Sunday 30 December 2018

नासाच्या पहिल्या मानवी चांद्रमोहीमेला झाली 50 वर्षे पूर्ण


Earthrise         चंद्राभोवती फेऱ्या मारताना Apollo मधून 24 डिसेंबर 1968ला घेतलेले  उगवत्या पृथ्वीचे हे विहंगम दृश्य
 फोटो- नासा संस्था

नासा संस्था - 
आकाशातील उगवता चंद्र नेहमीच मानवाला भुरळ पाडतो त्याची शीतलता मंद प्रकाशआणि त्याच चांदण्यातल अलौकिक सौन्दर्य! मग ती कलाकलाने वाढणारी चंद्रकोर असो कि पोर्णिमेचा प्रकाशमान पूर्ण चंद्र. कवी असो कि प्रेमीजन,चंद्राला पाहून कवींना कविता स्फुरते लेखकांना लेख. सौन्दर्याला तर चंद्राचीच उपमा दिल्या जाते
असा हा चंद्र सामान्यजनांप्रमाणेच वैज्ञानिकांनाही तेव्हढाच भुरळ पाडतो हा चंद्र कसा आहे त्या वर पृथ्वीसारखी सृष्टी आहे का? तिथे मानवाला अनुकूल वातावरण आहे का? ह्याचा शोध पूर्वीपासूनच शास्त्रज्ञ घेत आले आहेत आणि म्हणूनच शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ एकत्र आले आणि मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आणि चंद्राविषयीच कुतूहल शमल आपला भारत देशही त्यात मागे नव्हता आता तर मानवाने आकाशातील एक एक ग्रह पार करत सूर्यालाही गवसणी घातलीय त्या मुळे चांद्रमोहिमेच तितकस कौतुक राहील नाही
पण आधी अस नव्हत आकाशात दुरून दिसणाऱ्या चंद्राला गवसणी घालण अकल्पित आणि अश्यक्यप्राय होत पण शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमाने आणि आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वप्न साकार केल अमेरिकेच्या नासा संस्थेने प्रथम मानवाला अंतराळात पाठवल आणि त्यांनी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून आकाशातील चंद्र कसा दिसतो तिथून आपली पृथ्वी कशी दिसते ह्याच वर्णन करत तिथले फोटोही काढले त्या वेळी आतासारखी अत्याधुनिक यंत्रणा नव्हती तो दिवस होता 24 डिसेंबर 1968
यंदाच्या मेरी क्रिसमसला नासाच्या मानवी चांद्रमोहिमेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत पन्नास वर्षांपूर्वी प्रथमच मानवाने अपोलो यानातून चंद्राभोवती यशस्वी प्रदक्षिणा घातल्या होत्या
नासाच्या ह्या अभूतपूर्व यशाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि ह्या यशाला उजाळा देण्यासाठी नासा संस्थेने नुकतेच अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे SPIRIT  OF APOLLO ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
ह्या कार्यक्रमात नासाच्या Space Flight मध्ये मैलाचा दगड ठरलेल्या APOLLO 8 Missionच्या launching च्या वेळेसचा इतिहास नासाचे सध्याचे Administrator Jim Bridenstine ह्यांनी उलगडला
ह्या कार्यक्रमात ह्या अपोलो 8 मधून चंद्राला फेरी मारणाऱ्या  तीन अंतराळवीरानीं ह्या मोहिमेविषयी आणि प्रत्यक्ष चंद्रावर पोहोचल्यानंतरच्या  थरारक क्षणांचा अनुभव कथन केला
Frank Borman ,Jim lovell आणि Bill Andre हे ते तीन अंतराळवीर ज्यांनी अंतराळात Apollo 8 ह्या यानातून चंद्राभोवती प्रथम फेऱ्या मारल्या होत्या

Apollo 8 astronauts aboard Yorktown
                    Apollo 8 मिशन यशस्वी केल्याच्या आनंदात अंतराळवीर -फोटो -नासा संस्था

नासाचे प्रमुख Jim Bridenstine ह्यांनी त्यांच्या प्रभावी भाषणात सांगितले कि,हि मोहीम राबवण जिकिरीच आणि तितकच जोखमीच होत ह्या आधीची नासाची चांद्र मोहीम अयशस्वी झाली होती ह्या अंतराळवीरांना चांद्र मोहिमेवर पाठवताना त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण महत्वाच होत चांद्रमोहिमेवर निघालेले अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परततील ह्याची शाश्वती नव्हती
आधीची  Apollo 1 मोहीम अयशस्वी झाली होती यानाचा भडका उडन यान नष्ट झालं होत होता, त्यातील तीन अंतराळवीर Gus Grisson,EdWhite आणि Roger Chaffee हे प्राणाला मुकले होते
त्या नंतरची1965 ची अंतराळ मोहीमही फेल झाली होती त्या मुळे हि अपोलो 8 मोहीम अत्यंत कठीण होती त्या मुळेच ह्या अंतराळवीरांना प्रत्यक्ष चंद्राच्या भूमीवर न उतरवता अंतराळयानातून चंद्राभोवती फेऱ्या मारून तिथली माहिती मिळवण्याचे ठरले होते
हि मोहीम यशस्वी होईल किंवा अयशस्वी! हे अंतराळवीर पृथ्वीवर जिवंत परततील किंवा नाही! ह्याची शाश्वती नव्हती पण तरीही हि मोहीम राबवायचीच अस ठरवण्यात आल होत कारण तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी ह्यांच ध्येय होत कि ,जिथे जगण्याचे उधिष्ठ नाही त्या जगण्याला अर्थ नाही आजही नासा संस्थेच्या भिंतीवर हे वाक्य लिहलेल आहे
                             Where There Is No Vision The People Perish !
त्याच सुमारास अमेरिकेला Intelligence Information कडून माहिती मिळाली कि,रशिया डिसेंबर मध्ये मानवाला चंद्राभोवती किंवा चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे आणि त्या वेळेस अमेरिका आणि रशियात प्रचंड चुरस होती त्या मुळे रशियाच्या आधी अमेरिकन मोहीम राबवण्याचे ठरले त्यानुसार यानात आवश्यक बदल करण्यात आले आणि यान चंद्राच्या पृष्ठभागावर न उतरवता चंद्राभोवती फेरी मारण्याचे ठरवण्यात आले
Frank Borman म्हणाले -वेळ अत्यंत कमी होता अवघ्या चार महिन्यात एक,दीड वर्षाचे ट्रेनिंग आम्हाला पूर्ण करावे लागले त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले ट्रेनिंग अत्यंत कठीण होते खूप त्रास झाला तरीही आम्ही उत्साहात होतो साऱ्याचे ध्येय एकच होते राष्ट्राध्यक्ष केनडींच उधिष्ठ पूर्ण करण आणि रशियाच्या आधी चंद्रावर पोहोचण
Bill Anders  म्हणाले कि ,Apollo 8 ह्या मोहिमेला खूप प्रसिद्धी मिळाली आणि ह्या मोहिमेच्या यशाने पुढच्या मोहिमांचा पाया रचला
Jim Lovell - ह्यांनी सांगितल कि,मी यानात पाय ठेवला तेव्हा "मी खरच चंद्रावर चाललोय !"ह्या विचाराने मी आनंदित झालो
यानाने यशस्वी उड्डाण केले आणि आम्ही प्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा मारली आमच यान योग्य रीतीने कार्यरत झाल्याची खात्री पटली मग आम्ही यानाची दिशा चंद्राकडे वळवून चंद्राकडे मार्गस्थ झालो काही वेळाने खिडकीतून मागे वळून पाहिले तेव्हा पृथ्वी लहान,लहान होताना दिसत होती 
पृथ्वी ते चंद्र हा अंतराळ प्रवास तीन दिवसांचा होता 21 डिसेंबरला आमच Apollo 8 यान पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने निघाल होत आणि मानवाला घेऊन चंद्राभोवती फिरण्याची हि पहिली अंतराळ मोहीम होती
Apollo 8हे छोटस इंजिनाच्या स्वरूपातल यान होत 
Frank Borman ह्यांनी सांगितल,आपल्याला न दिसणारी चंद्राची बाजू अंधारात असल्याने त्याला dark side म्हटले जाते पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ती बाजू सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघाली होती,अत्यंत प्रकाशमान दिसत होती
ते पाहून आम्ही अचंबित झालो एखाद्या लहान मुलाला candy store मध्ये गेल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद आम्हाला झाला होता आम्ही आश्चर्यचकित झालो होतो विस्मयाने क्षणभर स्थंबीत होऊन चंद्राच्या त्या प्रकाशित भूमीकडे त्यावरील निनावी विवराकडे पाहात राहिलो
Bill Anders ह्यांनीही आपला अनुभव सांगितला ," मी लँडिंग site शोधण्यासाठी सुरक्षित जागा शोधून त्याचे फोटो घेण्यात व्यग्र होतो आणि अचानक मला एक सुंदर दृश्य दिसल एक सुंदर गोळा हळू ,हळू अंतराळात वर येताना दिसला ती पृथ्वी होती आजूबाजूच्या वातावरणात उगवती ती एकमेव रंगीत वस्तू होती माझ्याकडे Lighting Equipment नव्हते पण मी माझ्या जवळच्या कॅमेऱ्याने भराभर फोटो घेतले !" कारण वेळ खूपच कमी होता
Jim Lovell -म्हणाले मी,खिडकी बाहेर पाहिल तेव्हा पृथ्वी खूपच लहान दिसत होती मी अंगठा खिडकीवर ठेवून पाहिल तर अंगठ्याने पृथ्वी झाकली गेली ह्या विशालकाय milky Galaxy मध्ये पृथ्वी एक लहानसा बिंदू आहे
चंद्र करड्या रंगाचा आहे तो रंगीत नाही तो प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारखा किंवा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या रंगाचा दिसतो
आणि आपली पृथ्वी रंगीत आहे पृथ्वीवर वातावरण आहे सूर्य प्रकाश आहे त्यातून येणारी ऊर्जा आहे,सजीव सृष्टी आहे देवाने मानवाला दिलेला हा सुंदर रंगमंच आहे त्यावरची आपण पात्र आहोत त्या वर घडणार नाट्य आपल्यावर अवलंबून आहे
ज्या वेळेस हे तीन अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत पोहोचले तेव्हा अमेरिकेत नाताळ साजरा होत होता लोक उत्साहाने  सण साजरा करत होते सगळीकडे रोषणाईचा झगमगाट होता ह्या आंनदात भर टाकत ह्या अंतराळवीरांनी यानातून पृथ्वीवर संवाद साधला आणि नाताळच्या शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सुखरूप आहोत असं सांगून चंद्राच आणि उगवत्या पृथ्वीच्या सौन्दर्याच वर्णन केल तेव्हा नासा संस्थेतील ह्या मोहिमेशी संबंधित शास्त्रज्ञ तंत्रज्ञ अधिकारी आणि पृथ्वीवरील  लोकांचा आनंद द्विगुणित झाला 
       त्या वेळेस Apollo 8 च्या अंतराळवीरांनी Christmas साठी पृथ्वीवासीयांना दिलेला हा संदेश

"In the beginning God Greated Heaven & Earth The Earth was without form &void and darkness was upon face of the deep Siprit of God moved upon face of water God said ,"there be light & there was light God saw light and it was Good !"
From Crew Of Apollo 8," We close with Good Night Good Luck ! God Bless You On Good Earth "!
Frank Borman म्हणतात आमची हि मोहीम co-ordination चा उत्तम नमुना आहे आता अमेरिकेने space मध्ये यशस्वी भरारी मारलीय पण त्या वेळेस चंद्राविषयी कुतूहल होत आमच्या त्या मिशन मध्ये चंद्रावर लँडिंग साठी सुरक्षित जागा शोधण,चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा space craft वर होणारा परिणाम पाहण तिथे पाणी जीवसृष्टी अस्तित्वात आहे का हे शोधण हा मुळ उद्देश होता आणि त्या वेळेस हे काम अत्यंत कठीण आणि जोखमीच होत.

No comments:

Post a Comment