फोटो -नासा संस्था
नासा संस्था -11dec.
नासाच्या अंतराळ मोहीम 45 चे अंतराळवीर केजल लिंडग्रेन अंतराळ स्थानकातील आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून 11dec.ला पृथ्वीवर सुखरूप परतले त्यांच्या सोबत रशियन स्पेस एजन्सीचे Flight Engineer Oleg Kononenko आणि जपानच्या स्पेस एजन्सीचे अंतराळवीर Kimiya Yui हे सुद्धा परतले
हे क्रु मेंबर कझाकीस्थान च्या उत्तरेकडील भागात सोयुझ स्पेक्टोक्राफ्ट मधून तिथल्या स्थानिक वेळेनुसार अंदाजे रात्री 8.12 m वाजता सुखरूप पोहोचले
ह्या मोहिमेतील Oleg Kononenko ह्यांनी अंतराळ स्थानकात 533 दिवस तर केजल आणि युई ह्यांनी 141 दिवस मुक्काम केला
त्यांच्या ह्या अंतराळ स्थानकातील नीवासादरम्यान त्यांनी पृथ्वी निरीक्षण तर केलेच शिवाय भौतिक ,जैविक आणि आण्विक विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केलीय त्यांनी केलेले तंत्रज्ञानातील संशोधन नाविन्यपूर्ण असून हे प्रयोग पृथ्वीला लाभदायक ठरले असून भविष्यात अंतराळातील खोलवरच्या भागात मानवाला जास्त दिवस राहून मानवी व रोबोटिक संशोधनासाठी उपयुक्त ठरतील आणि आगामी मोहीम अधिक सक्षम व कल्पकतेने राबविता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतोय
ऑगस्ष्ट महिन्यात केजल लिंडग्रेन व युई ह्यांचा Veggie plant growth ह्या मोहिमेत सहभाग होता ह्या मोहिमे अंतर्गत अंतराळात वनस्पती लागवडीचा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला त्यांच्या प्रयत्नांनी अंतराळात वनस्पती उगवली आणि झाडाला लेट्यूसची ताजी पानेही आली ह्या नव्या प्रयोगामुळे आता अंतराळ स्थानकातील अंतराळ वीरांसाठी अंतराळात ताजी फळे ,भाजी व अन्नही पिकवता येईल अशी शक्यता निर्माण झाली असून नासाच्या जास्त दिवसाच्या अंतराळ मोहिमेतील मुक्कामात फावल्या वेळात अंतराळ वीरांना बागकामाचाही आनंद घेता येईल शिवाय नवीन संशोधन पृथ्वीवरील बायोमास वाढीच्या व सुधारणेच्या प्रगतीसाठीही उपयुक्त ठरेल मोहीम 45च्या अंतराळवीरांनी दूरवरच्या अंतराळ प्रवासादरम्यान मानवी आरोग्याच्या व्यवस्थापना विषयीही महत्व पूर्ण संशोधन केले आहे
ह्या मोहिमे दरम्यान तीन कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळ वीरांसाठी लागणारे व प्रयोगासाठीचे आवश्यक असलेले काही टन सामान घेऊन अंतराळ स्थानकात पाठवण्यात आले

लिंडग्रेन ह्यांनी अंतराळ निवासा दरम्यान दोनवेळा स्पेस walk केला पहिला स्पेस walk स्थानकाच्या मेंटनन्स साठी व दुसरा यानाची अमोनिया कुलिंग सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी होता
सद्या Skott Kelly ह्यांच्या नेतृत्वात 46 वी अंतराळ मोहीम सुरु असून त्यांच्या सोबत Kornienko आणि Sergey Volkov (Roscosmos) हे दोन अंतराळवीर चार दिवस अंतराळ स्थानकात असून नासाचे Tim Kopra रशियाचे Yuri Malenchenko आणि Tim Peake हे आणखी तीन अंतराळवीर 15 डिसेंबरला त्यांच्या सोबत अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जातील
No comments:
Post a Comment