यवतमाळ -२१ ऑगस्ट
यवतमाळ येथे गेल्या दोन महिन्यात भरपूर पाऊस पडला त्या मुळे यवतमाळला पाणी पुरवठा करणारी धरणे ओसंडून वाहू लागली तरीही यवतमाळातील पाणी पुरवठा मात्र नियमित केल्या गेला नाही अजूनही नळाला आठ दिवसातून एकदाच पाणी सोडण्यात येतेय विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून यवतमाळात सतत पाऊस पडत आहे तरीही बाहेर मुसळधार पाऊस पण घरातील नळाला अर्थातच घरात पाणी नाही अशी अवस्था यवतमाळकरांची झाली आहेआणि हे केवळ प्रशासनाची उदासीनता,निष्क्रियता आणि योग्य नियोजनाअभावी झाले आहे नागरिकांना अजूनही बिसलेरी आणि टँकरचा नाहक खर्च सोसावा लागतोय आधीच उन्हाळ्यात टँकर,बिसलेरी ,कॅन,स्टील टाक्या प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्या ,फिल्टर आदीचा खर्च सोसावा लागल्याने ते त्रस्त होते आता पावसाळ्यातही लोकांना कृत्रिम पाणीटंचाईमुळे आणि नेते आणि संबंधितांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा खर्च करावा लागतोय त्या मुळे लोक त्रासले नसले तरच नवल
आता भरपूर पाऊस पडलाय जिल्यात अनेक ठिकाणी पूर आलाय त्या मुळे पाणी समस्या संपली आहे निदान आता तरी संबंधीतांनी ह्या समस्येकडे लक्ष देऊन नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी यवतमाळकर सतत करत आहेत
यवतमाळला पाणी पुरवठा करणारे निळोणा व चापडोह प्रकल्प पावसाळा सुरु होताच अवघ्या दोन महिन्यातच भरून वाहू लागले त्या मुळे ह्या वर्षीच्या दुष्काळातील पाणीटंचाईने त्रस्त झालेले यवतमाळचे नागरिक आनंदित झाले टंचाईच्या काळात दोन महिने बंद झालेला पाणीपुरवठा आता नियमित होईल ह्या आशेत असलेल्या नागरिकांचा आता भ्रमनिरास झाला असून अजूनही पाणी दररोज किंवा एक दिवसाआड सोडण्यास प्रशासन तयार नाही मध्यंतरी काही नागरिकांनी मोर्चा नेऊन पाणीपुरवठा विभागाला चार दिवसातून एकदा पाणी सोडण्याची विनंती केली तरीही प्रशासन पाणीपुरवठा नियमित करण्यात असमर्थ आहे
यवतमाळकरांना गेल्या पाचसहा वर्षांपासूनच पाणीसमस्येचा त्रास सोसावा लागतोय पाणी कमी दाबाने येणे पाईपलाईन फुटणे ,नियमित न येणे नित्याचेच आहे ,पाणी बेसिनच्या नळाच्या उंचीपर्यंतही पोहोचत नाही वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही सतत नवीन पाईपलाईन टाकत असल्याचे सांगितले जाते पण वर्षभरानंतरही काम पुर्ण होत नाहीच
नागरिकांना गेले वर्षभर बेंबळा प्रकल्पातून पाणी पुरवठा करणार असे आश्वासन दिल्या जात होते ते कामही पूर्ण झाले नाहीच आणि ह्या कामासाठी जिथपर्यंत पाईप टाकण्यात आले ते पाइपही निकृष्ट दर्जाचे निघाल्याने टेस्टिंगच्या वेळी पाण्याच्या दाबाने पाइपच फुटले त्या मुळे आधीच उशिराने सुरु करणार असलेला प्रकल्प लांबणीवर पडला शिवाय पाईप फुटल्याने दुष्काळात पाणीच वाया गेले नाही तर आसपासच्या शेतीचेही नुकसान झाले
निवडणुकीआधी नागरिकांना चोवीसतास भरपूर पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन देणारे मंत्री सध्या भरपूर पाऊस पडून धरणे भरून वाहत असताना दररोज तर सोडाच एक दिवसाआड पाणीपुरवठा करू शकत नाहीत आणि हि परिस्थिती पावसाळ्यातली आहे म्हणजे पावसाळा संपल्यावर काय होईल ? ह्याच कामामुळे रस्ते खोदल्याने गेल्या ऑक्टोबर पासून इंटरनेट सेवा व लोकल फोनही बंदच आहेत आता त्यालाही वर्ष होत आले आहे अजूनही प्रशासन ढीम्म आहे आता वायफाय देण्याचे आश्वासन देण्यात येतेय हि सेवा जेव्हा सुरु होईल तेव्हा होईल तोवर इंटरनेट आणि लोकल फोन सुरु ठेवण्यास काहीच हरकत नाही
पाणीटंचाई निवारणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही यवतमाळकरांना पाणीटंचाईचा त्रास होत आहे
अजून दोन महिने पावसाळा असल्याने पाऊस आला आणि धरणे भरून पाणी वाहू लागली कि जास्तीचे पाणी
रस्त्यांवर सोडले जाईल आणि पाणी नाहक वाया जाईल त्या ऐवजी लोकांना दररोज पाणीपुरवठा केल्यास हि वेळ येणार नाही
मागच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला लोकांनी त्या काळात संयमाने प्रशासनाला साथ दिली पण आता मुसळधार पाऊस पडूनही आणि धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पाणी योग्य नियोजना अभावी नियमित सोडल्या जात नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत पावसाळ्यातील कृत्रिम पाणीटंचाईला ते साथ तर देणार नाहीतच शिवाय पुढच्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवतील त्या मुळे संबंधितांनी ह्या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन फोर्सने नियमित पाणीपुरवठा करावा अशी यवतमाळ मधील नागरिकांची रास्त मागणी आहे
पाण्याअभावी शासनाची वृक्ष संवर्धन मोहीमही फोल आहे पाणी अत्यल्प आठवड्यातून एकदाच सोडल्यास पाणी पिण्यासाठी आणि इतर आवश्यक कामासाठीही पुरणार नाहीच आधीच दुष्काळात झाडे वाळून गेलीत सध्या पावसाळा आहे नंतरचे काय ? त्या मुळे ह्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
No comments:
Post a Comment