फोटो आणि व्हिडीओ नासा संस्था
नासा संस्था -15 nov.
नासा संस्थेच्या इंटर नॅशनल अंतराळस्थानकाला येत्या वीस नोव्हेंबरला वीस वर्षे पूर्ण होत आहेत आणि अंतराळस्थानकातील अंतराळवीरांच्या वास्तव्याला दोन नोव्हेंबरला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत गेल्या वीस वर्षात नासा संस्थेने ह्या अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत अनेक अंतराळवीरांना ट्रेनिंग देऊन अंतराळस्थानकात राहून दोनशेहून अधिक सायंटिफिक प्रयोगावर सखोल संशोधन करण्याची संधी दिली आहे
अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये राहून प्रयोग करणे सोपे नाही तिथे तरंगत्या अवस्थेत राहून संशोधन करणे तर त्याहून कठीण अंतराळस्थानकात प्रत्येकच वस्तू तरंगते मग ते पाणी असो किअन्न पण गेली वीस वर्षे अंतराळवीर हि कसरत करत स्थानकात राहून त्यांचे संशोधन यशस्वी करत आहेत यात महिला अंतराळवीरांगना पण मागे नाहीत
आपल्या भारतीय वंशाच्या कल्पना चावला,सुनीता विल्यम्सही अंतराळस्थानकात राहायला गेल्या होत्या दुर्दैवाने कल्पना चावलाचा अपघात झाला पण सुनीता विल्यम्स यशस्वी झाली नासाच्या केट रूबिन्स,सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेली सेरेना ऑनॉन-चान्सलर या सारख्या अनेक महिला अंतराळवीरांगनाही स्थानकात राहून यशस्वी संशोधन करून पृथ्वीवर परतल्या पेगी व्हाइटसॉन ह्यांनी तर अंतराळस्थानकात राहून कित्येक विक्रम केले जास्त दिवस अंतराळस्थानकात राहणे,जास्तवेळा स्पेसवॉक करणे स्थानकात यशस्वी भाजी लागवड करणे या सारखे अनेक विक्रम त्यांनी आपल्या नावावर नोंदवले आहेत
सध्या सेरेना स्थानकात राहून कॅन्सर वर यशस्वी उपचार पद्धती शोधण्यासाठी पेशींवर संशोधन करत आहे
स्कॉट केली ह्यांनी देखील स्थानकात पेगी प्रमाणेच लेट्युसची भाजी व झिनिया फुलांची यशस्वी लागवड करून त्यांची जोपासना केली केजल लिंडग्रेन ह्यांनीही व्हेजी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रोपांची निगा राखली
सध्या स्थानकात राहत असलेल्या अंतराळवीरांनी कमी उंचीच्या गव्हाची आणि नविन प्रकारच्या भाजीची रोपे स्थानकातील अत्याधुनिक ग्रोथ चेंबर मध्ये लावली आहेत ह्या रोपांची लागवड व्हेजी प्रकल्पाअंतर्गत केली जाते त्यासाठी रोपांना आवश्यक प्रकाश मिळावा म्हणून खास कलर लाईटिंगची सोय केली आहे आणि विशेष म्हणजे नुकतेच स्थानकात गहूही अंकुरले आहेत ह्या व्हेजी प्रकल्पा अंतर्गत स्थानकातील वातावरणात रोपांची होणारी वाढ आणि झिरो ग्रॅविटीचा होणारा परिणाम अभ्यासून त्यावर सखोल संशोधन केले जातेय
स्थानकात राहताना अंतराळवीरांना पृथ्वीवरील प्रिझर्व केलेले अन्न खावे लागते त्यांना ताजे अन्न,भाजी व फळे मिळावीत म्हणून हे अंतराळवीर स्थानकातील प्रतिकूल वातावरणात हा व्हेजी प्रकल्प राबवत आहेत शिवाय तिथल्या रुक्ष वातावरणात त्यांना विरंगुळा आणि बागकामामुळे मिळणारा आनंद मिळावा हाही हेतू आहेच
शिवाय तिथे राहात असताना तिथल्या झिरो ग्रॅविटीचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हेही अभ्यासल्या जातेय अपुरी झोप,सतत तरंगती अवस्था असल्याने हाडांवर ,डोळ्यांवर ,शरीरातील रक्ताभिसणावर होणारा परिणाम नोंदवून त्यावरही संशोधन केल्या जातेय
अंतराळातील फिरत्या लॅबमध्ये मानवी शरीरातील रक्त पेशींमधील DNA,RNA वर स्थानकातील वातावरणाचा काय परिणाम होतो हे रक्त नमुना घेऊन नियमित तपासून फरक नोंदवून संशोधन केल्या जातेय
पृथ्वीवरील भूकंप,वादळ ,पूर या सारख्या घडामोडीचेही निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या जातेय
अंतराळस्थानकात वेळोवेळी ह्या अंतराळवीरांच्या संशोधनासाठी लागणारे अत्याधुनिक सामान,अन्न व इंधन पृथ्वीवरून कार्गो space craft मधून पाठविल्या जाते नुकतेच नासा व जर्मनीचे कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळस्थानकात गेले आहे त्यातून हजारो टन आवश्यक सामान अंतराळवीरांसाठी पाठवण्यात आलेय शिवाय त्यात अंतराळवीरांसाठी आईस्क्रीम व ताजी फळे पाठवण्यात आली आहेत
स्थानकाला जोडलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या ,दुर्बिणीच्या साहाय्याने हे अंतराळवीर स्पेसवॉक करतात व स्थानकात येणाऱ्या कार्गो स्पेस क्राफ्ट साठी डॉकिंगची सोय करतात आणि ह्या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने संशोधनही यशस्वी करतात
स्थानकातील छोट्या जागेत,तरंगत्या अवस्थेत कसरत करत पाणी पिणे,जेवण,झोप हे तर ते करतातच शिवाय कधी मधी आवडते सिनेमेही पाहतात हे अंतराळवीर हे सार कस करतात हे पाहण्याची ,जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते त्या साठी वेळोवेळी नासा संस्थेने प्रसारित केलेल्या अंतराळवीरांच्या लाईव्ह चॅट कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान पृथ्वीवरील नागरिक,विध्यार्थी अधिकारी त्यांना प्रश्न विचारतात अंतराळवीरही त्यांना पाणी पिण्याचे व इतर क्रियांचे प्रात्यक्षित करून दाखवतात ,फोटो पाठवतात
नुकताच स्थानकात पाठवलेल्या Ultra High Definition (UHD ) कॅमेऱ्याने ह्याअंतराळवीरांनी त्यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्यातील त्यांची दिनचर्या,व्यायाम ,संशोधन या बरोबरच तिथल्या व्हेजी ग्रोथचेम्बरचे चित्रण करून त्याचा पहिला व्हिडीओ लाँच केला आहे आणि पृथ्वीवासीयांसाठी पाहण्यासाठी पाठवलाय
नासा संस्थेने ह्या व्हिडीओ बनवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल युरोपियन स्पेस एजन्सी,ISS National Lab आणि अंतराळ स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांचे आभार मानलेत
अंतराळवीर Alexander Grest,Serena Aunon-Chancellor,Ricky Arnold आणि Drew Feustel ह्यांनी हा व्हीडीओ बनवला आहे
No comments:
Post a Comment