Wednesday, 9 September 2026

अंतराळस्थानकाच्या नूतनीकरणासाठी नासाच्या अंतराळवीर जेसिका आणि युरोपियन अंतराळवीर सोफी ह्यांचा स्पेसवॉक पूर्ण

NASA astronaut Jessica Meir prepares to enter the Quest airlock to complete a spacewalk outside the International Space Station.

नासाच्या अंतराळवीर जेसिका मीर अंतराळस्थानका बाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था/ ESA संस्था  - 8 सप्टेंबर 

नासाच्या अंतराळवीर जेसिका मीर आणी युरोपियन अंतराळवीर सोफी अडेनॉट ह्यांनी एक सप्टेंबरला स्थानकाच्या बाहेरील भागातील नूतनीकरणाच्या कामासाठी स्पेसवॉक पूर्ण केला स्थानकाच्या बाहेरील भागातील दिशादर्शक High definition कॅमेरा बदलण्यासाठी आणि पुढील स्पेसवॉकची पूर्वतयारी करण्यासाठी हा स्पेसवॉक करण्यात आला स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी केलेला ह्या महिन्यातील हा तिसरा स्पेसवॉक होता

ह्या  दोन्ही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉकची तयारी आधीच करून ठेवली त्यांनी त्यांचे स्पेससूट चार्ज करून लिकेज चेक केले रोबोटिक आर्म आणि कॅमेरा चेक केला आणि स्पेसवॉकसाठी लागणारे सामान तयार ठेवले 

एक सप्टेंबरला सकाळी 8.40 मिनिटाला स्थानकाच्या Quest Airlock ह्या भागातून स्पेसवॉकसाठी ह्या दोघी बाहेर पडल्या आणि दुपारी 3.29 मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतल्या अंतराळवीर सोफी ह्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा होत्या तर अंतराळवीर जेसिका ह्यांनी रेषाविरहित स्पेससूट परिधान केला होता 

 EVA-99: Sophie Adenot working in the vacuum of space

अंतराळस्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करताना  युरोपियन अंतराळवीर सोफी फोटो - ESA संस्था 

सहा तास एकोणपन्नास मिनिटाच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघींनी स्थानकाच्या Harmony Module आणी Truss ह्या भागातील काम पुर्ण केले त्यांनी Harmony Module च्या समोरील भागात स्थानकात येणाऱ्या अंतराळयानाच्या डॉकिंग प्रक्रियेच्या दिशादर्शनासाठी आवश्यक असलेले जुने retroflector बदलुन नवीन बसविले आणी स्थानकाच्या Truss ह्या भागातील जुना नादुरुस्त Camera बदलून नवा High definition Camera बसविण्याचे काम पुर्ण केले त्या नंतर ह्या दोघीनी अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागातील मायक्रोऑरगॅनिझमच्या संशोधन प्रयोगाचे निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती व नमुना घेतला 

Back to the airlock during the EVA to fetch the MicroOrganisms sample collection kit.

युरोपियन अंतराळवीर सोफी अंतराळस्थानकाबाहेरील भागातील मायक्रो ऑरगॅनिझमचे सॅम्पल्स घेताना -फोटो -ESA संस्था 

त्यानंतर त्यांनी पुढील स्पेसवॉकच्या कामासाठीची पुर्व तयारी करून ठेवली त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक सिस्टीम साठी  लागणाऱ्या जंपर केबल वायर जोडणीचे काम पूर्ण केले पुढील स्पेसवॉक मध्ये Alpha Magnetic Spectrometer चा Heat rejecting Radiator बदलण्यात येणार आहे 

स्पेसवॉक दरम्यान Sophie ह्यांना डाव्या हाताने हालचाल करताना त्रास होत होता तेव्हा जेसिका त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या जवळ गेल्या तेव्हा सोफी ह्यांच्या स्पेससुट मध्ये प्रॉब्लेम झाल्याने हा त्रास होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तो प्राब्लेम लगेच दुर केला 

स्थानकाच्या कामासाठी केलेला हा 99 वा स्पेसवॉक होता अंतराळवीर सोफी ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता आणि जेसिका ह्यांचा हा सातवा स्पेसवॉक होता अंतराळवीर सोफी ह्यांनी ह्या आधीच पहिली फ्रेंच महिला स्पेसवॉकर अंतराळवीर म्हणून विक्रम प्रस्थापित केला होता आता जेसिका ह्यांनी महिला स्पेसवॉकर मध्ये तिसरे स्थान प्राप्त केले आहे पहिल्या क्रमांकावर अंतराळवीर Peggy Whitson आहेत त्यांनी आजवर त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत10 वेळा स्पेसवॉक केला आणि भारतीय वंशाच्या  Sunita Williams ह्यांनी 9 वेळा स्पेसवॉक केल्याने त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 284 व स्पेसवॉक होता

No comments:

Post a Comment