Sunday 9 September 2018

मंगळावरील धुळीच्या वादळाला तोंड देत नासाचे Curiosity Mars Rover पुन्हा कार्यरत

NASA's Curiosity rover at its location on Vera Rubin Ridge
 Curiosity Mars Rover कार्यरत असलेला  मंगळावरील Vera Rubin Ridge हा भाग -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -8 सप्टेंबर

मंगळावर गेल्या महिन्यात धुळीचे भयानक वादळ घोंघावले होते तिथल्या प्रचंड धुळीच्या लोटात काहीकाळ   Curiosity मंगळयानाचे काम ठप्प झाले होते त्याचा पृथ्वीशी असणारा संपर्कही काही काळ तुटला होता पण आता मंगळावरील धुळीवादळ शमले आहे
धुळीमुळे अंधारलेल्या मंगळावरील Curiosity कार्यरत असलेल्या भागात आता सूर्यदर्शन झाल्याने Curiosity यान पुन्हा व्यवस्थित स्थिरावले आहे धुळीवादळा मुळे भरकटलेले व ठप्प झालेले Curiosity यान सूर्यकिरणांच्या सौर ऊर्जेने बॅटरी चार्जित करून पुन्हा कार्यरत झाले आहे
अत्याधुनिक यंत्रणेने बनवलेल्या Curiosity मंगळ यानाने ऑगस्ट मध्ये त्याच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Vera Rubin Ridge ह्या भागात ड्रिल करून नव्या खडकांचे नमुने शोधले आहेत आधी दोन वेळेस केलेल्या ड्रिल च्या वेळेस तिथे असलेल्या अत्यंत हार्ड खडकामध्ये खोदकाम करताना तांत्रिक अडचण येत होती म्हणून ह्या वेळेस  ड्रिलींगची जागा बदलली ह्या भागाला Stoer हे नाव दिले आहे 
Curiosity मंगळ यानाने शोधलेले नवे खडक अत्यंत कडक आहेत ते सिमेंट सारखेच कडक असल्याने त्यांचे ड्रिल करून पावडरच्या स्वरूपात सॅम्पल बनवणे अत्यंत कठीण काम आहे असे नासाचे ह्या प्रोजेक्टचे शास्त्रज्ञ म्हणतात
ह्या नव्या नमुन्यातील खडक विविध रंगांचे आहेत ते साध्या डोळ्यांनीही दिसतात पण काही नजरेच्या टप्प्याबाहेरच्या खडकाचे निरीक्षण करण्यासाठी इन्फ्रा रेड चा वापर करण्यात येतोय काही खडक टोकदार आहेत मंगळावर खूप पूर्वी पाणी वाहात होते ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे ह्या खडकांची झीज झाली असावी व प्रचंड वादळाचा परिणाम होऊन Erosion झाले असावे त्या मुळे ह्या खडकांची झीज होऊन खडक कडक व टोकदार झाले असावे असे शास्त्रज्ञाचे मत आहे ह्या खडकांमध्ये Hematite Mineralचे कण सापडले आहेत आणि हे मिनरल पाण्यात तयार होतात
सप्टेंबर महिन्यात आणखी दोनवेळा ह्या भागात खोदकाम केले जाईल त्या नंतर Curiosity चे त्या भागातील काम संपेल सध्या सापडलेले हे खडक अत्यंत कडक असले तरीही आतून ते मऊही असू शकतील आणखी खोदकाम करून त्यांची सखोल माहिती मिळेल
विशेष म्हणजे मंगळावरील ह्या प्रचंड भयानक धुळीच्या वादळाला तोंड देत Curiosity मंगळ यान शाबूत राहिले आणि आता स्व-कार्यक्षमतेने कार्यरतही झाले आहे
आता तिथले आकाश निरभ्र असले तरी वादळाच्या काळात तिथे अंधार दाटला होता सूर्यदर्शन दुर्लभ झाले होते
तेव्हाही काही काळ Curiosity मंगळ यानाने प्रचंड मोठ्या धुळीच्या लोटातही त्याच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने काही दुर्मिळ वादळी दृश्ये टिपली आहेत त्यात Curiosity च्या डेस्कवरही पातळ धुळीचे आवरण दिसतेय




No comments:

Post a Comment