Wednesday 23 September 2015

नासा मंगळ मिशन news apdates


Sept. 3,1976 ला मंगळावर  3:58 p.m  वाजता Viking Lander 2 ह्या अंतराळ यानाने 330 डिग्री कोनातून घेतलेला युटोपिया प्लानिटिया  ( Utopia Planitia} ह्या पृष्ठभागाचा हा फोटो- नासा संस्था 
नासा संस्था -9 Sept
मंगळावर त्या वेळेस दहा वाजलेले होते ह्या फोटोत सूर्य दिसत नसला तरी मधला भाग प्रकाशमान दिसतोय तर खालील भागात काळोख दिसतोय हा भाग गोलाकार व खोलगट दिसत असला तरी पहिले  viking मंगळ यान जिथे land केले होते त्या भागापेक्षा सपाट आहे पृष्ठ भागावर लांबवर दगड पसरलेले दिसतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत .
काही दगडांना खडडे पडलेले असून ते फेसाळत्या lava रसापासून तयार झालेले दगड असावेत तर काही दगडांना खाचा पडलेल्या असून वारा वादळामुळे वाळू ,धूळ उडून गेल्यामुळे त्यांची धूप झाली असावी अशी शक्यता शास्त्रज्ञाना वाटते 
काही दगडांचा पृष्ठभाग एकसारखा (fine ) दिसत असला तरी त्यात वाळूचे कण नाहीत असेही भूगर्भ शास्त्रज्ञांचे मत आहे     
मंगळावरील पूर्वकालीन खडकाळ भागाचा फोटो
This view combines information from two instruments on NASA's Mars Reconnaissance Orbiter
Nili Fossae हा मंगळ ग्रहावरील खडकाळ भाग -  फोटो -नासा संस्था
नासा - 9 Sept
मंगळावर आढळलेल्या खडकात भरपूर प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड आढळले आहे खूप पूर्वी मंगळावरील वातावरणातील घडामोडीचा परिणाम होऊन तेथील दगडावर रासायनिक प्रक्रिया झाली असावी त्या मुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड कॅर्बोनेटच्या स्वरूपात दगडात मिसळल्या गेले आणि वातावरणातील कार्बनची पातळी कमी झाली असावी असा  निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे  
Nili Fossae ह्या मंगळावरील भागात संशोधन केल्यावर असे आढळले कि पूर्वीच्या तुलनेत कार्बनचे प्रमाण
कमी आहे पूर्वी ते दुप्पट होते आता ते  कार्बन डाय ऑक्साईडच्या स्वरूपात आढळले इतर कोर्बोनेटच्या तुलनेत ते जास्त आहे. ह्या लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर पूर्वी नद्या वहात असतील तर त्या गोठून कोरडया का झाल्या ह्याचा नव्याने संशोधक शोध घेत आहेत. 
ह्या फोटोतल्या अंदाजे 2.3 k. m.  लांबवर पसरलेल्या ह्या भागात कार्बन डाय ऑक्साईडचे भरपूर प्रमाण असलेले खडक आढळले आहेत  Spectrometerच्या सहाय्याने घेतलेल्या ह्या फोटोत  मार्स ऑर्बिटर 2006 Reconnaissance द जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ अप्लाईड फिजिक्सच्या प्रयोगशाळेत संशोधक , मंगळ संशोधनासाठी CRISM, HiRISE आणि चार इतर उपकरणांचा वापर करत आहेत 
ह्या फोटोतील हिरवा रंग असलेल्या खडकात कार्बोनेटचे प्रमाण जास्त आढळते. 
ब्राऊन रंगाच्या खडकात वाळू मिश्रीत olivine मिनरल आढळले तर जांभळा रंग  बेसाल्ट मिश्रीत खडक दर्शवितात खडकांचे प्रकार दाखवण्यासाठी हे कलर दर्शविले आहेत .   

No comments:

Post a Comment