फोटो - NASA / Goddard/Arizona State University
12Oct 2015.ला नासाच्या LRO ( Lunar Reconnaissance Orbiter) ह्या यानातुन उगवत्या पृथ्वीच हे नयनरम्य दृश्य अचूक टीपलय
नासा संस्था -18 dec.
सूर्याच्या किंवा चंद्राच्या उगवत्या मावळत्या क्षणाच आल्हाददायी दृश्य आपण नेहमीच पाहतो पण आपण उगवत्या पृथ्वीच नयनरम्य दृश्य पाहतोय हि कल्पनाच किती सुंदर अन नाविन्यपूर्ण अन तितकीच अविश्वसनीयही! अर्थात पृथ्वीवर राहणारया मानवाला उगवत्या पृथ्वीच मनमोहक दृश्य दिसण केवळ अशक्यच ! पण अंतराळातून मात्र हि कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते आणि उगवत्या पृथ्वीच निसर्गरम्य दृश्य अंतराळवीर किंवा यानामुळे आपल्यापर्यंत छायाचित्राच्या रूपात पाहता येऊ शकत
सरत्या वर्षाच्या शेवटी नासाच्या संशोधकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हि कल्पना प्रत्यक्षात साकार केलीय
LRO ने चंद्राच्या Comton विवरापासून 83 mile दूर अंतरावरून हे छायाचित्र घेतल त्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले आणि अखेर अनेक छायाचित्रे एक करून तयार झालेल हे छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचल
ह्या छायाचित्रात पृथ्वी चंद्राच्या क्षीतीजा वरून उगवताना दिसतेय तसेच ह्या छायाचित्रात उजव्या बाजूला सहारा वाळवंट दिसतेय तर पलीकडे सौदी अरेबिया आणि साउथ अमेरिकेची अटलांटिक किनारपट्टी सुद्धा दिसतेय
नासाच्या मेरिलंड येथील Goddard Space Flight Centerयेथील Deputy Project Scientist Noah Petro म्हणतात कि ,"पृथ्वी उगवतानाचे हे सुंदर छायाचित्र पाहून 43 वर्षापूर्वीच्या अपोलो 17 ह्या चांद्रमोहिमेदरम्यान काढलेल्या पृथ्वीच्या छायाचित्राची आठवण येते त्या फोटोतही आफ्रिका देशाचा भाग ठळकपणे दिसत होता "
जून 18-2009 ला LRO हे यान launch केल्या गेले आणि त्याने त्याच्या सात शक्तिशाली instrumentच्या सहाय्याने आतापर्यंत चंद्राची अत्यंत महत्वपूर्ण माहिती गोळा केलीय
पृथ्वीवर चंद्राचे उगवणे मावळणे नेहमीचआल्हाददायी असते पण चंद्रावर अंतराळवीरांना वेगळेच दृश्य दिसते चंद्रावर पृथ्वी कधीच उगवताना वा मावळताना दिसत नाही तर क्षितिजावर पृथ्वी नेहमी स्थिर दिसते अस Arizona state University चे Mark Robinson हे संशोधक सांगतात
No comments:
Post a Comment