अंतराळ स्थानकात उगवलेली हि झीनियाची टवटवीत रोपे फोटो -नासा संस्था
नासा संस्था 23 dec.2015
अंतराळ स्थानकातील VEG -O1 ह्या व्हेजी शोध प्रकल्पा अंतर्गत लावलेली झीनियाची रोपे अंकुरली असून हि रोपे पृथ्वीवरच्या रोपापेक्षा मोठी दिसत असून त्यांना लवकरच कळ्या येथील अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय नव्हे तसा त्यांना विश्वास आहे कारण ह्या आधीही त्यांनी लावलेल्या अंतराळ स्थानकातील लेट्युसच्या रोपाला पाने आली आणि अंतराळवीरांनी ती खाल्ली देखील
व्हेजी ह्या शोध प्रकल्पा अंतर्गत अंतराळ स्थानकात लागवड केलेली रोपे एका चेंबर मध्ये वाढवल्या जात आहेत तिथे त्यांना आवश्यक पोषक द्रव्ये व प्रकाश दिल्या जातोय ह्या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीत रोपे कशी वाढतात हे जाणुन घेण्यासाठी झीनियाची लागवड केल्या गेली व शास्त्रज्ञांना अपेक्षे प्रमाणे ह्या अभिनव व नाविन्यपूर्ण प्रयोगात यशही मिळालय आणि त्यांच्या प्रयत्न आणि मेहनतीच फळ आता अंतराळ स्थानकात बहरलेल्या झीनियाच्या फुलांच्या रुपात लवकरच पहायला मिळेल
No comments:
Post a Comment