Tuesday 29 December 2015

वर्ष गाजवल वैज्ञानिकांनी ,महिलांनाही भाग्याच!

                                  वर्ष सरता सरता गाजल ते एका महिलेच्या धर्मविरोधी रूढी मोडत शनिशिंगणापूरच्या चौथारयावर चढुन शनीला तेल अर्पण करण्यान! आजवर स्त्रीन चौथारयावर चढणच काय तिथल्या घरात चोरी करण्याच धैर्यही चोर करत नाहीत त्या मुळेच तिथल्या घरांना दार खिडक्याही नाहीत अस नागरिक सांगतात तिथे हि धर्मविरोधी घटना घडताच संतप्त झालेल्या विश्वस्त पुजाऱ्यांनी मग दुग्धाभिषेक करून देवाला शुध्द केल कारण त्यांच्या मते त्या महिलेन स्पर्श करून देव अशुद्ध केला विशेष म्हणजे हि घटना घडताना तिथला सुरक्षा रक्षक दारू ढोसत होता म्हणूनच केवळ स्त्री आहे म्हणून प्रवेश नाकारण आणि पुरुष आहे म्हणून देवापुढे दारू ढोसण हा विरोधाभासी भेदाभेद आजची जागृत स्त्री सहन करण शक्यच नव्हत त्या मुळे ती स्त्री आणि महिला संघटना स्त्रीच्या झालेल्या अपमानान पेटून उठल्या मिडिया वाल्यांनी बातमी उचलून धरली काहींनी तीच अभिनंदन केल समाजातील मान्यवरांच्या नेत्यांच्या चर्चा घडविल्या गेल्या आणि जाहीर निषेध नोंदवत महिला संघटनान शानिशिंगणापुरला मोर्चा काढला आंदोलनही केल ह्या दरम्यान ज्या पंकजा मुंडेंनी पूर्वापार चालत आलेली व महिलांना निशिब्ध असलेली प्रथा मोडत आपल्या पित्याच्या चितेला अग्नी दिला त्यांच्यावरच त्या जुन्या रुढीला प्रोत्साहन देत आहेत असा आरोप केला गेला खरेतर त्याचं वारंवार सांगण होत," कि पूजा अर्चात अडकून राजकारण करून तुम्ही पुन्हा जुन्या वाटेवर जात आहात महिलेचा अपमान हि चुकीचीच गोष्ट आहे" पण तापलेलं जनमानस त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत होता आणि विशेष म्हणजे हि महिला कोण तीन हे अनपेक्षितपणे केल कि कोणाच्या सांगण्यावरून ? हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले स्त्री संघटना आणि माध्यमांनी तिला समोर आणायला हवय!
 ह्या निमित्तान स्त्रीच वास्तव मात्र समोर आल अजूनही तिला घर दोघांच असल तरीही संसारात ,प्रापर्टीत किंवा आर्थिक बाबतीत समान हक्क नाही ती त्या बाबतीत बोलूही शकत नाही कितीही राबल तरी घरचा पुरुष तिला केव्हाही बाहेर काढू शकतो आर्थिक पिळवणूक करू शकतो हे आजच कटू वास्तव आहे  ह्याकडे महिला संघटनांनी लक्ष द्याव विशेष म्हणजे ज्या पूजाअर्चा ,सणवार ,माजघरातून रुढीच्या जोखडातून स्त्रीला बाहेर पडायला इतकी वर्ष लागली ज्या साठी स्वातंत्रपूर्व व स्वातंरयानंतरही समाज सुधारकांना ,स्त्रीयांना अथक प्रयत्न करावे लागले पराकोटीचा संघर्ष सोसावा लागला प्रसंगी वाळीत टाकेलल आयुष्य जगाव लागल तेव्हा कोठे स्त्री शिक्षण ,समानता ,स्वातत्र्य नोकरी किंवा करिअर आताच्या स्त्रीला करता येऊ लागलय तिच्या सर्वच क्षेत्रात तिला बरोबरीचा हक्क मिळू लागलाय ,ती परदेशात एकटीन जाऊ शकतेय शिकू शकतेय आपल्या आवडीचा वेष परिधान करतेय जिथे नउवारी ऐवजी सहावारी घालण अशक्य होत तिथे पंजाबी ड्रेस तर दूरच ! त्या साठीही कित्येकांनी संघर्ष केलाय पण आता त्या तो सहजतेन घालू शकताहेत पण ज्या सण वार पुजेअर्चेतुन त्यांची सुटका झालीय त्या साठीचा हा संघर्ष आणि नऊ वारी ,नथीच आकर्षण पाहून नवल वाटतय आणि अंधुकशी भीतीही! आजच्या तरुणींची पावलं मागे तर पडत नाहीयत ना ? तसही आजची सुज्ञ तरुणी जास्ती दिवस नऊवारीचा बोजा सांभाळू शकणार नाही आणि करीअर करताना तिला सणवारात अडकायला वेळ तरी कोठे आहे ?  अर्थात आजच्या नवतरुणींनीच हे ठरवायचाय कि त्यांना प्रगत जगाकडे झेप घ्यायचीय का पुन्हा जुन्या रुढीत, पूजा अर्चात अडकायचय?
 विशेष म्हणजे इकडे शनिशिंगणापूर प्रकरण गाजत असताना तिकडे नासाच्या शास्त्रज्ञांनी शनिभोवतीच्या कडयाच गूढ उकलत शनि भोवतीच्या कड्याजवळिल वातावरणात बर्फाचे अंश असल्याचा शोध लावत त्याचा सुंदर फोटो सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केला तसाच मंगळावर पाणी वहात होत तिथ जीवसृष्ठी अस्तित्वात होती ह्याचे ठोस पुरावे देणारा शोध लावत त्याचेही फोटो त्वरित पाठवले नासाच्या शास्त्रज्ञांनी उगवत्या पृथ्वीच नयनरम्य छायाचित्र, प्लुटो ,सूर्यावरील प्रचंड उष्ण आगडोंबाची छायाचित्रही काढून पाठवली तसेच अंतराळ स्थानकात त्यांनी लावलेल्या रोपांना आलेली लेट्युसची पाने ,झीनियाची टवटवीत रोपे ,उगवलेल्या कळ्या ह्यांचीही फोटोसहीत माहिती पाठवली
 अंतराळवीर Scott Kelly ह्यांनाही सेल्फिचा मोह आवरता आला नाही त्यांनी अत्यंत कठीण असलेल्या स्पेस walk दरम्यान स्वत: चा सेल्फी काढून पाठविला तर कित्येकांना सेल्फिमुळे आपल आयुष्य गमवाव लागल

महिला वैज्ञानिकांच्या पत्रिकेतला मंगळ भाग्यशाली 
 आपल्या भारताच्या इस्रोच्या मंगळ मोहिमेनही यशस्वीपणे वर्ष पूर्ण केलय आणि ज्या मंगळाला अपशकुनी चांगल्या कामात विघ्न आणणारा अस दोषारोपित केल जायचं त्याच मंगळान भारतियांच मंगळ मिशन यशस्वी करत शुभशकुनच केलाय नासा प्रमाणेच हि मंगळ मोहीम यशस्वी करणारया चमूमध्ये महिला वैज्ञानिकांचाही सहभाग होता त्या मुळे त्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह भाग्यकारकच ठरलाय

चीनी वृत्त वाहिनीवर महिला रोबोट Ankar 
चीनी वृत्त वाहिनीवर तर रोबोट Ankar न प्रवेश केलाय ह्या स्त्री रोबोट Ankarच नाव शियाओआइस असे आहे मंगळवारी एका लाइव ब्रेकफास्ट न्युज कार्यक्रमात ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रोबोटन हवामान खात्याची माहिती देण्याच्या शुभारंभ केलाय तर भारतातल्या अग्निशमन दलातही Fire fighter Robot सामील झालाय तो आता जिथे अग्निशमन खात्यातील जवान जाऊ शकत नाहीत तिथे जाऊन लोकांना वाचऊ शकेल व आग विझवु शकेल

महिला बनतील  Fighter Jet Pilot
हे वर्ष लष्करातील महिला अधिकारयांसाठीही महत्वाच ठरलय त्यांना आता लढाईच्या काळात महिलांच्या तुकडीला स्वतंत्र आदेश देण्याचा अधिकार प्राप्त झालाय आणि लवकरच तो आमलातही येईल शिवाय सध्या महिला वैमानिक Helicopter व विमान पायलट म्हणुन काम करतात पण Fighter Jet त्या उडवु शकत नाहीत पण आता संरक्षण मंत्र्यांनी महिला वैमानिकांना Fighter Jet उडवण्यासाठी परवानगी दिलीय आणि सध्या Fighter Pilot team मध्ये महिलांना त्याचे training देण्यात येतेय
2017 मध्ये वायुसेनेत त्या Fighter Pilot म्हणून काम करतील

सौदी महिलांना मिळाला मतदानाचा हक्क 
सौदीअरेबियातील महिलांना आता मतदानाचा हक्क मिळालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी नुकतीच निवडणूक लढवून यशही मिळवलय तर त्याच सौदीत बार्बी डॉल खरेदी करण्यास मात्र बंदी आहे कारण बार्बी सुखवस्तू ,कमनीय बांध्याची व उच्चवर्णीय भासते अस मत व्यक्त करत त्या ऐवजी सौदीत नव्या बार्बिसारखीच दिसणारया पण सौदी बुरखाधारी पोशाख असलेल्या फुला डॉलची निर्मिती करण्यात आलीय

जपानी महिलांना रडण्यासाठी मिळाली जागा व सुविधा
तिकडे जपान मध्ये तर तिथल्या सरकारन बायकांना रडण्यासाठी हॉटेल मध्ये जागा ,डोळे पुसण्यासाठी टीश्यु पेपर, eye मास्क व रडू येण्यासाठी खास दु:खी सिनेमे पाहण्याचीही सोय केलीय आणि त्याच एक दिवसाच भाड आहे 10.000 जापनीज येन  तीथल्या सरकारन हि सुविधा उपलब्ध केलीय ते तिथल्या महिलांनी रडाव म्हणून आता तिथल्या बायका का रडत नाहीत, कामाच्या ताणामुळे कि अतित्रासाने त्यांचे अश्रू आटल्यामुळे किंवा रडण हे दुबळेपणाच लक्षण आहे म्हणून त्या रडत नाहीत हे जपानी महिलाच जाणोत इथ भारतात मात्र बायकांना रडायला क्षणाचाहि विलंब लागत नाही सुखदुखा:त ,भावनेचा कल्लोळ दाटल्यावर ,दुसऱ्यांच दु:ख पाहून अस कधीही केव्हाही कोठेही रडू येत त्या साठी विशेष काही कराव लागत नाही त्यावर अनेक विनोदही केले जातात

डाळ महागली ,लसूणहि महाग
इकडे भारतात अच्छे दिन येणार अस म्हणता म्हणता महागाईन मात्र गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणल आधी कांदा मग Tomato आणि इतर भाज्या महागल्या दिवाळीच्या तोंडावर तर दाळीन भावाचा उच्चांक गाठला तो नवीन तुरीच्या शेंगा बाजारात आल्या तरी तसाच आहे आणि आता ओला लसुण बाजारात आला तरीही लसुण अडीचशे रुपये कीलौने विकल्या जातोय

सोन्या ,चांदीला चकाकी 
सरत्या वर्षान महिलांना सोन्यान मात्र चकाकी दिली सोन ह्या वर्षी दोनतीनदा २५०००रु. तोळा पर्यंत क्वचित त्याच्याही खाली आल चांदीही ३५००० रु.किलौ पर्यंत उतरली आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे उतरलेले भाव डॉलरच्या तुलनेत रुपयाच झालेलं अवमूल्यन ,जागतिक मंदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे उतरलेले भाव ह्या मुळे सोने उतरले पण तरीही ते गृहिणींची दागिन्यांची हौस  मात्र  भागऊ शकले नाही

चोरी ,दरोडे लुटीचा आलेख चढताच
ह्याहि वर्षी वाढत्या चोरीला आळा बसला नाहीच उलट चोरया,दरोडे, लुटीच्या घटना वाढतच गेल्याने दागिने घालुन बाहेर जाण तर दूरच ते घरी ठेवलं तरीही चोर ते चोरू लागलेत दररोज राजरोसपणे दिवसा देखील तीन चार घरे फोडणे हे नित्याचेच झालेय एव्हढेच नाही तर भाजप आणि शिवसेनेच सरकार असताना देखील चोर सर्रास मंदिरातही चोरी करण्यास धजाऊ लागलेत कोणाच्या जोरावर ते एव्हढे निर्ढावलेत ? चोर सापडत का नाहीत ?सापडले तरी का सुटतात? एखाद्या इमानदार पोलिस इन्स्पेक्टरांनी जीवाची बाजी लाऊन चोर पकडला तरी तो का सोडल्या जातो? चोरीचे दागिने कोठे जातात ते विकत घेण्यावर निर्बंध असतानाही कोण विकत घेत? निर्भय निर्धास्त आयुष्य नागरिक कधी जगतील असे प्रश्न संतप्त नागरिक विचारू लागलेत खरतर निवडून येण्या आधी आणि नंतरही चोरांना जरब बसेल व तो पुन्हा चोरी करण्यास धजावणार नाही अशी शिक्षा करू अस आश्वासन मंत्र्यांनी दिल होत आता स्त्री संघटनांनी त्यांना त्याचा जाब विचारावा ह्या बाबतीत सरकारला धारेवर धरत ,धरणे धरत आंदोलन करून चोरांना पकडून तुरुंगात खडी फोडायला पाठवण्यास बाध्य करावे

Thursday 24 December 2015

अंतराळ स्थानकात बहरणार झीनियाची फुले

              अंतराळ स्थानकात उगवलेली हि झीनियाची टवटवीत रोपे                                  फोटो -नासा संस्था 


  नासा संस्था 23 dec.2015

 नासाच्या अंतराळ स्थानकात भाजी व फुले उगवण्याच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच अंतराळ स्थानकात  झीनियाची फुले बहरणार आहेत
 अंतराळ स्थानकातील VEG -O1 ह्या व्हेजी शोध प्रकल्पा अंतर्गत लावलेली झीनियाची रोपे अंकुरली असून हि रोपे पृथ्वीवरच्या रोपापेक्षा मोठी दिसत असून त्यांना लवकरच कळ्या येथील अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय नव्हे तसा त्यांना विश्वास आहे कारण ह्या आधीही त्यांनी लावलेल्या अंतराळ स्थानकातील लेट्युसच्या रोपाला पाने आली आणि अंतराळवीरांनी ती खाल्ली देखील 
व्हेजी ह्या शोध प्रकल्पा अंतर्गत अंतराळ स्थानकात लागवड केलेली रोपे  एका चेंबर मध्ये वाढवल्या जात आहेत तिथे त्यांना आवश्यक पोषक द्रव्ये व प्रकाश दिल्या जातोय  ह्या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीत रोपे कशी वाढतात हे जाणुन घेण्यासाठी झीनियाची लागवड केल्या गेली व शास्त्रज्ञांना अपेक्षे प्रमाणे ह्या अभिनव व नाविन्यपूर्ण प्रयोगात यशही मिळालय आणि त्यांच्या प्रयत्न आणि मेहनतीच फळ आता अंतराळ स्थानकात बहरलेल्या झीनियाच्या फुलांच्या रुपात लवकरच पहायला मिळेल  

Scott Kelly आणि Tim Kopra या अंतराळवीरांचा थरारक space walk यशस्वी


                                  टीम कोप्रा स्पेस walk करतानाचा थरारक क्षण                                फोटो -नासा संस्था

                                  Scott Kelly चाही स्पेस walk दरम्यानचा थरारक क्षण                      फोटो -नासा संस्था
नासा संस्था -22dec.

नासाचे अंतराळवीर Scott Kelly व Tim Kopra यांनी २१ डिसेंबरला अंतराळ स्थानका बाहेर तीन तास सोळा मिनिटेचा  space walk केला Scott Kelly यांचा हा तिसरा तर Tim Kopra ह्यांचा हा दुसरा space walk होता
 दोन्ही अंतराळवीरांनी हा स्पेस walk यांत्रिक कामासाठी केला बुधवारी रशियन कार्गो सप्लाय स्पेस क्राफ्ट आवश्यक सामान घेऊन अंतराळ स्थानकात येणार असल्यामुळे त्याच्या आगमनाच्या तयारीसाठी हा स्पेस walk होता
अंतराळ वीरांनी space walk मध्ये काम केल 
 Scott kelly ह्यांनी स्पेस walk मध्ये अंतराळ स्थानकाची मोबाइल ट्रान्स्पोर्ट कार योग्य ठिकाणी हलविली तसेच U .S क़मर्शियल क्रु च्या वाहनासाठी आवश्यक केबल जोड तयार ठेवला
आणि Tim Kopra  यांनी  रशियन laboratory module  अंतराळ स्थानकाशी जोडण्यासाठी Ethernet cable तयार ठेवली
 दोन्हीही अंतराळ वीरांनी  ह्या स्पेस walk दरम्यान अंतराळ स्थानकाच्या बाहेरील यंत्र पेटीतून काही आवश्यक यंत्र सामुग्रीही काढली जी पुढील कामासाठी आवश्यक आहेत
अंतराळवीरांसाठी हा स्पेस walk अत्यंत कठीण व घातक असतो क्षणाचीही चूक किंवा विलंब जीवावर बेतू शकतो त्या मुळेच हा  यशस्वी स्पेस walk अंतराळ वीरांसाठी अभिनंदनीय आहे

Monday 21 December 2015

उगवत्या पृथ्वीच नयनरम्य दृश्य



फोटो -   NASA / Goddard/Arizona State University
 12Oct 2015.ला  नासाच्या  LRO  ( Lunar Reconnaissance Orbiter) ह्या यानातुन उगवत्या पृथ्वीच हे नयनरम्य दृश्य अचूक टीपलय
नासा  संस्था -18 dec.
सूर्याच्या किंवा चंद्राच्या उगवत्या मावळत्या क्षणाच आल्हाददायी दृश्य आपण नेहमीच पाहतो पण आपण उगवत्या पृथ्वीच नयनरम्य दृश्य पाहतोय हि कल्पनाच किती सुंदर अन नाविन्यपूर्ण अन तितकीच  अविश्वसनीयही! अर्थात पृथ्वीवर राहणारया मानवाला उगवत्या पृथ्वीच मनमोहक दृश्य दिसण केवळ अशक्यच ! पण अंतराळातून मात्र हि कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते आणि उगवत्या पृथ्वीच निसर्गरम्य दृश्य अंतराळवीर किंवा यानामुळे आपल्यापर्यंत छायाचित्राच्या रूपात पाहता येऊ शकत
सरत्या वर्षाच्या शेवटी नासाच्या संशोधकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हि कल्पना प्रत्यक्षात साकार केलीय
 LRO ने चंद्राच्या Comton विवरापासून  83 mile दूर अंतरावरून हे छायाचित्र घेतल त्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले आणि अखेर अनेक छायाचित्रे एक करून तयार झालेल हे  छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचल
ह्या छायाचित्रात पृथ्वी चंद्राच्या क्षीतीजा वरून उगवताना दिसतेय तसेच ह्या छायाचित्रात उजव्या बाजूला सहारा वाळवंट दिसतेय तर पलीकडे सौदी अरेबिया आणि साउथ अमेरिकेची अटलांटिक किनारपट्टी सुद्धा दिसतेय
नासाच्या मेरिलंड येथील Goddard Space Flight Centerयेथील Deputy Project Scientist Noah Petro म्हणतात कि ,"पृथ्वी उगवतानाचे हे सुंदर छायाचित्र पाहून 43 वर्षापूर्वीच्या अपोलो 17 ह्या चांद्रमोहिमेदरम्यान काढलेल्या पृथ्वीच्या छायाचित्राची आठवण येते त्या फोटोतही आफ्रिका देशाचा भाग ठळकपणे दिसत होता "
जून 18-2009 ला LRO  हे यान launch केल्या गेले आणि त्याने त्याच्या सात शक्तिशाली instrumentच्या सहाय्याने आतापर्यंत चंद्राची अत्यंत महत्वपूर्ण माहिती गोळा केलीय 
पृथ्वीवर चंद्राचे उगवणे मावळणे नेहमीचआल्हाददायी असते पण चंद्रावर अंतराळवीरांना वेगळेच दृश्य दिसते चंद्रावर पृथ्वी कधीच उगवताना वा मावळताना दिसत नाही तर क्षितिजावर पृथ्वी नेहमी स्थिर दिसते अस Arizona state University चे Mark Robinson हे संशोधक सांगतात

Saturday 12 December 2015

केजल लिंडग्रेनचे स्पेस स्टेशन मिशन यशस्वी पृथ्वीवर सुरक्षित परतले

                                                                   फोटो -नासा संस्था
नासा संस्था -11dec.
नासाच्या अंतराळ मोहीम  45 चे अंतराळवीर केजल लिंडग्रेन अंतराळ स्थानकातील आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून 11dec.ला पृथ्वीवर सुखरूप परतले त्यांच्या सोबत रशियन स्पेस एजन्सीचे Flight Engineer Oleg Kononenko आणि जपानच्या स्पेस एजन्सीचे अंतराळवीर Kimiya Yui हे सुद्धा परतले
हे क्रु मेंबर कझाकीस्थान च्या उत्तरेकडील भागात सोयुझ स्पेक्टोक्राफ्ट मधून तिथल्या स्थानिक वेळेनुसार अंदाजे रात्री 8.12 m वाजता सुखरूप पोहोचले
ह्या मोहिमेतील Oleg Kononenko ह्यांनी अंतराळ स्थानकात 533 दिवस तर केजल आणि युई ह्यांनी 141 दिवस मुक्काम केला
त्यांच्या ह्या अंतराळ स्थानकातील नीवासादरम्यान त्यांनी पृथ्वी निरीक्षण तर केलेच शिवाय भौतिक ,जैविक आणि आण्विक विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केलीय त्यांनी केलेले तंत्रज्ञानातील संशोधन नाविन्यपूर्ण असून हे प्रयोग पृथ्वीला लाभदायक ठरले असून भविष्यात अंतराळातील खोलवरच्या भागात मानवाला जास्त दिवस राहून मानवी व रोबोटिक संशोधनासाठी उपयुक्त ठरतील आणि आगामी मोहीम अधिक सक्षम व कल्पकतेने राबविता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतोय
ऑगस्ष्ट महिन्यात केजल लिंडग्रेन व युई ह्यांचा  Veggie plant growth ह्या मोहिमेत सहभाग होता ह्या मोहिमे अंतर्गत अंतराळात वनस्पती लागवडीचा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला त्यांच्या प्रयत्नांनी अंतराळात वनस्पती उगवली आणि झाडाला लेट्यूसची ताजी पानेही आली ह्या नव्या प्रयोगामुळे आता अंतराळ स्थानकातील अंतराळ वीरांसाठी अंतराळात ताजी फळे ,भाजी व अन्नही पिकवता येईल अशी शक्यता निर्माण झाली असून नासाच्या जास्त दिवसाच्या अंतराळ मोहिमेतील मुक्कामात  फावल्या वेळात अंतराळ वीरांना बागकामाचाही आनंद घेता येईल शिवाय नवीन संशोधन पृथ्वीवरील बायोमास वाढीच्या व सुधारणेच्या प्रगतीसाठीही उपयुक्त ठरेल मोहीम 45च्या अंतराळवीरांनी दूरवरच्या अंतराळ प्रवासादरम्यान मानवी आरोग्याच्या व्यवस्थापना विषयीही महत्व पूर्ण संशोधन केले आहे
 ह्या मोहिमे दरम्यान तीन कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळ वीरांसाठी  लागणारे व प्रयोगासाठीचे आवश्यक असलेले काही टन सामान घेऊन अंतराळ स्थानकात पाठवण्यात आले
लिंडग्रेन ह्यांनी अंतराळ निवासा दरम्यान दोनवेळा स्पेस walk केला पहिला स्पेस walk स्थानकाच्या मेंटनन्स साठी व दुसरा यानाची अमोनिया कुलिंग सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी होता  
सद्या Skott  Kelly  ह्यांच्या नेतृत्वात 46 वी अंतराळ मोहीम सुरु असून त्यांच्या सोबत  Kornienko आणि Sergey Volkov (Roscosmos) हे दोन अंतराळवीर चार दिवस अंतराळ स्थानकात असून नासाचे Tim Kopra रशियाचे Yuri  Malenchenko आणि Tim Peake हे आणखी तीन अंतराळवीर 15 डिसेंबरला त्यांच्या सोबत अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जातील

Friday 4 December 2015

वीस वर्षानंतरही SOHO कार्यक्षम

                 फोटो -NASA /ESA /SOHO
नासा संस्था -1dec.
नासा आणि इसा च्या स्पेस मधील सोलर आणि हेलिओस्पिअरिक ऑबझरवेटरी (SOHO ) (वेधशाळा) वीस वर्षानंतर अजूनही भक्कम आणि कार्यरत आहे व नासा आणि ESA SOHOच्या वीस वर्षाच्या यशस्वी कार्यशीलतेचा आनंद सद्या साजरा करत आहेत
1995 मध्ये सूर्य व सौर मंडलातील उत्सर्जित होणारी प्रचंड उष्णता ,सौरउर्जा ,सौरवादळ ह्यांचा सखोल अभ्यास  करण्यासाठी SOHO कार्यान्वित करण्यात आली सूर्यावरील सौरवादळ ,सौरत्सुनामी व सौर भूकंप ह्याचा शोध घेण्यास SOHO मुळे मदत झाली असून अनपेक्षितपणे धुमकेतू शोधण्याचे कामही SOHO ने केले आहे आतापर्यंत SOHO ने सुमारे 5000  धुमकेतू  शोधले आहेत

काय आहे SOHO
SOHO हे NASA व ESA ह्यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एक Space Craft आहे
सुरवातीला दोन वर्षासाठी पाठवण्यात आलेले SOHO वीस वर्ष होऊनही अजूनही भक्कमपणे कार्यरत  आहे आता त्याची मुदत डिसेंबर 2016 पर्यंत वाढविण्यात आलीय
ह्या छायाचित्रात सूर्यापासून उत्सर्जित झालेली प्रचंड गतिमान उर्जा व विद्युत भारीत ढगांचे झोत दोन विरुध्द दिशेला जाताना दिसत आहेत ह्या सौर पदार्थातील चुंबकीय शक्ती पृथ्वीच्या वातावरणातील चुंबकीय शक्तीकडे आकर्षित झाल्यास भूचुंबकीय वादळ होऊ शकते

Tuesday 1 December 2015

शनीचा चंद्र व शनीच्या कड्यावर जलविश्व

    फोटो -नासा /Caltech Space Science Institute
नासा संस्था -30 nov.
नासाच्या कॅलिफोर्निया येथील Jet Prapulsion Lab मध्ये NASA ,युरोपियन(ESA ) व इटालियन स्पेस एजन्सी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नवीन प्रोजेक्टच्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे  कि ,
शनीचा चंद्र व शनी भोवतीचे कडे गोठलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांनी बनलेले असून ह्या कड्यामुळेच शनीला वैशिष्ठ प्राप्त झाले आहे
हे कण अत्यंत सुक्ष असल्यामुळे त्यांच्या अंतर्गत असलेली उष्णता राखू शकले नाहीत त्या मुळे अती थंड हवामानात ते गोठले गेले व Geologically मृतप्राय झाले तर दुसरीकडे हि उष्णता शनीच्या चंद्रावरील दक्षिण ध्रुवाकडे ओढल्या जाऊन पोलार जेट water च्या स्वरूपात साठवल्या गेली
नुकत्याच कॅसीनी यानावरून घेतलेल्या छायांचीत्राच्या निरीक्षणा नंतर अधिक संशोधनाअंती शनीच्या पृष्ठभागावर 313 मैल ( 504 k.m).अंतरा नंतरच्या पृष्ठभागावरच्या अंतर्गत भागात द्रव्य पाण्याचा महासागर  आढळला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे
ह्या संशोधनानंतर सौरमालेतील जीव सृष्ठीच्या विकासातील पाण्याची भूमिका समजून घेण्याची शास्त्रज्ञांची उत्सुकता वाढली आहे
कॅसीनी यानावरून घेतलेल्या ह्या छायाचित्रात  शनीच्या कड्याच्या  प्रकाशमान भागाच्या  0.3 degrees खालचा भाग दिसतोय              

Wednesday 25 November 2015

नासाने केला केमिकल Laptop विकसित


                     फोटो -नासा JPL/Caltech  Test rover वरील साधा व केमिकल Laptop

नासा संस्था -18 Nov.
नासाच्या कॅलीफोर्निया ( Pasadena )  येथील  Jet Propulsion प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी Chemical Laptopची निर्मिती केली असून त्यावर अजून संशोधन सुरु आहे
अंतराळातील इतर ग्रहावरील जीवसृष्ठीचा शोध घेण्यासाठी अंतराळात नेता येऊ शकेल अशा छोटया व सहजतेने हाताळता येण्याजोग्या उपकरणाचा शोध शास्त्रज्ञ अनेक वर्षापासून घेत आहेत नुकतेच त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा केमीकल Laptop पृथ्वीसारखीच आणखी कोठल्या ग्रहावर जीवसृष्ठी आहे का ह्याचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडेल.

          फोटो-नासा संस्था - JPL चे संशोधक Jessica Creamer,Fernanda mora,Peter Wills Chemical  Laptop सोबत

                                                    कसा आहे हा Chemical Laptop ? 
 हा  Chemical Laptop म्हणजे एक अत्यंत संवेदनशील उपकरण असून त्या द्वारे इतर ग्रहावरील Amino Acid व  Fatty Acid  चा शोध घेता येईल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटत असून भविष्यात युरोपा व मंगळ ग्रहावर हा Laptop पाठवण्याची त्यांची इच्छा आहे
हा Laptop म्हणजे एक केमिकल Analyzer असून साध्या Laptop पेक्षा थोडा जाड आहे त्यात Amino acid व fatty acid शोधण्यास मदत करणारे Apps आहेत
हा  Laptop द्रव्य स्वरूपातील Amino व fatty acid शोधु शकेल पण इतर ग्रहावर हि acids द्रव्य स्वरूपात नसतील आणि तिथे पाणी नसेल तर ?
ह्या समस्येवरही शास्त्रज्ञांनी उपाय शोधलाय त्या साठी त्यांनी Expresso Machine सारखे तंत्रज्ञान वापरले असून मातीचे नमुने पाण्यात मिसळुन 212.F डीग्री तापमानावर वर तापवुन त्याचे Analysis केले जाईल
मागच्या वर्षी शास्त्रज्ञांनी ह्या Chemical Laptop ची  यशस्वी चाचणी घेतली असून सद्या हा Laptop आणखी प्रभावशाली करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
JPL प्रयोगशाळेचे प्रमुख संशोधक Peter Wills म्हणतात कि ,"Mars Rover सारख्या Space craft वर हे उपकरण बसवणे हे आमचे अंतिम उद्दिष्ठ आहे " हा Chemical  Laptop आणखी प्रभावशाली करण्यासाठी नवीन Laser Technologyचा वापर करण्यावरही संशोधन सुरु आहे Atacama Desert  ( Chile ) इथे पुढील चाचणी होणार आहे
पृथ्वीवरील नमुने शोधण्यासाठीही हा  Chemical Laptop उपयुक्त आहे वेगवेगळे नमुने किंवा ऒषधातील भेसळ  शोधण्यासाठी  हे नमुने प्रयोग शाळेत नेण्याऐवजी ते तिथल्या तेथेच शोधण्यासाठी हा Laptop उपयुक्त ठरेल 

Tuesday 17 November 2015

प्लुटोची लक्षवेधी छबी

                                                                   फोटो - नासा संस्था
         नासा संस्था -12nov.
 प्लुटोचा हा सुंदर लक्षवेधी फोटो न्यू होरायझन ह्या शास्त्रज्ञांच्या टीममधील Will Grundy ह्यांनी
14 जुलैला सकाळी 11वाजुन 11मिनिटांनी स्पेक्टोक्राफ्टच्या  Ralph/MVIC ह्या कॅमेरयाने टिपलाय 
ह्या फोटोला नवीन कलर टेक्निक वापरून आल्हाददायी तर केले आहेच शिवाय त्या मुळे प्लुटोवरील 
उंचसखल व इतर भाग  ठळकपणे दिसत आहेत  

Wednesday 11 November 2015

स्कॉट केली ह्यांचा दुसरा यशस्वी spacewalk

         फोटो -नासा संस्था
नासा संस्था -10 nov.2015
सहा नोव्हेंबरला अंतराळवीर स्कॉट केली व केजल लिंडग्रेन ह्यांनी आंतर राष्ट्र्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर सात तास अठ्ठेचाळीस मिनिटे spacewalk केले हा  दुसरा व 190वा spacewalk  स्टेशन असेंब्ली व मेंटनन्स ह्यांच्या समर्थनार्थ होता
त्यांनी ऑरबीटल प्रयोगशाळेच्या बाहेर आतापर्यंत एकूण  1,192 तास  आणि चार मिनिटे घालवली आहेत.
spacewalk दरम्यानचा स्कॉट केली ह्यांचा त्यांनी पाठवलेला हा फोटो

                                                                हितगुजच्या वाचकांना 
                                                          " दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"

Tuesday 3 November 2015

स्कॉट केलीचा Spacewalk सेल्फी

 नासा संस्था- फोटो -स्कॉट केलीचा सेल्फी  

नासा - 29 oct -आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वरून
 अंतराळवीर स्कॉट केली व फ्लाईट इंजिनीअर केजल लिंडग्रेन ह्यांनी 28 oct .ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर अल्फा magnetic स्पेक्टोमीटर घालून सात तास सोळा मिनिटे Spacewalk  केले आणि Scott Kelly ह्यांनी हा सेल्फी Spacewalk दरम्यान काढुन सर्वांना पाहण्यासाठी पाठवलाय शुक्रवारी 6 Nov ला दोघेही दुसरया Spacewalk ला जातील .

Sunday 18 October 2015

अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केलीन केले अंतराळ मोहिमेत तीन रेकॉर्ड ब्रेक

                                 फोटो -नासा संस्था स्कॉट केली अंतराळ स्थानकातून पाहताना
नासा संस्था -16oct.
अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनने पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण  केले असुन येत्या दोन nov ला स्पेस स्टेशनचा पंधरावा वर्धापन दिन आहे
                               अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केलीन केले आंतराळ मोहिमेत तीन रेकॉर्ड 
  45 व्या अंतराळ मोहिमेचे कमांडर अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी आपल्या अंतराळ मोहिमेत तीन रेकॉर्ड ब्रेक केले आहेत
16oct.ला स्कॉट केली ह्यांचा अंतराळातील स्पेस स्टेशन मधील 383 वा दिवस सुरु होईल त्यांनी ह्या आधीचा अमेरिकन अंतराळवीर  Mike Fincke ह्यांचा अंतराळात 282 दिवस राहण्याचा विक्रम मागे टाकत नव्या विक्रमाची नोंद केलीय 
29 oct.ला स्कॉट केली अंतराळात सलग 216 राहण्याचा दुसरा रेकॉर्ड ब्रेक करतील 2006 मध्ये 14 व्या अंतराळ मोहिमेचे Michael Lopez-Alegria ह्यांनी ह्या आधी 215 दिवस सलग अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये राहण्याचा विक्रम केला होता तो स्कॉट केली मोडतील 
तसेच त्यांच्या स्पेस स्टेशन मधील एक वर्षाच्या वास्तव्यात येणारा प्रत्येक दिवस ह्या विक्रमात नोंदविल्या जाइल आणि ह्या वास्तव्यातील जास्ती दिवस राहतानाच त्याचे होणारे परिणामहि अभ्यासतील   
ह्या फोटोत स्कॉट केली अंतराळ स्थानकातील Cupola मध्ये दिसत आहेत ज्या मधून पृथ्वी कडे 360 डिग्री कोनातून पाहता येते  


Sunday 11 October 2015

मंगळ यानाच्या उष्णता रोधक शिल्डची चाचणी यशस्वी


                  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -6oct.
नासाने आगामी मंगळ मोहिमेसाठी पाठवण्यात येणारया स्पेक्टो क्राफ्ट साठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उष्णता रोधक शिल्ड तयार करण्यात यश मिळवले आहे नुकतीच मंगळावरील वातावरणा सारखे वातावरण तयार करून ह्या शिल्डची यशस्वी चाचणी घेण्यात आली मंगळावर पाठवण्यात येणारया स्पेक्टोक्राफ्टला मोठया आकाराच्या उष्णता रोधक शिल्डची आवश्यकता भासते कारण मंगळाच्या वातावरणात शिरताना तयार होणारी उष्णता व यानाचा वेग नियंत्रित करताना तयार होणारया उष्णतेशी सामना करत स्वत:ला सुरक्षित ठेऊन यानाला तिथल्या वातावरणात प्रवेश करण आवश्यक असत हे काम अत्यंत जिकीरीचे व कठीण आहे

                    सद्याच्या उष्णता रोधक  शिल्डला लिमिट नवीन प्रगत शिल्ड बनवण्यात यश 

सध्या जे रॉकेट आहे त्यात उष्णता रोधक व स्पेक्टोक्राफ्ट साठी फार कमी व सीमित जागा आहे  त्या मुळे यानाला खूप अडचणीचा सामना करावा लागतो म्हणूनच नासाच्या Sillicon Valley  येथील एम्स रिसर्च सेंटर कॅलीफोर्निया मधील इंजीनीयर्सनी  आधुनिक तंत्र  वापरून ह्या समस्येवर उपाय शोधण्यात यश मिळवले आहे
                                              ADEPT ह्या  आधुनिक टेक्निकचा वापर 

ADEPT ह्या  आधुनिक प्रोजेक्टचा  वापर (  heating simulation testing of an ADEPT model)  त्या साठी करण्यात आला कार्बन फेब्रिक चा वापर करून हिट शिल्ड तयार करण्यात आली हि शिल्ड लवचिक असून उघडल्यावर छत्रीसारखी दिसेल
मंगळासारखे वातावरण कृत्रिमरित्या तयार करून संशोधकांनी घेतलेल्या  ह्या स्पेक्टो क्राफ्ट च्या उष्णता रोधक शिल्डच्या चाचणीला यश मिळाले आहे   

Morning aurora आंतर राष्ट्रीय स्पेस स्टेशन वरून

    फोटो- नासा संस्था-Skott Kelly
नासा संस्था -9 oct.
नासाचे  अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वरून हे निसर्गरम्य नैसर्गिक हिरव्या रंगाचे पटल 7oct.ला सकाळी कॅमेराबद्ध केले
आणि सर्वांना Good Mornihg म्हणत हे छायाचित्र  पाहण्यासाठी उपलब्ध केलेय 

Friday 9 October 2015

प्लुटो वर निळे आकाश आणि बर्फ नासाचा शोध

                                                    फोटो -नासाच्या होरायझन यानातील MVIC कॅमेरयाने घेतलेले

नासा न्यूज सर्विस -9oct.

प्लुटो वर निळे आकाश आणि बर्फ  आढळले असल्याचा शोध नासाच्या संशोधकांनी लावला असुन नासाच्या  होरायझन या अंतराळ यानातील ( MVIC)  ह्या कॅमेरयाने प्लुटोवरील हे दृष्य टिपले आहे प्लुटोचा नैसर्गिक चंद्र " Titan "  वर दिसणारे धुके व प्लुटोवरील धुके सारखेच असल्याचे मानले जातेय सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नायट्रोजन व मिथेन वायु ह्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे काजळीचे सूक्ष्म कण तयार होतात त्यांना Tholins म्हणतात हे कण पृष्ठ्भागाकडे येताना मात्र मोठे होत जातात

प्लूटोच्या वातावरणातील धुक्याचे हे पहिले रंगीत छायाचित्र नासाच्या होरायझन या अंतराळ यानातील ( MVIC)  ह्या कॅमेरयाने टिपले आहे
Kuiper बेल्ट मध्ये निळ्या आकाशाची कल्पना आजवर कोणीही केली नव्हती हे दृष्य खरोखरच अप्रतिम !वातावरणातील सूक्ष्म कण सूर्यप्रकाशामुळे परावर्तीत झाल्यामुळे त्यांना निळसर रंग प्राप्त झाला आहे
Tholins चा रंग करडा किंवा लाल असतो पण ते निळा रंग कसे परावर्तीत करतात ह्याचे कोडे शास्त्रज्ञ उलगडत आहेत


               फोटो -नासा -होरायझन यानातील MVIC ह्या कॅमेरयाने टिपलेले प्लुटो वरील बर्फ

                                                        प्लुटो वर आढळले बर्फ  
 होरायझन मधील कॅमेरयाने  टिपलेल्या छायाचित्रात प्लुटो वरील भूभागात काही ठिकाणी बर्फाचे पट्टे आढळले आहेत पण खूप कमी ठिकाणी ते दिसतात हे पाण्याचे बर्फ का दिसतेय ह्याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत आणि त्यांच्यासाठी ते मोठे आव्हान आहे
Mery land University च्या विज्ञान संशोधीका सिल्विया प्रोटोपापा म्हणतात कि जिथे पाण्याच्या बर्फाचे पट्टे आढळले आहेत ते छायाचित्रात लाल रंगाचे दिसतात त्या मुळे पाण्याचा बर्फ व लाल रंग प्रदान करणारे थोलीन चे कण ह्याचा काय संबंध आहे ह्याच आम्ही संशोधन करतोय 
New Horizan हे अंतराळ यान पृथ्वीपासून 3.1 billion miles अंतरावर आहे व व्यवस्थित कार्य करत आहे  

मंगळावरच्या वालुकामय भागात आढळला भेगाळलेला पृष्ठभाग

  फोटो -नासा संस्था -HiRISE camera

नासा न्यूज सर्विस -7oct.

मंगळावरच्या वालुकामय भागात भेगाळलेला पृष्ठभाग आढळला असून नासाच्या Mars Reconnaissance Orbiter ह्या यानातील
HiRISE ह्या कॅमेरयाने तो भाग छायाचित्रीत केला आहे
ह्या कॅमेरयामुळे मंगळावरील वातावरणातील घडामोडी ,मातीची धूप ,वारा वादळ माती व मातीच्या कणांचा आकार ह्या बद्दलची अद्ययावत माहिती मिळते
ह्या कॅमेरयाने घेतलेल्या ह्या छायाचित्रात नदीतील गाळ व वाळूच्या थरांमुळे तयार झालेले सेडीमेंटरी खडक काही ठिकाणचा भेगाळलेला भागही दिसतोय त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढलाय की हा भाग वालुकामय आहे म्हणजे तिथे वाळू असावी जर तिथे वाळू आहे तर नक्कीच त्या भागातून पूर्वी नदी वाहात असणार तिथल्या वादळवारया मुळे ,वातावरणतील  विध्वंसक घडामोडींचा परिणाम होऊन नंतर अतीउष्णते मुळे त्या आटून कोरड्या पडल्या पण नदीकाठच्या भागात वर्षानुवर्षे नदीबरोबर वहात आलेल्या गाळामुळे त्यांच्या थरामुळे तिथे वाळूमिश्रित खडक (सेडीमेंटरी रॉक ) तयार झाले पण नंतर बदलेल्या वातावरणामुळे व तो भाग वाळल्यामुळे कडक झाला आणि त्या भागाला भेगा पडल्या असाव्यात
हा भाग ह्या फोटोत ठळक पणे  गडद व खोल दिसत असल्याने मंगळावर पूर्वी पाणी होते ह्या शक्यतेला पृष्ठी तर मिळतेच शिवाय आता नवीन संशोधना नंतर तिथे अजूनही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत नासाचे अंतराळवीर ह्या शक्यतेवर दररोज नवनवीन संशोधन करत आहेत           

Wednesday 7 October 2015

पृथ्वी ते स्पेस स्टेशन कार्गो ट्रफिक

नासा न्यूज  सर्विस -2 oct. 

पृथ्वीवरील शहरी भागातली रस्त्यावरील ट्रफिक आपण नेहमीच पाहतो ,अनुभवतो  कधी,कधी तर ट्रफिक जाम झाल तर जाम वैतागतो देखील पण  हि बातमी आहे ती  ह्या आठवडयातील पृथ्वी ते नासाच स्पेस स्टेशन ह्या  मार्गावरची.
नासाच्या अंतराळ स्थानकावर ह्या आठवडयात  दोन मालवाहू विमानांच्या  (कार्गो ) येण्या जाण्या मुळे अंतराळ स्थानकासाठी रहदारीचा ठरला त्या बाबतीतली माहिती अशी,
अंतराळ स्थानकात पृथ्वीवरून जपानचे HTV-5  हे  कार्गो विमान पाच आठवड्या आधी अंतराळ स्थानकावर गेले होते पाच टन  अत्यावश्यक सामान घेऊन गेलेले हे मालवाहू विमान अजूनही तिथेच होते  ह्या आठवडयात तिथून पृथ्वीकडे  परत निघालेले हे कार्गो विमान एक दिवसानंतर पृथ्वीच्या कक्षेत प्रवेशले  पण प्रशांत महासागराच्या वरच्या परिसरात  येताच ते जळून नष्ट  झाले अंतराळ स्थानकातून येताना अंतराळ वीरांनी त्या मधून टाकाऊ कचरा पाठवला होता तो ह्या कार्गो विमानासोबत जळून गेला

1oct.ला कझाकीस्थान येथून सोडलेले रशियाचे कार्गो विमान सहा तासानंतर अंतराळ स्थानकात पोहोचले
त्यात मोहीम 45 च्या चमुसाठी लागणारी अन्न सामुग्री ,इंधन ,Hardware व इतर सामानांचा त्यात समावेश असून सामानाचे वजन तीन टन आहे हे कार्गो विमान डिसेंबर पर्यंत तिथे राहणार आहे.
सद्या हि  कार्गो विमानांची  पृथ्वी ते अंतरिक्षातील वाहतूक  तुरळक असली तरीही प्रगत देशांचा अंतराळ संशोधनाचा वाढता कल पाहता भविष्यात स्पर्धा वाढून पृथ्वी ते अंतरीक्ष मार्गावर ट्रफिक जाम झाल्यास नवल नाही 

ह्या आठवडयात  अंतराळ स्थानकातील  अंतराळवीर किमिया युई ह्यांनी नियंत्रक वापरून जर्मनी इथे असलेल्या रोवरला निर्देश पाठवले भविष्यात ह्या तंत्रज्ञाना मुळे मंगळाभोवती फिरणारया अंतराळवीरांना मंगळाच्या पृष्ठभागावर कार्यरत असलेल्या रोबोटला नियंत्रित करता येईल  त्या मुळे सद्या  पृथ्वीवरून नियंत्रित करताना होणारा विलंब टाळता येईल.
हे  नवीन तंत्रज्ञान एखाद्या धोकादायक ठिकाणी रोबोट पाठवण्यासाठी  मानवालाही उपयुक्त ठरेल
सद्या मंगळावर वाहते पाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे  ती जर खरी ठरली तर पुढची तयारी
म्हणून अंतराळवीर अशा शक्यतेचा विचार करून नवीन तंत्र विकसित करत आहेत ज्याचा उपयोग मंगळावर उतरलेल्या रोवरला वाहत्या पाण्यातून वाट काढण्यासाठी होईल.   


नासाच्या MAVEN मंगळ यानाला वर्ष पूर्ण

MAVEN ह्या नासाच्या अंतराळ यानाच्या मंगळाच्या कक्षेतील भ्रमणाला  नुकतेच  एक वर्ष पूर्ण झाले असून 
ते यशस्वीपणे तिथे कार्यरत असून त्याने अत्यंत महत्वाची माहिती गोळा केली आहे  
हे अंतराळ यान फ्लोरिडा  येथील Cape Canaveral Air Force Station येथून 18 Nov 2013 प्रक्षेपित करण्यात आले होते ते 21 Sept 2014 ला मंगळाच्या कक्षेत पोहोचले
 MAVEN प्रकल्पाचे प्रमुख संशोधक ब्रूस जॉकोस्की म्हणतात  MAVEN चे हे यश म्हणजे ह्या प्रकल्पातील सर्वच संशोधकांनी केलेल्या अविरत व अथक परिश्रमाचे फलित आहे.16Nov 2014 पासून सुरु झालेल्या मावेन यानाच्या मंगळ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ठ वायू व उत्सर्जनामुळे मंगळाच्या वातावरणात झालेल्या बदलाचा अभ्यास करणे हा असून सर्वात वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंतचा अभ्यास  व त्यातला नेमका संबंध काय ह्या बाबतीतले महत्वपूर्ण संशोधन ह्या अंतराळ याना मार्फत केल्या जातेय .
आणखी दोन महिने हे काम चालेल त्या नंतर मावेनचा कार्यकाळ वाढविल्या जाइल मावेन मार्फत मंगळावरील वातावरणाची अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळवल्या जातेय. 
Mery land  येथील नासाच्या  Godard Space Flight Center येथून मावेन अंतराळ यानाचे नियंत्रण केल्या जातेय . 

MAVEN ने वर्षभरात पूर्ण केलेले महत्वाचे काम :

यशस्वी पणे मंगळ कक्षेत प्रवेश करून स्थिरावल्या नंतर मावेनने
Sliding Spring ह्या धुमकेतुशी  सामना करत यानाची तांत्रिक चाचणी पूर्ण करून 
मंगळ निरीक्षणाचे दहा महिने पूर्ण केले आहेत आणि 
चार वेळा " deep dig " मोहीम ( माती परीक्षणासाठी खोदकाम करणे ) पूर्ण केली आहे 
मावेनचे प्रोजेक्ट Manager Richard Burns ह्यांच्या मते ह्या अंतराळ यानाला मंगळावरील वातावरणाशी जुळवून घेण्याचे अतुलनीय काम मावेन प्रकल्पाच्या चमूने यशस्वीपणे केले आहे.

Nebula veil

                              Nebula veil-फोटो -नासा हबल टेलिस्कोप
नासा संस्था -

       साधारणत:  8000 वर्षापूर्वी अंतरिक्षातील विनाशकारी घडामोडींमुळे सूर्यापेक्षा वीसपट मोठया असलेल्या ग्रहाचा विस्फोट झाला त्याचे अवशेष तुकड्यांच्या रुपात अजूनही अंतराळात फिरत असतात अशाच नष्ठ न झालेल्या ग्रहाच्या एका तुकडया वरील पातळ रंगीबिरंगी पटलाचे  हे आकर्षक छायाचित्र नासाच्या हबल टेलिस्कोप ने टिपले आहे
अंतरिक्षातील धूळ ,हायड्रोजन ,हेलियम व इतर वायूंमुळे तयार झालेले हे रंगीत पटल पृथ्वीपासून 110 प्रकाशवर्ष दूर आहे
त्याला veil nebula  असे  नाव देण्यात आले आहे    

Friday 2 October 2015

मंगळावर पाणी असल्याच्या खुणा सापडल्या नासाकडून दुजोरा

                         फोटो - Nasa-HiRISE Camera- मंगळावरील पाणी असल्याच्या खुणा दर्शविणारया गडद रेषा

नासा संस्था -29sept.

         नासाकडून  मिळालेल्या माहितीनुसार  मंगळावर पूर्वी पाणी होते हे सिध्द करणारे पुरावे मिळाले आहेत
मंगळ ग्रह अपशकुनी ,चांगल्या कार्यात विघ्न आणणारा म्हणून कितीही दोषारोपित असला तरीही शास्त्रज्ञ सतत मंगळावर जीवसृष्टी होती का?  त्यासाठीच आवश्यक वातावरण तिथे होत का ,आताही तिथे सूक्ष्मजीव   आहेत का ?   तिथे जीवसृष्टी असेल तर पाणी असणारच या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मंगळावर मानवरहित यान पाठवून सतत संशोधन करत असतात
आपला भारतही आता मागे राहिलेला नाही नुकतच भारताच्या मंगळ  मोहिमेला  ( MOM)  वर्ष पूर्ण झालय

                                                मंगळावर पाणी होत , नासाकडून पृष्ठी 
नासाच्या  MRO  (  Mars Recnnaissance Orbiter )  द्वारे केलेल्या नवीन संशोधनानुसार मंगळवार पाण्याचे अस्तित्व होते हे सिद्ध करणारे पुरावे मिळाले आहेत  आता नवीन संशोधनात खारट पाण्याचे अंश असलेल्या असंख्य रेषा (  वाहत्या पाण्याच्या धारांच्या खुणा )  मंगळा वरील डोंगर माथ्याच्या उतारावरील  भागात बरयाच ठिकाणी आढळल्या आहेत
MRO च्या इमेजिंग स्पेक्टोमिटर  ह्या उपकरणाच्या साह्याने घेतलेल्या छायाचित्रामध्ये मंगळावरील डोंगरावरील उतार भागातील खडकांमधील खनिजात बाष्प आढळले आहे व ते प्रवाही असल्याच्या खुणा सापडल्या आहेत ह्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे खडकावर परिणाम होऊन त्यांची झीज झाली असावी आणि अति उष्णतेने पाणी आटुन तो भाग कोरडा पडला पण पाणी अतिशय खारट असल्याने त्यातील मिठाचे अस्तित्व तसेच राहिले खडकावरील ह्या वाहत्या पाण्याच्या धारांच्या खुणा मंगळावर पाणी असल्याचा पुरावा देतात असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे
उतार भागात असलेल्या पट्टयात बाष्प मिश्रित खनिज सापडले आहेत विशेष म्हणजे खानिजावरील पडलेल्या वाहत्या पाण्याच्या रेषा उष्ण वातावरणात  गडद व प्रवाही दिसतात तर थंड वातावरणात पुसट  दिसतात  जेव्हा तापमान उणे १०. F (उणे २३.C ) असते तेव्हा गोठल्या मुळे ह्या रेषा ठळकपणे दिसत नाहीत
पण उष्ण तापमानात त्या प्रवाही स्थितीत दिसतात  स्पेक्टोमिटरने केलेल्या निरीक्षणात मंगळावर खारे पाणी असल्याचे पुरावे मिळाले असून मंगळावर जीवसृष्टी होती का? ह्याचा शोध घेण्यासाठी हि माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते कारण पूर्वी जर मंगळावर जीवसृष्टी  असेल आणि ती नंतर नष्ठ झाली असेल तर त्यांचे सूक्ष्म जीवाणू ह्या बाष्पयुक्त खनिजात अस्तित्वात असतील तर ते शोधण्यात वैज्ञानिकांना मदत होईल
पूर्वीपासूनच मंगळाच्या पृष्ठभागावरील उतार भागातील खडकावर जवळपास १०० मीटर लांबीच्या दिसणारया ह्या रेषा मंगळावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे पुरावे देतात  ते पाणी अती उष्णतेने वाळून कोरडे पडल्यामुळे  उतार भागात तयार झालेल्या रेषांच्या स्वरूपात त्या दिसत असाव्यात असा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे बाष्पयुक्त खनिजांमधील रासायनिक घटकांमुळे पाण्याचा गोठणबिंदू कमी होत असावा असेही शास्त्रज्ञांना वाटतेय

                                            पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले 

           फोटो -  HiRISE Camera-   मंगळावरील Garni Creater ह्या उतारावरील भागातील गडद रेषा  


२०१० साली प्रथम ह्या रेषा मुळच्या नेपाळच्या व सद्या जॉर्जिया institute मध्ये कार्यरत असलेल्या लुजेन्द्र ओझा ह्यांना MRO च्या HiRISE  (High Resolution Imaging Science Experiment  )  प्रयोगा दरम्यान घेतलेल्या छायाचित्रामध्ये दिसल्या होत्या पण त्यांचे अस्तित्व चक्रावणारे होते कारण त्या कधी दिसत तर कधी गायब होत त्या मुळे त्यांनी त्या भागाचे हिवाळ्यात व उन्हाळ्यात अजून संशोधन केले आणि मंगळावर अतिशय खारट पाण्याचे स्रोत अस्तित्वात असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला त्यांचा शोध निबंध नेचर Geoscience मध्ये प्रकाशित झाला आहे ओझा ह्यांनी केलेल्या संशोधना नुसार खानिजामध्ये magnesium perchlorate ,magnesium chlorate आणि sodium perrchlorate ह्यांचे मिश्रण असावे काही perchlorate हे अतिथंड तापमानात साध्या पाण्याचे रुपांतर बर्फात होऊ देत नाहीत
आता नवीन संशोधनानुसार मंगळावरील डोंगरातील उतारावरच्या खडकाळ भागात  बरयाच ठिकाणी   खडकाला चरे पडलेले आढळले आहेत पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे देणारया ह्या असंख्य रेषा तिथुन वाहणारया  पाण्याच्या धारांमुळे पडलेल्या असाव्यात  असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे मंगळावरील अंतर्गत व अंतराळातील बाह्य घडामोडी मुळे नंतर तिथले पाणी नष्ठ झाले असावे आणि तिथल्या विरळ वातावरणामुळे जीवसृष्टीहि नष्ठ झाली असावी मंगळावर सजीव असतील  ह्या शक्यतेवर आणि मंगळ यानावरून  मिळालेल्या नवीन छायाचित्रात दिसत असलेल्या तेथील खडकात  fossils च्या खुणा असतील तर त्याचेही संशोधन शास्त्रज्ञानी केल्यानंतर  ह्या शक्यतेला पृष्ठी मिळेल

                                                   मंगळावरील खडक,  वाहत्या पाण्याच्या खुणा व  fossils ?


 २००६ सालापासून वैज्ञानिक सतत MRO  उपकरणाद्वारे मंगळावरील वातावरणाच संशोधन करत आहेत
त्यांच्या मते पूर्वी देखील अशा खारट पाण्याचे अवशेष रेषांच्या रुपात आधळले आहेत
नासाच्या आधीच्या मंगळ मोहिमेतील  Phoenix lander आणि Curiosity Rover ह्यांनी गोळा केलेल्या   मंगळावरील मातिच्या नमुन्या मध्येहि  perchlorate सापडले होते
काही शास्त्रज्ञांच्या मते १९७० ला मंगळावर गेलेल्या व्हायकिंग यानाच्या मंगळ मोहिमेतही  तिथल्या मातीच्या नमुन्यात मिठाचे अस्तित्व आढळले होते आताही खारट पाण्याच्या रेषा शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत त्या मुळे मंगळावर अब्जो वर्षापूर्वी पाणी होते आणि अंतरिक्षातील विनाशकारी घडामोडीमुळे तिथले जीवसृष्टीला आवश्यक वातावरण विरळ झाले व तेथील  अतीउष्णतेने नद्या कोरड्या पडून पाणी आटुन गेले व जीवसृष्टीहि नष्ठ झाली असावी ह्या शक्यतेला पृष्ठी मिळाली आहे
असे असले तरी हे पुरावे छायाचित्रातून ,खनिजातून  मातीतून मिळाले आहेत  प्रत्यक्ष तिथे जाऊन पाणी प्रवाही अवस्थेत अजूनही कोणी पहिले नाही  पण लवकरच मंगळावर मानव पाठविण्याच्या दृष्ठीने नासाचे प्रयत्न सुरु आहेत तरीही ह्या नवीन शोधामुळे मंगळावर पूर्वी पाणी होते व तिथे जीवसृष्टी अस्तित्वात होती अशी शक्यता बरयाच वर्षापासुन वर्तविल्या जात होती  त्याला प्रयोगाअंती शास्त्रज्ञांनी  दुजोरा दिलाय

Tuesday 29 September 2015

सुपर मुन चंद्रग्रहण अमेरिकेतून

 नासा संस्था:- 28 sept  
 28 sept.ला सुपरमून म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राचे खग्रास चंद्रग्रहण होते पर्यंतू ते भारतातील गुजरात व राजस्थानातील काही भागातच खंडग्रास तर महाराष्ट्रात किंचित अंधुकशा सावलीच्या स्वरूपात दिसले
पण 27 sept ला रविवारी अमेरीकेत मात्र खग्रास चंद्रग्रहण दिसले अमेरीकेतील न्युयॉर्क,Washington आणि कॉलोराडो राज्यातील डेनवर येथे दिसलेल्या सुपरमूनच्या खग्रास चंद्रग्रहणाची हि दृश्ये नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी टिपली आणि ती सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केली
                                                 सुपर मुन  
चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचा आकार मोठा व पुर्णाकारात दिसतो त्याला सुपर मून म्हणतात हे चंद्रग्रहण 1982 साली दिसले होते आता ते 2033 साली दिसेल  ग्रहण पहाटे 5.43 पासुन सुरु झाले व एक तास अकरा मिनिटे व एकोणीस सेकंदांनी संपले. 

NEW YORK येथील खग्रास चंद्र ग्रहणाच्या 
सुरवातिच्या क्षणाचे दृश्य
ग्रहण स्पर्श 
फोटो सौजन्य: NASA/Aubrey Gemignani 
                      न्युयार्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग जवळील ग्रहणाच्या 
                         सुरवातीला ग्रहण स्पर्शाचे हे मनोहारी दृश्य नासाच्या
                                 Aubrey Gemignani ह्यांनी टिपलय                                

                                   ग्रहण मध्य 
                                               WASHINGTON स्मारका मागील सुपरमूनच्या खग्रास चंद्र ग्रहणाचे दृश्य  
फोटो सौजन्य : NASA/Bill Ingalls
Washington येथुन Washington स्मारका मागील दिसणारे 
खग्रास चंद्र ग्रहणाचे हे मनोहारी दृश्य टिपलेय नासाच्या बिल Ingalls यांनी.

      कॉलोराडो तील DENVER येथील खग्रास 
  चंद्र ग्रहणाचे शेवटच्या क्षणाचे दृश्य
फोटो सौजन्य : NASA/Bill Ingalls 
     अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील विद्याभवन इमारतीमागे दिसणारे
   पूर्णत्वास येत असलेले हे खग्रास (super moon ) चंद्र ग्रहणाचे 
नयनरम्य दृश्य टिपलय नासाच्या Bill Ingalls यांनी. 

Monday 28 September 2015

नासा संस्थेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थासाठी नाविन्यपूर्ण स्पर्धा जाहीर


photo : NASA
:                                                                                                                                        
नासा  संस्थे तर्फे मिळालेल्या माहिती नुसार-
वाशिंग्टन अंतराळ तंत्रज्ञान मिशन व एरोस्पेस national institute ह्यांच्या संयुक्त विद्यमाने university व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एका अभिनव व नाविन्यपूर्ण स्पर्धेची घोषणा करण्यात आली  आहे 
                                                                        स्पर्धेचा विषय 

       ह्या स्पर्धे साठीचा विषय अंतराळ यान हा असून मंगळावर जाणारया अंतराळ यानाचे वजन व वेग कमी होण्यासाठी अंतराळ यानाच्या वरील आवरणात हवा भरून हा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याचे कसब ह्या स्पर्धेद्वारे विध्यार्थ्यांना दाखवण्याची संधी देण्यात आली आहे
विद्यार्थांना तीन,चार मुलांचा group करून ह्या स्पर्धेत भाग घेत येईल निवड झालेल्या विध्यार्थ्यांच्या group ला 6ooo Dollar stipend  मिळेल स्पर्धेची अंतिम तारीख 15 Nov 2015 हि आहे

                                                                ह्या विषयाची अधिक माहिती 

         HIAD- (hypersonic inflatable aerodynamic decelerator) हे हवा भरलेल्या  उष्णतारोधक आवरणाने लिफ्ट निर्माण करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आहे सद्या एक टन वजनाचे Mars Curiosity Rover हे आता पर्यंतचे मंगळावर सुरक्षितपणे  उतरणारे सर्वात वजनदार उपकरण आहे  पर्यंतू ह्या उपकरणाचा वेग कमी करून सुरक्षितपणे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरविणे हे अंतराळवीरांसाठी  मोठे आव्हान आहे म्हणूनच हवा भरलेले  उष्णता रोधक आवरण वापरून वेग कमी करण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु आहेत त्या मुळे अंतराळ यानाचे वजन कमी होऊन यानाला लिफ्टहि ( उड्डाण क्षमता ) मिळेल असे संशोधकांना वाटतेय 

Wednesday 23 September 2015

नासा मंगळ मिशन news apdates


Sept. 3,1976 ला मंगळावर  3:58 p.m  वाजता Viking Lander 2 ह्या अंतराळ यानाने 330 डिग्री कोनातून घेतलेला युटोपिया प्लानिटिया  ( Utopia Planitia} ह्या पृष्ठभागाचा हा फोटो- नासा संस्था 
नासा संस्था -9 Sept
मंगळावर त्या वेळेस दहा वाजलेले होते ह्या फोटोत सूर्य दिसत नसला तरी मधला भाग प्रकाशमान दिसतोय तर खालील भागात काळोख दिसतोय हा भाग गोलाकार व खोलगट दिसत असला तरी पहिले  viking मंगळ यान जिथे land केले होते त्या भागापेक्षा सपाट आहे पृष्ठ भागावर लांबवर दगड पसरलेले दिसतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत .
काही दगडांना खडडे पडलेले असून ते फेसाळत्या lava रसापासून तयार झालेले दगड असावेत तर काही दगडांना खाचा पडलेल्या असून वारा वादळामुळे वाळू ,धूळ उडून गेल्यामुळे त्यांची धूप झाली असावी अशी शक्यता शास्त्रज्ञाना वाटते 
काही दगडांचा पृष्ठभाग एकसारखा (fine ) दिसत असला तरी त्यात वाळूचे कण नाहीत असेही भूगर्भ शास्त्रज्ञांचे मत आहे     
मंगळावरील पूर्वकालीन खडकाळ भागाचा फोटो
This view combines information from two instruments on NASA's Mars Reconnaissance Orbiter
Nili Fossae हा मंगळ ग्रहावरील खडकाळ भाग -  फोटो -नासा संस्था
नासा - 9 Sept
मंगळावर आढळलेल्या खडकात भरपूर प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड आढळले आहे खूप पूर्वी मंगळावरील वातावरणातील घडामोडीचा परिणाम होऊन तेथील दगडावर रासायनिक प्रक्रिया झाली असावी त्या मुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड कॅर्बोनेटच्या स्वरूपात दगडात मिसळल्या गेले आणि वातावरणातील कार्बनची पातळी कमी झाली असावी असा  निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे  
Nili Fossae ह्या मंगळावरील भागात संशोधन केल्यावर असे आढळले कि पूर्वीच्या तुलनेत कार्बनचे प्रमाण
कमी आहे पूर्वी ते दुप्पट होते आता ते  कार्बन डाय ऑक्साईडच्या स्वरूपात आढळले इतर कोर्बोनेटच्या तुलनेत ते जास्त आहे. ह्या लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर पूर्वी नद्या वहात असतील तर त्या गोठून कोरडया का झाल्या ह्याचा नव्याने संशोधक शोध घेत आहेत. 
ह्या फोटोतल्या अंदाजे 2.3 k. m.  लांबवर पसरलेल्या ह्या भागात कार्बन डाय ऑक्साईडचे भरपूर प्रमाण असलेले खडक आढळले आहेत  Spectrometerच्या सहाय्याने घेतलेल्या ह्या फोटोत  मार्स ऑर्बिटर 2006 Reconnaissance द जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ अप्लाईड फिजिक्सच्या प्रयोगशाळेत संशोधक , मंगळ संशोधनासाठी CRISM, HiRISE आणि चार इतर उपकरणांचा वापर करत आहेत 
ह्या फोटोतील हिरवा रंग असलेल्या खडकात कार्बोनेटचे प्रमाण जास्त आढळते. 
ब्राऊन रंगाच्या खडकात वाळू मिश्रीत olivine मिनरल आढळले तर जांभळा रंग  बेसाल्ट मिश्रीत खडक दर्शवितात खडकांचे प्रकार दाखवण्यासाठी हे कलर दर्शविले आहेत .   

Tuesday 22 September 2015

यवतमाळ येथील रस्त्याला पावसामुळे पडले खडडे

 ह्या वर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाले नंतर मात्र पावसाने दडी मारली त्या मुळे दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असताना मध्यंतरी आठवडाभर पाऊस धो,धो बरसला आणि नागरिकांच्या पाण्याची समस्या दूर झाली पण पुन्हा पाऊस गायब झाला लोक उकाडयाने त्रासले आणि पावसाची आतुरतेने वाट पाहु लागले उशिराने पुन्हा एकदा पाऊस जाता,जाता धो,धो बरसला आणि शेतकरयांबरोबरच लोकही सुखावले

           पाऊस बरसला पण रस्त्यावरची खडी वाहुन गेली ,रस्त्यांना पडले खडडे
पावसाच्या आगमनाने आनंदित झालेले यवतमाळकर पावसामुळे रस्त्याला पडलेल्या खड्डयामुळे हैराण झाले आहेत विशेष म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत अत्यल्प झालेल्या पावसामुळे दोनचार महिन्याआधी दुरुस्त झालेल्या रस्त्याची खडी जागोजागी वाहून गेल्यामुळे  रस्त्याला खड्डे पडले असुन रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे काही ठिकाणच्या स्पीड ब्रेकर वरचीही खडी वाहून गेली आहे दत्त चौक ,दाते कॉलेज चौक ,जाजू चौक ते आझाद मैदान चौक ,आर्णी रोड या बरोबरच इतर अनेक भागातील रस्ते खराब झाले आहेत हे रस्ते इतक्या कमी पावसात ,कमी अवधीत कसे नादुरुस्त झाले असा प्रश्न नागरिकांना पडला असून संबंधित अधिकारयांनी  रस्ता निकृष्ट कसा झाला ह्याची चौकशी करून लोकांच्या शंकेचे निरसन करावे 
व रस्ते लवकरात लवकर कायम स्वरूपी दुरुस्त करावे अशी नागरिकांची मागणी आहे   

Monday 14 September 2015

अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांच्या निवासाला सहा महिने पूर्ण

                                     उरलेल्या सहा महिन्यात करणार आणखी संशोधन  

      फोटो- नासा संस्था                   अमेरिकन  अंतराळवीर Scott Kelly आणि रशियन  cosmonaut Mikhail Kornienko 

 नासा संस्था -15 सप्टेंबर  

                      उद्या  मंगळवार १५ सप्टेंबर ला scott kelly आणि Kornienko हे दोघे त्यांच्या एक वर्षाच्या अंतराळस्थानकातील वास्तव्याचा सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करतील उरलेल्या सहा महिन्यात ते अंतराळ स्थानकात राहून ( मेडिकली ) शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारया परिणामाचे निरीक्षण नोंदवून ह्या आव्हानात्मक अडचणीवर कसे मात करता येईल आणि जास्ती दिवस अंतराळ स्थानकात कसे राहता येईल ह्याचा अभ्यास करतील  हे दोघे अंतराळ स्थानकात 342 दिवसाचे वास्तव्य पूर्ण करून मार्च 2016 मध्ये सोयुझ TMA-18M  ह्या यानाने पृथ्वीवर परततील .  
येत्या काही महिन्यात मोहीम 45 चे हे अंतराळवीर अडीचशेहून अधिक विज्ञान प्रयोग करतील त्यात biology, Earth science, human research, physical sciences, तंत्रज्ञानातील प्रगती विषयक संशोधनाचा समावेश असेल 

                         CALET   टेलिस्कोप द्वारे करणार कॉस्मिक किरणाचे संशोधन  
नुकताच अंतराळ स्थानकात CALorimetric Electron Telescope (CALET) बसवण्यात आला असून ह्या टेलिस्कोप द्वारे अंतराळातील काळोखातील सूक्ष्म घटक , आकाशगंगेतील अतिशक्तिमान ,गतिमान कॉस्मिक किरणे त्याच बरोबर त्यांचा उगम त्यांना  प्राप्त झालेली गती त्यांचा आकाशगंगेतील प्रवास ह्याचा सखोल अभ्यास करतील .  
एकदा का वैज्ञानिकांनी आपल्याला माहित नसलेली हि अनमोल आणि इतर माहिती मिळवली कि अंतराळातील अतिशक्तीशाली किरणे आणि तिथले वातावरण ह्या बाबतीतही उपयुक्त माहिती मिळेल. 

                           अवकाशात ज्योत गोलाकार का दिसते ?  ह्याचेही होणार संशोधन 
 शिवाय तेथील सूक्ष्म गुरुत्वाकार्षाणात ज्वलनाचाही प्रयोग केल्या जातोय ( Flame Extinguishment Experiment-2 JAXA (FLEX-2J) ) असे ह्या प्रयोगाचे नाव आहे . 
ह्या अंतर्गत शास्त्रज्ञानी केलेल्या प्रयोगात असे आढळले आहे कि, पृथ्वीवर ज्योतीच्या स्वरूपात पेटणारा जाळ अंतराळात वेगळा म्हणजे गोलाकारात असतो  कारण तिथे द्रव्य स्वरूपातील ज्वलनशील पदार्थाच्या थेंबाचा आकारही गोलच असतो ह्या प्रयोगाद्वारे हे का व कशामुळे होते ? शिवाय ज्योतीवर तिथल्या वेगाचा व प्रज्वलनाचा कसा प्रभाव पडतो ह्या बाबतीतहि संशोधन करण्यात येतेय ह्यात जर यश मिळाले तर ह्या माहितीचा पृथ्वीवरील इंधनाची बचत व परिणामकारीकता वाढविण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल असे शास्त्रज्ञांना वाटते. 

                            शेवटच्या टप्प्यात होणार मानवी क्रोमोसोम वर संशोधन 
ह्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात मानवी आरोग्याशी संबधित संशोधन करण्यात येणार आहे 
मानवी शरीरातील पेशीमधील क्रोमोसोम्स वर संशोधन करण्यात येणार आहे मानवी रक्तपेशीतील क्रोमोसोम्स च्या टोकावर असणारा टोपीसारखा भाग ज्याला Telomere म्हणतात काळानुसार टेलोमीअरची लांबी कमी होते वाढत्या तणावामुळेहि हि लांबी कमी होते त्याचा मानवी आरोग्यावर अपायकारक  परिणाम होतो परिणामी अकाली वृद्धत्व येणे,हृदयरोग,कॅन्सर आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्यावर होऊ शकते असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे .
ह्या प्रयोगासाठी अंतराळ वीरांचे blood samples घेऊन Telomere च्या लांबीशी संबंधित enzymes वर अंतराळ प्रवासात होणारया बदलावर संशोधन करण्यात येईल त्याचा उपयोग भविष्यात जास्त दिवसाच्या अंतराळ स्थानकातील मुक्कामासाठी होईल विशेषत: पुढील मंगळ मोहिमेसाठी हि माहिती उपयोगी पडेल .    

    Good Morning  स्पेस स्टेशन वरून 

    Good Morning From the International Space Statio - skott kelly    नासा संस्था - (10sept.2015)                                              
पहाटेच्या वेळच्या चंद्र आणि शुक्राचा हा तेजस्वी फोटो  skott kelly ह्यांनी चित्रबद्ध करून सर्वांना पाहण्यासाठी  उपलब्ध केलाय .