Monday 14 September 2015

अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांच्या निवासाला सहा महिने पूर्ण

                                     उरलेल्या सहा महिन्यात करणार आणखी संशोधन  

      फोटो- नासा संस्था                   अमेरिकन  अंतराळवीर Scott Kelly आणि रशियन  cosmonaut Mikhail Kornienko 

 नासा संस्था -15 सप्टेंबर  

                      उद्या  मंगळवार १५ सप्टेंबर ला scott kelly आणि Kornienko हे दोघे त्यांच्या एक वर्षाच्या अंतराळस्थानकातील वास्तव्याचा सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करतील उरलेल्या सहा महिन्यात ते अंतराळ स्थानकात राहून ( मेडिकली ) शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारया परिणामाचे निरीक्षण नोंदवून ह्या आव्हानात्मक अडचणीवर कसे मात करता येईल आणि जास्ती दिवस अंतराळ स्थानकात कसे राहता येईल ह्याचा अभ्यास करतील  हे दोघे अंतराळ स्थानकात 342 दिवसाचे वास्तव्य पूर्ण करून मार्च 2016 मध्ये सोयुझ TMA-18M  ह्या यानाने पृथ्वीवर परततील .  
येत्या काही महिन्यात मोहीम 45 चे हे अंतराळवीर अडीचशेहून अधिक विज्ञान प्रयोग करतील त्यात biology, Earth science, human research, physical sciences, तंत्रज्ञानातील प्रगती विषयक संशोधनाचा समावेश असेल 

                         CALET   टेलिस्कोप द्वारे करणार कॉस्मिक किरणाचे संशोधन  
नुकताच अंतराळ स्थानकात CALorimetric Electron Telescope (CALET) बसवण्यात आला असून ह्या टेलिस्कोप द्वारे अंतराळातील काळोखातील सूक्ष्म घटक , आकाशगंगेतील अतिशक्तिमान ,गतिमान कॉस्मिक किरणे त्याच बरोबर त्यांचा उगम त्यांना  प्राप्त झालेली गती त्यांचा आकाशगंगेतील प्रवास ह्याचा सखोल अभ्यास करतील .  
एकदा का वैज्ञानिकांनी आपल्याला माहित नसलेली हि अनमोल आणि इतर माहिती मिळवली कि अंतराळातील अतिशक्तीशाली किरणे आणि तिथले वातावरण ह्या बाबतीतही उपयुक्त माहिती मिळेल. 

                           अवकाशात ज्योत गोलाकार का दिसते ?  ह्याचेही होणार संशोधन 
 शिवाय तेथील सूक्ष्म गुरुत्वाकार्षाणात ज्वलनाचाही प्रयोग केल्या जातोय ( Flame Extinguishment Experiment-2 JAXA (FLEX-2J) ) असे ह्या प्रयोगाचे नाव आहे . 
ह्या अंतर्गत शास्त्रज्ञानी केलेल्या प्रयोगात असे आढळले आहे कि, पृथ्वीवर ज्योतीच्या स्वरूपात पेटणारा जाळ अंतराळात वेगळा म्हणजे गोलाकारात असतो  कारण तिथे द्रव्य स्वरूपातील ज्वलनशील पदार्थाच्या थेंबाचा आकारही गोलच असतो ह्या प्रयोगाद्वारे हे का व कशामुळे होते ? शिवाय ज्योतीवर तिथल्या वेगाचा व प्रज्वलनाचा कसा प्रभाव पडतो ह्या बाबतीतहि संशोधन करण्यात येतेय ह्यात जर यश मिळाले तर ह्या माहितीचा पृथ्वीवरील इंधनाची बचत व परिणामकारीकता वाढविण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल असे शास्त्रज्ञांना वाटते. 

                            शेवटच्या टप्प्यात होणार मानवी क्रोमोसोम वर संशोधन 
ह्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात मानवी आरोग्याशी संबधित संशोधन करण्यात येणार आहे 
मानवी शरीरातील पेशीमधील क्रोमोसोम्स वर संशोधन करण्यात येणार आहे मानवी रक्तपेशीतील क्रोमोसोम्स च्या टोकावर असणारा टोपीसारखा भाग ज्याला Telomere म्हणतात काळानुसार टेलोमीअरची लांबी कमी होते वाढत्या तणावामुळेहि हि लांबी कमी होते त्याचा मानवी आरोग्यावर अपायकारक  परिणाम होतो परिणामी अकाली वृद्धत्व येणे,हृदयरोग,कॅन्सर आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्यावर होऊ शकते असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे .
ह्या प्रयोगासाठी अंतराळ वीरांचे blood samples घेऊन Telomere च्या लांबीशी संबंधित enzymes वर अंतराळ प्रवासात होणारया बदलावर संशोधन करण्यात येईल त्याचा उपयोग भविष्यात जास्त दिवसाच्या अंतराळ स्थानकातील मुक्कामासाठी होईल विशेषत: पुढील मंगळ मोहिमेसाठी हि माहिती उपयोगी पडेल .    

    Good Morning  स्पेस स्टेशन वरून 

    Good Morning From the International Space Statio - skott kelly    नासा संस्था - (10sept.2015)                                              
पहाटेच्या वेळच्या चंद्र आणि शुक्राचा हा तेजस्वी फोटो  skott kelly ह्यांनी चित्रबद्ध करून सर्वांना पाहण्यासाठी  उपलब्ध केलाय . 

No comments:

Post a Comment