
रशियातील कझाकस्थान येथील बैकोनुर ऊड्डाणस्थळावरुन अंतराळवीर अनिल मेनन ह्यांच्या पत्नी Anna मुलांसोबत सोयूझ यानाचे ऊड्डाण पहाताना - फोटो -नासा संस्था
नासा संस्था -17 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 74/75 अंतर्गत अंतराळवीर अनिल मेनन रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov आणि Anna kikina हे तिघे 14 जुलैला आठ महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले आहेत ह्या तिन्ही अंतराळवीरांसह सोयुझ MS-29 अंतराळयान रशियातील कझाकस्थान येथील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून सकाळी 10.47 मिनिटांनी स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले

अंतराळवीर अनिल मेनन ,Pyotr Dubrov आणि Anna Kikina -फोटो- नासा संस्था
हे अंतराळवीर दोन महिने रशियातील Cosmonaut training Center मधील Cosmonaut Hotel Crew Quarter मध्ये रहात होते उड्डाणाआधी संस्थेच्या बस मधून ते उड्डाणस्थळी निघाले तेव्हा त्यांच्या अंतराळवीर मित्रांनी Farewell song वाजवून त्यांना निरोप दिला आणि सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या
उड्डाणाआधी ह्या अंतराळवीरांचे उड्डाणपूर्व मेडिकल,स्पेससूट फिटिंग लिकेज व इतर आवश्यक गोष्टीचे चेकअप झाले त्या नंतर ह्या अंतराळवीरांशी नासा संस्थेचे Administrator Jared Isaacman,Deputy Administrator Matt Anderson आणि Roscosmos संस्थेतील प्रमुखांनी संवाद साधला Jared ह्यांनी मेनन ह्यांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले "तुम्ही भाग्यवान आहात खूप कमी जणांना अंतराळस्थानकात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते तुम्ही त्यासाठी खूप मेहनत घेतलीत तुम्ही कर्तृत्ववान आहात तुमच्याकडून आम्हाला अमेरिकेला खूप अपेक्षा आहेत त्या साठी आमचा पाठिंबा आणि अमेरिकन जनतेच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही रशिया आणि अमेरिका ह्या दोन देशाचे नाव यशस्वी कराल अशी खात्री आहे !"
त्या नंतर ह्या अंतराळवीरांना पोहोचवायला आलेल्या त्यांच्या कुटुंबयांशी,मित्र आणि नासा संस्थेतील मान्यवर अंतराळवीरांशी ह्या तिघांनी संवाद साधला मेनन ह्यांच्या पत्नी Anna ह्या त्यांना निरोप द्यायला आल्या होत्या त्या नंतर दोन्ही संस्थेतील प्रमुखांनी त्यांना उड्डाणस्थळी नेले आणि सोयूझ अंतराळ याना पर्यंत पोहोचवले निर्धारित वेळी यानाचे रॉकेट प्रज्वलित झाले आणि यान अंतराळात झेपावले
सोयुझ यान अंतराळात पोहोचताच स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होऊन अंतराळयान रॉकेटपासून वेगळे झाले आणि स्थानकाच्या दिशेने अंतराळप्रवासास लागले तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर दुपारी 1.52 मिनिटाला स्थानकाच्या Prichal Module जवळ पोहोचले सोयूझ यानाने अंतराळात दोन फेऱ्या मारल्या नंतर स्थानक आणि सोयूझ यान ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली दुपारी 4.30 वाजता स्थानकाचे दार उघडल्यानंतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला
सध्या स्थानकात वास्तव्यास असलेल्या कमांडर Sergey Sverchkov ह्यांच्या मार्गदर्शनात अंतराळ मोहीम 74 चे अंतराळवीर Jessica Mier,Jack,Chris, Sophie, अंतराळवीर Sergey Mikoev आणि Adrey Fedyaev ह्यांनी ह्या तिन्ही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले त्यानंतर काही वेळातच नासा आणि Roscosmos संस्थेतील प्रमुखांच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांचा स्थानकातील Welcome Ceremony पार पडला

अंतराळवीर मेनन Anna आणि Dubrov स्थानकात पोहोचल्या नंतर Welcome Ceremony दरम्यान संस्थेतील मान्यवरांशी संवाद साधताना सर्व अंतराळवीर एकत्रित -फोटो -नासा संस्था
Mitri Kalashnikov -Good Evening ! तुम्ही सर्वजण स्थानकात सुखरूप पोहोचला आहात आनंदी दिसत आहात हे पाहून आम्हा सर्वांना आनंद झाला Anna ,Pyotr आणि अनिल तुमचे अभिनंदन!
Huston -आम्ही सुद्धा हेच म्हणू तुमच Launching ,Docking आणि अंतराळ प्रवास ग्रेट होता Anna ,Pyotr तुम्ही स्थानकात सुखरूप पोहोचला आहात आणि अनिल तुम्ही पहिल्यांदाच स्थानकात प्रवेश केलाय आता तुमच स्थानकातील संशोधन पण असच ग्रेट असेल अशी आशा आहे आमच्या रशियन मित्रांचे आभारी आहोत त्यांनी हि मोहीम यशस्वी केली
Alona Sakchinka -Welcome ! तुम्ही सुखरूप पोहोचला आहात आनंदी आहात आणि आमच्याशी संवाद साधत आहात हे पाहून आनंद झाला अभिनंदन स्थानकातील वास्तव्यासाठी संशोधनासाठी शुभेच्छा! तुम्ही सगळे कसे आहात मेनन तुम्ही प्रथमच अंतराळ प्रवास केला स्थानकातील प्रवेशानंतरची भावना कशी आहे ? Anna Pyotr तुम्ही पुन्हा स्थानकात प्रवेश केलाय कस वाटतय ?
मेनन -आम्ही आनंदी आहोत खूप लवकर तीन तासात इथे पोहोचलो हे सार आश्चर्यकारक आहे कुठल्याही पहिल्या गोष्टीच अप्रूप वाटत आणि हा तर अंतराळ प्रवास आणि अंतराळातील स्थानकातला प्रवेश खूप Excellent ! आणि निघण्याआधी मला निरोप द्यायला Jared Isaacman आले त्यांनी माझ्याशी संवाद साधत प्रोत्साहन दिले माझ्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे मी निश्चितच नवीन संशोधित माहिती मिळवेन
Pyotr -आणि आम्हाला अस वाटतय कि पृथ्वीवर खूप दिवसांची मोठी सुट्टी व्यतीत करून पुन्हा इथे पोहोचलो आहोत अशा ठिकाणी जिथे मी खूप दिवस राहिलोय इथल्या सहकारी अंतराळवीर मित्रांसोबत संशोधन केलय मोकळा वेळ व्यतीत केलाय मला अस वाटतय हि बिझिनेस ट्रीप आहे पुन्हा पृथ्वीवर आणि इथे माझ्या घरातला प्रवास स्थानकात पोहोचल्यावरआधी तर ह्या अंतराळवीरांनी केलेल प्रेमळ स्वागत Welcome Ceremony! ची परंपरा सगळे अंतराळवीर आनंदाने हसतमुखाने स्वागत करतात भेटतात आम्ही सर्वजण पृथ्वीवर ट्रेनिंगमध्ये एकत्र राहिलोय ट्रेनिंग घेतलय आता इथे एकत्र आलोय त्यांच्या हार्दिक स्वागताने भारावलोय !
अंतराळवीरांच्या नातेवाईकांनी ह्या अंतराळवीरासोबत संवाद साधून त्यांच्या भावना व्यक्त केल्या
"तुम्ही सर्वजण सुखरूप पोहोचला आहात हे पाहून आनंद होतोय हा भावनिक क्षण आहे तुमचे अभिनंदन आणि वास्तव्यासाठी शुभेच्छा तुम्ही लांब आहात आता नवीन संशोधन करणार आहात आताचा हा वंडरफूल क्षण enjoy करतोय launching च्या वेळी भावनात्मक आणि रोमांचक अनुभव पहायला मिळाला आम्ही प्रेरित झालो तुम्हाला संशोधनासाठी सुरक्षित वास्तव्यासाठी शुभेच्छा !"
आता हे तिनही अंतराळवीर स्थानकातील अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील अंतराळवीर मेनन पहिल्यांदाच स्थानकात वास्तव्यास गेले असून Dubrov आणि Anna दुसऱ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत Dubrov ह्यांनी स्थानकात 355 दिवस आणि Anna ह्यांनी 157 दिवस वास्तव्य करून संशोधन केले आहे मेनन झिरो ग्रॅव्हीटीत मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामावर उपयुक्त संशोधन विशेषतः रक्ताभिसरण,ब्लड सेल Bone loss , Heart attack वर ऊपयुक्त संशोधन स्टेमसेल आणी झिरो ग्रव्हिटित मायक्रोआँरगँनिझम, बँक्टेरीया ह्यांच्यवर होणाऱ्या परिणामाची माहिती संशोधीत करणार आहेत
No comments:
Post a Comment