Saturday, 4 July 2026

नासाच्या अंतराळवीरांनी स्थानकातून दिल्या अमेरिकेच्या 250 स्वतंत्रदिनानिमित्य शुभेच्छा !

true

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे अंतराळवीर Jessica Meir ,Jack Hathaway आणि Chris Williams स्थानकातून पृथ्वीवासीयांना अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र दिनानिमित्त शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था 


नासा संस्था - 4 जुलै 

अमेरिकेचा 4 जुलैला 250वा स्वातंत्र दिन आहे सध्या अमेरिकन नागरिकात तो साजरा करण्यासाठी उत्साहाचे वातावरण आहे पृथ्वीपासून दूर अंतराळस्थानकात वास्तव्य करीत असलेल्या अंतराळवीरांना तो पृथ्वीवर साजरा करता येत नाही पण अंतराळस्थानकातील अंतराळवीर एकत्र येऊन तो दिवस अंतराळात उत्साहाने साजरा करतात अंतराळमोहीम 74 चे अंतराळवीर Jack Hathaway,Chris Williams आणि Jessica Meir सध्या स्थानकात वास्तव्य करीत आहेत त्यांनी स्थानकातून नासाच्या लाईव्ह संपर्कात संवाद साधून पृथ्वीवासीयांना अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्या वेळी त्यांनी साधलेला हा संवाद 

अंतराळवीर Jack Hathaway -"आता ह्या क्षणी आम्ही पृथ्वीपासून दूर अंतराळातून 250 मैल अंतरावरून तुमच्याशी संवाद साधत आहोत आम्हाला  स्थानकात अमेरिकेचा हा 250 वा स्वातंत्र दिन साजरा करायला मिळतोय हा आमचा बहुमान आहे अंतराळातील अंतराळस्थानकात विविध देशातील अंतराळवीर एकत्र येतात वास्तव्य करतात आणि इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत ह्या फिरत्या लॅब मध्ये मानवाच्या,पृथ्वीच्या विकासासाठी संशोधन करतात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावतात इथे केलेले हे संशोधन भविष्यकालीन चंद्र आणि मंगळमोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणि तेथील त्यांच्या वास्तव्यासाठीची पूर्व तयारी आहे !"

अंतराळवीर Chris Williams - "अंतराळविश्वातील ह्या संशोधन आणि अंतराळमोहिमांमुळे जगातील अनेक देशातील अंतराळवीर आणि मानव एकत्र येतात आणि अंतराळवीर होण्याचे  स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना अशक्य ते शक्य करण्यासाठी प्रेरित करतात अंतराळविश्वातील आधीची Mercury ,Gemini आणि Apollo अंतराळ मोहीम त्यानंतरच Space Shuttle आणि आताची आमची हि अंतराळ मोहीम आम्ही सध्या स्थानकात वास्तव्य करत आहोत ह्या प्रत्येक अंतराळ मोहिमेमागे आधी इथे येऊन गेलेल्या अंतराळवीरांचं ध्येय साध्य करण्यासाठीच कर्तृत्व आहे आमच्या साठी ती अंतराळातील पाऊलवाट आहे !"

अंतराळवीर Jessica Meir - "आणि आता नासाने अंतराळविश्वातील आर्टेमिस चंद्रमोहीमेद्वारे अंतराळात यशस्वी पाऊल टाकले आहे आणि सर्व मानवाच्या कल्याणासाठी नासाने अंतराळ विश्वात टाकलेल्या ह्या यशस्वी  पाऊलवाटेवरून ह्या मोहिमेद्वारे पुढे वाटचाल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत 

             आम्हा सर्वांतर्फे अंतराळस्थानकातून तुम्हा सर्व पृथ्वीवासीयांना 

                                                        Happy 250 America ! 

 

 

No comments:

Post a Comment