Sunday 30 December 2018

नासाच्या पहिल्या मानवी चांद्रमोहीमेला झाली 50 वर्षे पूर्ण


Earthrise         चंद्राभोवती फेऱ्या मारताना Apollo मधून 24 डिसेंबर 1968ला घेतलेले  उगवत्या पृथ्वीचे हे विहंगम दृश्य
 फोटो- नासा संस्था

नासा संस्था - 
आकाशातील उगवता चंद्र नेहमीच मानवाला भुरळ पाडतो त्याची शीतलता मंद प्रकाशआणि त्याच चांदण्यातल अलौकिक सौन्दर्य! मग ती कलाकलाने वाढणारी चंद्रकोर असो कि पोर्णिमेचा प्रकाशमान पूर्ण चंद्र. कवी असो कि प्रेमीजन,चंद्राला पाहून कवींना कविता स्फुरते लेखकांना लेख. सौन्दर्याला तर चंद्राचीच उपमा दिल्या जाते
असा हा चंद्र सामान्यजनांप्रमाणेच वैज्ञानिकांनाही तेव्हढाच भुरळ पाडतो हा चंद्र कसा आहे त्या वर पृथ्वीसारखी सृष्टी आहे का? तिथे मानवाला अनुकूल वातावरण आहे का? ह्याचा शोध पूर्वीपासूनच शास्त्रज्ञ घेत आले आहेत आणि म्हणूनच शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ एकत्र आले आणि मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आणि चंद्राविषयीच कुतूहल शमल आपला भारत देशही त्यात मागे नव्हता आता तर मानवाने आकाशातील एक एक ग्रह पार करत सूर्यालाही गवसणी घातलीय त्या मुळे चांद्रमोहिमेच तितकस कौतुक राहील नाही
पण आधी अस नव्हत आकाशात दुरून दिसणाऱ्या चंद्राला गवसणी घालण अकल्पित आणि अश्यक्यप्राय होत पण शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमाने आणि आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वप्न साकार केल अमेरिकेच्या नासा संस्थेने प्रथम मानवाला अंतराळात पाठवल आणि त्यांनी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून आकाशातील चंद्र कसा दिसतो तिथून आपली पृथ्वी कशी दिसते ह्याच वर्णन करत तिथले फोटोही काढले त्या वेळी आतासारखी अत्याधुनिक यंत्रणा नव्हती तो दिवस होता 24 डिसेंबर 1968
यंदाच्या मेरी क्रिसमसला नासाच्या मानवी चांद्रमोहिमेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत पन्नास वर्षांपूर्वी प्रथमच मानवाने अपोलो यानातून चंद्राभोवती यशस्वी प्रदक्षिणा घातल्या होत्या
नासाच्या ह्या अभूतपूर्व यशाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि ह्या यशाला उजाळा देण्यासाठी नासा संस्थेने नुकतेच अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे SPIRIT  OF APOLLO ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
ह्या कार्यक्रमात नासाच्या Space Flight मध्ये मैलाचा दगड ठरलेल्या APOLLO 8 Missionच्या launching च्या वेळेसचा इतिहास नासाचे सध्याचे Administrator Jim Bridenstine ह्यांनी उलगडला
ह्या कार्यक्रमात ह्या अपोलो 8 मधून चंद्राला फेरी मारणाऱ्या  तीन अंतराळवीरानीं ह्या मोहिमेविषयी आणि प्रत्यक्ष चंद्रावर पोहोचल्यानंतरच्या  थरारक क्षणांचा अनुभव कथन केला
Frank Borman ,Jim lovell आणि Bill Andre हे ते तीन अंतराळवीर ज्यांनी अंतराळात Apollo 8 ह्या यानातून चंद्राभोवती प्रथम फेऱ्या मारल्या होत्या

Apollo 8 astronauts aboard Yorktown
                    Apollo 8 मिशन यशस्वी केल्याच्या आनंदात अंतराळवीर -फोटो -नासा संस्था

नासाचे प्रमुख Jim Bridenstine ह्यांनी त्यांच्या प्रभावी भाषणात सांगितले कि,हि मोहीम राबवण जिकिरीच आणि तितकच जोखमीच होत ह्या आधीची नासाची चांद्र मोहीम अयशस्वी झाली होती ह्या अंतराळवीरांना चांद्र मोहिमेवर पाठवताना त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण महत्वाच होत चांद्रमोहिमेवर निघालेले अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परततील ह्याची शाश्वती नव्हती
आधीची  Apollo 1 मोहीम अयशस्वी झाली होती यानाचा भडका उडन यान नष्ट झालं होत होता, त्यातील तीन अंतराळवीर Gus Grisson,EdWhite आणि Roger Chaffee हे प्राणाला मुकले होते
त्या नंतरची1965 ची अंतराळ मोहीमही फेल झाली होती त्या मुळे हि अपोलो 8 मोहीम अत्यंत कठीण होती त्या मुळेच ह्या अंतराळवीरांना प्रत्यक्ष चंद्राच्या भूमीवर न उतरवता अंतराळयानातून चंद्राभोवती फेऱ्या मारून तिथली माहिती मिळवण्याचे ठरले होते
हि मोहीम यशस्वी होईल किंवा अयशस्वी! हे अंतराळवीर पृथ्वीवर जिवंत परततील किंवा नाही! ह्याची शाश्वती नव्हती पण तरीही हि मोहीम राबवायचीच अस ठरवण्यात आल होत कारण तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी ह्यांच ध्येय होत कि ,जिथे जगण्याचे उधिष्ठ नाही त्या जगण्याला अर्थ नाही आजही नासा संस्थेच्या भिंतीवर हे वाक्य लिहलेल आहे
                             Where There Is No Vision The People Perish !
त्याच सुमारास अमेरिकेला Intelligence Information कडून माहिती मिळाली कि,रशिया डिसेंबर मध्ये मानवाला चंद्राभोवती किंवा चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे आणि त्या वेळेस अमेरिका आणि रशियात प्रचंड चुरस होती त्या मुळे रशियाच्या आधी अमेरिकन मोहीम राबवण्याचे ठरले त्यानुसार यानात आवश्यक बदल करण्यात आले आणि यान चंद्राच्या पृष्ठभागावर न उतरवता चंद्राभोवती फेरी मारण्याचे ठरवण्यात आले
Frank Borman म्हणाले -वेळ अत्यंत कमी होता अवघ्या चार महिन्यात एक,दीड वर्षाचे ट्रेनिंग आम्हाला पूर्ण करावे लागले त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले ट्रेनिंग अत्यंत कठीण होते खूप त्रास झाला तरीही आम्ही उत्साहात होतो साऱ्याचे ध्येय एकच होते राष्ट्राध्यक्ष केनडींच उधिष्ठ पूर्ण करण आणि रशियाच्या आधी चंद्रावर पोहोचण
Bill Anders  म्हणाले कि ,Apollo 8 ह्या मोहिमेला खूप प्रसिद्धी मिळाली आणि ह्या मोहिमेच्या यशाने पुढच्या मोहिमांचा पाया रचला
Jim Lovell - ह्यांनी सांगितल कि,मी यानात पाय ठेवला तेव्हा "मी खरच चंद्रावर चाललोय !"ह्या विचाराने मी आनंदित झालो
यानाने यशस्वी उड्डाण केले आणि आम्ही प्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा मारली आमच यान योग्य रीतीने कार्यरत झाल्याची खात्री पटली मग आम्ही यानाची दिशा चंद्राकडे वळवून चंद्राकडे मार्गस्थ झालो काही वेळाने खिडकीतून मागे वळून पाहिले तेव्हा पृथ्वी लहान,लहान होताना दिसत होती 
पृथ्वी ते चंद्र हा अंतराळ प्रवास तीन दिवसांचा होता 21 डिसेंबरला आमच Apollo 8 यान पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने निघाल होत आणि मानवाला घेऊन चंद्राभोवती फिरण्याची हि पहिली अंतराळ मोहीम होती
Apollo 8हे छोटस इंजिनाच्या स्वरूपातल यान होत 
Frank Borman ह्यांनी सांगितल,आपल्याला न दिसणारी चंद्राची बाजू अंधारात असल्याने त्याला dark side म्हटले जाते पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ती बाजू सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघाली होती,अत्यंत प्रकाशमान दिसत होती
ते पाहून आम्ही अचंबित झालो एखाद्या लहान मुलाला candy store मध्ये गेल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद आम्हाला झाला होता आम्ही आश्चर्यचकित झालो होतो विस्मयाने क्षणभर स्थंबीत होऊन चंद्राच्या त्या प्रकाशित भूमीकडे त्यावरील निनावी विवराकडे पाहात राहिलो
Bill Anders ह्यांनीही आपला अनुभव सांगितला ," मी लँडिंग site शोधण्यासाठी सुरक्षित जागा शोधून त्याचे फोटो घेण्यात व्यग्र होतो आणि अचानक मला एक सुंदर दृश्य दिसल एक सुंदर गोळा हळू ,हळू अंतराळात वर येताना दिसला ती पृथ्वी होती आजूबाजूच्या वातावरणात उगवती ती एकमेव रंगीत वस्तू होती माझ्याकडे Lighting Equipment नव्हते पण मी माझ्या जवळच्या कॅमेऱ्याने भराभर फोटो घेतले !" कारण वेळ खूपच कमी होता
Jim Lovell -म्हणाले मी,खिडकी बाहेर पाहिल तेव्हा पृथ्वी खूपच लहान दिसत होती मी अंगठा खिडकीवर ठेवून पाहिल तर अंगठ्याने पृथ्वी झाकली गेली ह्या विशालकाय milky Galaxy मध्ये पृथ्वी एक लहानसा बिंदू आहे
चंद्र करड्या रंगाचा आहे तो रंगीत नाही तो प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारखा किंवा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या रंगाचा दिसतो
आणि आपली पृथ्वी रंगीत आहे पृथ्वीवर वातावरण आहे सूर्य प्रकाश आहे त्यातून येणारी ऊर्जा आहे,सजीव सृष्टी आहे देवाने मानवाला दिलेला हा सुंदर रंगमंच आहे त्यावरची आपण पात्र आहोत त्या वर घडणार नाट्य आपल्यावर अवलंबून आहे
ज्या वेळेस हे तीन अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत पोहोचले तेव्हा अमेरिकेत नाताळ साजरा होत होता लोक उत्साहाने  सण साजरा करत होते सगळीकडे रोषणाईचा झगमगाट होता ह्या आंनदात भर टाकत ह्या अंतराळवीरांनी यानातून पृथ्वीवर संवाद साधला आणि नाताळच्या शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सुखरूप आहोत असं सांगून चंद्राच आणि उगवत्या पृथ्वीच्या सौन्दर्याच वर्णन केल तेव्हा नासा संस्थेतील ह्या मोहिमेशी संबंधित शास्त्रज्ञ तंत्रज्ञ अधिकारी आणि पृथ्वीवरील  लोकांचा आनंद द्विगुणित झाला 
       त्या वेळेस Apollo 8 च्या अंतराळवीरांनी Christmas साठी पृथ्वीवासीयांना दिलेला हा संदेश

"In the beginning God Greated Heaven & Earth The Earth was without form &void and darkness was upon face of the deep Siprit of God moved upon face of water God said ,"there be light & there was light God saw light and it was Good !"
From Crew Of Apollo 8," We close with Good Night Good Luck ! God Bless You On Good Earth "!
Frank Borman म्हणतात आमची हि मोहीम co-ordination चा उत्तम नमुना आहे आता अमेरिकेने space मध्ये यशस्वी भरारी मारलीय पण त्या वेळेस चंद्राविषयी कुतूहल होत आमच्या त्या मिशन मध्ये चंद्रावर लँडिंग साठी सुरक्षित जागा शोधण,चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा space craft वर होणारा परिणाम पाहण तिथे पाणी जीवसृष्टी अस्तित्वात आहे का हे शोधण हा मुळ उद्देश होता आणि त्या वेळेस हे काम अत्यंत कठीण आणि जोखमीच होत.

Saturday 22 December 2018

नासाच्या मोहीम 57चे अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/alt1_nhq201812200001.png
 अंतराळवीर Sergey Prokopyev ,Flight engineer Serena Aunon आणि Alexander Grest स्थानकातून पृथ्वीवर परतल्याच्या आनंदात -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -20 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 57 चे अंतराळवीर व कमांडर Alexander Grest सोयूझ कमांडर Sergey Prokopyev आणि Flight Engineer Serena Aunon -Chancellor हे तिघेही गुरुवारी सकाळी 12.2 a.m. वाजता अंतराळस्थानकातून पृथ्वीवर सुखरूप पोहोचले
जूनमध्ये हे तीनही अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी गेले होते त्यांनी स्थानकात 197 दिवस वास्तव्य केले त्या दरम्यान त्यांनी स्थानकातून पृथ्वीभोवती 3,152 वेळा फेऱ्या मारल्या आणि तिथल्या फिरत्या लॅब मध्ये सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला
नुकत्याच अंतराळस्थानकात राहायला गेलेली Anne McClain आणि Serena Aunon ह्या दोन्ही महिला Astronauts नि मिळून सोळा दिवस एकत्रित संशोधन केले प्रथमच अंतराळस्थानकात दोन महिला Astronauts एकत्र आल्या आता पुन्हा 28 फेब्रुवारीला अंतराळ स्थानकात राहायला जाण्याऱ्या तीन अंतराळवीरामध्ये Cristina Koch ह्या महिलाAstronautचा समावेश असल्याने पुन्हा स्थानकात दोन महिला Astronaut एकत्रित संशोधन करतील

NASA astronauts Serena Auñón-Chancellor (background) and Anne McClain
 महिला astronauts Serena Aunon आणि Anne McClain अंतराळ स्थानकातील जॅपनीज मोड्यूल मध्ये Air Circulation maintain करण्यासाठी vents cleaning करताना फोटो -नासा संस्था

ह्या अंतराळवीरांनी स्थानकातील वास्तव्यात अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो जेव्हा ऑर्बिटल लॅब tip top shape मध्ये असते ह्या वर संशोधन केले कमांडर Alexander Grest आणि Serena Aunon ह्यांनी येण्याआधी रिसर्च सॅम्पल्स गोळा केले Nano Racks Plate Reader आणि Cellular adapatation स्टडीजच्या फ्रीझर मधील सॅम्पल्सचा त्यात समावेश आहे शिवाय अंतराळवीरांनी  blood आणि urine ह्यांचे सॅम्पल्स घेऊन analyzed केले ह्या अंतराळवीरांनी अंतराळस्थानकातील ग्रोथ चेम्बरमधील स्थानकातील वातावरणाचा algae ग्रोथवर होणाऱ्या परिणामावरही संशोधन केले
Serena Aunon हिने कॅन्सर,व पार्किसन्स ह्या रोगांवर अत्याधुनिक उपचार पद्धत शोधण्यासाठी संशोधन केले
अंतराळवीर Prokopyev आणि Serena हे दोघेही प्रथमच अंतराळ स्थानकात राहायला गेले होते तर Alexander दुसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले होते Prokopyev ह्यांनी ह्या दरम्यान अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी दोनवेळा space walk केला
28 feb. ला नासाचे नवीन तीन अंतराळवीर Nick Hague ,Christina Koch आणि Alexey Ovchinin अंतराळस्थानकात राहायला जातील तोवर सध्याचे तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून तिथले संशोधन सुरु ठेवतील

Wednesday 19 December 2018

परतण्याआधी Serena Aunon -Chancellor ने साधला अंतराळस्थानकातून विध्यार्थांशी संवाद


NASA astronaut Serena Auñón-Chancellor
             Serena Aunon  स्थानकातून विद्यार्थ्यांशी बोलण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -19 डिसेंबर
सेरेना आज पृथ्वीवर परतणार आहे आपल्या सहा महिन्यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्यात तिने कॅन्सर व पार्किसन्स ह्या रोगांवर प्रभावी औषध शोधण्यासाठी संशोधन केले तिच्या ह्या संशोधनातून मिळालेल्या मोकळ्या वेळात तिने अनेकदा पृथ्वीवरील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद हि साधलाय आता पृथ्वीवर परतण्याआधी तिने मागच्या आठवड्यात मियामी येथील विध्यार्थांशी साधलेल्या संवादाचा हा वृत्तांत
सुरवातीला नासाच्या फ्लोरिडा येथील नासा संस्थेतील अधिकाऱ्यांनी तिचा तिच्या नातेवाईकांशी संपर्क करून दिला
"Hello सेरेना मी तुझी कझिन MalaneyYoung Young Mottey बोलतेय प्रथम तुझ अभिनंदन !
 तू आपल्या फॅमिलीतील पहिली Cuban American Astranaut आहेस आणि स्थानकात राहून यशस्वी संशोधन केल्याबद्दल आम्हाला तुझा अभिमान वाटतोय तुझ्या मुळे युवा शास्त्रज्ञ प्रेरित झालेत !"आणि आता मियामी मधील Mandelstam School मधील मुलांना तुझ्याशी बोलायचय तुला प्रश्न विचारण्यासाठी ते उत्सुक झालेत
सेरेनाने तिचे आभार मानत सर्वांना हॅलो म्हणत संवादाला सुरवात केली
Lola (1st grade)-स्पेस स्टेशन मधल तुमच सर्वात आवडत काम कोणत ?
Serena - माझं सर्वात आवडत काम तरंगण ! आम्ही स्थानकात सतत तरंगतच असतो सगळी कामे आम्हाला  तरंगत्या अवस्थेतच करावी लागतात कारण इथे झिरो ग्रॅव्हिटी असते आम्ही तरंगतच भिंतीवर,छतावर कोठेही कसेही काम करू शकतो मी डोके खाली टेकवून उलट्या अवस्थेतही तुझ्याशी बोलू शकतेय रोजच काम कुठल्या पृष्ठभागावर करायच व कस करायच हे ठरवायला मला आवडत कारण आम्ही सगळे वेगवेगळ्या दिशेने काम करत असतो 
Niandro -तुम्ही इतक्या कमी जागेत कसे राहता?तुम्हाला केबिन fever होतो का? मोकळ्या वेळेत काय करता ?
Serena -आमच स्पेस्टेशन मोठ आणि स्पेशियस आहे छोट नाही! ते फ़ुटबाँलच्या मैदानाएव्हडे मोठे आहे बरीच मोकळी जागा आहे आम्ही वेगवेगळ्या भागात काम करतो सध्या मी जापनीज मोड्युल मध्ये काम करतेय आणि लंच पर्यंत इथे कोणी येत नाही त्या मुळे मला मोकळीक मिळते मोकळ्या वेळेत आम्ही movie बघतो शनिवारी आमची movie night असते प्रत्येकाला एक movie सिलेक्ट करता येते आमच्या कडे movie candies पण असतात तसेच आम्ही स्थानकातील ग्रोथ चेम्बरमधील वाढणाऱ्या रोपांची देखभाल करतो त्यांची निगा राखतो कधी,कधी स्थानकाच्या Cubola मधून पृथ्वीकडे पहातो ती खूप सुंदर दिसते कधी आकाशातील ग्रहतारे पहातो Aurora पाहायला मिळतो तेव्हा आकाशातील सोनेरी,रंगीबिरंगी सुंदर प्रकाशाचा झोत पाहता येतो तुही कधीतरी आकाशात आमचे स्थानक पहा आकाशातील ती एक सुंदर वस्तू आहे

image of astronaut Serena Auñón-Chancellor using cutting tools to collect lettuce and kale leaves.
स्थानकातील ग्रोथ चेंबर मधील रेड लेट्युस आणि रेड रशियन Kale ची पाहणी करताना सेरेना -फोटो -नासा संस्था

Broody( 5th grade) -  अंतराळात शरीरातील पेशींवर काय परिणाम होतो सर्वात जास्त परिणाम कुठल्या अवयवांवर होतो  ?
Serena - Good Question ! आकाशात शरीरावर मसल्सवर परिणाम होतो त्यासाठी आम्हाला व्यायाम करावा लागतो शरीरातील पेशी नेहमीप्रमाणेच शरीरात वाढतात पण पृथ्वीप्रमाणे शरीराबाहेरील पेशी अल्पकाळ न टिकता जास्तकाळ टिकतात अंतराळात शरीरातील पेशी जास्त काळ तग धरतात त्यामुळेच कँसर आणि पार्किसन्स ह्या रोगांवर इथे संशोधन करता येते पृथ्वीवर हे शक्य नव्हते अंतराळात शरीराबाहेरील पेशींची वाढ व्यवस्थित होते

NASA astronauts Anne McClain and Serena Auñón-Chancellor
Serena Aunon  परतण्याआधी  McClain सोबत अंतराळ स्थानकातील लॅब मध्ये काम करताना -फोटो -नासा संस्था

Wu Xias (5th grade) - तुम्ही जेवल्यावर स्थानकात तुमच्याबरोबर पोटातील अन्नही तरंगते का? वेगळ फिलिंग येत का?
Serena - हो ! अन्न पोटात थोडस तरंगत सुरवातीला थोडं जेवल तरी पोट भरत पण पृथ्वीप्रमाणे इथेही सुरवातीला कठीण जात आणि मग हळूहळू सवय होते.
इथे जेवताना,पाणी पिताना खूप तारांबळ उडते कारण झिरो ग्रॅव्हिटी! पण हळूहळू सवय होते,खूप मजा येते
आम्ही ते एन्जॉय करतो आम्ही कुठल्याही दिशेने कुठल्याही स्थितीत जेवू शकतो कधी सिलिंगवर तर कधी भिंतीवर जेवतो तरंगत ज्युस,पाणी पिऊ शकतो अंतराळ स्थानकातील surface tension मुळे द्रव पदार्थ खाली सांडत नाहीत त्याचे थेंब तरंगतात ते पकडण्याची प्रॅक्टिस करावी लागते आम्हाला सूपचे,पाण्याचे पाऊच मिळतात ते उघडल्यावर त्याचे थेंब सगळीकडे तरंगत जातात मोठे होत जातात म्हणून ते हातात पकडावे लागतात किंवा तोंडात. हातावरून ते घरंगळत नाहीत त्याचा आकार मोठा,मोठा होऊन पाणी हातावर पसरत
मग ते तसच प्याव लागत असे सांगत सेरेनाने त्याचे प्रात्यक्षित मुलांना करून दाखवले
Ella (3rd grade) - तुम्हाला Astronaut व्हावेसे का वाटले ?
Serena - मी लहान असताना माझ्या कुटुंबासोबत shuttle Launches प्रोग्रॅम पाहायचे तेव्हा अंतराळवीरांचे  स्थानकातील तरंगणे,आणि तिथून आपली पृथ्वी पाहता येण हे सारच मला आश्चर्य चकित करायच ,आकर्षित करायच मग हळू हळू मी देखील astronaut व्हायच स्वप्न पाहू लागले माझ्या कुटुंबीयांनी ,मित्रांनी मला साथ दिली प्रेरित केलं हा प्रवास खूप मोठा होता पण आता मात्र मागे वळून बघताना तो खूप लवकर झाला असं वाटतय
Piero (5th grade) - अंतराळवीर स्थानकात जास्त दिवस राहून आल्यावर अंतराळवीरांना विकनेस येतो का? ते आजारी पडतात का ? स्थानकात bacteria आणि इतर रोगांपासून स्वत:ला सुरक्षित कसे ठेवता?
Serena - Good Question ! आता आम्ही त्या वरच संशोधन करतोय आणि आम्हाला असे आढळून आलेय कि ,bacteria मध्ये स्थानकातील वातावरणात बदल होतो स्थानकातील कॉस्मिक रेज आणि पृथ्वीपेक्षा स्थानकातील कार्बन डाय ऑक्साईड चे जास्त प्रमाण ह्याचा परिणाम आणि अंतराळातील वातावरणामुळे bacteria मध्ये बदल होतो अजूनतरी कुठलाही अंतराळवीर स्थानकात गंभीर आजारी पडला नाही bacteria चा किंवा अंतराळातील कुठल्याही रोगजंतूंचा स्थानकात शिरकाव होऊ नये म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील असतो स्थानक सतत स्वच्छ ठेवतो ,वेळोवेळी स्पेशल जंतुनाशक फवारतो
Angelina (4th grade)- Astronaut झाल्यावर तुम्हाला कोणत काम अपेक्षित होत?अंतराळस्थानकात राहण्याच ध्येय होत का ?
Serena -Astronaut झाल्यावर स्पेस स्टेशन मध्ये कधी ना कधी जायला मिळेल हे माहिती होत पण कधी ते मात्र नक्की माहीत नव्हतं ट्रेनिंगचा काळ किती आहे हेही माहीत नव्हत पण आयुष्य क्षणा क्षणा ला बदलत असत
ट्रेनिंग मुळे मला खूप छानछान नवीन गोष्टी शिकायला अनुभवायला मिळाल्या मला ट्रेनिंग दरम्यान दोन महिने अंटार्टिकल दक्षिण ध्रुवावर राहायला मिळाल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर दोन आठवडे मी पाण्याखाली Aquanaut म्हणून काम केल त्यावेळेसचा अनुभव खूपच मस्त होता वेगवेगळ्या लोकांना भेटण वेगवेगळे अनुभव घेण ! नव्या गोष्टी शिकत्या आल्या आणि स्पेसस्टेशन मध्ये राहण्याचा अनुभव तर खूपच थरारक अविश्वसनीय आणि अलौकीक आहे माझ्यासाठी!खूपच ग्रेट,ब्युटीफुल!
Graham - तुम्ही पृथीवर परतल्यावर तुमच्या शरीराला वातावरणाशी जुळवून घ्यायला खूप वेळ लागतो का ?
Serena - हो !थोडा वेळ लागतो ! आपल शरीर अद्भुत आहे ते पृथ्वीवरच वातावरण लक्षात ठेवत त्याला ग्रॅव्हिटी आठवते आपल चालण आठवत त्या मुळे जास्त वेळ लागत नाही पण हाडांना आणि स्नायूना मात्र पृथ्वीवरील वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो पण नासा मधील डॉक्टरांची टीम काही आठवडे आमची काळजी घेतात थोडस अवघड जात स्थानकात माझे केस सतत वरच्या दिशेने उडतात ते त्याच स्थितीत राहतात माझी इच्छा असते की ते खाली यावेत पण तसे होत नाही !
Zoe ( 3rd grade )-अन्न आणि पदार्थांच्या चवीत अंतराळ स्थानकात बदल होतो का ? जेवण कस असत ?
Serena -  आम्ही पृथ्वीवरच प्रिझर्व प्रोसेसिंग केलेल मऊ अन्न खातो आम्हाला कुरकूरीत कडक क्रॅकर्स खाता येत नाहीत म्हणूनच आम्ही पृथ्वीवरच अन्न मिस करतो पॅकेटबंद अन्न असल्यामुळे आणि इथे grocery नसल्यामुळे तिथल्यासारखे प्लेट मध्ये खाऊ शकत नाही पण कधी कधी पृथ्वीवरून आलेल्या कार्गो स्पेसक्राफ्ट मधून आम्हाला candies,crackers पाठवले जातात आम्ही चीज बर्गर खूप मिस करतो
Felix (3rd grade )स्थानकात तुम्ही रोज दोन तास व्यायाम करता पण जर तुम्ही तो केला नाही तर काय होत ?
Serena -रोज व्यायाम करण आवश्यक आहे कारण स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटीचा शरीरातील हाडांवर,स्नायूंवर विपरीत परिणाम होतो व्यायाम केला नाही तर ते लहान,लहान होत जातात त्याला Atrophy अस म्हणतात तिथे हाताची सतत हालचाल होते पण तरंगत्या अवस्थेमुळे पायांच्या स्नायूंची कमरेची,पाठीची हालचाल होत नाही शिवाय गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हृदयाच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो पंपिंग वर परिणाम होतो हालचालच नसल्याने,हृदयास काम कमी असल्याने हृदय weak होऊ शकत,हाडे ठिसूळ होऊ शकतात पण नियमित व्यायामामुळे हे सर्व टाळता येत आणि स्थानकातील वातावरणाचे शरीरावरील दुष्परिणाम टाळता येतात
Ernesto( 2nd grade)-आम्हाला कोलांटउड्या मारायला शिकण्यासाठी gymnastics शिकाव लागत पण तुम्ही स्थानकात वावरायला कसे शिकता ?
Serena -हो! या साठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते तशीच अंतराळ स्थानकात फिरतानाही करावी लागते सुरवातीला कठीण जात कारण कुठेही विशेषतः डोक्याला मार लागू शकतो कुठेही धडकू शकत,दुखापत होते म्हणून सावधतेने हालचाल करावी लागते पण सरावाने हळूहळू प्रॅक्टिस होते कशाचा तरी आधार घ्यावा लागतो मग हळूहळू मेंदूला त्याची सवय होते मग मात्र तरंगत फिरण पाय वर,डोकं खाली म्हणजे शिर्षासनाच्या स्थितीत राहता येत आणि सगळ्या हालचाली सहज करता आल्या कि मग आम्ही त्या एन्जॉय करतो
Ryan(1st grade)-आम्ही पाहिलेय कि स्पेसस्टेशन मध्ये Plankton आहे हे Plankton तिथे वाढणे कसे शक्य आहे
Serena - Again Good  Question ! Plankton स्वत:हुन स्पेसस्टेशन मध्ये येऊ शकत नाही रशियन मोड्यूल च्या बाहेरअं तराळवीरांना स्पेसवॉक करताना ते दिसले त्यांनी ते स्थानकात आणले कदाचित पृथ्वीवरून स्थानकात आलेल्या कार्गोशिप बरोबर ते अंतराळात आले विशेष म्हणजे ते जिवंत राहिले अंतराळात मानव तग धरू शकत नाही
Creep (1st grade)- स्पेस मध्ये तुमच्या सोबत कुठले प्राणी आहेत ?
Serena - आता स्पेसस्टेशन मध्ये नुकत्याच आलेल्या कार्गोशिप मधून आलेले 40mice आहेत या आधी spiders होते Bumble Bee होती काही mice जुलै मध्ये स्थानकात आले आणि ऑगस्ट मध्ये पृथ्वीवर परत पाठवण्यात आले रशियन्स कडे बेबी quail होते ह्या प्राण्यांना वजनरहित अवस्थेत स्थानकात पाहणं आनंददायी असत त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची सोय करून त्यांची काळजी घेणं आणि झिरो ग्रॅव्हिटीत त्यांचं adjust होण पाहून त्यांच निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण आम्हाला आवडत
Nika (1st grade) - तुम्ही स्थानकातून पृथ्वीवरील माहिती कशी घेता ?
Serena -स्थानकाच्या Cupola मधून आम्ही पृथ्वी निरीक्षण करतो,पृथ्वीवरील,वातावरणातील आणि अंतराळातील ग्रहताऱयांच निरीक्षण करतो त्यांचे फोटो काढतो विशेषतः चक्रीवादळ आले कि ते येताना आणि संपल्यावर आम्ही त्याचे फोटो घेतो पृथ्वी वरील घडामोडींची नोंद करून त्याची माहिती लगेचच पृथ्वीवर पाठवतो रात्रीच्या वेळेस
पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणच लाइटमधलं चकाकत सौन्दर्य पाहायला मला खूप आवडत
Daniela - स्पेसस्टेशनचा विस्तार करण्याचा प्लॅन आहे का ?
Serena -सध्या तरी नाही Space Station Assembly Complete आहे आणि आमचा फोकस सायंटिफिक रिसर्च वर आहे आणि भविष्यात Moonआणि  Mars मिशनवर नासाचा भर आहे म्हणूनच स्थानकातील झिरोग्रॅविटीतील आमच्या वास्तव्यात आगामी दूरवरच्या ग्रहमोहिमांसाठी आम्ही संशोधन करत आहोत
Valentina (kintergarden )- स्पेस मध्ये तारे वेगळे दिसतात का ?
Serena - हा प्रश्न आम्हाला खूपवेळा खुपजण विचारतात पण तारे इथून वेगळे दिसत नाहीत फक्त जास्त प्रकाशमान दिसतात आम्ही रात्री एखाद्या module चे सर्व लाईट बंद करून आकाशातील तारे पहातो तेव्हाच दृश्य खूपच विलोभनीय आणि सुंदर भासत तुही लाईट बंद करून आकाशातील चंद्र तारे पहा. 

Sunday 16 December 2018

अंतराळ मोहीम 57 च्या अंतराळवीरांचा Space Walk संपन्न

 Spacewalker Oleg Kononenko
 अंतराळवीर Oleg Kononenko space Walk दरम्यान दुरुस्ती करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -11डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 57 चे Flight Engineer Oleg Kononenkoआणि अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी 11 डिसेंबरला सात तास पंचेचाळीस मिनिटांचा स्पेसवॉक पूर्ण केला हा स्पेसवॉक अंतराळस्थानकाच्या दुरुस्तीसाठी होता ऑगस्टमध्ये स्थानकात लीकेजची समस्या निर्माण झाली होती ती शोधून दुरुस्ती करण्यात आली
हे दोनही अंतराळवीर सकाळी10. 59 a.m.ला स्थानकातून स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणि संध्याकाळी 6. 44 p.m.ला स्पेसवॉक संपवून स्थानकात परतले


 Space Walk  यशस्वी झाल्यानंतर अंतराळवीर SergeyProkopyev आणि Oleg  Kononenko ह्यांच अभिनंदन करताना Serena ,Mc Clain आणि इतर अंतराळवीर-फोटो -नासा संस्था

ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोघांनी रशियन बनावटीच्या सोयूझ MS-09 ह्या स्पेसक्राफ्टच्या टपाचा भाग चेक केला हा भाग अंतराळ स्थानकाला जोडलेला आहे तिथूनच स्थानकात लिकेज होत होते स्पेसवॉक पूर्ण करून अंतराळस्थानकात परतलेल्या अंतराळवीर Sergey Prokopyevआणि अंतराळवीर Oleg Kononenko ह्यांचे स्थानकातील इतर अंतराळवीरांनी जोशात स्वागत केले आणि त्यांचं अभिनंदन केल
ह्या दोघांनी त्या भागाचा फोटो घेतला आणि त्यावर साचलेल्या धूलिकणांचे नमुने घेतले ह्या कणांचे नमुने पृथ्वीवर आणल्यानंतर शास्त्रज्ञ त्यावर संशोधन करतील त्या नंतर ह्या दोनही  अंतराळवीरांनी टपाच्या छेद असलेल्या भागावर ब्लॅंकेट टाकले आणि तो भाग झाकला आजवर स्थानकाच्या दुरुस्तीसाठी अंतराळवीरांनी केलेला हा 213वा स्पेसवॉक होता
 Oleg Kononenko ह्याच्या अंतराळ करिअर मधला हा चवथा स्पेसवॉक होता तर Sergey Prokopyev ह्याच्या अंतराळ करिअर मधला हा दुसरा स्पेसवॉक आहे

Saturday 15 December 2018

Air hostess Caroline म्हणते महिलांसाठी एअरहोस्टेस च करिअर उत्तम


                                   Airhostess Caroline ड्युटी फ्री झाल्यावर पोझ देताना

कुठल्याही विमानातील एअर होस्टेस विषयी साऱ्यांनाच कुतूहल असत त्यांची राहणी त्यांच करिअर त्यांच ट्रेनिंग एकूणच त्यांच लाईफ ह्याच आकर्षण साऱ्यांनाच असत म्हणूनच हे सार जाणून घेण्यासाठी स्पाईसजेट ऐअरवेजची एअर होस्टेस कॅरोलिन हिच्याशी विमान प्रवासादरम्यान तिच्या करिअर विषयी केलेली हि बातचीत!  
Spice Jet मध्ये एअर होस्टेस झाल्यानंतरचा तुझा अनुभव कसा होता ? एअर होस्टेस होण्यासाठी काय      
 आवश्यक असत ? कधी इमर्जन्सी कंडिशन उद्भवली का ? त्या वेळेस परिस्थिती तुम्ही कशी हाताळता ?
कॅरोलिन - खूपच छान ! गेल्या चार वर्षातला माझा अनुभव खूपच छान आहे ! असं सांगणारी कॅरोलिन मूळची मणिपूरची नोकरीनिमित्याने ती हैदराबादेत स्थायिक झाली चार वर्षांपूर्वी तीच Spice Jet विमान कंपनीत सिलेक्शन झाल ह्या चार वर्षात तीला ह्या करिअर मूळे दोनदा परदेशवारी करायला मिळाली
एअर होस्टेस होण्यासाठी बारावी पर्यंतच शिक्षण आवश्यक असत विशेषतः फिजिक्स ,Maths असे सायन्सचे विषय असावे लागतात
सिलेक्शन नंतर कंपनी तर्फे ट्रेनिंग दिल जात प्रवाशांच स्वागत करण,त्यांना गाईड करण त्यांना विमान उड्डाणापूर्वी आणि विमानतळावर उतरण्यापूर्वी बेल्ट बांधण्यासाठीच प्रात्यक्षिक दाखवण संकटकाळी प्रवाशांच्या सीटखाली असलेल सुरक्षा जॅकेट काढून घालण्याच ट्रेनिंग दिल जात या शिवाय  प्रवाश्यांना इतर आवश्यक सूचना देण त्यांना काय हवं नको ते पाहण वेळोवेळी अनांउन्समेंट करून आवश्यक ती माहिती देण,सूचना देण आणि प्रथमोपचार ह्या गोष्टी शिकवल्या जातात
आणि त्याच वेळी विमानात एखादी इमर्जन्सी उद्भवली तर काय करायच ह्याच ट्रेनिंगही दिल जात त्या साठी आवश्यक सुविधा विमान कंपनी मार्फत पुरवल्या जातात आणि अशा वेळेस घटनेच गांभीर्य ओळखून परिस्थिती यशस्वीपणे हाताळली जाते माझ्या चार वर्षांच्या काळात असा प्रसंग उद्भवला नसला तरीही माझ्या सोबतच्या -एअरहोस्टेसच्या करिअर मध्ये अशी परिस्थिती उद्भवली आणि तिने ती व्यवस्थित हाताळली
ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवतात
कॅरोलिन  -ट्रेनिंगच्या वेळेस आम्हाला सेल्फ ग्रूमिंग,मेकअप,पोश्चर या सारख्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात एअर होस्टेसना प्रेझेन्टेबल दिसण आवश्यक असत त्या मुळे त्यांना मेकअप करण अनिवार्य असत मेकअपच सामान ड्रेस आणि असेसरीज कंपनी तर्फे दिल्या जातात आम्हाला मेडिकल बेनिफिट हि कंपनीतर्फे मिळतो ह्या जॉबमुळे आम्हाला देशाअंतर्गत आणि परदेशीही प्रवास करायला मिळतो अर्थात विमानाच मुक्काम तिथे जितक्या दिवस असतो तेव्हढेच दिवस तिथे राहता येत
एअर होस्टेस चा कार्यकाळ किती असतो ?पेन्शन मिळत का ?
कॅरोलिन -पण एअर होस्टेसच करिअर मात्र खूप कमी काळाच असत 25-45 वर्षांपर्यंतच आणि त्यांना इतर ठिकाणच्या नोकरी प्रमाणे निवृत्ती नंतर पेन्शन मात्र मिळत नाही नंतर त्यांना दुसरीकडे करिअर कराव लागत सध्या त्यांना पुरेशी सॅलरी मिळते
-फॅमिली लाईफवर परिणाम होतो का ?
कॅरोलिन -हो ! निश्चितच !नोकरी मूळे फॅमिली लाईफ अफेक्ट तर होतच कारण फॅमिली पासून दूर राहाव लागत पण सुटीमध्ये मात्र  मी मणिपूरला जाते
-महिलांसाठी एअर होस्टेसच करिअर सुरक्षित आहे का ? लोक त्रास देतात का ? टेन्शन असत का ?
Spice Jet मध्ये महिला पायलट आहेत का ?
एअर होस्टेसच लाईफ म्हणजे सतत टेन्शन! विशेषतःविमानाच्या उड्डाणाच्या वेळी आणि विमानाच्या लँडिंगच्या वेळी खूप टेन्शन असत शेवटी प्रवाशांचा आयुष्याचा प्रश्न असतो
प्रवासात चांगले लोक भेटतात तसे मुद्दाम त्रास देणारेही असतात अशा वेळेस त्यांच्याशी कस निपटायच कस वागायच ह्याचे धडे ट्रेनिंगच्या वेळेस दिले जातात आणि अशा घटना घडतातही! त्या मुळे महिलांनी न घाबरता ह्या फिल्डमध्ये यायला हरकत नाही अर्थात त्रास देणारे सगळीकडे असतातच! महिलांसाठी आता हे करिअर उत्तम आहे आता spice jet मधेही महिला पायलटची नियुक्ती झालीय
-तुमचा दिनक्रम कसा असतो ,ड्युटीच्या वेळा कशा असतात ?
कॅरोलिन - एअर होस्टेसचा दिनक्रम पहाटेच चारला सुरु होतो मग ड्युटी असो व नसो विमानाच्या flight च्या वेळेनुसार ड्युटी सुरु होते मग कधी ती सकाळी तर कधी रात्री अपरात्री कधीही!
ह्या वेळा कटाक्षाने पाळाव्या लागतात Spice Jet विमान सेवेसाठी ड्युटी आधी महत्वाची असते
विमानाच्या आगमनापासून चेकिंग नंतर प्रवाशांच हसतमुखाने स्वागत करून प्रवाशांना सुरक्षितपणे आत बसवण त्यांना सुरक्षेच्या सूचना देण आणि लँडिंगच्या वेळेसही मार्गदर्शन करून त्यांना व्यवस्थित विमानतळापर्यंत पोहोचवण त्यांच लगेज ठेवण्यास काढण्यास मदत करण अत्यंत आवश्यक असत आणि तितकच महत्वाचही !
पण तरीही एअरहोस्टेसच करिअर आणि Spice Jet is Best ! अस कॅरोलिन म्हणते 

हैद्राबादच्या राजीव गांधी विमानतळावर प्रवाशांची गर्दी


हैद्राबाद -7 डिसेंबर
एरव्ही आपण रेल्वे स्टेशन ,एसटी स्टॅन्ड वरील गर्दी पहातो पण सात तारखेला हैद्राबादच्या राजीव गांधी विमानतळावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली अर्थात हि गर्दी शिस्तबद्ध होती
त्या दिवशी तेलंगणात विधानसभेची निवडणूक होती आणि हि निवडणूक प्रतीष्ठेची होती कारण तिथले मुख्यमंत्री KCR हे पुन्हा निवणूक लढवत होते त्या मुळे  तेलंगणाच्या बॉर्डरवरूनच कडक चेकिंग होत होते कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती एरव्ही गर्दीने गजबजलेल्या हैदराबादच्या रस्त्यावरही शांतता होती दुकानातही शुकशुकाट जाणवत होता अगदी बिगबाझार मधेही कमी ग्राहक होते कारण अर्थातच निवडणूक !
पण राजीव गांधी विमानतळावर मात्र प्रवाशांची गजबज होती त्या दिवशी हैद्राबाद तिरुपती Spice Jet विमान एक तास लेट होते त्या मूळे नंतरच्या आणि आधीच्या विमानातील प्रवाशांची गर्दी झाली होती निवडणुकीमुळे बहुदा इतर ठिकाणच्या विमानसेवेवरही परिणाम झाला असावा
कारण विमानतळावरचे Escalator आणि साध्या पायऱ्यावरही प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली चेकिंग नंतर बोर्डिंग पास मिळाल्यानंतर प्रवाशांना बसण्यासाठीच्या खुर्च्यांवरही गर्दी मुळे बसायला जागा नव्हती
चहा नास्ताची दुकानेही गर्दीने गजबजली होती अर्थात विमानतळावरचा चहा कॉफी स्वस्त मात्र नसते कारण सुरवातच 80 रु. कपने होते आणि वेगवेगळ्या फ्लेवर प्रमाणे 200-250 रु.पर्यंत किंमत वाढत जाते
80रु. च्या कॉफी,चहाची चव घेतल्यास रेल्वे स्टेशन वरच्या चहाची आठवण येते
                            विमानातही मार्केटिंग कंपन्यांचा शिरकाव
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान प्रवास सामान्यांच्या आवाक्यात आणला शिवाय देशाअंतर्गत ठिकठिकाणी विमानसेवाही सुरु केल्या त्याचा फायदा अर्थातच प्रवाशांसोबतच विमान कंपन्यांनाही झाला
आधी एअर इंडिया किंवा इंडियन एअर लाईन्स कंपनीच्या विमानात प्रवाशांना मोफत चॉकलेट,ज्युस ,नास्ता ठराविक अंतराच्या प्रवासादरम्यान दिला जायचा पण आता ह्या गोष्टी पाहिजे तर बिल द्यावे लागते तिकिटाचे दर कमी झाल्याने मोफत काहीही देण परवडत नसल्याची माहिती मिळाली
पण आता विमानात प्रवाशांच्या सिटजवळील मेनू कार्ड वर पदार्थांची लिस्ट असते त्या नुसार ऑर्डर दिल्यास
विमानातील एअर होस्टेस तो पदार्थ प्रवाशांना पुरवतात एअरहोस्टेस विमानातून खाद्यपदार्थांची ट्रॉली फिरवून प्रवाशांना काही हवे असल्यास ऑर्डरप्रमाणे तो पदार्थ किंवा ज्युस पुरवतात अर्थात त्यासाठीचे बिल मात्र प्रवाशांना ध्यावे लागते कधी कधी पदार्थांची add हि केल्या जाते
मार्केटिंग कंपन्यांनी प्रवाशांची संख्या आणि प्रतिसाद हेरून मार्केटिंगचा नवा फंडा आमलात आणलाय प्रवाशांच्या सीटजवळील बुक मध्ये वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट्सची add करत त्या वस्तूंवर विमानउड्डाण्णा दरम्यान सूट देऊ केली आहे जर प्रवाशांनी विमानप्रवासात एखादी वस्तू ऑर्डर केल्यास त्यांना ती माफक दरात दिली जाईल असा दावा ह्या कंपन्यांनी केलाय

Wednesday 5 December 2018

अंतराळवीरOleg Konenenko,Anne McClain आणि David Saint अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचले


Expedition 58 crew members in front of the Soyuz MS-11 spacecraft
नासाची Astronaut Anne McClain अंतराळवीर Oleg Konenenkoआणि  David Saint उड्डाणाआधी चेकिंग दरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -4 डिसेंबर
नासाच्या मोहीम 58 चे अंतराळवीर David Saint ,Anne McClainआणि  Oleg Konenenko सोमवारी तीन तारखेला रशियन बनावटीच्या सोयूझ MS -11 ह्या अंतराळयानाने संध्याकाळी 6. 31मिनिटाला स्थानकाकडे रवाना झाले आणि पृथ्वीला चारवेळा परिक्रमा करून रात्री 12.33मिनिटाला स्थानकात पोहोचले
रात्री 2.37 मिनिटांनी सोयूझ यान स्थानकाशी जोडले गेले आणि ह्या अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश करताच स्थानकातील अंतराळवीर Alexander ,Serena आणि Sergey ह्या अंतराळवीरांनी स्थानकात त्यांचे स्वागत केले
 ह्या तीन अंतराळवीरांच्या प्रवेशाने स्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून हे सहाजण मिळून स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील
वीस डिसेंबरला आधीचे तीन अंतराळवीर Alexander Grest ,Serena Aunon आणि Sergey Prokopyev पृथ्वीवर परततील आणि मार्चमध्ये नवीन तीन अंतराळवीर स्थानकात राहायला जातील तेव्हा पुन्हा एकदा अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा होईल तोवर हे नवे तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून त्यांचे संशोधन सुरु ठेवतील
अंतराळवीर David Saint आणि Anne McClain हे प्रथमच स्थानकात राहायला गेले आहेत त्यांच्यासाठी स्थानकात राहण्याचा आनंद रोमांचकारी आहे
नासाची महिला Astronaut Anne नासा मध्ये येण्याआधी आर्मी मध्ये  सिनिअर Army Aviator ह्या पदावर कार्यरत होती तिच लहानपणापासूनच आर्मी मध्ये जाऊन देशासाठी काहीतरी करण्याच स्वप्न होत तसेच तिला astronautहि व्हायच होत
तू  astronaut झाली नसतीस तर तू काय केल असतस?  ह्या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणते ," जर नासामध्ये मी सिलेक्ट झाले नसते तर मी आर्मी मध्ये खुश असते कारण माझ पहिल पॅशन आर्मी आहे पण आता अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये राहून मला संशोधन करायला मिळाल हि अमूल्य संधी मिळाली मी लकी आहे हा नवा अनुभव माझ्यासाठी अभूतपूर्व आहे रोमांचकारी आहे"!
Anne McClain च मूळ गाव वॉशिंग्टन मधल Spokane आहे तिने मिलिटरी अकाडमी मधून मेकॅनिकल आणि Aeronautical engineering ची पदवी प्राप्त केली असून Aeronautical मधे M.E. आणि International relations  Master degree प्राप्त केलीय आर्मी मधले सिलेक्शन तिच्या मेरीटवर झाले आहे तिने आर्मीमध्ये असताना तिने आजवर 20 विमानातून वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाण केले असून तिला  2000 तास उड्डाणाचा अनुभव आहे


 स्थानकात राहण्यासाठीच्या नासा संस्थेतील कठीण ट्रेनिंगचा आनंद घेताना Anne McClain -फोटो-नासा संस्था

स्थानकात राहण्यासाठी जाण्याआधीच्या नासा संस्थेतील ट्रेनिंग दरम्यान तिला रोज नवनव्या कठीण आव्हानला सोमोरे जावे लागले ते तिने मनापासून एन्जॉय केले तो अनुभव खरच अफलातून होता विशेषतः स्पेससूट घालून पाण्याखाली राहण्याचा अनुभव माझ्यासाठी नवा होता आनंददायी होता असेही ती म्हणते  तसेच रशियन भाषा शिकण्याचाही ! 

Friday 30 November 2018

तीन डिसेंबरला नासाच्या मोहीम 58चे तीन अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी जाणार



In the Integration Facility at the Baikonur Cosmodrome in Kazakhstan, Expedition 58 crew members Anne McClain of NASA (left),
अंतराळमोहीम ची 58 Anne McClain रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणि कॅनडाचे अंतराळवीर David Saint स्थानकाकडे जाण्यासाठी सज्ज -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -29 Nov.
नासाच्या अंतराळमोहीम 58 अंतर्गत नासाचे आणखी तीन अंतराळवीर अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत नासाची Anne McClain ,कॅनडाचे अंतराळवीर  David Saint आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत 27नोव्हेंबरपासून त्यांच्या स्थानकातील प्रयाणाची पूर्व तयारी जोरात सुरु आहे अंतराळ स्थानकात राहायला जाण्याआधीचे कठीण ट्रेनिंग त्यांनी ह्या आधीच पूर्ण केले आहे

नासाची  Anne McClain अंतराळवीर David Saint आणि अंतराळवीर Oleg स्थानकात राहायला जाण्याआधी कठीण ट्रेनिंग दरम्यान -फोटो -नासा संस्था

सोयूझ MS -11ह्या अंतराळयानातून हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे प्रयाण करणार आहेत सोमवारी तीन डिसेंबरला 6.31a.m.(EST) (5.31p.m.स्थानिक वेळ ) वाजता कझाकस्थानातील बैकोनूर येथील Cosmodrome वरून त्यांचे सोयूझ यान  स्थानकाकडे झेपावेल
सोयूझ यान जवळपास साडेसहा तासांचा अंतराळ प्रवास पूर्ण करून स्थानकाजवळ पोहोचेल हे यान पृथ्वीभोवती चारवेळा परिक्रमा करेल आणि 12.35 p.m.ला स्थानकाच्या Poisk Moduleच्या Docking पाथ जवळ पोहोचेल
सोयूझ यान  स्थानकाच्या नजीकच्या टप्प्यात येताच स्थानकातील यंत्रणा कार्यरत होईल
सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले मोहीम 57चे कमांडर  Alexander  Grest ,Flight Engineer Serena Aunon आणि Flight Engineer Sergey Prokopyev हे त्यांच्या यानासाठी डॉकिंग पाथची सोय करतील आणि स्थानकाचे दार उघडून त्यांना आत प्रवेश देतील
यान स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर जवळपास दोन तासांनी सोयूझ यान आणि स्थानकातील डॉकिंगचा मार्ग एकमेकांशी जोडला जाईल आणि अंतराळवीर आत प्रवेशताच स्थानकातील अंतराळवीर स्थानकात त्यांचे स्वागत करतील
अंतराळ मोहीम 57चे सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले अंतराळवीर वीस डिसेंबररला पृथ्वीवर परतणार आहेत जूनमध्ये हे तीनही अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी गेले होते
मोहीम 58चे हे नवे तीन अंतराळवीर साडेसहा महिने अंतराळस्थानकात राहून तिथल्या संशोधनात सहभागी होणार आहेत
अंतराळवीर David Saint व Anne McClain हे दोघेही प्रथमच स्थानकात राहण्यासाठी जाणार असून हि त्यांची पहिलीच अंतराळवारी आहे तर रशियन अंतराळवीर Oleg Kononenko हे चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहायला जात आहेत
ह्या अंतराळवीरांच्या अंतराळस्थानकाकडे प्रयाणाचे आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T .V वरून करण्यात येईल .
ह्या तीनही अंतराळवीरांनी जाण्याआधी नासा संस्थेच्या म्युझियमला भेट दिली तिथे त्यांनी ह्या आधी अंतराळस्थानकात राहायला गेलेल्या अंतराळवीरांच्या सह्या असलेल्या ठिकाणी सह्या केल्या तिघांनी सेल्फी काढले आम्ही स्थानकात राहायला जाण्यासाठी सज्ज आहोत असेहि त्यांनी सांगितले तर McClain आणि David  प्रथमच अंतराळ प्रवास करणार असून स्थानकात राहायला जाण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक झालो आहोत असेही ते म्हणाले

Tuesday 27 November 2018

InSight मंगळ यान मंगळाच्या भूमीवर सुखरूप उतरले


NASA's InSight Mars lander acquired this image of the area in front of the lander
Insight मंगळ यानाने मंगळाच्या भूमीवर प्रवेशताक्षणी मंगळग्रहाचा पाठवलेला पहिला फोटो -नासा संस्था

नासा संस्था -26 Nov.
नासाची मंगळ मोहीम यशस्वी करत नासाचे InSight मंगळयान अखेर मंगळ ग्रहावर निर्विघ्न पणे पोहोचले आहे सोमवारी 26 नोव्हेंबरला 3p.m.(EST) ला InSight  मंगळयान मंगळाच्या भूमीवर यशवीपणे उतरले
पाच मे 2018ला InSight यान कॅलिफोर्निया येथील Vandenberg Airforce Base येथून 7.05p.m.ला मंगळाच्या दिशेने झेपावले होते आणि कुठलेही विघ्न न येता साडेसहामहिन्यांत तब्बल  300 मिलियन मैलाचा अंतराळप्रवास यशस्वीपणे पार करून अखेर मंगळावर पोहोचले आहे
Insight मंगळ यान मंगळ ग्रहावर दोन वर्षे म्हणजे मंगळावरील वर्षगणनेनुसार एक वर्षे चाळीस दिवस राहून संशोधन करेल
Insight यान 19,800 k.m. इतक्या प्रचंड वेगाने मंगळाच्या कक्षेत शिरले आणि अवघ्या साडेसहा मिनिटात ते मंगळाच्या भूमीवर पोहोचले सुद्धा ! यान मंगळाच्या कक्षेत शिरले तेव्हा यानाचा वेग प्रचंड असला तरीही मंगळाच्या वातावरणात शिरताच तेथील विरळ वातावरणाशी जुळवून घेत यानाने स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने हळूहळू वेगावर नियंत्रण मिळवत आणि  वेग कमी,कमी करत शुन्यावर आणला
यान मंगळाच्या कक्षेत शिरताच यानाचे पॅराशूट उघडले आणि यान मंगळाकडे झेपावू लागले जसजसे मंगळाची भूमी जवळ येऊ लागली तसतसा यानाचा वेग कमी झाला यान जमिनीच्या निकट येताच यानाची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होऊन यानाची चाके बाहेर आली आणि यान स्वत:वर नियंत्रण मिळवून मंगळाच्या भूमीवर स्थिरावले
अवघ्या साडेसहा मिनिटे इतक्या कमी वेळेत Insight यानात बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने यानातील डझनावर ऑपरेशन्स कार्यान्वित झाली आणि यानाचे कार्य मंगळावर पोहोचल्यानंतरच्या क्षणभरात सुरु झालेही
Insight Mars लँडर वर सिस्मोमीटर बसवण्यात आला आहे जेव्हा हे मंगळयान मंगळावरील भूमीवर उतरले  तेव्हा ह्या उपकरणाच्या एका रोबोटिक आर्मने पृष्ठभागावर सिस्मोमीटर बसवला Insight च्या ह्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचे प्रवाह आणि तीव्रता ह्यांचे मोजमाप करून त्यावर संशोधन करण्यात येईल विशेष म्हणजे ह्या रोबोटिक आर्मला बसविलेल्या अत्याधुनिक दुर्बिणीच्या साहाय्याने यानाने लगेचच तिथला पहिला फोटोही पृथ्वीवर पाठवला आहे
Insight यानाचे मंगळावर पोहोचल्यानंतरचे पहिले काम यानाला बसवण्यात आलेली सौर प्रणाली कार्यान्वित करणे हे होते कारण ह्या यानाचे कार्य सौर उर्जेवरच चालणार आहे आणि यानाने हि प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली पोहोचल्यानंतर पहिल्या सोळा मिनिटात हि प्रणाली सुरु करण्याची प्रोसेस सुरु झाली आणि नंतरच्या सोळा मिनिटात हि प्रणाली सुरु झाली
नासाच्या कॅलिफोर्नियातील Jet Propulsion Lab मधील ह्या Insight यानाच्या मंगळ मोहिमेशी संबंधित अधिकारी ,शास्त्रज्ञ ,इंजिनिअर्स आणि कर्मचारी मंगळयानाचा भूमिप्रवेश उसुकतेने पाहात होते जसजसे यान मंगळाकडे झेपावत होते तसतशी साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली अखेर Insight मंगळाच्या भूमीवर सुखरूप पोहोचल्याचे पाहून सारेच आनंदित झाले यानाच्या मंगळ भूमीला स्पर्शण्याचा रोमांचक क्षण पाहताना शास्त्रज्ञ क्षणभर भारावले टाळ्या वाजवत हर्षोउल्हासाने साऱ्यांनी एकच जल्लोष केला एकमेकांचे अभिनंदन करत तर काहींनी नाचून ह्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला

Mars InSight team members Kris Bruvold, left, and Sandy Krasner react after receiving confirmation that InSight landed
  कॅलिफोर्नियातील J.PL lab मध्ये Insight मंगळावर लँडिंग झाल्याचे पाहून जल्लोष करताना शास्त्रज्ञ -फोटो-नासा संस्था

 Insight चे मुख्य Investigater Bruce Banerdt म्हणतात कि,ह्या Insight च्या मंगळावरील लँडिंगचा क्षण पाहण आमच्यासाठी रोमांचक अनुभव होता पण आम्ही Insight जेव्हा रोबोटिक आर्मच्या साहाय्याने तिथली जमीन खणायला सुरु करेल त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहोत
ह्या Insight मंगळ यानासोबतच मंगळावर दोन CubeSats MarCOs पाठवण्यात आले असून त्यांनी देखील व्यवस्थित काम करायला सुरवात केली आहे
मंगळ ग्रहांभोवती फेऱ्या मारणाऱ्या ह्या उपग्रहांनी Insight मंगळावर पोहोचल्याचा संदेश कॅलिफोर्नियातील  J.PL लॅबमध्ये दिला मार्को क्यूबसॅटच्या यशस्वी कार्याने मार्को चे प्रोजेक्ट मॅनेजर आणि टीम आनंदित झाले आहेत
नासा संस्थेतर्फे Insight मंगळ लँडिंग चे लाईव्ह प्रक्षेपण सोशल मीडियावरूनहि करण्यात आले होते

Spectators in Times Square watch the live NASA TV broadcast of the Mars InSight landing.
 हि अमूल्य संधी साधत Times Square वर मंगळ ग्रहावरील Insight प्रवेशाचा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी केलेली हि गर्दी -फोटो -नासा संस्था

Insight वर बसवलेल्या दुसऱ्या रोबोटिक आर्मचे काम त्याच्या सेल्फ हॅमरींगद्वारे मंगळावरील पृष्ठभागावर दहा ते सोळा फूट खोल खड्डा खणणे (पृर्वीच्या तुलनेत ह्याची खोली पंधरापट जास्त ) आणि तेथील माती व इतर अवशेषांचे उत्खनन करून त्याची संशोधित माहिती गोळा करून त्याचे नमुने पृथ्वीवर पाठवण्याचे आहे
मंगळयानाला सौर ऊर्जेसोबतच बॅटरीच्या ऊर्जेचा पुरवठा केल्या गेला असून शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार हे यान मंगळावर सव्वीस महिने कार्यरत राहू शकेल नासाच्या JPL lab चे Insight चे मुख्य प्रबंधक म्हणतात हा प्राथमिक अंदाज असला तरीही Insight ह्या पेक्षा जास्त काळ कार्यरत राहील
मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी Seismology च्या ह्या प्रकल्पाचे स्वप्न शास्त्रज्ञ गेल्या चाळीस वर्षांपासून पहात आहेत त्या वेळेस मी student होतो आणि आज मी त्यात सह्भागी आहे असे JPL लॅबचे Insight mars Lander चे मुख्य Investigator Bruce Banordt  म्हणाले होते आता त्यांचे ते स्वप्न साकार झाले आहे 
ह्या मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेमुळे मंगळावरील वातावरणाची,भूगर्भांची माहिती मिळेल शिवाय ब्रह्मांडातील पृथ्वी चंद्र आणि इतर ग्रहांची आपल्याला अवगत नसलेली माहितीही मिळेल
आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी,मंगळ ग्रहावरील  मानवी निवासासाठी उपयुक्त ,योग्य ठीकाण ,तेथील मानवासाठी आवश्यक वातावरणाचीही माहिती मिळेल
मागच्या मंगळ मोहिमेत मंगळावरील माती,डोंगर दऱ्या ,volcanoes ,पाण्याचे आटलेले प्रवाह ह्यांची माहिती मिळाली आता ह्या ग्रहाची भूमिगत अंतर्गत रचना व वातावरणाची माहिती मिळेल
ह्या आधी 2012 मध्ये नासाचे क्युरियासिटी मार्स रोव्हर मंगळावर पोहोचले होते आता Insight Mars lander मंगळावर पोहोचले आहे आणि लवकरच तिथली अद्ययावत आधुनिक माहिती हे यान पृथ्वीवर पाठवेल
ह्या यशस्वी Insight मंगळ मोहिमेत नासा संस्थेसोबत France ,German आणि अनेक युरोपियन स्पेस एजन्सीची मदत मिळाली नासाचे नवे Administrator Jim Bridenstine  ह्यांनी ह्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले  Insight च्या यशस्वीतेसाठी ज्यांनी,ज्यांनी हातभार लावला त्या साऱ्याचे कौतुक करतानाच " ते म्हणतात हे यश त्या साऱयांच्या बुद्धिमत्तेचे ,कुशलतेचे आणि कठोर परिश्रमाचे आहे त्यांच्यामुळेच
 हा  ऐतिहासिक क्षण अनुभभवता आला "! 



Sunday 25 November 2018

अंतराळवीरांनी स्थानकात साजरा केला Thanks Giving Day

 Expedition 57 crew selfie
 Serena Aunon ,अंतराळवीर Sergey Prokopyev आणि Alexander स्थानकातील रशियन Segment मध्ये पार्टीच्या वेळेस सेल्फी घेताना फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -22 Nov.
नासाच्या अंतराळमोहीम 57 चे कमांडर Alexander Grest आणि flight engineer Serena Aunon Chancellor
ह्यांनी ह्या वर्षीचा Thanks Giving Day अंतराळस्थानकात साजरा केला रशियात हा दिवस साजरा होत नसला तरीही रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनीही ह्या दोघांसोबत पार्टी एन्जॉय केली
अमेरिका व युरोप मध्ये दरवर्षी Thanks giving Day  साजरा केला जातो वर्षभरात आपण ज्यांची मदत घेतली त्यांच्या उपकाराची ,कष्ठाची ,मदतीची कामाची ,प्रेमाची जाणीव ठेवून त्याची परतफेड म्हणून त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
त्या दिवशी स्पेशल फिस्टचे आयोजन केले जाते जेवणात विशेषतः टर्की पक्ष्याचे वेगवेगळे पदार्थ आवर्जून केले जातात आपले कुटुंबीय,आप्तस्वकीय आणि मित्रांसोबत पार्टीचे आयोजन केले जाते आणि अनेक स्वादिष्ठ पदार्थासोबतच टर्कीच्या पदार्थाचा आस्वाद घेतल्या जातो आणि साऱ्यांचे आभार मानले जातात
ह्या वर्षी स्थानकात राहायला गेलेल्याअंतराळवीर Alexander आणि Serena Aunon  ह्यांना मात्र हा दिवस पृथ्वीवर साजरा करता आला नाही तरीही त्यांनी हा दिवस अंतराळ स्थानकात साजरा केला
अंतराळवीर Alexander Grest आणि Serena Aunon ह्या दोघांनी हा दिवस साजरा करण्यासाठी कामातून खास वेळ काढला पण अंतराळवीर Sergey Prokopyev  ह्यांनी मात्र त्यांचे रोजचे काम संपवून ह्या दोघांच्या फीस्टमध्ये सहभाग नोंदवला
अंतराळवीर Alexander Grest आणि Serena ह्या दोघांनी  Thanks Giving Day च्या दिवशी स्थानकातून पृथ्वीवर लाईव्ह संपर्क साधत त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्य शुभेच्छा दिल्या आणि नुकत्याच स्थानकात गेलेल्या कार्गोशिप मधून खास त्यांच्यासाठी आलेले टर्की आणि इतर पदार्थांचे पार्सल दाखवले
Alexander म्हणाले कि हा दिवस आमच्यासाठी खास असतो आम्ही पृथ्वीवर अनेकदा हा दिवस साजरा केलाय पण ह्या वेळेस आम्ही हा दिवस स्थानकात साजरा करतोय म्हणून हा दिवस आमच्यासाठी स्पेशल आहे आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आम्ही नासाचे आभारी आहोत हे स्पेशल फूड पाठवल्याबद्दलहि  आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो
आज आम्ही पार्टी करणार आहोत आणि आम्ही तिघे आम्हाला पाठवलेल्या टर्की पदार्थाचा आस्वाद घेणार आहोत आमच्या पार्टीत Spicy पाउंड केक,स्टफिंग candied yams आणि इतर फ्रोजन फूड चाही समावेश आहे
सेरेना म्हणाली कि खरोखरच Alexander म्हणतात तसा हा दिवस आमच्यासाठी खास आहे स्थानकात हा दिवस साजरा करण हि गोष्ट आमच्यासाठी भाग्याची आहे आणि हा अनुभव आमच्यासाठी रोमांचक आहे ,हा दिवस आमच्यासाठी खास आहे आणि सर्वानीच आपण जगात कोठेही असो आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून हा दिवस आवश्य साजरा करावा

Monday 19 November 2018

InSight Mars Lander मंगळावर पोहोचणार नासा T.V. वरून होणार लाईव्ह प्रसारण

NASA's InSight lander descending toward the surface of Mars.
नासाचे मंगळावर पोहोचलेले InSight Mars Lander मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाकडे झेपावताना- फोटो -नासा संस्था

नासा संस्था -13 Nov
अमेरिकेच्या नासा संस्थेने मंगळावर पाठवलेले InSight Mars Lander 26 नोव्हेंबरला ( 3 P.M. EST ) मंगळावर पोहोचणारआहे
ह्या  InSight मंगळ यानाचा मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचतानाचा ऐतिहासिक क्षण नासा संस्थेसोबतच पृथीवासीयांनाही पाहण्याचे भाग्य लाभणार आहे नासा संस्थेतर्फे ही संधी देण्यात येणार आहे नासा संस्था ह्या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करणार आहे
InSight Mars Lander 5 मे ला मंगळाच्या दिशेने झेपावले होते आता ते मंगळग्रहावर पोहोचत आहे ह्या आधी नासाने 2012 मध्ये क्युरिओसिटी  हे मंगळयान मंगळावर पाठवले होते आणि हे मंगळयान मंगळावर व्यवस्थित पोहोचले सुद्धा गेल्या सहा वर्षांपासुन हे यान तिथे यशस्वीपणे कार्यरत आहे नुकतेच क्युरीओसिटी यानाने मंगळावरील धुळीच्या प्रचंड वादळाला सामोरे जात तेथील धुळीवादळाचे फोटो पृथ्वीवर पाठवले होते काहीकाळ ह्या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला पण पुन्हा हे यान त्याला बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने  स्व:च कार्यरत झाले आणि पुन्हा पृथ्वीशी संपर्क साधत यानाने पृथ्वीवरील संशोधन केंद्रात माहिती पाठवणेही सुरु केले आहे आता नासाचे दुसरे InSight हे मंगळ यान मंगळ ग्रहाच्या भुपृष्ठावर धडकणार आहे मंगळावर पोहोचताच हे यान कार्यरत होईल आणि तेथील सखोल माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल
हे मंगळयान दोन वर्षे मंगळावर राहील ह्या काळात InSight यान मंगळाच्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील सखोल माहिती गोळा करेल मंगळाच्या पृष्ठभागाच्या जमिनीखालील मातीचे उत्खनन करून तेथील,मिनरल्स,दगडांचे नमुने गोळा करून त्यांचे फोटो व इतर घडामोडींचे निरीक्षण नोंदवून त्यावरील संशोधित माहिती पृथ्वीवर पाठवेल शिवाय InSight मंगळयान भूपृष्ठभागावरील पाठारी प्रदेश ,डोंगर,नदीचे आटलेले पात्र त्यातील माती,दगड व इतर अवशेष ह्या संबंधित माहिती गोळा करेल शिवाय तेथील डोंगरदऱ्यांचा उगम कसा झाला ह्याविषयीही माहिती गोळा करेल ह्या संशोधित माहितीचा उपयोग पृथ्वीवरील संशोधनासाठीही होईल
ह्या Insight मंगळयानाच्या यशस्वीतेनंतर आता नासा संस्थे तर्फे आणखी दोन छोटी याने मंगळावर पाठवली जाणार आहेत त्या मध्ये Mars Cube One (MarCo )चा समावेश आहे आणि जर मार्को ठराविक वेळेत मंगळावर पोहोचले तर Insight मंगळ यानाने केलेल्या संशोधनाचा त्याला फायदा होईल
InSight यानामार्फत मंगळ ग्रहावरील वातावरणाचीही सखोल माहिती मिळवल्या जाईल आगामी मानवासहित अंतराळमोहीम आणि मंगळ ग्रहावरील मानवी वास्तव्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल
ह्या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून 2-3.30 p.m.वाजता होईल t.v. प्रमाणेच ट्विटर व फेसबुक वरूनही InSight मंगळयानाच्या मंगळ ग्रहावर धडकण्याचा ऐतिहासिक क्षण पाहता येईल
भारतीय वेळेनुसार 26 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 m.वाजता नासा t.v. वर भारतीयांना हा मंगळयान पोहोचण्याचा क्षण पाहता येईल


Sunday 18 November 2018

अंतराळस्थानकाचे विसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण अंतराळवीरांनी केला स्थानकातून व्हिडीओ लाँच

                                                   अंतराळवीर अंतराळस्थानकातील व्हिडीओ  शूट करताना
                                                        फोटो आणि व्हिडीओ नासा संस्था

नासा संस्था -15 nov.
नासा संस्थेच्या इंटर नॅशनल अंतराळस्थानकाला येत्या वीस नोव्हेंबरला वीस वर्षे पूर्ण होत आहेत आणि अंतराळस्थानकातील अंतराळवीरांच्या वास्तव्याला दोन नोव्हेंबरला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत गेल्या वीस वर्षात नासा संस्थेने ह्या अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत अनेक अंतराळवीरांना ट्रेनिंग देऊन अंतराळस्थानकात राहून दोनशेहून अधिक सायंटिफिक प्रयोगावर सखोल संशोधन करण्याची संधी दिली आहे
अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये राहून प्रयोग करणे सोपे नाही तिथे तरंगत्या अवस्थेत राहून संशोधन  करणे तर त्याहून कठीण अंतराळस्थानकात प्रत्येकच वस्तू तरंगते मग ते पाणी असो किअन्न पण गेली वीस वर्षे अंतराळवीर हि कसरत करत स्थानकात राहून त्यांचे संशोधन यशस्वी करत आहेत यात महिला अंतराळवीरांगना पण मागे नाहीत
आपल्या भारतीय वंशाच्या कल्पना चावला,सुनीता विल्यम्सही अंतराळस्थानकात राहायला गेल्या होत्या दुर्दैवाने कल्पना चावलाचा अपघात झाला पण सुनीता विल्यम्स यशस्वी झाली नासाच्या केट रूबिन्स,सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेली सेरेना ऑनॉन-चान्सलर या सारख्या अनेक महिला अंतराळवीरांगनाही स्थानकात राहून यशस्वी संशोधन करून पृथ्वीवर परतल्या पेगी व्हाइटसॉन ह्यांनी  तर अंतराळस्थानकात राहून कित्येक विक्रम केले जास्त दिवस अंतराळस्थानकात राहणे,जास्तवेळा स्पेसवॉक करणे स्थानकात यशस्वी भाजी लागवड करणे या सारखे अनेक विक्रम त्यांनी आपल्या नावावर नोंदवले आहेत
सध्या सेरेना स्थानकात राहून कॅन्सर वर यशस्वी उपचार पद्धती शोधण्यासाठी पेशींवर संशोधन करत आहे
स्कॉट केली ह्यांनी देखील स्थानकात पेगी प्रमाणेच लेट्युसची भाजी व झिनिया फुलांची यशस्वी लागवड करून त्यांची जोपासना केली केजल लिंडग्रेन ह्यांनीही व्हेजी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रोपांची निगा राखली

 Flight Engineer Serena Auñón-Chancellor conducts research operations for the AngieX Cancer Therapy study
    अंतराळवीरांगना Serena Aunon-Chancellor अंतराळस्थानकातील कामात व्यस्त फोटो -नासा संस्था

सध्या स्थानकात राहत असलेल्या अंतराळवीरांनी कमी उंचीच्या गव्हाची आणि नविन प्रकारच्या भाजीची रोपे स्थानकातील अत्याधुनिक ग्रोथ चेंबर मध्ये लावली आहेत ह्या रोपांची लागवड व्हेजी प्रकल्पाअंतर्गत केली जाते त्यासाठी रोपांना आवश्यक प्रकाश मिळावा म्हणून खास कलर लाईटिंगची सोय केली आहे आणि विशेष म्हणजे नुकतेच स्थानकात गहूही अंकुरले आहेत ह्या व्हेजी प्रकल्पा अंतर्गत स्थानकातील वातावरणात रोपांची होणारी वाढ आणि झिरो ग्रॅविटीचा होणारा परिणाम अभ्यासून त्यावर सखोल संशोधन केले जातेय

NASA astronaut Ricky Arnold filming on the ISS
              अंतराळवीर Ricky Arnold स्थानकातील व्हिडीओ शूटिंगच्या तयारीत -फोटो -नासा संस्था 

स्थानकात राहताना अंतराळवीरांना पृथ्वीवरील प्रिझर्व केलेले अन्न खावे लागते त्यांना ताजे अन्न,भाजी व फळे मिळावीत म्हणून हे अंतराळवीर स्थानकातील प्रतिकूल वातावरणात हा व्हेजी प्रकल्प राबवत आहेत शिवाय तिथल्या रुक्ष वातावरणात त्यांना विरंगुळा आणि बागकामामुळे मिळणारा आनंद मिळावा हाही हेतू आहेच
शिवाय तिथे राहात असताना तिथल्या झिरो ग्रॅविटीचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हेही अभ्यासल्या जातेय अपुरी झोप,सतत तरंगती अवस्था असल्याने हाडांवर ,डोळ्यांवर ,शरीरातील रक्ताभिसणावर होणारा परिणाम नोंदवून त्यावरही संशोधन केल्या जातेय
अंतराळातील फिरत्या लॅबमध्ये मानवी शरीरातील रक्त पेशींमधील DNA,RNA वर स्थानकातील वातावरणाचा काय परिणाम होतो हे रक्त नमुना घेऊन नियमित तपासून फरक नोंदवून संशोधन केल्या जातेय
पृथ्वीवरील भूकंप,वादळ ,पूर या सारख्या घडामोडीचेही निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या जातेय
अंतराळस्थानकात वेळोवेळी ह्या अंतराळवीरांच्या संशोधनासाठी लागणारे अत्याधुनिक सामान,अन्न व इंधन पृथ्वीवरून कार्गो space craft मधून पाठविल्या जाते नुकतेच नासा व जर्मनीचे कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळस्थानकात गेले आहे त्यातून हजारो टन आवश्यक सामान अंतराळवीरांसाठी पाठवण्यात आलेय शिवाय त्यात अंतराळवीरांसाठी आईस्क्रीम व ताजी फळे पाठवण्यात आली आहेत
स्थानकाला जोडलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या ,दुर्बिणीच्या साहाय्याने हे अंतराळवीर स्पेसवॉक करतात व स्थानकात येणाऱ्या कार्गो स्पेस क्राफ्ट साठी डॉकिंगची सोय करतात आणि ह्या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने संशोधनही यशस्वी करतात
स्थानकातील छोट्या जागेत,तरंगत्या अवस्थेत कसरत करत पाणी पिणे,जेवण,झोप हे तर ते करतातच शिवाय कधी मधी आवडते सिनेमेही पाहतात हे अंतराळवीर हे सार कस करतात हे पाहण्याची ,जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते त्या साठी वेळोवेळी नासा संस्थेने प्रसारित केलेल्या अंतराळवीरांच्या लाईव्ह चॅट कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान पृथ्वीवरील नागरिक,विध्यार्थी अधिकारी त्यांना प्रश्न विचारतात अंतराळवीरही त्यांना पाणी पिण्याचे व इतर क्रियांचे प्रात्यक्षित करून दाखवतात ,फोटो पाठवतात
नुकताच स्थानकात पाठवलेल्या Ultra High Definition (UHD ) कॅमेऱ्याने ह्याअंतराळवीरांनी त्यांच्या  अंतराळस्थानकातील वास्तव्यातील त्यांची दिनचर्या,व्यायाम ,संशोधन या बरोबरच तिथल्या व्हेजी ग्रोथचेम्बरचे चित्रण करून त्याचा पहिला व्हिडीओ लाँच केला आहे आणि पृथ्वीवासीयांसाठी पाहण्यासाठी पाठवलाय
नासा संस्थेने ह्या व्हिडीओ बनवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल युरोपियन स्पेस एजन्सी,ISS National Lab आणि अंतराळ स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांचे आभार मानलेत
अंतराळवीर Alexander Grest,Serena Aunon-Chancellor,Ricky Arnold आणि  Drew Feustel ह्यांनी हा व्हीडीओ बनवला आहे

Sunday 11 November 2018

पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या नजीकच्या टप्प्यात प्रवेशले

 illustration of Parker Solar Probe
            पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेकडे मार्गक्रमण करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 नोव्हेंबर 
सूर्याकडे झेपावलेले पार्कर सोलर प्रोब हे सौरयान अंतराळात यशस्वी मार्गक्रमण करत आता सूर्याजवळ पोहोचतेय सात नोव्हेंबरला नासा संस्थेत ह्या सौरयानातुन असे signals प्राप्त झाले आहेत
पार्कर सोलर प्रोब यान 11ऑगष्टला सूर्याकडे जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणि कार्यरत होऊन यशस्वी मार्गक्रमण करत आता हे यान सूर्यापासून 15 मिलियन मैल अंतरावर पोहोचले आहे
विशेष म्हणजे ह्या आधी एकही सौऱयान सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचले नव्हते 1976 मध्ये सूर्याकडे झेपावलेल्या  Helios-B ह्या यानाने पार केलेल्या अंतराचा रेकॉर्ड पार्कर सौर यानाने मोडला आहे
पार्कर प्रोब चे मिशन कंट्रोल करणाऱ्या Johns Hopkins University च्या लॅब मध्ये सात नोव्हेंबरला शास्त्रज्ञांना 4.46 p.m. ला पार्कर प्रोब व्यवस्थित कार्यरत असून यशस्वी मार्गक्रमण करीत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत
Parker Solar Probe mission team
 पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेजवळ जात असल्याचे संकेत मिळताच आनंदित झालेले शास्त्रज्ञ -फोटो -नासा संस्था

पार्कर सोलर प्रोब आता सूर्याच्या करोनाच्या दिशेने अत्यंत वेगाने प्रवास करत असून यानाचा वेग ताशी 213.200 मैल इतका आहे विशेष म्हणजे ह्या यानाचा वेग इतका प्रचंड आहे कि हे यान सतत त्याचा स्वत:चाच रेकॉर्ड मोडत आहे लवकरच यान सूर्याच्या करोनाच्या Perihelion जवळ पोहोचेल सूर्याचा हा करोनाआपल्याला साध्या डोळ्याने पाहता येत नाही इतका तो प्रखर प्रकाशमान असतो पण ग्रहण काळात मात्र आपण तो पाहू शकतो तिथे सतत उष्ण वारे वाहतात ,सौर वादळे होतात आगीच्या प्रचंड ज्वाळा सतत बाहेर पडतात अशा अत्युच्च तापमानात साधे सौर यान जळून खाक होऊ शकते पण पार्कर सोलर प्रोबला बसवलेली Thermal Protection System ह्या यानाचे सूर्याच्या प्रचंड उष्णतेपासून रक्षण करेल व यान सुरक्षित राहून त्याचे कार्य करेल
पार्कर सोलर प्रोब सूर्यावरील प्रचंड उष्णता ,सौरमंडळ,त्यावरील वादळे त्याचा पृथ्वीवरील वातावरणावर होणारा परिणाम ह्याचा अभ्यास करून पृथ्वीवर माहिती पाठवेल शिवाय सूर्याचा करोनाचा भाग अत्यंत उष्ण आणि त्या खालचा सूर्याचा पृष्ठभाग मात्र कमी उष्ण का असतो ? ह्या बाबतीतही माहिती मिळवेल
सध्या तेथील वातावरणाची उष्णता 820 डिग्री f.आहे पण जसजसे पार्कर सौऱयान सूर्याच्या कक्षेजवळ पोहोचेल तसतसे उष्णतामान वाढत जाईल व ते 2500 डिग्री f.पर्यंत पोहोचेल सूर्याच्या अत्युच्च तापमानात पोहोचल्यावर यानाला प्रचंड उष्णतेचा आणि तेथील रेडिएशनचा सामना करावा लागेल
नासाच्या वॉशिंग्टन येथील नासा सेंटर मधले Associate Administrator Thomas Zurbuchen ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार पार्कर सोलर प्रोबची रचनाच अशी केली आहे कि हे सौर यान सूर्याच्या प्रभामंडळातील अत्युच्च तापमानात शिरताना स्वतःचे रक्षण स्वत:च करेल कारण पृथ्वीवरून ह्या यानावर नियंत्रण करणे कठीण आहे
आता पार्कर सोलर सौर यानाची स्वयंचलित operating system व्यवस्थित कार्यरत झाली असून सारे instrument हि व्यवस्थित कार्यरत होऊन डाटा गोळा करत आहेत आणि जर काही मायनर प्रॉब्लेम आला तरीही पार्कर प्रोबची ऑटोमॅटिक यंत्रणा कार्यरत होऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करेल गेल्या साठ दशकात पार्कर सोलर प्रोब ने प्रथमच रेकॉर्डब्रेक अंतर पार करून मिळवलेल्या ह्या यशाने शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत
सूर्याच्या कक्षेच्या 68.63 कि.मी. अंतरावरून पार्कर सौरयान सूर्याभोवती सात वर्षे परिक्रमा करेल व तिथली माहिती मिळवेल .

Thursday 25 October 2018

आपत्कालीन लँडिंगनंतर Jim Bridenstineह्यांनी अंतराळवीर Nick Hague ह्याच्याशी साधला संवाद

                            https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/jsc2018e081923.jpg                                      
                       अंतराळवीर Nick Hague नासा प्रमुख Jim Bridenstine ह्यांच्याशी संवाद साधताना

नासा संस्था -20 oct.
11 oct ला नासाचे सोयूझ MS-10 हे अंतराळयान यानात बिघाड झाल्याने पृथ्वीवर परतले यानाच्या आपत्कालीन लँडिंग नंतर यानातील दोनीही अंतराळवीरांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळत यान पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरवले ह्या यानातून सुदैवाने सुरक्षित बाहेर पडलेल्या अंतराळवीरांचे नासा प्रमुख JIm Bridenstine ह्यांनी कौतुक करत त्यांच्याशी संवाद साधला
अंतराळवीर Nick Hague ह्याच्याशी त्यांनी साधलेला हा संवाद
Jim -
आता तुम्ही कसे आहात ! आम्ही पाहील ते खूपच आश्चर्यकारक होत उड्डाणाच्या वेळेस काही चुकल्याचे जाणवले का? त्या वेळेस नेमक काय घडल? यानातील बिघाड कधी लक्षात आला तूम्ही Air Force मध्ये होतात त्याचा अनुभव कामी आला का ?
Nick -
आम्ही ठीक आहोत ! हा अनुभव आमच्यासाठीही अनपेक्षित आणि आश्चर्यकारी होता खरंच ह्या अपघातातून आम्ही वेळीच चूक लक्षात आल्याने वाचलो हे आमचे भाग्यच !
यानात असलेली Rescue सिस्टिम अतिशय फास्ट असते काही कळायच्या आत आम्ही बाहेर रॉकेट पासून दूर फेकल्या गेलो जेव्हा Automated message अलार्म वाजला ,इमर्जन्सी लाईट्स लागले आणि फेल्युअरचा मेसेज आला तेव्हा आम्हाला जाणवल कि यानात काहीतरी गडबड आहे आता आपण अंतराळस्थानकात पोहोचू शकणार नाही
सुरवातीला यानाने व्यवस्थित उड्डाण केले हा पहिला अनुभव माझ्यासाठी आनंददायी आणिअविस्मरणीय होता पण त्या नंतरच्या पहिल्या प्रक्रियेत बूस्टर मध्ये बिघाड झाला आणि हा अनर्थ घडला क्षणात सारे चित्र बदलले आम्ही त्याही परिस्थितीत यान सुरक्षित उड्डाण करावे म्हणून आम्हाला सुचेल ते प्रयत्न केले पण यान खूप वेगाने
हेलकावू लागले श्वास घुसमटू लागला काही कळायच्या आत काही क्षणातच सार संपल्याची जाणीव झाली
त्या काही क्षणात आमचा रोख पृथ्वीवर सुरक्षित परतण्यावर होता आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयन्त्न करायला सुरवात केली सोयूझ कॅप्सूल मध्ये नेमक काय घडतय कळत नव्हत
अर्थातच एअर फोर्स मधला पायलट असतानाचा अनुभव कामी आला तेव्हाचे ट्रेनिंग आणि नासा संस्थेतील ट्रेनिंग ,मेहनत कामी आली अशा वेळेस नेमके काय करायला पाहिजे ते प्रयत्न केले धैर्याने आणि शांततेने परिस्थिती हाताळली
पण आत बरच काही घडतय हे जाणवत होत क्षणात कॅप्सूल वेगळी झाली आणि कॅप्सूल सहित आम्ही दूर फेकल्या गेलो तेव्हा प्रचंड वेग जाणवत होता यानाची response system अलार्म वाजताच आणि धोक्याची सूचना मिळताच त्वरित कार्यरत झाली आणि विशेष म्हणजे आम्ही त्याच मुळे वाचलो
हे अंतराळ यान तयार करणारे इंजिनीअर्स ,डिझायनर्स आणि टीममधील इतर सहकाऱयांचे हि System तयार केली म्हणून आम्ही आभार मानतो मी त्यांचा ऋणी आहे ह्या 35 वर्षात कधीही ह्या सिस्टिमचा वापर करण्याची वेळ आली नव्हती कारण आता पर्यंतच्या अंतराळमोहिमा यशस्वी झाल्या आहेत कित्येक अंतराळवीर अंतराळ स्थानकात सुरक्षितपणे पोहोचून तिथे राहून परत आले आहेत सतत जा,ये सुरूच असते
पण ह्या वेळेस विपरीत घडल अचानक बुष्टर बिघाडामुळे हि मोहीम अयशस्वी झाली अर्धवट राहिली आणि त्या मुळेच हि सिस्टिम तपासल्या गेली तिची उत्तम कार्यतत्परता कळली

JIm -
तुमच्या यानाने यशस्वीपणे अंतराळात झेप घेतली यान वर,वर जात होत तुम्ही अर्ध्या वाटेत होता आम्ही पृथ्वीवरून तो थरारक क्षण अनुभवत होतो पुढची प्रक्रिया सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहात होतो पण क्षणात चित्र पालटल यान पृथ्वीकडे परतु लागल आम्हालाही क्षणभर काय होतय कळत नव्हत
Nick -
हो ! बुष्टर मधला बिघाड लक्षात आला अन सारे प्रयत्न निष्फळ ठरले मग परतण्याचा निर्णय घेतला आणि यानाची दिशा पुन्हा पृथ्वीकडे वळवली त्या वेळेसचा अनुभव आम्हाला एखाद्या उंच फेकलेल्या ball सारखा वाटला  उंच उडालेला बॉल जसा ग्रॅव्हिटीमुळे पुन्हा खाली यायला लागतो तसच रॉकेट पासून वेगळे होताच काही क्षणातच  आम्ही पृथ्वीवर खाली येऊ लागलो
तो क्षण अविस्मरणीय अकल्पित होता बरेच नवे अनुभव आले वजनरहित अवस्था होती ती ! काही क्षण आजूबाजूच्या वस्तू तरंगत होत्या O Gचे इंडिकेटर सुरु होते मी खिडकी बाहेर पाहिले समुद्र ,डोंगर आणि नंतर जमीन दिसू लागली आणि मला जाणवल आम्ही पोहोचत आहोत
Jim -
आम्हाला सगळ्यांना यान परत येताना दिसले आणि पॅराशूट पण उघडलेले दिसले !
Nick -
हो ! आम्ही अत्यंत वेगाने खाली येत होतो आणि प्रेशरही प्रचंड होते नेहमीच्या सामान्य लँडिंग पेक्षा हा अनुभव वेगळा होता आम्ही खरेच भाग्यवान आहोत हा अनुभवही आम्हाला अनुभवता आला
मी गेली पाच वर्षे नासामध्ये आहे आणि ह्या पुढेही राहीन नासा मला पुन्हा स्थानकात राहायला जाण्याची संधी देईल आता ती संधी कधी मिळेल ते आताच सांगता येत नाही
हि मानव निर्मित अंतराळ मोहीम आहे त्या साठी प्रचंड मोठी टीम कार्यरत असते हा निर्णय एकट्याचा नसतो हि मोहीम यशस्वी व्हावी म्हणून आणि अंतराळवीर सुरक्षित स्थानकात जा,ये कारावेत म्हणून हि टीम सतत जागृत असते
मला माझी हि पहिली मोहीम अवीस्मर्णीय व्हावी असं वाटत होत पण ती अशा तरेने नाही पण ह्या अनुभवातून
मला नक्कीच नव शिकायला मिळाल
आता ह्या मोहिमेतील बुष्टर बिघाडाचे कारण शोधले जातेय त्या साठी नासा संस्थेतील सहकारी देशाचे पार्टनर्सहि
मदत करत आहेत आणि त्या साठी अंतराळ स्थानकातील कार्यक्रमात कराव्या लागलेल्या बदलाचा आढावा घेत आहेत .

Wednesday 17 October 2018

यवतमाळात दुर्गादेवीचे उत्साहात स्वागत


    यवतमाळातील दुर्गादेवीचे हे आकर्षक रूप आणि देखावे
     फोटो -पूजा दुद्दलवार(B.E.Soft.&B.M.C)

यवतमाळ -10 oct.
यवतमाळात दरवर्षी दुर्गोत्सव उत्साहात स्वागत केल्या जातो आकर्षक व नाविन्यपूर्ण देखाव्यामुळे इथल्या दुर्गा मंडळांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे ह्या काळात आजूबाजूच्या खेड्यातून लोक इथल्या दुर्गादेवी पाहण्यासाठी गर्दी करतात
ह्या वेळेस पाणीपुरवठा विभागातर्फे सतत रस्ते खोदल्या जात असल्याने काही मंडळांना आकर्षक देखावे तयार करण्यासाठी वेळ मिळाला नाही असे काही मंडळांनी सांगितले शिवाय यवतमाळ येथील कृत्रिम पाणी टंचाई, बंद असलेली लोकल फोन व इंटरनेट सेवा ,वाढती महागाई सततचे बंद या मुळे आलेली व्यापारातील मंद आदी अनेक कारणांनी लोकांनी वर्गणी देताना काटकसर केली विशेष म्हणजे काही मंडळांनीही बळजबरी न करता वर्गणी ऐच्छिक ठेवली हे ह्या वेळचे वैशिष्ठ निश्चितच कौतुकास्पद आहे
तरीही दुर्गादेविंचे आगमन दिव्यांच्या आकर्षक सजावटीने सजलेल्या रस्त्यांवरून मंडळांच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या आदिवासी नृत्य ,टिपरी नृत्य वै. कला सादर करीत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने थाटामाटात  झाले  यवतमाळातील प्रत्येक चौकातच दुर्गादेवीची प्रतीष्ठापना झाली आहे त्या मुळे साहजिकच दुर्गादेवींची संख्याही वाढली आहे ह्या सर्व ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी पाहता पोलीस बंदोबस्तही चोक आहे यवतमाळात सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून ते लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत
अशाच काही दुर्गादेवीच्या मंडळाबद्दल आणि सजावटीबद्दल घेतलेली हि माहिती
 छोटी गुजरीतील एकता मंडळ १९७१ सालापासून दुर्गादेवी बसवतात त्यांच्या मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक देखावे सादर केले जातात यंदा त्यांनी कृत्रिम फुले व हिरवळीचा वापर करून आकर्षक सजावटीचा इंद्रपुरी महाल साकारला आहे त्या साठी खास कलकत्यावरून हरी नामक कलाकाराला बोलवण्यात आले आहे त्यांनी त्यांच्या तीस सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीस दिवसांच्या परिश्रमाने हा देखावा सादर केला आहे आणि तो खरोखरच आकर्षक आहे मंडळातर्फे सामाजिक कार्यही केल्या जाते शिवाय दररोज येणाऱ्या भक्तांना उपवासाचा फराळ वाटप केल्या जातो
यवतमाळ येथील वडगाव रोड वरील सुभाष क्रीडा मंडळाचे यंदाचे हे बावन्नावे वर्ष आहे दरवर्षी भव्यदिव्य व वेगळेपण दर्शवणारे देखावे सादर करण हे या मंडळाच वैशिष्ट .यंदाही त्यांनी केदारनाथ धामाचा देखावा साकारला असून त्यांनीही कलकत्त्याहून कारागीर बोलावले होते हा देखावा साकारण्यासाठी वीस पंचवीस कामगारांनी परिश्रम घेतले त्यांनी उंच डोंगर तयार केले असून डोंगरावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी लोखंडी जिना बसवला आहे आणि आतमधल्या मोठ्या गुहेत नागाच्या फण्यावर दुर्गादेवी विराजमान झाली आहे उंच डोंगरावर शंकराची मूर्ती आहे प्रवेशद्वारावर आदिवासी वेशातील कलाकार,समोर कारंजे महादेव आणि गणपतीची मूर्ती येणाऱ्यांना आकर्षित करतात
आर्णी रोड वरील लोकमान्य दुर्गादेवीची मूर्तीही लक्षवेधी आहे मंडपात गोलाकार पाण्याच्या तळ्यात मध्यभागी दुर्गेची मूर्ती असून तिची समोरची बाजू दुर्गेचे सुंदर ,शांतरूप दर्शवते तर पाठीमागील मूर्ती कालीमातेचे क्रोधीत
रूप दर्शवते
आठवडी बाजारातील राणी झासी बंगाली दुर्गा मंडळाने कलकत्याच्या कालीमातेचे विलोभनीय रूप साकारणारी आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे
शिवाजीनगर मधील मंडळाने बालकांना आकर्षित करणारे छोटा भीम मधील ढोलकपूर गाव चलतचित्र माध्यमातून साकारले आहे. स्टेट बँक चौकातही केदारनाथ धाम साकारले आहे. दर्डा मातोश्री जवळील शिवराय मंडळाने दुर्गेची त्रिमूर्ती प्रतिष्ठापीत केली असून त्यासमोरील कारंजे लोकांना आकर्षित करत आहे.या शिवाय नेहमीच्या लोकमत चौक ,मेन लाईन ,गांधी नगर इथल्या म्हैसासूरमर्दिनीच्या रूपातील दुर्गादेवीही लोकांना आकर्षित करत आहेत.
ओम सोसायटी जवळ माँ एकविरा दुर्गोत्सव मंडळाने साठ फूट उंच शिवलिंग बनवून त्याच्या आतमध्ये देवी दुर्गा प्रतिष्ठापित केली आहे आणि आजूबाजूला बारा जोतिर्लिंगाची मूर्ती साकारली आहे प्रवेशदारावर समोर नंदीची
मूर्ती आहे आणि छोट्याशा तळ्यात एक घागर ठेवली आहे त्यात नागरिक नाणी टाकतात हे त्यांचे पंचविसावे वर्ष आहे.
समर्थवाडी मधल्या समर्थ दुर्गा उत्सव मंडळाचा देखावाही लक्षवेधी आहे त्यांनी खेड्यातील झोपडीच्या देखावा साकारला असून आतमध्ये गोल तळ्यात दुर्गादेवी विराजमान झाली असून बाहेर बैलाचा पुतळा आहे ह्या मंडळाला आदर्श दुर्गोत्सवाचे बक्षीस मिळाले आहे यंदा त्यांनी बाजूला बेटी बचाव ,पाणी अडवा पाणी जिरवा या सारखे वैचारिक लोकजागृती करणारे फलक लावले आहेत  

Friday 12 October 2018

अंतराळस्थानकाकडे निघालेल्या सोयूझ M.S.-10 मध्ये बिघाड आपत्कालीन landing अंतराळवीर सुरक्षित


Alexey Ovchinin of Roscosmos, left, and Flight Engineer Nick Hague of NASA
 सोयूझ यानाच्या आपत्कालीन लँडिंग नंतर पृथ्वीवर सुरक्षित पोहोचलेल्या अंतराळवीरांना भेटतानाचा हृद्य क्षण
फोटो -नासा संस्था

नासा संस्था -11 oct 
नासाच्या अंतराळ मोहीम 57 चे अंतराळवीर Nick Hague आणि रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin हे दोघे रशियन बनावटीच्या MS-10 ह्या अंतराळयानातून अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जात होते
 त्यांच्या सोयूझ यानाने ठरल्या प्रमाणे ठरलेल्या वेळी कझाकस्थानातील उड्डाणस्थळावरून ठीक 4.40 am वाजता अंतराळस्थानकाकडे यशस्वीपणे झेप देखील घेतली आणि यानाने काही अंतर क्षणात पारही केले
पण यानाच्या पहिल्या चरणातील प्रक्रियेला सुरवात होताच काही सेकंदातच बुस्टर रॉकेट मध्ये बिघाड निर्माण झाला आणि ह्या समस्येनंतर अंतराळस्थानकाकडे प्रवास करणे अशक्य असल्याने यानाचे पृथ्वीवर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात आला
यानातील दोनीही अंतराळवीरांनी ह्या निर्णयाचे पालन करून यान पृथ्वीकडे परत आणले सोयूझ यान पृथ्वीवर सुरक्षित पणे उतरल्यानंतर नासाच्या search &rescue टीमने यानाचा शोध घेऊन अंतराळवीर Hague आणि अंतराळवीर Ovichinin ह्यांना capsule मधून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना जेथून सोयूझ यानाचे उड्डाण झाले त्या ठिकाणी नेण्यात आले
तेथे नासाचे प्रमुख Jim Bridenshine ,रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख अधिकारी आणि अंतराळवीरांचे नातेवाईक उपस्थित होते हे अंतराळवीर सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला Jim Bridenshine ह्यांनी रशियाच्या व नासाच्या टीमचे हि समस्या यशस्वीपणे हाताळल्याबद्दल कौतुक केले
आता ह्या अंतराळवीरांचे आवश्यक काळजी म्हणून मेडिकल चेकअप केले जाईल आणि त्या नंतर ते घरी परततील

Sunday 7 October 2018

अंतराळ मोहीम 56चे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

 Members of the Expedition 56 crew, NASA astronauts Drew Feustel and Ricky Arnold, and cosmonaut Oleg Artemyev of the Russia
 अंतराळवीर Drew Feustel ,अंतराळवीर Ricky Arnold आणि Oleg Artemyev  पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्यानंतर - फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -4 Oct.
नासाच्या अंतराळमोहीम 56चे अंतराळवीर Drew Feustel ,Ricky Arnold आणि Oleg Artemyev हे तिन्ही अंतराळवीर गुरुवारी चार तारखेला 7.44 a.m. वाजता (5.44pm.स्थानिक वेळ ) कझाकस्थानातील Dzhezkazgen येथे सुखरूप पोहोचले
 ह्या तीनही अंतराळवीरांनी त्यांच्या अंतराळ स्थानकातील वास्त्यव्यात तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनात सहभाग नोंदवला शिवाय तिथे आलेल्या पाच कार्गोशिपच्या आगमनासाठी path तयार करून त्यांच्या docking ची सोय केली आणि त्यांच्या संशोधनाच्या कार्यातून वेळ काढत अमेरिकेतील 29 स्टेट मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
अंतराळवीर Drew Feustel  ह्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत तीनवेळा अंतराळयात्रा केली आणि अंतराळ स्थानकात 226 दिवस वास्तव्य केले तर Ricky Arnold ह्यांनी दोनवेळा अंतराळयात्रा केली आणि अंतराळ स्थानकात 209 दिवस वास्तव्य केले
ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान संशोधनाबरोबरच अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्थानकाबाहेर तीनवेळा spacewalk केला
Drew Feustel ह्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत नऊवेळा स्पेसवॉक केला आणि त्या साठी स्थानकाबाहेर 61 तास 48मिनिटे व्यतीत केले आणि त्या मुळे जास्तवेळ स्पेसवॉक करणाऱ्या अमेरिकन अंतराळ वीरांच्या यादीत त्यांनी तिसरे स्थान मिळवले
Ricky Arnold ह्यांनी देखील त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत पाच वेळा स्पेसवॉक केला आणि त्या साठी त्यांनी स्थानकाबाहेर 32 तास 4 मिनिटांचा वेळ व्यतीत केला
अंतराळ वीर Oleg  Artemyev ह्यांनी दोनवेळा अंतराळवारी केली आणि त्या दरम्यान त्यांनी अंतराळ स्थानकात 366 दिवस वास्तव्य केले त्यांनी केलेला पहिलाच स्पेसवॉक मात्र  रेकॉर्डब्रेक ठरला
त्यांनी केलेला 7 तास 46मिनिटांचा स्पेसवॉक रशियन Space Programm History मधला सर्वात जास्तवेळ केलेला स्पेसवॉक होता


Tuesday 2 October 2018

अंतराळवीर Drew Feustel ह्यांनी स्थानकातून Music Video केला रेकॉर्ड

 Expedition 56 Commander Drew Feustel
 अंतराळ स्थानकात Music Video रेकॉर्ड करण्याच्या तयारीत अंतराळवीर Drew Feustel -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 sap.
नासाचे अंतराळवीर Drew Feustel ह्यांनी अंतराळस्थानकातून एक Music Video रेकॉर्ड केला आहे हा video त्यांनी कॅनडियन रॉक बँड च्या टीमच्या साहाय्याने रेकॉर्ड केला आहे अंतराळवीर Drew मार्च मध्ये अंतराळस्थानकात राहण्यासाठी गेले होते आणि गुरुवारी 4octला पृथ्वीवर परतणार आहेत
 त्या आधीच अंतराळ स्थानकातून त्यांनी हा video रेकॉर्ड केला असून नुकताच त्यांनी तो त्यांच्या चाहत्यांसाठी You tube वर शेअर केला आहे हे गाण श्रवणीय तरआहेच शिवाय त्यातील दृश्येही आल्हाददायी आहेत अंतराळस्थानकातील झिरो गुरुत्वाकर्षणात संशोधनासोबतच फावल्या वेळात केलेला हा video खरोखरच सुखद आश्चर्य आणि कौतुकास्पदच !
त्यांनी ह्या video रेकॉर्डिंग करण्यासाठी मदत करणाऱ्या टीमचे आभार मानले आहेतच शिवाय ह्या video recording साठी सहाय्य केल्याबद्दल नासाच्या Johnson Space Center चे मिशन सपोर्ट आणि टेक्निकल रिसोर्सेसचेही विशेष आभार मानले
हा video बनविण्यासाठी त्यांच्या मोहीम 55-56चे सहयोगी अंतराळवीरांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल विशेष आभारही मानले त्यांच्या ह्या यशात त्यांचे कुटुंबीय व मित्रांचाही वाटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
त्यांच्या गाण्याचे बोल आहेत ,
                                         "  love is all around and us,
                                          We are all around the World"
           
      

 

अंतराळ मोहीम 56 चे तीन अंतराळवीर 4 तारखेला पृथ्वीवर परतणार

 Drew Festal (right) and Ricky Arnold (left) of NASA, along with Oleg Artemyev of Roscosmos (center)
 नासाच्या मोहीम 56चे कमांडर Drew Feustel,flight engineer Ricky Arnold आणि Oleg Artemyev यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यानचा क्षण -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -2 oct.
नासाच्या अंतराळ मोहीम 56चे कमांडर Drew Feustel, flight engineer Ricky Arnold  आणि flight engineer व  सोयूझ कमांडर रशियन अंतराळवीर Oleg Artemyev गुरुवारी 40ct.ला पृथ्वीवर परतणार आहेत
 हे तीनही अंतराळवीर सोयूझ MS-08 ह्या अंतराळ यानातून पृथ्वीवर परततील स्थानकातून निघाल्यानंतर जवळपास तीन तासानंतर त्यांचे सोयूझ यान कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचेल
त्या आधी 3oct.ला स्थानकात कमांडर ceremony पार पडेल सध्याचे कमांडर Drew Feustel स्थानकाच्या कमांडर पदाची सूत्रे Alexander Grest ( ESA ) ह्याच्या हाती सोपवतील
4oct.ला 12.30a.m.-ला अंतराळवीरांचा  Farewell ceremony कार्यक्रम होईल आणि अंतराळवीर एकमेकांचा निरोप घेतील नंतर यानाचे  Hatch Closure पार पडेल 3.30a.m.-ला यानाची  Unlocking प्रक्रिया पार पडेल
6.30a.m.ते 6.51a.m.-वाजेपर्यंत  Deorbit burn & 7.45 वाजता यानाचे Landing होईल व सर्व क्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर सोयूझ अंतराळयान पृथ्वीकडे झेपावेल
ह्या सर्व घडामोडींचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करण्यात येणार आहे
पृथ्वीवर पोहोचल्यानंतर ह्या अंतराळवीरांना हेलिकाफ्टरने कझाकस्थानातील recovery staging city Karaganda येथे नेण्यात येईल आणि चेकअप नंतर नासाच्या दोन विमानाने अंतराळवीर आपल्या इच्छित स्थळी पोहचतील
अंतराळवीर Feustel आणि Arnold नासाच्या विमानाने Houston येथे जातील तर रशियन अंतराळवीर Artemyev रशियातील त्यांच्या घरी Star City येथे जातील
ह्या तीनही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात 197 दिवस वास्तव्य केले असून त्यांनी स्थानकातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान स्थानकातून पृथ्वीभोवती 3,152 वेळा फेऱ्या मारल्या
अंतराळवीरांनी अंतराळस्थानकातील त्यांच्या वास्तव्यात स्थानकातील फिरत्या लॅब मध्ये सुरु असलेल्या संशोधनात्मक वैज्ञानिक प्रयोगात सहभाग नोंदवला हे संशोधन पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी,अंतराळवीरांच्या स्थानकातील  वास्तव्यासाठी व आगामी दूरवरच्या अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त आहे


Sunday 23 September 2018

पार्कर सोलर प्रोब यशस्वी पणे कार्यरत - प्रकाशाचे पाठवले फोटो




पार्कर सोलर प्रोबने पाठवलेल्या डावीकडील फोटोत मिल्की आकाशगंगेतील तारकासमूह आणि उजवीकडील फोटोत तेजपुंज तारकांमध्ये प्रकाशमान गुरु ग्रह -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -21सप्टेंबर
मागच्या महिन्यात सूर्याकडे झेपावलेल्या पार्कर सोलर प्रोब सौर यानाचा प्रवास निर्विघ्न पणे सुरु आहे हे यान प्रचंड आगीचे लोळ उठणाऱ्या सूर्याच्या प्रभामंडळात प्रवेशून तिथल्या वातावरणाची सखोल माहिती मिळवणार आहे त्या साठी ह्या यानाला आगीपासून बचाव करणारे संरक्षक कवच बसवले आहे नोव्हेंबरमध्ये पार्कर प्रोब सूर्याजवळ पोहोचेल आणि प्रत्यक्ष कार्याला सुरवात होईल पण त्या आधीच
पार्कर सौर यानाने प्रवासात असतानाच कार्यरत होऊन अवकाशातील प्रकाशाचे सुंदर प्रकाशमान फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत 
पार्कर सोलर प्रोब वर बसविलेली चार अत्याधुनिक उपकरणे आता कार्यान्वित झाली असून पार्कर प्रोब सूर्याच्या जवळ जात आहे आणि त्यावर बसवलेली अत्याधुनिक यंत्रणा चार्ज होऊन व्यवस्थित काम करत असल्याचे संकेत शास्त्रज्ञांना मिळत आहेत
पार्कर सोलर प्रोब सौरयानावर बसवलेल्या कॅमेऱ्याने यानाभोवतीच्या वातावरणातील प्रकाशाच्या सूक्ष्म कणांचे अत्यंत प्रकाशमान फोटो टिपले आहेत हा अवकाशातील दक्षिणेकडचा भाग आहे ह्या फोटोत सूर्य दृष्टीस पडत नाही पण उजव्या बाजूला गुरु ग्रह दिसतोय तर डाव्या बाजूला अत्यंत तेजपुंज मिल्की आकाशगंगेचा प्रकाशमान पट्टा दिसत आहे हे फोटो पार्कर प्रोब सौर यानाच्या WISPR' ह्या उपकरणाने टेलिस्कोपच्या साहाय्याने टिपले आहेत
सध्या हि उपकरणे कमी क्षमतेने काम करत आहेत पण जसजसे पार्कर प्रोब सूर्याच्या कक्षेजवळ पोहोचेल तसतशी त्यांची कार्यक्षमता वाढत जाईल पार्कर सोलर प्रोब नोव्हेंबर मध्ये सूर्याच्या जवळ पोहोचेल आणि सूर्याभोवतीचे प्रभामंडळ भेदून त्याच्या कक्षेत शिरेल तेव्हा पूर्ण क्षमतेने पार्कर प्रोब कार्यरत होईल
ह्या प्रभामंडळातील प्रचंड आगीच्या लोळातील इलेक्ट्रिकल व मॅग्नेटिक फिल्डमधल्या प्रकाश किरणांचा आकार,गती आणि प्रकाशाची तीव्रता ह्या विषयी पार्कर प्रोब सखोल माहिती मिळवेल त्या मुळे सूर्याचा करोना (तेजोवलय ) हा  सूर्याच्या खालच्या पृष्ठभागापेक्षा शम्भरपटीने का उष्ण आहे ह्याची माहिती मिळेल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करतात

Sunday 9 September 2018

मंगळावरील धुळीच्या वादळाला तोंड देत नासाचे Curiosity Mars Rover पुन्हा कार्यरत

NASA's Curiosity rover at its location on Vera Rubin Ridge
 Curiosity Mars Rover कार्यरत असलेला  मंगळावरील Vera Rubin Ridge हा भाग -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -8 सप्टेंबर

मंगळावर गेल्या महिन्यात धुळीचे भयानक वादळ घोंघावले होते तिथल्या प्रचंड धुळीच्या लोटात काहीकाळ   Curiosity मंगळयानाचे काम ठप्प झाले होते त्याचा पृथ्वीशी असणारा संपर्कही काही काळ तुटला होता पण आता मंगळावरील धुळीवादळ शमले आहे
धुळीमुळे अंधारलेल्या मंगळावरील Curiosity कार्यरत असलेल्या भागात आता सूर्यदर्शन झाल्याने Curiosity यान पुन्हा व्यवस्थित स्थिरावले आहे धुळीवादळा मुळे भरकटलेले व ठप्प झालेले Curiosity यान सूर्यकिरणांच्या सौर ऊर्जेने बॅटरी चार्जित करून पुन्हा कार्यरत झाले आहे
अत्याधुनिक यंत्रणेने बनवलेल्या Curiosity मंगळ यानाने ऑगस्ट मध्ये त्याच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Vera Rubin Ridge ह्या भागात ड्रिल करून नव्या खडकांचे नमुने शोधले आहेत आधी दोन वेळेस केलेल्या ड्रिल च्या वेळेस तिथे असलेल्या अत्यंत हार्ड खडकामध्ये खोदकाम करताना तांत्रिक अडचण येत होती म्हणून ह्या वेळेस  ड्रिलींगची जागा बदलली ह्या भागाला Stoer हे नाव दिले आहे 
Curiosity मंगळ यानाने शोधलेले नवे खडक अत्यंत कडक आहेत ते सिमेंट सारखेच कडक असल्याने त्यांचे ड्रिल करून पावडरच्या स्वरूपात सॅम्पल बनवणे अत्यंत कठीण काम आहे असे नासाचे ह्या प्रोजेक्टचे शास्त्रज्ञ म्हणतात
ह्या नव्या नमुन्यातील खडक विविध रंगांचे आहेत ते साध्या डोळ्यांनीही दिसतात पण काही नजरेच्या टप्प्याबाहेरच्या खडकाचे निरीक्षण करण्यासाठी इन्फ्रा रेड चा वापर करण्यात येतोय काही खडक टोकदार आहेत मंगळावर खूप पूर्वी पाणी वाहात होते ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे ह्या खडकांची झीज झाली असावी व प्रचंड वादळाचा परिणाम होऊन Erosion झाले असावे त्या मुळे ह्या खडकांची झीज होऊन खडक कडक व टोकदार झाले असावे असे शास्त्रज्ञाचे मत आहे ह्या खडकांमध्ये Hematite Mineralचे कण सापडले आहेत आणि हे मिनरल पाण्यात तयार होतात
सप्टेंबर महिन्यात आणखी दोनवेळा ह्या भागात खोदकाम केले जाईल त्या नंतर Curiosity चे त्या भागातील काम संपेल सध्या सापडलेले हे खडक अत्यंत कडक असले तरीही आतून ते मऊही असू शकतील आणखी खोदकाम करून त्यांची सखोल माहिती मिळेल
विशेष म्हणजे मंगळावरील ह्या प्रचंड भयानक धुळीच्या वादळाला तोंड देत Curiosity मंगळ यान शाबूत राहिले आणि आता स्व-कार्यक्षमतेने कार्यरतही झाले आहे
आता तिथले आकाश निरभ्र असले तरी वादळाच्या काळात तिथे अंधार दाटला होता सूर्यदर्शन दुर्लभ झाले होते
तेव्हाही काही काळ Curiosity मंगळ यानाने प्रचंड मोठ्या धुळीच्या लोटातही त्याच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने काही दुर्मिळ वादळी दृश्ये टिपली आहेत त्यात Curiosity च्या डेस्कवरही पातळ धुळीचे आवरण दिसतेय




Friday 7 September 2018

नासाच्या अंतराळमोहीम 58 चेअंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज


 Expedition 58 crew members Anne McClain, Oleg Kononenko and David Saint-Jacques
 नासाच्या मोहीम 58 ची अंतराळ वीरांगना  Anne McClain कॅनडाचे अंतराळवीर Davis Saint आणि  रशियन अंतराळवीर Oleg Kononenko अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज
-फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 58ची अंतराळ वीरांगना Anne McClain कॅनडाचे अंतराळवीर  Davis Saint-Jacques आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko लवकरच अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत
जाण्याआधी ते सहा सप्टेंबरला नासाच्या Johnson Space Center मध्ये पत्रकारांशी संवाद साधतील व त्यांच्या या अंतराळ मोहिमेबद्दल माहिती सांगतील
 हे अंतराळवीर 20 डिसेंबरला कझाकस्थानातील बैकोनूर मधल्या Cosmodrome वरून  Soyuz MS-11ह्या अंतराळ यानातून अंतराळस्थानकाकडे रवाना होतील आणि अंतराळ स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळवीरांसोबत तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील
अंतराळ वीरांगना Anne McClainआणि Davis Saint Jacques  ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे
रशियन अंतराळवीर Oleg Kononenko  मात्र चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहण्यासाठी जातआहेत आणि ते ह्या मोहीम 59च्या पथकाचे कमांडरपद सांभाळतील
हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या वेगवेगळ्या सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनात सहभागी होतील McClain  पहिल्या Tissues on chip ह्या प्रोजेक्ट अंतर्गत सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवेल
  U.S.मधून मेकॅनिकल आणि Aeronautical engineering ची पदवी घेतल्यानंतर McClainने  इंग्लंड मधल्या Bath युनिव्हर्सिटीतून M.E  Aerospace Engineering केले आहे .ती ह्या प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळ स्थानकातील micro gravity चा tissues वर होणाऱ्या परिणामावर संशोधन करणार आहे

Sunday 2 September 2018

गुरु ग्रहावरही सापडले पाण्याचे अस्तित्व नासाच्या शास्त्रज्ञाच संशोधन प्रकाशित

infrared image of jupiter
                                         गुरु ग्रहावरील पाण्याचे अस्तित्व सापडलेला ग्रेट रेड स्पॉट
                                              फोटो -नासा संस्था


नासा संस्था -30 ऑगस्ट

सध्या जगभरातील शास्त्रज्ञ परग्रहावरील पाण्याचा ,सजीव सृष्टीच्याअस्तित्वाचा सतत शोध घेतआहेत ह्या मोहिमेअंतर्गत सध्या नासाची वेगवेगळी अत्याधुनिक यंत्रणा असलेली अंतराळयाने ग्रहावर पोहोचलीही आहेत आणि त्या त्या ग्रहाभोवती भ्रमण करत नवनवीन माहितीही पृथ्वीवर पाठवत आहेत
गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा व सूर्याच्या जवळचा ग्रह असल्याने शास्त्रज्ञांना ह्या ग्रहाबद्दल नेहमीच कुतूहल वाटते हा ग्रह नेमका कसा आहे आणि तो कसा तयार झाला हे शोधल्यास सूर्यमालेच्या उगम व विकास कसा झाला ह्याची आणखी सखोल माहिती मिळवणे सोपे जाईल असे त्यांचे मत आहे
ह्याच संशोधना अंतर्गत गुरु ग्रहावर पूर्वी पाणी अस्तित्वात होते का ?असल्यास  कोठे आणि किती प्रमाणात होते आणि सध्या तेथे पाणी उपलब्ध आहे का? ह्याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत आणि आश्चर्य म्हणजे शास्त्रज्ञाच्या ह्या प्रयत्नांना यश देखील आले आहे नासाच्या गुरु ग्रहावरील Juno अंतराळयाने नुकत्याच पाठवलेल्या संशोधित माहितीनुसार गुरु ग्रहावर पाण्याचे अस्तित्व सापडले आहे
नासाच्या Maryland Space Flight Center मधील  Gordon L.Bjoraker (Astrophysicist ) ह्या शास्त्रज्ञानीं Astronomical Journal मधून हि माहिती प्रकाशित केली आहे
नासाचे Juno अंतराळ यान गुरु ग्रहाभोवती भ्रमण करीत असून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दर 53 दिवसातून एकदा चक्कर मारतोय
गुरु ग्रहावर 350 वर्षांपूर्वी प्रचंड वादळ झाले होते ज्या ठिकाणी हे भयानक वादळ झाले त्या ठिकाणाला ग्रेट रेड स्पॉट असे नाव देण्यात आले त्याच ठिकाणाचे Juno अंतराळ यानामार्फत संशोधन केल्या जात असून तिथल्या पाण्याचे अस्तित्वाचे ठिकाणही शोधले जात असताना त्याच भागात पाण्याचे अस्तित्व सापडले आहे
ह्या संशोधित पाण्याच्या नमुन्यात ऑक्सिजन व कार्बन मोनो ऑक्साईड असल्यामुळे तेथे सूर्यापेक्षा दुप्पट ते नऊपट जास्त ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाले आणि ह्या मुळे तिथे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याच्या शक्यतेलाही दुजोरा मिळाला आहे
सध्या ह्या ग्रेट रेड स्पॉट मधील भाग घनदाट ढगांनी व्यापलेला आहे त्या मुळे त्या भागातून electromagnetic energy बाहेर पडण्यास अडथळा येत असल्याने पाण्याच्या अस्तित्वाची सखोल माहिती संशोधकांना मिळाली नसली तरीही लवकरच ह्या परिस्थितीवर मात करून संशोधन करण्यात शास्त्रज्ञ यश मिळवतील असे मत शास्त्रज्ञ Gordon Bjoraker ह्यांनी व्यक्त केले आहे ह्या संशोधनाने ते आनंदित झाले असून ह्या शोधाचा उपयोग आगामी गुरु ग्रहावरील मानवसहित अंतराळ मिशन साठी होईल असे शास्त्रज्ञांना वाटतेय


Tuesday 21 August 2018

यवतमाळात भर पावसाळ्यातही पाणी आठवड्यातून एकदाच

यवतमाळ -२१ ऑगस्ट

यवतमाळ येथे गेल्या दोन महिन्यात भरपूर पाऊस पडला त्या मुळे यवतमाळला पाणी पुरवठा करणारी धरणे ओसंडून वाहू लागली तरीही यवतमाळातील पाणी पुरवठा मात्र नियमित केल्या गेला नाही अजूनही नळाला आठ दिवसातून एकदाच पाणी सोडण्यात येतेय विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून यवतमाळात सतत पाऊस पडत आहे तरीही बाहेर मुसळधार पाऊस पण घरातील नळाला अर्थातच घरात पाणी नाही अशी अवस्था यवतमाळकरांची झाली आहे
आणि हे केवळ प्रशासनाची उदासीनता,निष्क्रियता आणि योग्य नियोजनाअभावी झाले आहे नागरिकांना अजूनही बिसलेरी आणि टँकरचा नाहक खर्च सोसावा लागतोय आधीच उन्हाळ्यात टँकर,बिसलेरी ,कॅन,स्टील टाक्या प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्या ,फिल्टर आदीचा खर्च सोसावा लागल्याने ते त्रस्त होते आता पावसाळ्यातही लोकांना कृत्रिम पाणीटंचाईमुळे आणि नेते आणि संबंधितांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा खर्च करावा लागतोय त्या मुळे लोक त्रासले नसले तरच नवल
आता भरपूर पाऊस पडलाय जिल्यात अनेक ठिकाणी पूर आलाय त्या मुळे पाणी समस्या संपली आहे निदान आता तरी संबंधीतांनी ह्या समस्येकडे लक्ष देऊन नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी यवतमाळकर सतत करत आहेत
यवतमाळला पाणी पुरवठा करणारे निळोणा व चापडोह प्रकल्प पावसाळा सुरु होताच अवघ्या दोन महिन्यातच भरून वाहू लागले त्या मुळे ह्या वर्षीच्या दुष्काळातील पाणीटंचाईने त्रस्त झालेले यवतमाळचे नागरिक आनंदित झाले टंचाईच्या काळात दोन महिने बंद झालेला पाणीपुरवठा आता नियमित होईल ह्या आशेत असलेल्या नागरिकांचा आता भ्रमनिरास झाला असून अजूनही पाणी दररोज किंवा एक दिवसाआड सोडण्यास प्रशासन तयार नाही मध्यंतरी काही नागरिकांनी मोर्चा नेऊन पाणीपुरवठा विभागाला चार दिवसातून एकदा पाणी सोडण्याची विनंती केली तरीही प्रशासन पाणीपुरवठा नियमित करण्यात असमर्थ आहे
यवतमाळकरांना गेल्या पाचसहा वर्षांपासूनच पाणीसमस्येचा त्रास सोसावा लागतोय पाणी कमी दाबाने येणे पाईपलाईन फुटणे ,नियमित न येणे नित्याचेच आहे ,पाणी बेसिनच्या नळाच्या उंचीपर्यंतही पोहोचत नाही वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही सतत नवीन पाईपलाईन टाकत असल्याचे सांगितले जाते पण वर्षभरानंतरही काम पुर्ण होत नाहीच
नागरिकांना गेले वर्षभर बेंबळा प्रकल्पातून पाणी पुरवठा करणार असे आश्वासन दिल्या जात होते ते कामही पूर्ण झाले नाहीच आणि ह्या कामासाठी जिथपर्यंत पाईप टाकण्यात आले ते पाइपही निकृष्ट दर्जाचे निघाल्याने टेस्टिंगच्या वेळी पाण्याच्या दाबाने पाइपच फुटले त्या मुळे आधीच उशिराने सुरु करणार असलेला  प्रकल्प लांबणीवर पडला शिवाय पाईप फुटल्याने दुष्काळात पाणीच वाया गेले नाही तर आसपासच्या शेतीचेही नुकसान झाले
निवडणुकीआधी नागरिकांना चोवीसतास भरपूर पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन देणारे मंत्री सध्या भरपूर पाऊस पडून धरणे भरून वाहत असताना दररोज तर सोडाच एक दिवसाआड पाणीपुरवठा करू शकत नाहीत आणि हि परिस्थिती पावसाळ्यातली आहे म्हणजे पावसाळा संपल्यावर काय होईल ?  ह्याच कामामुळे रस्ते खोदल्याने गेल्या ऑक्टोबर पासून इंटरनेट सेवा व लोकल फोनही बंदच आहेत आता त्यालाही वर्ष होत आले आहे अजूनही प्रशासन ढीम्म आहे आता वायफाय देण्याचे आश्वासन देण्यात येतेय हि सेवा जेव्हा सुरु होईल तेव्हा होईल तोवर इंटरनेट आणि लोकल फोन सुरु ठेवण्यास काहीच हरकत नाही
पाणीटंचाई निवारणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही यवतमाळकरांना पाणीटंचाईचा त्रास होत आहे
अजून दोन महिने पावसाळा असल्याने पाऊस आला आणि धरणे भरून पाणी वाहू लागली कि जास्तीचे पाणी
रस्त्यांवर सोडले जाईल आणि पाणी नाहक वाया जाईल त्या ऐवजी लोकांना दररोज पाणीपुरवठा केल्यास हि वेळ येणार नाही
मागच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला लोकांनी त्या काळात संयमाने प्रशासनाला साथ दिली पण आता मुसळधार पाऊस पडूनही आणि धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पाणी योग्य नियोजना अभावी नियमित सोडल्या जात नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत पावसाळ्यातील कृत्रिम पाणीटंचाईला ते साथ तर देणार नाहीतच शिवाय पुढच्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवतील त्या मुळे संबंधितांनी ह्या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन फोर्सने नियमित पाणीपुरवठा करावा अशी यवतमाळ मधील नागरिकांची रास्त मागणी आहे
पाण्याअभावी शासनाची वृक्ष संवर्धन मोहीमही फोल आहे पाणी अत्यल्प आठवड्यातून एकदाच सोडल्यास पाणी पिण्यासाठी आणि इतर आवश्यक कामासाठीही पुरणार नाहीच आधीच दुष्काळात झाडे वाळून गेलीत सध्या पावसाळा आहे नंतरचे काय ? त्या मुळे ह्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे



Sunday 19 August 2018

नासाच्या मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी


Flight Engineers Oleg Artemyev and Sergey Prokopyev
          नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे अंतराळवीर Oleg आणि Sergey  -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -17 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे फ्लाईट इंजिनीअर  Oleg Artemyev आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आणि आगामी स्पेसवॉक व कार्गोशिपच्या आगमनाच्या तयारीसाठी 15 ऑगस्टला यशस्वी स्पेसवॉक केला
हा स्पेसवॉक सात तास सेहचाळीस मिनिटांचा होता हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकातून 12.17 p.m. ला स्पेसवॉक साठी बाहेर पडले आणि 8.05 p.m. ला स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले
ह्या सात तासांच्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकातील रशियन सेगमेंटचा बाहेरील भागात Small Technology Satellites आणि नव्या सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे आवश्यक पार्ट बसविण्यासाठी केबल बसवण्याचे काम पूर्ण केले

Roscosmos cosmonaut Sergey Prokopyev
       अंतराळवीर Sergey Prokopyev स्पेसवॉक दरम्यान केबल बसवताना -फोटो -नासा संस्था

जर्मन अंतराळ एजन्सी D LR आणि रशियन अंतराळ एजन्सी Roscosmos ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने नवा Icarus सायंटिफीक प्रयोग करण्यात येणार आहे ह्या प्रयोगांतर्गत पृथ्वीवरील  स्थलांतरित प्राण्याच्या हालचाली टिपण्यात येतील स्थानकाला बसवलेल्या अँटेना आणि GPS hardwareच्या मदतीने पृथ्वीवरील छोट्या प्राण्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाण्याच्या हालचाली ,त्यांच्या मुळे पसरणारे रोग आणि इतर घडामोडी ट्रॅक केल्या जातील आणि त्या वर संशोधन केल्या जाईल
आजवर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 212 वा स्पेसवॉक होता  Oleg Artemyev ह्यांच्या अंतराळवारीतील हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परिधान केलेल्या सूटवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि  20 नंबरचा आकडा असलेला हेल्मेट घातला होता
अंतराळवीर Sergey ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी 18 नंबरचे लेबल असलेले हेल्मेट घातले होतेआणि त्यांनी परिधान केलेल्या सुटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या

Friday 10 August 2018

Curiosity Mars Rover ने केले सहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण


                            मंगळावरील Curiosity Mars Rover -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -6 ऑगस्ट
नासाने मंगळावर पाठवलेले क्युरिओसिटी मंगळ यान गेल्या पाच वर्षांपासून मंगळावर अविरतपणे कार्यरत असून आता त्याने सहाव्या वर्षात यशवी पदार्पण केले आहे आणि नुकतेच Curiosity Rover ने त्याचा सहावा वाढदिवस साजरा करत असल्याच ट्विट पृथ्वीवर पाठवलय
Curiosity मंगळ यान 2011 सालच्या नोव्हेंबर मध्ये मंगळाकडे झेपावले आणि ऑगष्ट 2012 मध्ये मंगळावर पोहोचले तेव्हापासून ते मंगळावर कार्यरत आहे ह्या मंगळयानावर 17अत्याधुनिक कॅमेरे व लेन्स बसविलेले असून
त्याच्या साहाय्याने मंगळावरच्या जीवसृष्टीचे अस्तित्व शोधले जात आहे आणि त्या संबंधित माहिती व फोटो Curiosity पृथ्वीवर पाठवत आहे आणि संशोधित माहीती नुसार पूर्वी तिथे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे पुरावेही मिळत आहेत
Curiosity मंगळ यानाने पाच वर्षात मंगळावरील पाण्याचे अस्तित्व शोधून पुराव्यादाखल तिथल्या  आटलेल्या आणि पूर्वी तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे सबळ पुरावे देणारे काही ठिकाणचे फोटो पाठवले आहेत आहेत विशेष म्हणजे नुकतेच तिथल्या एका भागात गोठलेल्या बर्फाखाली वाहत्या पाण्याचे सरोवरही ESA ला सापडले आहे
ह्या मंगळयानाने त्याच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने गोळा केलेल्या भूगर्भातील मातीच्या उत्खननाचे नमुनेही पाठवले आहेत ते नमुने संशोधित केल्यानंतर त्यात जैविक अणूचे अंश ,सल्फर ,ऑक्सिजन ,कार्बन आणि नायट्रोजनचे अस्तित्व सापडले आहे

moving image showing darkening dust storm

          मंगळावरील वादळी वातावरणात Curiosity Mars Rover -फोटो -नासा संस्था

सध्या मंगळावर धुळीच्या वादळी वाऱयांचे प्रचंड वादळ उठले असून त्या वादळामुळे प्रचंड धुळीचे लोट वाहात आहेत त्या मुळेच तिथे असलेले दुसरे मंगळ यान रोवर अपारच्युनिटीचा संपर्क तुटला आहे पण Curiosity ने ह्या धुळीच्या वादळाचे फोटो जुलै मध्ये पाठवले असून सध्या ह्या यानाच्या साहाय्याने शास्त्रज्ञ ह्या वादळाची तीव्रता  आणि त्यातील धूलिकणांचा आकार व प्रमाण परमाणु ऊर्जेद्वारे संशोधित करत आहेत ह्या संशोधनाचा उपयोग आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी होईल अस संशोधकांच मत आहे
 2013 साली Curiosity मंगळयानाने त्याच्या पहिल्या वाढदिवशी " Happy Birthday " चा संदेश पृथ्वीवर पाठवला होता आता त्याच्या सहाव्या वाढदिवशी Curiosity वरून ट्विट करण्यात आलेय कि ,तो त्याचा सहावा वाढदिवस साजरा करतोय तेही तिथे असलेल्या आयर्न ऑक्साइड सोबत ह्या आयर्न ऑक्साईड मुळेच मंगळ ग्रहाला लाल रंग प्राप्त झालाय