ह्या वर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाले नंतर मात्र पावसाने दडी मारली त्या मुळे दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असताना मध्यंतरी आठवडाभर पाऊस धो,धो बरसला आणि नागरिकांच्या पाण्याची समस्या दूर झाली पण पुन्हा पाऊस गायब झाला लोक उकाडयाने त्रासले आणि पावसाची आतुरतेने वाट पाहु लागले उशिराने पुन्हा एकदा पाऊस जाता,जाता धो,धो बरसला आणि शेतकरयांबरोबरच लोकही सुखावले
पाऊस बरसला पण रस्त्यावरची खडी वाहुन गेली ,रस्त्यांना पडले खडडे
पावसाच्या आगमनाने आनंदित झालेले यवतमाळकर पावसामुळे रस्त्याला पडलेल्या खड्डयामुळे हैराण झाले आहेत विशेष म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत अत्यल्प झालेल्या पावसामुळे दोनचार महिन्याआधी दुरुस्त झालेल्या रस्त्याची खडी जागोजागी वाहून गेल्यामुळे रस्त्याला खड्डे पडले असुन रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे काही ठिकाणच्या स्पीड ब्रेकर वरचीही खडी वाहून गेली आहे दत्त चौक ,दाते कॉलेज चौक ,जाजू चौक ते आझाद मैदान चौक ,आर्णी रोड या बरोबरच इतर अनेक भागातील रस्ते खराब झाले आहेत हे रस्ते इतक्या कमी पावसात ,कमी अवधीत कसे नादुरुस्त झाले असा प्रश्न नागरिकांना पडला असून संबंधित अधिकारयांनी रस्ता निकृष्ट कसा झाला ह्याची चौकशी करून लोकांच्या शंकेचे निरसन करावे
व रस्ते लवकरात लवकर कायम स्वरूपी दुरुस्त करावे अशी नागरिकांची मागणी आहे
No comments:
Post a Comment