणी 1984 साली अंतराळवीर राकेश शर्मा ह्यांनी सोयुझ T-11अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळ ऊड्डाण केले होते हे भारताचे पहिले ऐतिहासिक मानवी अंतराळ ऊड्डाण होते आता भारत स्वयंपूर्ण बनला आहे भारतीय अंतराळसंस्था ईसरोने गगनयान ह्या अंतराळयानाची निर्मिती केली आहे त्या साठीही रशियाने सहकार्य केले आता भारतीय अंतराळवीर रशियाच्या Yuri Gagarin Cosmonauts Training Center मध्ये ऊड्डाण पुर्व प्रशिक्षण घेतात 

अंतराळवीर Andrey म्हणाले आता रशिया आणी भारत देशाची  अंतराळविश्वातिल हि ऐतिहासिक भागीदारी विकासाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण करत आहे नुकतीच ईसरो आणी रशियन अंतराळसंस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची निवड घोषित करण्यात आली आहेत

         "भारतीय नागरिकांना ऐशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !"

Saturday, 8 August 2026

नासाच्या Innovative Technology Concepts स्पर्धेतील विजेत्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची संशोधनासाठी निवड

 

नासाच्या Innovative Technology Concepts स्पर्धेतील 2026 च्या विजेत्यांच्या संकल्पित तंत्रज्ञानाचे चित्रकारांनी साकारलेले कोलाज -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -8 ऑगस्ट 

नासा संस्थेद्वारे भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या परग्रहावरील सुरक्षीत वास्तव्यासाठी आणि नवीन विकसित तंत्रज्ञान संशोधित करण्यासाठी दर वर्षी अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते त्या स्पर्धेत शास्त्रज्ञ आणी सर्जनशील नागरिकांना सहभागी होण्याची संधी दिली जाते ह्या वर्षी NIAC द्वारा जाहीर झालेल्या अभिनव स्पर्धेला अमेरिकेतील सर्व राज्यातील संस्था आणी कंपनीतील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला ह्या सहभागी स्पर्धेकामधील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या पहिल्या गटातील 18 विजेत्या स्पर्धेकांची अंतिम निवड करण्यात आली आहे  

ह्या वर्षीच्या विजेत्या स्पर्धकांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना ऊल्लेखनियआहेत एका विजेत्या स्पर्धेकाने चंद्र मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील अंधारात देखील कार्यक्षम राहण्यासाठी आणि सुरक्षित संशोधनासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे भविष्यकालीन चंद्र मोहिमेदरम्यान तेथील भूगर्भातील Lava Tubeच्या अस्तित्वाचा भाग शोधून तेथील संशोधित माहिती आणि नकाशा मिळवण्यासाठी हवेत तरंगणाऱ्या छोट्या रोबोटची निर्मिती त्यांना आधार देणारी तंत्रज्ञान प्रणाली आणि तापमान नियंत्रक विकसित केले आहेत शिवाय चंद्रावर दोन आठवड्यांची प्रदीर्घ रात्र असल्यामुळे तेथे अंधार असतो अशावेळी भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांच्या तेथील वास्तव्यादरम्यान संशोधित माहिती मिळविताना कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता भासेल त्यासाठी ह्या सर्जनशील संशोधकाने अंतराळवीरांच्या स्पेससूट मध्ये रेडिओयसोटॉपिक उष्णता निर्मिती प्रणाली विकसित केली आहे 

दुसऱ्या विजेत्या सर्जनशील संशोधकाने सौरमालेतील शुक्र ग्रहाच्या उष्ण वातावरणात देखील सुरक्षित राहून कार्यरत राहणाऱ्या अंतराळयानाची आणि अत्याधुनिक उपकरणाची निर्मिती संकल्पना विकसित केली आहे तिसऱ्या विजेत्या संशोधकाने शनी ग्रहाभोवतीच्या कड्याची संशोधित माहिती मिळवण्यासाठी दहा हजार लघु उपग्रहांच्या वापराची संकल्पना मांडली आहे शिवाय शनी,युरेनस नेपच्युन या सारख्या ग्रहाभोवती फिरणाऱ्या कड्यामधून संशोधित नमुने गोळा करणारी प्रणाली संकल्पित केली आहे 

काही कल्पक संशोधकांनी सौरमालेबाहेरील मानवाला अज्ञात असलेल्या ग्रहांचा शोध घेऊन त्यांची सखोल भौगोलिक माहिती नकाशे आणि फोटो ह्यांची निरक्षित संशोधित माहिती मिळविण्यासाठीची संकल्पना मांडली आहे शिवाय काही स्पर्धकांनी  आकाशगंगा निर्मिती संशोधन,कृष्णविवर निर्मिती रहस्य आणि त्यातील गुरुत्वाकर्षणीय लहरींचा शोध घेणारी संकल्पना विकसित केली असून काहींनी पृथ्वीवरील सूर्याच्या हानिकारक सूर्यकिरणांचा उत्सर्ग कमी करण्यासाठी आणि अंतराळातील धूलिकणांचा संभाव्य वापर ह्या सारख्या अभिनव संकल्पना सादर केल्या आहेत  

"नासा संस्थेच्या NIAC (NASA Innovative Advance Concept) ह्या मोहिमे अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो नासा संस्था भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी,अंतराळविश्वातील व्यावसायिक वाढीसाठीआणि एरोस्पेस मोहीम सक्षम करण्यासाठी अशा अवकाश तंत्रज्ञानांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देते आणि त्या प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करते नासा संस्थेने ह्या स्पर्धेतील अठरा जणांच्या ह्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांची निवड घोषित केली असून त्या नासा संस्थेशी संबंधित नाहीत परंतु भविष्यकालीन अंतराळविश्वातील संशोधनासाठी त्या उपयुक्त ठरतील म्हणून नासा संस्थेने त्यांच्या संकल्पित तंत्रज्ञान निर्मितीसाठी त्यांना 3.2 million डॉलर इतका निधी मंजूर केला असून ह्या अठरा पैकी प्रत्येकांना 175,000 डॉलर्स इतका निधी देण्यात येणार आहे मात्र नऊ महिन्यात त्यांना त्यांची तंत्रज्ञान निर्मिती पूर्ण करावी लागेल असे नासाचे वॉशिंग्टन येथील Mission Directorate Greg Stover म्हणतात !"