Friday 2 October 2015

मंगळावर पाणी असल्याच्या खुणा सापडल्या नासाकडून दुजोरा

                         फोटो - Nasa-HiRISE Camera- मंगळावरील पाणी असल्याच्या खुणा दर्शविणारया गडद रेषा

नासा संस्था -29sept.

         नासाकडून  मिळालेल्या माहितीनुसार  मंगळावर पूर्वी पाणी होते हे सिध्द करणारे पुरावे मिळाले आहेत
मंगळ ग्रह अपशकुनी ,चांगल्या कार्यात विघ्न आणणारा म्हणून कितीही दोषारोपित असला तरीही शास्त्रज्ञ सतत मंगळावर जीवसृष्टी होती का?  त्यासाठीच आवश्यक वातावरण तिथे होत का ,आताही तिथे सूक्ष्मजीव   आहेत का ?   तिथे जीवसृष्टी असेल तर पाणी असणारच या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मंगळावर मानवरहित यान पाठवून सतत संशोधन करत असतात
आपला भारतही आता मागे राहिलेला नाही नुकतच भारताच्या मंगळ  मोहिमेला  ( MOM)  वर्ष पूर्ण झालय

                                                मंगळावर पाणी होत , नासाकडून पृष्ठी 
नासाच्या  MRO  (  Mars Recnnaissance Orbiter )  द्वारे केलेल्या नवीन संशोधनानुसार मंगळवार पाण्याचे अस्तित्व होते हे सिद्ध करणारे पुरावे मिळाले आहेत  आता नवीन संशोधनात खारट पाण्याचे अंश असलेल्या असंख्य रेषा (  वाहत्या पाण्याच्या धारांच्या खुणा )  मंगळा वरील डोंगर माथ्याच्या उतारावरील  भागात बरयाच ठिकाणी आढळल्या आहेत
MRO च्या इमेजिंग स्पेक्टोमिटर  ह्या उपकरणाच्या साह्याने घेतलेल्या छायाचित्रामध्ये मंगळावरील डोंगरावरील उतार भागातील खडकांमधील खनिजात बाष्प आढळले आहे व ते प्रवाही असल्याच्या खुणा सापडल्या आहेत ह्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे खडकावर परिणाम होऊन त्यांची झीज झाली असावी आणि अति उष्णतेने पाणी आटुन तो भाग कोरडा पडला पण पाणी अतिशय खारट असल्याने त्यातील मिठाचे अस्तित्व तसेच राहिले खडकावरील ह्या वाहत्या पाण्याच्या धारांच्या खुणा मंगळावर पाणी असल्याचा पुरावा देतात असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे
उतार भागात असलेल्या पट्टयात बाष्प मिश्रित खनिज सापडले आहेत विशेष म्हणजे खानिजावरील पडलेल्या वाहत्या पाण्याच्या रेषा उष्ण वातावरणात  गडद व प्रवाही दिसतात तर थंड वातावरणात पुसट  दिसतात  जेव्हा तापमान उणे १०. F (उणे २३.C ) असते तेव्हा गोठल्या मुळे ह्या रेषा ठळकपणे दिसत नाहीत
पण उष्ण तापमानात त्या प्रवाही स्थितीत दिसतात  स्पेक्टोमिटरने केलेल्या निरीक्षणात मंगळावर खारे पाणी असल्याचे पुरावे मिळाले असून मंगळावर जीवसृष्टी होती का? ह्याचा शोध घेण्यासाठी हि माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते कारण पूर्वी जर मंगळावर जीवसृष्टी  असेल आणि ती नंतर नष्ठ झाली असेल तर त्यांचे सूक्ष्म जीवाणू ह्या बाष्पयुक्त खनिजात अस्तित्वात असतील तर ते शोधण्यात वैज्ञानिकांना मदत होईल
पूर्वीपासूनच मंगळाच्या पृष्ठभागावरील उतार भागातील खडकावर जवळपास १०० मीटर लांबीच्या दिसणारया ह्या रेषा मंगळावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे पुरावे देतात  ते पाणी अती उष्णतेने वाळून कोरडे पडल्यामुळे  उतार भागात तयार झालेल्या रेषांच्या स्वरूपात त्या दिसत असाव्यात असा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे बाष्पयुक्त खनिजांमधील रासायनिक घटकांमुळे पाण्याचा गोठणबिंदू कमी होत असावा असेही शास्त्रज्ञांना वाटतेय

                                            पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले 

           फोटो -  HiRISE Camera-   मंगळावरील Garni Creater ह्या उतारावरील भागातील गडद रेषा  


२०१० साली प्रथम ह्या रेषा मुळच्या नेपाळच्या व सद्या जॉर्जिया institute मध्ये कार्यरत असलेल्या लुजेन्द्र ओझा ह्यांना MRO च्या HiRISE  (High Resolution Imaging Science Experiment  )  प्रयोगा दरम्यान घेतलेल्या छायाचित्रामध्ये दिसल्या होत्या पण त्यांचे अस्तित्व चक्रावणारे होते कारण त्या कधी दिसत तर कधी गायब होत त्या मुळे त्यांनी त्या भागाचे हिवाळ्यात व उन्हाळ्यात अजून संशोधन केले आणि मंगळावर अतिशय खारट पाण्याचे स्रोत अस्तित्वात असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला त्यांचा शोध निबंध नेचर Geoscience मध्ये प्रकाशित झाला आहे ओझा ह्यांनी केलेल्या संशोधना नुसार खानिजामध्ये magnesium perchlorate ,magnesium chlorate आणि sodium perrchlorate ह्यांचे मिश्रण असावे काही perchlorate हे अतिथंड तापमानात साध्या पाण्याचे रुपांतर बर्फात होऊ देत नाहीत
आता नवीन संशोधनानुसार मंगळावरील डोंगरातील उतारावरच्या खडकाळ भागात  बरयाच ठिकाणी   खडकाला चरे पडलेले आढळले आहेत पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे देणारया ह्या असंख्य रेषा तिथुन वाहणारया  पाण्याच्या धारांमुळे पडलेल्या असाव्यात  असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे मंगळावरील अंतर्गत व अंतराळातील बाह्य घडामोडी मुळे नंतर तिथले पाणी नष्ठ झाले असावे आणि तिथल्या विरळ वातावरणामुळे जीवसृष्टीहि नष्ठ झाली असावी मंगळावर सजीव असतील  ह्या शक्यतेवर आणि मंगळ यानावरून  मिळालेल्या नवीन छायाचित्रात दिसत असलेल्या तेथील खडकात  fossils च्या खुणा असतील तर त्याचेही संशोधन शास्त्रज्ञानी केल्यानंतर  ह्या शक्यतेला पृष्ठी मिळेल

                                                   मंगळावरील खडक,  वाहत्या पाण्याच्या खुणा व  fossils ?


 २००६ सालापासून वैज्ञानिक सतत MRO  उपकरणाद्वारे मंगळावरील वातावरणाच संशोधन करत आहेत
त्यांच्या मते पूर्वी देखील अशा खारट पाण्याचे अवशेष रेषांच्या रुपात आधळले आहेत
नासाच्या आधीच्या मंगळ मोहिमेतील  Phoenix lander आणि Curiosity Rover ह्यांनी गोळा केलेल्या   मंगळावरील मातिच्या नमुन्या मध्येहि  perchlorate सापडले होते
काही शास्त्रज्ञांच्या मते १९७० ला मंगळावर गेलेल्या व्हायकिंग यानाच्या मंगळ मोहिमेतही  तिथल्या मातीच्या नमुन्यात मिठाचे अस्तित्व आढळले होते आताही खारट पाण्याच्या रेषा शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत त्या मुळे मंगळावर अब्जो वर्षापूर्वी पाणी होते आणि अंतरिक्षातील विनाशकारी घडामोडीमुळे तिथले जीवसृष्टीला आवश्यक वातावरण विरळ झाले व तेथील  अतीउष्णतेने नद्या कोरड्या पडून पाणी आटुन गेले व जीवसृष्टीहि नष्ठ झाली असावी ह्या शक्यतेला पृष्ठी मिळाली आहे
असे असले तरी हे पुरावे छायाचित्रातून ,खनिजातून  मातीतून मिळाले आहेत  प्रत्यक्ष तिथे जाऊन पाणी प्रवाही अवस्थेत अजूनही कोणी पहिले नाही  पण लवकरच मंगळावर मानव पाठविण्याच्या दृष्ठीने नासाचे प्रयत्न सुरु आहेत तरीही ह्या नवीन शोधामुळे मंगळावर पूर्वी पाणी होते व तिथे जीवसृष्टी अस्तित्वात होती अशी शक्यता बरयाच वर्षापासुन वर्तविल्या जात होती  त्याला प्रयोगाअंती शास्त्रज्ञांनी  दुजोरा दिलाय

No comments:

Post a Comment