Thursday, 30 April 2026

E.SAच्या SOLIS100 अभियाना अंतर्गत संशोधनासाठी सहा प्रतिनिधींचा पृथ्वीवरील कृत्रिम झिरो ग्रॅविटीत प्रवेश

 SOLIS100 isolation study crew

 ESA च्या SOLIS 100 अभियानातील भविष्य कालीन अंतराळवीरांचे सहभागी प्रतिनिधी -फोटो -ESA

 ESA संस्था -23 एप्रिल 

युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मन एरोस्पेस सेंटर ह्यांच्या तर्फे SOLIS 100 ह्या नाविन्यपूर्ण अभियानाचा शुभारंभ झाला ह्या अभियाना अंतर्गत भविष्यकालीन मंगळ व दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहा तरुणांनी जर्मनीतील Cologne येथील शास्त्रज्ञ निर्मित अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी सारख्या कृत्रिम वातावरणात प्रवेश केला आता शंभर दिवस हे तरुण तेथे बंदिस्त असतील त्यांना बाहेरच्या जगाशी आणि  त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येणार नाही फक्त संस्थेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात असतील  

अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर जेव्हा अंतराळ प्रवास करतात किंवा अंतराळ स्थानकात राहतात तेव्हा ते पृथ्वीपासून त्यांच्या कुटुंबियांपासून जसे दूर असतात तसेच ह्या भावी अंतराळवीरांच्या प्रतिनिधींना ठेवण्यात येईल त्यांच्या ह्या शंभर दिवसांच्या वास्तव्यात हे प्रतिनिधी मानवी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठीच्या संशोधनात सहभागी होतील 

 हे सहा प्रतिनिधी जर्मनीतील Cologne येथे DLR Envihab Research Facility द्वारे निर्मित अंतराळस्थानकासारख्या वातावरणात आणि अंतराळवीरांसारख्या परिस्थितीत राहतील त्यांची दिनचर्या  देखील अंतराळवीरांसारखी असेल अंतराळवीरांसारखेच सायंटिफिक प्रयोग,संशोधन Technology Demonstration आणि इतर कामांचा त्यात समावेश आहे ह्या बंदिस्त झिरो ग्रॅविटीत राहताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत होणारे बदल ह्याचे निरीक्षण नोंदवून त्याची संशोधित माहिती गोळा केल्या जाईल ह्या दरम्यान त्यांना येणाऱ्या समस्या आणि इतर आव्हानांना ते कसे सामोरे जातात ह्याचीहि नोंद करण्यात येईल 

  SOLIS100 sleeping pods

      ESA च्या SOLIS 100 अभियानातील प्रतिनिधींचा Sleeping pod -फोटो -E.SA संस्था 

भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित अंतराळ प्रवास आणि निरोगी आरोग्यासाठी हि संशोधित माहिती गोळा करण्यात येत आहे हे अंतराळवीर पृथ्वीपासून दूर असल्यामुळे त्यांच्या अंतराळ प्रवासादरम्यान अचानक काही समस्या उद्भवल्यास आणि त्यांचा पृथ्वीशी संपर्क तुटल्यास त्या समस्येवर मात करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल 

झिरो ग्रॅविटीत दीर्घकाळ वास्तव्यादरम्यान अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर परिणाम होतो मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो मसल्स आणि हाडांची झीज होणे,रक्तप्रवाहाची दिशा बदलणे,हार्ट प्रॉब्लेम,थ्रम्बोसिस,वजन कमी होणे या सारख्या समस्या जाणवतात अशा विपरीत वातावरणात ह्या समस्या का निर्माण होतात शरीर ह्या परिस्थितीवर कशी मात करते त्यांच्या मानसिक अवस्थेत काय बदल जाणवतात ह्या विषयी संशोधन करण्यात येत आहे  

 ह्या अभियानातील भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांचे हे सहा प्रतिनिधी 26 ते 32 वयोगटातील असून युरोपातील वेगवेगळ्या भागातील आहेत त्यांची निवड युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मन एरोस्पेस सेंटर तर्फे केल्या गेली असून त्यांची मानसिक,शारीरिक क्षमता आणि इतर आवश्यक बाबीची पूर्तता करून अंतिम निवड करण्यात आली 

No comments:

Post a Comment