
नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey आणि Sergei पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकातील Change The Command आणि Farewell Ceremony दरम्यान नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -26 जुलै
नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियन अंतराळवीर Sergey Kud Sverchkov आणि Sergei Mikaev अंतराळस्थानकातील त्यांचे 241 दिवसांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले आहेत हे तीनही अंतराळवीर Soyuz MS- 28 ह्या अंतराळयानातून दुपारी 2.03 मिनिटाला पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि संध्याकाळी 5.27 वाजता पृथ्वीवर पोहोचले
रशियन अंतराळवीर Sergey Kud Sverchkov कझाकस्थानातील Dehezkazgan येथे सुरक्षित पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था
पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकात ह्या आंतराळवीरांचा Change The Command आणि Farewell Ceremony पार पडला स्थानकाचे सध्याचे कमांडर Sergey Kud Svarchkov ह्यांनी अंतराळ मोहीम 75च्या कमांडर पदाची सूत्रे अंतराळवीर Jessica ह्यांच्या हाती सोपविली त्या वेळी ह्या अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले
Sergey Kud Sverchkov -"स्थानकातील आठ महिन्यांचे वास्तव्य आनंदात गेले पण हे सोपे नव्हते आणि अवघडही मी आधी इथे वास्तव्य केल होत त्या मुळे अनुभवी होतो इथल्या वास्तव्यादरम्यान स्थानकात पृथ्वीवरून अनेक Cargo Vehicles इथे आले Payload ,Sign,Eva ह्यातला सहभाग महत्वपूर्ण आहे हा नवा अनुभव गाठीशी घेऊन हे सार मागे सोडून जात आहोत हा अनुभव देखील पुढे उपयुक्त ठरेल मी नासा संस्थेतील पार्टनर देश युरोप,जपान ,USA आणि रशियाचे आभार मानतो त्यांच्या एकत्रित सहकार्याने हि मोहीम यशस्वी झाली माझ्या स्थानकातील सहकारी अंतराळवीर मित्रांची साथ देखील महत्वाची आहे त्यांची बुद्धिमत्ता,समर्पण आणि कार्यक्षमता कौतुकास्पद आहे आम्ही सारे इथे कुटुंबियांसारखे एकत्र राहिलो त्यांच्या सोबतच मी नासा संस्थेतील टीममधील सर्वांचे आभार मानतो आणि स्थानकाची सूत्रे आता अंतराळवीर Jessica कडे सोपवतो !"
Jessica - "Thank You Sergey तुमच्या कुशल नेतृत्वाबद्दल तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन सर्व समस्यांवर मात करीत स्थानकाची धुरा सांभाळली आणि हि मोहीम यशस्वी केली तुमच्या सारख्या कर्तृत्वान कमांडरकडून स्थानकाची जबाबदारी स्वीकारताना मला सन्मानित वाटतय तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाल आपण इथून खाली जेव्हा पृथ्वीकडे पाहतो तेव्हा आपल्याला आपल सुरक्षित घर दिसत पण इथे दररोज अंतराळात फिरताना आपल्याला स्थानकातील आपल घर दिसत आपल काम दिसत इथे आपण प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी सुरक्षित असतो कारण जगभरातील नासा संस्थेतील हजारो कर्मचारी टीम प्रमुख सतत रात्रंदिवस आपल्या सुरक्षिततेसाठी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जागरूकतेने मार्गदर्शन करतात ह्याची जाणीव होते हि मोहीम जशी आपली आहे तशी त्यांची सुद्धा आहे माझ्यासाठी हे कमांडरपद म्हणजे अंतराळ स्थानक आणि अंतराळवीरांची जबाबदारीने काळजी घेण इथले सर्व अंतराळवीर कर्तृत्वान आहेत मेहनती आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण आणि कठीण समयी साथ देण महत्वाच आहे ह्या मोहिमेच्या यशासाठी आपल संशोधनच ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित काम करण आवश्यक आहे आपल्या कर्तृत्वाची छाप सोडून मित्रत्वाचे नाते जोडून आपण इथून पृथ्वीवरील ग्रॅव्हीटीत सुरक्षित पोहोचू तेव्हा आपली हि मोहीम पूर्ण होईल Sergey,Sergei आणि Chris ह्यांच्या परतण्याची तयारी पाहताना आनंद झाला हे तिघेही सुरक्षित पृथ्वीवर पोहोचो अशी शुभेच्छा त्यांच्या कठोर परिश्रम,समर्पण,सौहाद्रता आणि प्रेरणादायी मित्रत्वाची आठवण येईल Sergey नि बनविलेल्या Space Cakeची आठवण आहेच माझ्या मोहीम 75 मधील अंतराळवीरांनो सतत हसत रहा आणि संशोधनात सहभागी व्हा धन्यवाद!" त्या नंतर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेत एकत्रित फोटो घेतला आणि हे तिन्ही अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी निघाले

नासाचे अंतराळवीर Chris Williams रशियातील कझाकस्थानात सुरक्षित पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था
तीन तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर सोयूझ अंतराळयान पृथ्वीवर पोहोचले पृथ्वीच्या कक्षेत शिरताच हे तिन्ही अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने कझाकस्थानातील Dehezkazgan येथे खाली उतरले तेव्हा नासा आणि Roscosmos संस्थेतील रिकव्हरी टीम तेथे पोहोचली त्यांनी ह्या तीनही अंतराळवीरांना अंतराळयानातून बाहेर काढले आणि चेअरवर बसविले पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर त्यांना कसे आहात ? त्याचा अंतराळप्रवास कसा झाला? असे विचारले असता अंतराळप्रवास स्मूथ आणि छान झाला आम्ही आनंदी आहोत तुम्हा सर्वांच्या स्वागताने आणि अभिनंदनाने आणखी छान वाटल असे त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या प्रमुखांना सांगितले

रशियन अंतराळवीर Sergei Mikaev ह्यांना सोयूझ अंतराळयानातून उचलून आणताना रशियाच्या रिकव्हरी टीममधील कर्मचारी -फोटो -नासा संस्था
तेथे त्यांचे प्राथमिक चेकअप झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने कझाकस्थानातील Karaganda येथील रिकव्हरी कॅम्प येथे नेण्यात आले तेथे पुढील चेकअप झाल्यानंतर अंतराळवीर Chris ह्यांना नासाच्या विमानाने Johnson Space Center Huston येथे पोहोचविण्यात आले अंतराळवीर Sergey आणि Sergei ह्यांना रशियातील Star City Training Base येथे पोहोचविण्यात आले
No comments:
Post a Comment