Sunday, 26 July 2026

नासाच्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळभूमीत एक वर्षाच्या वास्तव्यासाठी धाडसी नागरिकांना संधी

 

नासाच्या  ह्या अभिनव उपक्रमातील सहभागी उमेदवार Augmented reality goggles घालून  शास्त्रज्ञ निर्मित परग्रहीय वातावरणात अंतराळवीरांसारखे कार्य करताना -फोटो -नासा संस्था 

 

 नासा संस्था - 26 जुलै 

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळसृष्टी निर्माण केली आहे नासाच्या भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळसृष्टीत राहिल्यावर मानवी शरीरावर व आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी CHAPEA हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे 

ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ सृष्टीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ भविष्य कालीन अंतराळवीरांचे प्रातिनिधित्व करणाऱ्या धाडसी ऊमेदवारांचा समावेश असलेले तीन गृप तयार करण्यात आले होते त्यातील पहिल्या गृप मधील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांनी ह्या सृष्टीत वर्षभर वास्तव्य करून उपयुक्त संशोधित माहिती गोळा केली असून दुसऱ्या गृप मधील चार प्रतिनिधी देखील ऑक्टोबर मध्ये नासा संस्थेतील कृत्रिम मंगळ भूमीतील एक वर्षांचे वास्तव्य संपवून परतणार आहेत 

आता पुन्हा नासा संस्थेतर्फे भविष्यकालीन मंगळ आणि चंद्र मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ह्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीतील परग्रहीय वातावरणात एक वर्षाच्या वास्तव्यासाठी संधी उपलब्ध केली आहे ह्या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छित उमेदवारांना नासा संस्थेच्या निर्धारित बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे त्या मध्ये उमेदवाराचे मानसिक आरोग्य,शैक्षणिक पात्रता,सुदृढ शारीरयष्टी ह्या बाबींचा समावेश आहे शिवाय ह्या उमेदवारांना नासा संस्थेच्या अनेक चाचण्या आणि दीर्घकालीन निवड प्रक्रिया पार पाडाव्या लागतील त्या साठी उमेदवारांमध्ये सयंम आणि चिकाटीची आवश्यकता असावी लागेल ह्या उमेदवारांना पृथ्वीवरील ह्या शास्त्रज्ञ निर्मित परग्रहीय वातावरणात वास्तव्य करून संशोधन करावे लागणार असल्याने ह्या बंदिस्स्त वातावरणात राहण्याची इच्छा आणि अभ्यासू वृत्ती असणे देखील आवश्यक आहे 

नासाच्या आतापर्यंतच्या HERA मोहिमे अंतर्गत संशोधन आणि CHAPEA मोहिमे अंतर्गत दीर्घकाळ परग्रहीय वातावरणात राहिल्यावर मानवाच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर काय परिणाम होतात ह्या विषयी संशोधित माहिती गोळा केल्या गेली आता ह्या दोन्ही मोहिमांचा एकत्रित विकसित परिणाम संशोधित करण्यात येणार आहे नासाच्या नव्या अभियानात HERA मोहिमेचा अंतराळयान आणि CHAPEA मोहिमेचा परग्रहावरील वास्तव्यासाठी वातावरणीय संशोधित माहिती गोळा करण्यासाठी उपयोग केल्या जाईल त्या साठी ह्या उमेदवारांना पृथ्वीवरील नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित परग्रहीय वातावरणात वास्तव्य करताना पृथ्वीपासून दूर आणि बंदिस्त परीस्थितीत राहावे लागणार असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क आणि  संवाद साधता येणार नाही फक्त नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील टीम प्रमुख त्यांच्याशी संपर्क साधतील त्यांना मर्यादित जागेत आणि मर्यादित साहित्यात तेथे राहावे लागेल

भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील भूमीवर वास्तव्य करताना शारीरिक व इतर अडचणींवर मात करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे अंतराळवीरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या उमेदवारांना अंतराळवीरांसारखेच ट्रेनींग दिले जाईल त्या मध्ये कृत्रिम मंगळभूमीत संशोधना सोबतच Simulated Mars Walk,रोबोटिक ऑपरेशन्स,मंगळ आणि भविष्यकालीन अंतराळमोहिमेसाठी डिझाईन केलेल्या तंत्रज्ञानाच्या संशोधनात्मक चाचणी,रोव्हरच्या साहाय्याने ह्या मंगळभूमीत दूरवर प्रवास करुन संशोधित माहिती गोळा करणे ह्याचा समावेश आहे सोबतच ह्या निवडक उमेदवारांना ह्या आधीच्या परग्रहावरील अनेक उड्डाणाचा आणि कार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी सुधारून नवीन विकसित संशोधित तंत्रज्ञान व माहिती गोळा करावी लागेल  

 भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि परग्रहावरील विपरीत वातावरणात अंतराळवीरांच्या शारीरिक दुष्परिणामावर मात करण्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी आणि नवीन विकसित अत्याधुनिक हार्डवेअर आणि  यंत्रणेच्या कार्यक्षमतेसाठी हा उपक्रम नासा संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे   

No comments:

Post a Comment