Thursday 24 December 2015

Scott Kelly आणि Tim Kopra या अंतराळवीरांचा थरारक space walk यशस्वी


                                  टीम कोप्रा स्पेस walk करतानाचा थरारक क्षण                                फोटो -नासा संस्था

                                  Scott Kelly चाही स्पेस walk दरम्यानचा थरारक क्षण                      फोटो -नासा संस्था
नासा संस्था -22dec.

नासाचे अंतराळवीर Scott Kelly व Tim Kopra यांनी २१ डिसेंबरला अंतराळ स्थानका बाहेर तीन तास सोळा मिनिटेचा  space walk केला Scott Kelly यांचा हा तिसरा तर Tim Kopra ह्यांचा हा दुसरा space walk होता
 दोन्ही अंतराळवीरांनी हा स्पेस walk यांत्रिक कामासाठी केला बुधवारी रशियन कार्गो सप्लाय स्पेस क्राफ्ट आवश्यक सामान घेऊन अंतराळ स्थानकात येणार असल्यामुळे त्याच्या आगमनाच्या तयारीसाठी हा स्पेस walk होता
अंतराळ वीरांनी space walk मध्ये काम केल 
 Scott kelly ह्यांनी स्पेस walk मध्ये अंतराळ स्थानकाची मोबाइल ट्रान्स्पोर्ट कार योग्य ठिकाणी हलविली तसेच U .S क़मर्शियल क्रु च्या वाहनासाठी आवश्यक केबल जोड तयार ठेवला
आणि Tim Kopra  यांनी  रशियन laboratory module  अंतराळ स्थानकाशी जोडण्यासाठी Ethernet cable तयार ठेवली
 दोन्हीही अंतराळ वीरांनी  ह्या स्पेस walk दरम्यान अंतराळ स्थानकाच्या बाहेरील यंत्र पेटीतून काही आवश्यक यंत्र सामुग्रीही काढली जी पुढील कामासाठी आवश्यक आहेत
अंतराळवीरांसाठी हा स्पेस walk अत्यंत कठीण व घातक असतो क्षणाचीही चूक किंवा विलंब जीवावर बेतू शकतो त्या मुळेच हा  यशस्वी स्पेस walk अंतराळ वीरांसाठी अभिनंदनीय आहे

No comments:

Post a Comment