नासाच्या Space X Crew -13 चे अंतराळवीर Jessica Watkins,Luke Delaney कॅनडाचे अंतराळवीर Joshua Kutryk आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Teteryatnikov- फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 20 मे
नासाच्या Space X Crew-13 अंतराळ मोहिमे अंतर्गत अंतराळ स्थानकात वास्तव्यासाठी जाण्यासाठी चार अंतराळविरांची निवड जाहीर झाली आहे नासाचे अंतराळवीर Jessica Watkins, Luke Delaney कॅनडाचे अंतराळवीर Joshua Kutryk आणी रशियन अंतराळवीर Sergey Teteryatnikov ह्यांचा समावेश. आहे
ह्या अंतराळ मोहिमेचे कमांडरपद अंतराळवीर Jessica आणी पायलटपद अंतराळवीर Luke सांभाळणार असुन अंतराळवीर Joshua आणी अंतराळवीर Sergey हे दोघे मिशन स्पेशालिस्टपद सांभाळतील
अंतराळवीर Jessica Watkins Colorado मधील Lafayette येथील रहिवासी आहेत 2017 मध्ये नासा संस्थेत त्यांची अंतराळवीर पदासाठी निवड झाली Stanford University मधून Geological आणी Environmental Scienceपदवी प्राप्त Jessica ह्यांनी California University मधून Doctorate केले त्यांनी Martian Surface विषयी संशोधनात्मक अभ्यास केला असून त्या नासाच्या Southern California येथील J.P.L Lab मधील Curiosity Mars Rover Science टिमच्या सदस्य आहेत त्या दुसऱ्यांंदा स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत ह्या आधी 2022 मध्ये Space X Crew 4 अंतराळ मोहीम अंतर्गत त्या स्थानकात गेल्या होत्या त्यांनी मोहीम 67/68 मध्ये सहभाग नोंदवला त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 170 दिवस वास्तव्य केले आणी सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला होता Space X Crew मोहीमे अंतर्गत स्थानकात दोनवेळा अंतराळप्रवास करणाऱ्या त्या पहिल्या नासाच्या अंतराळवीर आहेत
Florida येथील रहिवासी असलेले अंतराळवीर Luke Delaney B.E.Mechanical, ME Aerospaceआणि Naval Aviator मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त पायलट आहेत Lukeह्यांनी पायलटपदी कार्यरत असताना संपूर्ण Pacific region मधून प्रवास केला आहे नासाच्या Virginia येथील Langley Research Center Hampton येथे Test Pilot Instructor आणी Research Pilot पदी ते कार्यरत होते 2021 मध्ये त्यांची अंतराळवीर पदासाठी निवड झाली ते प्रथमच अंतराळस्थानकात वास्तव्यास जाणार आहेत
Fort Saskatchewan येथील रहिवासी अंतराळवीर Kutryk हे देखील पहिल्यांदाच अंतराळस्थानकात वास्तव्यास जाणार आहेत 2017 मध्ये त्यांची नासात निवड झाली त्यांनी कॅनडाच्या NATO UN आणी North American Aerospace Defense Command Commitment मध्ये CF-18 Fighter Pilot पदी काम केले Cold Lake येथील Aerospace Engineering Test Establishment मध्ये Experimental आणी Operational Test Pilot पदावरही ते कार्यरत होते
रशियन अंतराळवीर Sergey Teteryatnikov हे BE( Ship power plant Oprations Specialization- Naval Academy St.Petersburg) आहेत त्यांची Test Cosmonaut पदासाठी निवड होण्याआधी त्यांनी Naval Engineer म्हणून अनेक ठिकाणी कामे केली विशेषतः Undersea Vessels & Specialized engine room Operations पदी त्यांनी काम केले 2021 मध्ये त्यांची Gagarin Research & Test Cosmonaut Training Center Cosmonaut Crops मध्ये निवड झाली 2023 पर्यंत ते तिथे कार्यरत होते अंतराळवीर Sergey देखील पहिल्यांदाच अंतराळस्थानकात वास्तव्यास जाणार आहेत
हे चारही अंतराळवीर सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान सहा महिन्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात जातील आणी अंतराळ मोहीम 75 मध्ये सहभागी होऊन तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील
No comments:
Post a Comment