अंतराळमोहीम ची 58 Anne McClain रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणि कॅनडाचे अंतराळवीर David Saint स्थानकाकडे जाण्यासाठी सज्ज -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -29 Nov.
नासाच्या अंतराळमोहीम 58 अंतर्गत नासाचे आणखी तीन अंतराळवीर अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत नासाची Anne McClain ,कॅनडाचे अंतराळवीर David Saint आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत 27नोव्हेंबरपासून त्यांच्या स्थानकातील प्रयाणाची पूर्व तयारी जोरात सुरु आहे अंतराळ स्थानकात राहायला जाण्याआधीचे कठीण ट्रेनिंग त्यांनी ह्या आधीच पूर्ण केले आहे
नासाची Anne McClain अंतराळवीर David Saint आणि अंतराळवीर Oleg स्थानकात राहायला जाण्याआधी कठीण ट्रेनिंग दरम्यान -फोटो -नासा संस्था
सोयूझ MS -11ह्या अंतराळयानातून हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे प्रयाण करणार आहेत सोमवारी तीन डिसेंबरला 6.31a.m.(EST) (5.31p.m.स्थानिक वेळ ) वाजता कझाकस्थानातील बैकोनूर येथील Cosmodrome वरून त्यांचे सोयूझ यान स्थानकाकडे झेपावेल
सोयूझ यान जवळपास साडेसहा तासांचा अंतराळ प्रवास पूर्ण करून स्थानकाजवळ पोहोचेल हे यान पृथ्वीभोवती चारवेळा परिक्रमा करेल आणि 12.35 p.m.ला स्थानकाच्या Poisk Moduleच्या Docking पाथ जवळ पोहोचेल
सोयूझ यान स्थानकाच्या नजीकच्या टप्प्यात येताच स्थानकातील यंत्रणा कार्यरत होईल
सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले मोहीम 57चे कमांडर Alexander Grest ,Flight Engineer Serena Aunon आणि Flight Engineer Sergey Prokopyev हे त्यांच्या यानासाठी डॉकिंग पाथची सोय करतील आणि स्थानकाचे दार उघडून त्यांना आत प्रवेश देतील
यान स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर जवळपास दोन तासांनी सोयूझ यान आणि स्थानकातील डॉकिंगचा मार्ग एकमेकांशी जोडला जाईल आणि अंतराळवीर आत प्रवेशताच स्थानकातील अंतराळवीर स्थानकात त्यांचे स्वागत करतील
अंतराळ मोहीम 57चे सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले अंतराळवीर वीस डिसेंबररला पृथ्वीवर परतणार आहेत जूनमध्ये हे तीनही अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी गेले होते
मोहीम 58चे हे नवे तीन अंतराळवीर साडेसहा महिने अंतराळस्थानकात राहून तिथल्या संशोधनात सहभागी होणार आहेत
अंतराळवीर David Saint व Anne McClain हे दोघेही प्रथमच स्थानकात राहण्यासाठी जाणार असून हि त्यांची पहिलीच अंतराळवारी आहे तर रशियन अंतराळवीर Oleg Kononenko हे चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहायला जात आहेत
ह्या अंतराळवीरांच्या अंतराळस्थानकाकडे प्रयाणाचे आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T .V वरून करण्यात येईल .
ह्या तीनही अंतराळवीरांनी जाण्याआधी नासा संस्थेच्या म्युझियमला भेट दिली तिथे त्यांनी ह्या आधी अंतराळस्थानकात राहायला गेलेल्या अंतराळवीरांच्या सह्या असलेल्या ठिकाणी सह्या केल्या तिघांनी सेल्फी काढले आम्ही स्थानकात राहायला जाण्यासाठी सज्ज आहोत असेहि त्यांनी सांगितले तर McClain आणि David प्रथमच अंतराळ प्रवास करणार असून स्थानकात राहायला जाण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक झालो आहोत असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment