Friday 4 December 2015

वीस वर्षानंतरही SOHO कार्यक्षम

                 फोटो -NASA /ESA /SOHO
नासा संस्था -1dec.
नासा आणि इसा च्या स्पेस मधील सोलर आणि हेलिओस्पिअरिक ऑबझरवेटरी (SOHO ) (वेधशाळा) वीस वर्षानंतर अजूनही भक्कम आणि कार्यरत आहे व नासा आणि ESA SOHOच्या वीस वर्षाच्या यशस्वी कार्यशीलतेचा आनंद सद्या साजरा करत आहेत
1995 मध्ये सूर्य व सौर मंडलातील उत्सर्जित होणारी प्रचंड उष्णता ,सौरउर्जा ,सौरवादळ ह्यांचा सखोल अभ्यास  करण्यासाठी SOHO कार्यान्वित करण्यात आली सूर्यावरील सौरवादळ ,सौरत्सुनामी व सौर भूकंप ह्याचा शोध घेण्यास SOHO मुळे मदत झाली असून अनपेक्षितपणे धुमकेतू शोधण्याचे कामही SOHO ने केले आहे आतापर्यंत SOHO ने सुमारे 5000  धुमकेतू  शोधले आहेत

काय आहे SOHO
SOHO हे NASA व ESA ह्यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एक Space Craft आहे
सुरवातीला दोन वर्षासाठी पाठवण्यात आलेले SOHO वीस वर्ष होऊनही अजूनही भक्कमपणे कार्यरत  आहे आता त्याची मुदत डिसेंबर 2016 पर्यंत वाढविण्यात आलीय
ह्या छायाचित्रात सूर्यापासून उत्सर्जित झालेली प्रचंड गतिमान उर्जा व विद्युत भारीत ढगांचे झोत दोन विरुध्द दिशेला जाताना दिसत आहेत ह्या सौर पदार्थातील चुंबकीय शक्ती पृथ्वीच्या वातावरणातील चुंबकीय शक्तीकडे आकर्षित झाल्यास भूचुंबकीय वादळ होऊ शकते

No comments:

Post a Comment