Sunday 23 September 2018

पार्कर सोलर प्रोब यशस्वी पणे कार्यरत - प्रकाशाचे पाठवले फोटो




पार्कर सोलर प्रोबने पाठवलेल्या डावीकडील फोटोत मिल्की आकाशगंगेतील तारकासमूह आणि उजवीकडील फोटोत तेजपुंज तारकांमध्ये प्रकाशमान गुरु ग्रह -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -21सप्टेंबर
मागच्या महिन्यात सूर्याकडे झेपावलेल्या पार्कर सोलर प्रोब सौर यानाचा प्रवास निर्विघ्न पणे सुरु आहे हे यान प्रचंड आगीचे लोळ उठणाऱ्या सूर्याच्या प्रभामंडळात प्रवेशून तिथल्या वातावरणाची सखोल माहिती मिळवणार आहे त्या साठी ह्या यानाला आगीपासून बचाव करणारे संरक्षक कवच बसवले आहे नोव्हेंबरमध्ये पार्कर प्रोब सूर्याजवळ पोहोचेल आणि प्रत्यक्ष कार्याला सुरवात होईल पण त्या आधीच
पार्कर सौर यानाने प्रवासात असतानाच कार्यरत होऊन अवकाशातील प्रकाशाचे सुंदर प्रकाशमान फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत 
पार्कर सोलर प्रोब वर बसविलेली चार अत्याधुनिक उपकरणे आता कार्यान्वित झाली असून पार्कर प्रोब सूर्याच्या जवळ जात आहे आणि त्यावर बसवलेली अत्याधुनिक यंत्रणा चार्ज होऊन व्यवस्थित काम करत असल्याचे संकेत शास्त्रज्ञांना मिळत आहेत
पार्कर सोलर प्रोब सौरयानावर बसवलेल्या कॅमेऱ्याने यानाभोवतीच्या वातावरणातील प्रकाशाच्या सूक्ष्म कणांचे अत्यंत प्रकाशमान फोटो टिपले आहेत हा अवकाशातील दक्षिणेकडचा भाग आहे ह्या फोटोत सूर्य दृष्टीस पडत नाही पण उजव्या बाजूला गुरु ग्रह दिसतोय तर डाव्या बाजूला अत्यंत तेजपुंज मिल्की आकाशगंगेचा प्रकाशमान पट्टा दिसत आहे हे फोटो पार्कर प्रोब सौर यानाच्या WISPR' ह्या उपकरणाने टेलिस्कोपच्या साहाय्याने टिपले आहेत
सध्या हि उपकरणे कमी क्षमतेने काम करत आहेत पण जसजसे पार्कर प्रोब सूर्याच्या कक्षेजवळ पोहोचेल तसतशी त्यांची कार्यक्षमता वाढत जाईल पार्कर सोलर प्रोब नोव्हेंबर मध्ये सूर्याच्या जवळ पोहोचेल आणि सूर्याभोवतीचे प्रभामंडळ भेदून त्याच्या कक्षेत शिरेल तेव्हा पूर्ण क्षमतेने पार्कर प्रोब कार्यरत होईल
ह्या प्रभामंडळातील प्रचंड आगीच्या लोळातील इलेक्ट्रिकल व मॅग्नेटिक फिल्डमधल्या प्रकाश किरणांचा आकार,गती आणि प्रकाशाची तीव्रता ह्या विषयी पार्कर प्रोब सखोल माहिती मिळवेल त्या मुळे सूर्याचा करोना (तेजोवलय ) हा  सूर्याच्या खालच्या पृष्ठभागापेक्षा शम्भरपटीने का उष्ण आहे ह्याची माहिती मिळेल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करतात

No comments:

Post a Comment